प्लानचेट – Planchet Information In Marathi

प्लानचेट बद्दल माहिती मराठी मध्ये

३० वर्षापूर्वी प्लानचेट च एक खूळ आल होत . घरोघरी प्लानचेट चे प्रयोग चालू होते असे म्हंटले तरी हरकत नाही .
या साधनेसाठी एक गुळगुळीत फळी व तिवई यांचा उपयोग करण्यात येतो . तसेच एका कॅरम बोर्ड वर कापूर ठेवून तो पेटवून त्यावर लगेच एक छोटा ग्लास ठेवण्यात येतो . कापराची वात मावळली की तो ग्लास निर्यात ( vaccum ) होतो . कॅरम बोर्ड च्या चारी बाजूला A पासून Z पर्यंत अक्षरे लिहिलेली असतात . प्रयोगासाठी २-४ मनसे लागतात . त्यातील एका व्यक्तीस मिडिअम असे म्हणतात . सर्वांनी डोळे मिटून त्या ग्लासवर नुसते अलगद बोट ठेवायचे असते . मग मिडिअम कडून कोणाही मृत व्यक्तीच्या आत्म्यास मानाने बोलावण्यात येते . जर वेळाने तो ग्लास हलू लागतो व विशिष्ठ अक्षराकडे जाऊन परत मध्यावर येतो . तेथून तो परत दुसर्या अक्षराकडे जातो . अशा रीतीने ४-५ अक्षरे मिळून एखादे नाव तयार होते . असे झाले म्हणजे , त्या नावाची व्यक्ती प्लानचेटआली असे समजतात . त्यास काहीही प्रश्न विचारण्यात येतात व त्यांनी दिलेली उत्तरे सत्य असतात असे मानले जाते .

Planchet

पाश्चात्य देशात मृताम्याशी संभाषण करण्यासाठी ‘ प्लानचेट ‘ या साधनाचा फारसा वापर केला जात नसला तरी ‘ प्लानचेट ‘ या साधनेचा शोध परदेशातच लागला !
तो कसा लागला या बद्दलची सारीच हकीकत कल्पिताहून अद्भुत आणि मनोरंजक आहे.
अमेरिकेत newyork शहराजवळ हाईडव्हील या नावाचे एक खेडेगाव आहे . त्या खेड्यात fox आडनावाचे एक कुटुंब राहत असे . ३१ मार्च १८४८ ये दिवशी रात्रीच्या वेळी या कुटुंबाच्या घराच्या दारावर कुणीतरी हळूहळू ठोके मारीत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला . ठोके मारणारी व्यक्ती मात्र कुणालाच दिसत नव्हती .
त्यामुळे हा भुतट्किच प्रकार असावा असे fox कुटुंबियांना वाटले व त्यांच्या मनात थोडी घाबरत निर्माण झाली ; परंतु त्या कुटुंबात केटी फॉक्स या नावाची एक धीट मुलगी होती . तिने या प्रकारचा छडा लावण्याचा जणू निश्चयच केला . त्यासाठी तिने एक युक्ती करण्याचे ठरवले . ती दरवाजाकडे पाहत मोठ्याने म्हणाली ” बाबारे तू कुणीही असलास तरी चालेल ; परंतु मी टिचक्या वाजवीन तेवढेच ठोके तू दे ”
असे म्हणून तीने बोटाने काही टिचक्या वाजविल्या आणि आश्चर्य असे , की दारावर देखील तेवढेच ठोके वाजले !
यावरून , हि ठोके मारणारी व्यक्ती अदृश्य असली तरी तिलाही थोडीफार बुद्धी असावी असा निष्कर्ष तिने काढला .
हा सारा प्रकार त्यांच्याच शेजारी राहणारे एक कल्पक गृहस्थ मोठ्या कुतूहलाने पाहत होते . त्यांच्या डोक्यात लगेच वक कल्पना स्पुरली . ते त्या अज्ञात पिशाच्चाला उद्देशून म्हणाले , ” तू कोण आहेस हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे . तेव्हा मी आता A ते Z पर्यंतची सर्व मुळाक्षरे हळूहळू उच्चारतो . त्यात तुझ्या नावाचे अक्षर आले की तू लगेच ठोका दे . ”
अशा प्रकारे काही विशिष्ठ अक्षरे उच्चारल्या नंतर त्या पिशाच्चाने ठोके दिले . नंतर ती सगळी अक्षरे जुळवून वाचल्यावर एका मनुष्याचे नाव तयार झाले . ते नाव काही वर्षापूर्वी खून झालेल्या एका फेरीवाल्याचे नाव होते ! पुढे त्या केटी फॉक्स ची मध्यम शक्ती बरीच वाढली व तिला परलोकांतील अनेक दिवन्गतांचे संदेश तिला मिळू लागले ; परंतु अशा प्रकारे अक्षरे उच्चारून व ठोके ऐकून एक एक शब्द तयार करणे फारच जिकीरीचे होऊ लागले . त्यामुळे काही कल्पक लोकांनी एक गुळगुळीत कागदावर सर्व मुळाक्षरे लिहून मध्यभागी एक छोटासा ग्लास ठेवला व मृतात्म्यांना आवाहन केले .
आश्चर्य असे की तो ग्लास हळुहळु एकेका अक्षरावरून फिरू लागला व त्या अक्षरांचे मिळून एक वाक्य तयार झाले ! अशाप्रकारे प्लांचेट या साधनेचा शोध लागला व गूढविद्येची आवड असणारे लोक या साधनेच्या द्वारे परलोकातील मृत व्यक्तींशी संपर्क साधून त्यांच्याकडून परलोक जीवनाची माहिती मिळवू लागले .

Planchet करण्याचे आणखीही काही प्रकार आहेत .
स्टोव्ह चे Planchet
या प्रयोगात एका तव्यावर एक स्टोव्ह ठेवतात . हा स्टोव्ह अर्थातच पेटलेला नसतो . तव हळु नये म्हणून फेत्यासारखे गुंधाळलेले एक फडके ठेवतात . काही वेळा स्टोव्ह वर एक लहानसा पाट ही ठेवतात .
जर स्टोव्ह वर ताटली असल्यास पाटाची आवश्यकता नाही .
एवढी तयारी झाल्यावर २ – ३ मनसे या तत्लीव्र तिन्ही बाजूंनी आपल्या हाताची दोन दोन बोटे पालथी ठेवतात व एकाग्र चित्ताने एखाद्या परिचित आत्म्याला आवाहन करतात .

त्यानंतर एकजण त्या आत्म्याला उद्देशून ” आपण आला असाल तर ठोका द्या ” असे म्हणतो .
मृतात्मा आला असेल तर स्टोव्ह चा एक पाय किंचित वर उचलाल जाऊन तव्यावर एक ठोका पडतो . त्यानंतर ठोक्याच्या भाषेतच प्रश्नांची उत्तरे मिळतात म्हणजे , ” प्रश्न होकारार्थी असेल तर एक ठोका द्या , नकारार्थी असेल तर दोन ठोके द्या ” असे सांगून उत्तरे मिळवली जातात .

घाग्रीचे Planchet

या पध्दतीच्या ‘ प्लांचेट ‘ या प्रयोग बहुदा आश्विन शुध्द अष्टमीस रात्र केला जातो . या प्रयोगात एका पाटावर थोडे गहू पसरून त्यावर शुध्द पाण्याने भरलेली घागर किंवा कळशी ठेवतात . या कळशीत विड्याची पाच पाने घालून वर एक नारळ ठेवतात . कळशीच्या सर्व बाजूंना हळद – कुन्कुवाची बोटे ओढतात . नंतर तिची पूजा करून तिला माळ घालतात . त्यानंतर तिच्या भोवती तीन चार मनसे बसवतात . ही माणसेआपली बोटे कळशीस टेकतात व एखाद्या देवतेस किंवा मृतात्म्यास आवाहन करतात , नंतर एकजण “आपण आला असाल तर कळशी उजवीकडे वाळू दे ” असे शब्द उच्चारतो.

मृतात्मा आला असेल तर ” कळशी उजवीकडे वाळू दे , नकारार्थी असेल तर डावीकडे वळू दे ” असे म्हणतो .
त्याचप्रमाणे कळशी उजव्या किंवा डाव्या बाजूला वळते व प्रश्नांची उत्तरे मिळवली जातात .

दिव्यांचे Planchet

हे फार क्वचितच केले जाते . या प्लान्चेट च्या प्रयोग साठी एक जाडसर दोर घेतात . त्याची दोन्ही टोके हातात अडकवून दोन पदारांच्या आधाराने एक पेटती मातीची पानाती ठेवतात . आत्म्याला आवाहन केल्यानंतर पणती मागेपुढे झोके घेऊ लागते व त्यावरून होय किंवा नाही अशी उत्तरे मिळतात . या प्रकारच्या प्लान्चेट मध्ये पणती खाली पडून विझण्याची शक्यता असते . यात सविस्तर उत्तरे मिळत नसल्याने ही पध्दत तशी अपूर्णच म्हणावी लागेल .

या शिवाय कवटीचे प्लांचेट म्हणून एक प्रकार आहे ; परंतु ती खूपच अघोरी असल्याने ती न सांगणेच योग्य .
प्लांचेट वर आलेल्या मृतात्म्यांना दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात . पहिला प्रकार म्हणजे पूर्णपणे वयक्तिक स्वरूपाचे प्रश्न . यामध्ये प्रश्नकर्ते हे मृताचे नातेवाईक असतात . त्यांना मृत्तांचा विरह असह्य झालेला असतो आणि आपल्या प्रिय माणसाने अदृश्य स्वरूपात का होईना आपल्याशी बोलावे , आपल्याला काही सूचना किंवा संदेश द्यावा अशी प्रयोग कर्त्याची इच्छा असते .
काही वेळा काही महत्वाच्या खाजगी गोष्टींची मृतात्म्यांना हे प्रश्नकर्ते ‘ प्लान्चेट ‘ वर बोलावून घेतात व या वेळी ” आपण मृत्यू पत्र कोठे ठेवले आहे ? अमुक अमुक महत्वाचा कागद कोठे आहे ? तुमची काही इच्छा शिल्लक राहिली आहे का ?”
यासारखे प्रश्न विचारतात . काही मृतात्मे भावी काळाविषयी माहिती देतात , पण बहुतेक मृतात्मे स्पष्टपणे नकार देतात .
मृतात्म्यांची शक्ती भविष्यकाळात डोकावण्याची नसल्या मुले त्यांची उत्तरे कधी कधी चुकतात देखील.

दुसर्या प्रकारचे प्रश्न म्हणजे परलोकजीवना विषयी चे प्रश्न
खास जास्त करून जिज्ञासू आणि संशोधक यांचे प्रमाण जास्त आहे . ते कोणत्याही प्रकारचे वैयक्ती प्रश्न विचारात नाहीत . त्यांचे सारे लक्ष परलोक संशोधनावर खिळलेले असते .
Planchet मध्ये मृतात्म्यांकडून परलोक सृष्टीबाबत अनेक वेळा मोठी मौलिक माहिती प्राप्त होते . एकाच प्रश्न वेगवेगळ्या मृतात्म्यांना विचारला तरी त्याचे उत्तर सारखेच येते . आणि त्यामुळे ती माहिती विश्वासनीय असते .

जशी प्रत्येक साधनेची धन बाजू असते तशीच ऋण बाजू हि असते. या साधनेची हि तशीच एक ऋण बाजू आहे .
planchet मुळे काही माणसे वेडी झाल्याची उदाहरणे आहेत . बहुतेक जनांना डोके दुखी चा त्रास हमखास होतोच .
अशेच एक उदाहरण देतो . प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाचा एका व्यक्तीशी पत्र व्यवहार झाला होता .
एका पत्रात पुढील प्रमाणे मजकूर आला होता .
” माझ्याप्रमाणे दुसरीही पुष्कळ मंडळी त्यावेळी प्रयोग करीत होती . बहुतेकांनी डोक्याला त्रास होतो . म्हणून प्रयोग पुढे बंद केले . माझ्याबरोबर अजून एक व्यक्ती होती त्यांना पुढे कायमचे वेद लागले . माझा धाकटा भाऊ गावी प्रयोग करीत होता . तोही भ्रमिष्ट झाला . मला स्वतःला खुद्द planchet पासून काही त्रास झाला नाही . पण लवकरच मृतात्मे माझ्या कानाशीच बोलू लागले . तेव्हापासून ते फारच त्रासदायक झाले आहेत . त्यामुळे मी १९२१ नंतर मी कधीच planchet ला हात लावला नाही आणि आता देखील लावण्याची इच्छा नाही . ”

तसेच बहुतेक वेळा आपल्याला हवा तो मृतात्मा औजाबोर्ड ( planchett board ) वर येत नाही.
भलतच कोणतातरी पिशाच्च येउन खेळत बसतो . त्यामुळे बहुतेक वेळा फसगत होते आणि धोका संभावत .
/////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////////
संदर्भ :- प्लांचेट आणि परलोकजीवन ( वि. के.फडके )
मोहिनी विद्या साधन व सिद्धी ( अ. ल. भागवत )

Source : My Horror Experience

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *