स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रवास कर्नाळ्याचा

Indian Flag Shades

स्वातंत्र मिळवणं प्रचंड दुष्कर कार्य,
तरी आपल्या अनेक क्रांतीवीरांनी प्रसंगी जीव देऊन \ जीव घेवून स्वातंत्र मिळवलचं,

आपण तसे लाडोबा,
देशाच्या पारतंत्र्याची आपल्याला झळ बसली नाही,
देश गेली कित्त्येक वर्ष चालतोय आणि असाच चालत राहील असा आपला (गैर)समज,

खरं तर स्वातंत्र प्राप्ती पेक्षा काकणभर अवघड काम आपल्या अंगावर आहे, ते म्हणजे स्वातंत्र अबाधित राखण्याचं…………. !!!

स्वातंत्र अबाधित राखणं म्हणजे सैन्यात किंवा पोलिसातचं भरती होणं एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही.
आपण ज्या गोष्टीवर जीवापाड प्रेम करतो त्या गोष्टीची जीवतोड काळजी जरी आपण घेवू शकलो तरी आपल्या परीने स्वातंत्र आपण टिकवलेलं असतं.

सह्याद्रीत ह्याव होतं आणि त्याव होतं हे फक्त बोलून काहीच बंद होणार नाही,
चुकीच्या गोष्टी बंद पाडायच्या असतील तर एकीची वज्रमुठ बांधता यायलाचं हवी.
अगदी सगळ्या बाजूने विरोध हा दर्शवला जायलाच हवा.

हे कोण थांबणार?
डॉक्टर्स असोशियन की इंजिनियर्स असोशियन? की कोणत्या जाती-धर्माच्या नावावर चालणारी संस्था?

उत्तर सगळ्यांनाच माहितेय या पैकी कोणीही नाही, कारण तसा या पैकी कोणाचाच गड-किल्ले आणि सह्याद्रीशी रोजचा संबंध नाही.
मग गड-किल्ले आणि छत्रपती शिवराय आणि सह्याद्रीला गुरुस्थानी मानणारे आपणचं जर गप्प बसलो तर गडकोट आणि सह्याद्री पोरकेच राहिले की.

प्रत्येकांनी सह्याद्री भटकंती वेगवेगळी करावी, शिवकार्य करणार्यांनी वेगवेगळ्या संघटना काढाव्यात,
पण गडकोट-सह्याद्री स्वातंत्र टिकवण्याची जबाबदारी मात्र सगळ्यांनी उचलयलाच हवी, त्याला पर्याय नाही.

 

Source : Unknown

 

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *