नाळे बा – Nale Baa Marathi Horror Story

Nale Ba – Marathi Horror, Suspense & Thriller Story

 

मित्रहो आजची हि कथा आहे बेळगावची. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेलं हे गाव… तेव्हा साधारण साल १९८९ असेल…. त्यावेळी हे गावच होत. रवींद्र आज आपल्या साध्या पोस्टमनच्या मिळालेल्या नौकरीसाठी बेळगावला येऊन हजेरी लावणार होता. आणि शक्यतो झाला तर तिथेच ड्युटी जॉईन करून राहायचा बंदोबस्त करणार होता.
आपल्या गावाहून तो बेळगावला ट्रेनने यायला निघाला होता.

Nale Ba - Marathi Horror Story

Nale Ba – Marathi Horror Story

पोहोचता पोहोचता रात्र होत आली.. त्याने आपल्या कामाच्या ठिकाणी तार केली होती कि तो तिथे बेळगावला आज सायंकाळ पर्यंत पोहोचेल… पण घरच्या ठिकाणाहून निघतानाच ट्रेन लेट झाली होती. म्हणून इकडे बेळगावला देखील यायला ट्रेनला उशीर झाला.
पहिल्यांदाच तो येणार होता बेळगावला म्हणून त्याच्या ऑफिसमधील शिपाई त्याला न्यायला येणार होता.
परंतु रवींद्रला कळले होते कि आता तो तिथे स्टेशनवर नसणार कारण मलाच यायला उशीर झाला आहे. ट्रेन स्टेशनच्या जवळ आली होती. तसा रवींद्र ट्रेनच्या दारात येऊन उभा राहिला जवळ येत येत त्याला लाईटच्या खांबाखाली एक पिवळा बोर्ड दिसला
आणि त्यावर कन्नडमध्ये काहीतरी लिहील होत आणि रवींद्रला ते समजल नाही पण त्याने खाली लिहिलेलं देखील पाहिलं तेव्हा त्याला समजले कि तिथे लिहिले होते. “बेळगाव ” ट्रेन स्टेशनवर आली आणि ट्रेनमधून जेमतेम १०-१२ माणसे उतरली असतील…
त्यामध्ये रवींद्रदेखील होता. उतरताच त्याने एकवेळ सगळीकडे नजर टाकली.. पण त्याला अस कोणी दिसल नाही कि जे त्याची वाट पाहत आहे. आजूबाजूला काही कन्नड बोलणारेच लोक त्याला आढळून येत होते.
आणि रवींद्र त्याला मात्र कन्नडाचे क देखील येत नव्हते. रवींद्रच्या मनात आले कि आपण थोडावेळ थांबून पहाव कोणी आल तर ठीक नाही तर रात्र इथेच काढावी. पण तास नाही झाल…
रवींद्रला स्टेशच्या फाटकातून एक माणूस आतमध्ये येताना दिसला.. आत येताच तो platformवर इकडेतिकडे पाहत होता. जस कि कोणाला तरी शोधतोय. जेव्हा त्याची नजर रवींद्रवर पडली तेव्हा तो तत्काळ रवींद्रजवळ आला आणि म्हणाला, “नीव रवींद्र हौदिल्ला री सर ? ”
रवींद्रला ते समजलेच नाही कि तो काय बोलला.
तेव्हा रवींद्र जागेवरून उठला… आणि म्हणाला ‘काय ? काय म्हणताय ?” त्यावर तो माणूस हसला आणि कन्नड भाषेच्या स्वरात म्हणाला “तुमी रविंदर का ?”
तेव्हा रवींद्र वेळ न घालवता मान हलवत उत्तरला “हो हो मीच रवींद्र . पण तुम्ही ” तेव्हा तो माणूस परत त्याच स्वरात म्हणाला “मी लिंगप्पा तुमच ऑफिसच शिपाई ” तेव्हा रवींद्र उद्गरला
“मला वाटले कि कोणी येणारच नाही मला न्यायला ” त्यावर तो लिंगप्पा खुदकन हसला आणि म्हणाला “साहेब मी संध्याकाळी आलो आणि येऊन तुमच वाट बघत बसलो.. पण परत मला स्टेशन मास्तर कडन कळाल कि ट्रेन लेट येतय मी परत गेल आणि आता आल बघा ” असे म्हनत त्याने रवींद्रचे सामान उचलले आणि त्याला घेऊन चालू लागला.. फाटकाच्या बाहेर येउन पाहतो तर फक्त सायकलच त्याला दिसली..
रवींद्र काही नाही बोलला.. आता जे आहे त्यातच काम चालवून घ्याव लागणार होत.. कारण एवढ्या रात्री तिथ काही वाहन मिळणार नव्हत.. रविंद्र आपली एकच असलेली सुटकेस घेऊन मागे बसला.. आणि लिंगप्पा पुढे बसून चालवू लागला रस्ता एकदम सुन्न पडला होता सर्वत्र शांतता होती… फक्त रातकिडे किरर्र किरर्र आवाज करीत होते
स्टेशनवर एवढा बोलत असलेला लिंगप्पा आता सध्या एकदम शांत होता. त्याला अस शांत पाहून रवींद्रला अस्वस्थ होऊ लागल. म्हणून तोच बोलला “लिंगप्पा ” कि लगेच लिंगप्पाने त्याच वाक्य पूर्ण होईपर्यंत त्याला “श्श्श्श ” असे करत अडवले आणि शांत राहण्याचा इशारा केला. आणि म्हणाला “साहेब शांत रावा ” लिंगप्पाच बोलन रवींद्रला नाही समजल
त्यावर तो दबक्या आणि हळूवार स्वरांत उत्तर देत म्हणाला “नाळेबा ” त्याचां तो धीरगंभीर स्वर ऐकून रवींद्रच्या अंगावर सरसरून काटाच आला आजूबाजूचे गर्द झाडे आणि त्यांचा अंधार त्या काळ्या अंधारात इवलुश्या हलणाऱ्या पानाच्या हालचाली सुद्धा त्याच्या नजरेने टिपल्या गेल्या . रविंद्रला वाटले “नक्कीच इथ चोर डाकू दडलेले असणार ” अस विचार करीत त्याने परत लिंगप्पाला विचारले पण हळूवार आवाजात “नाळेबा कोणी चोर दरोडेखोर आहे का ” त्यावर तो लिंगप्पा उतरला “त्यांच्या पेक्षाहि भयानक ”
खांद्यावरच्या पिशवीतील पाणी काढून प्यायला पण त्याचे हात थरथरू लागले…त्याने पुन्हा लिंगप्पाला प्रश्न नाही केला. लिंगप्पा म्हणाला ” अंज बेदारी सर ” “म्हणजे , घाबरू नक साहेब मी असत नव्ह ” रवींद्रला थोड बर वाटल आणि तसेच ते गावाजवळ पोहोचले गाव जवळ येत एकदोन ठिकाणी कंदील दिसून येत होते आणि काही ठिकाणी बल्ब देखील होते.. व लाईट्स चे खांब देखील पण काही चलणारे तर काही अर्धमेल्यासारखे मिवमिव करत होते.
असच ते गावात पोहोचले जवळपास ११:३० चा वेळ झाला होता. लिंगाप्पाने रविंद्रला थेट त्याच्या ऑफिसच्या ठिकाणी नेले.. तस हि ते गावाच्या एका कोपऱ्याला आहे अस वाटत होत. कारण गावात येऊन सुद्धा ते लवकर येत नव्हत. लिंगाप्पाने रवींद्रला तेथे नेले आणि ऑफिस उघडून त्याला आत बोलवून घेतले.
व आत मधल्या लाईटस लावल्या.. व तेव्हा रवींद्रला समजून गेले कि हेच आपले ऑफिस आणि हीच राहायची जागा. कारण तेथे दोन खोल्या होत्या एका ठिकाणी त्याचा टेबल आणि आतल्या खोलीत त्याचा झोपण्याचा पलंग व बाकीच काही सामान. लिंगप्पा त्याला म्हणाला साहेब मी डब्बा तयार ठेवल होत तुमच्यासाठी खावून घ्या असे म्हणत लिंगप्पाने एकवेळ बाहेरच्या किरर्र अंधारात नजर टाकली. व मनोमन देवाच नाव घेऊन दार बंद केल
आज रात्रीला मी सोबत राहील तुमच” रवींद्रने होकार दिला आणि त्याने दोन घास खून घेतले. आणि तो आतमध्ये झोपला व लिंगप्पा बाहेरच ऑफिसमध्ये अंथरून करून झोपला… मध्यरात्र झाली होती. लिंगप्पाचा काय डोळ्याला डोळा लागत नव्हता. तो सारख उठून खात्री करून घेत होता कि
रविंद्र गाढ झोपी गेला आहे. पण व्हायचं तेच झाल लिंगप्पाला काहीक्षण डोळा लागलाच होता कि दार वाजले “रवी अरे बाळा रवी ” तो आवाज रविंद्रच्या आईचा होता.. आणि तो लिंगप्पाने देखील ऐकला होता. रवीच नाव घेत होती ती बाहेर उभा असलेली व्यक्ती त्यावरून लिंगप्पाला समजले कि जर रविंद्र साहेबांनी त्या हाकेला उत्तर दिले तर रविंद्रच्या जीवाला धोका होईल
गाढ झोपेत असलेल्या रविंद्रला तो ऐकू आला नाही तो आवाज वाढू लागला..
तसाच लिंगप्पा उठला आणि त्याने रविंद्रच्या कानावर आपले हात जोरात दाबून ठेवले जेणेकरून त्याला काही ऐकू येणार नाही.. आणि परत तो आवाज थांबला.. आणि पुन्हा त्या आवाजाने लिंगप्पाच्या बायकोचे रूप घेतले.. तो आवाज आता लिंगप्पासाठी होता.. ती हाक लिंगप्पासाठी होती..
लिंगप्पाने रविंद्रचे कान सोडून आपले कान धरले आणि तो आवाज ऐकू न यावे यासाठी प्रयत्न करु लागला.. लिंगप्पाच्या लक्षात आले कि या ऑफिसच्या दरवाज्यावर ते शब्द लिहिलेले नाहीयेत आणि थोडस धाडस करून लिंगप्पा दाराजवळ गेला आणि जोरजोरात म्हणू लागला “नळे बा ,नळे बा ” आणि तेव्हा तो बाहेरून येणारा आवाज बंद झाला… तेव्हा लिंगप्पाच्या जीवात जीव आला
सकाळ झाली तेव्हा रविंद्र उठला व त्याने पहिले कि लिंगप्पाने ऑफिस झाडले होते. आणि चहा नाष्ट्याचा प्रबंध केला होता पण सर्वप्रथम त्याने उठून ऑफिसच्या दरवाज्यावर कुंकवाने काही तरी लिहिले होते.. आणि ते होते “नाळे बा “…..
: रविंद्र उठला व त्याने अंघोळ वगेरे करून न्याहारी केली. लिंगप्पाने देखील थोडा चहा प्यायला ते देखील रवींद्रच्या आग्रह केल्यानंतर. आज लिंगप्पा रविंद्रला पूर्ण गाव दाखवण्यास घेऊन गेला जेणेकरून त्याला सर्व गाव माहित होईल आणि समजेल कुठला पत्ता कसा आहे ते.. रविंद्र लिंगप्पा सोबत सर्व फिरून पाहत होता..
तेव्हा अस सहज विचारव म्हणून त्याने लिंगाप्पाला विचारले “लिंगप्पा, अरे इथला जुना पोस्टमन, तो का सोडून गेला जॉब ? ” त्यावर लिंगप्पा काहीवेळ थबकला काय उत्तर द्यावे ते त्यालाच कळेना असे झाले होते. तरी देखील तो जीभ अडखळून बोलू लागला “नाही साहेब ते जून साहेब बघा लवकर गेल त्यांनी चूक केली होती ”
कसली चूक त्यावर लिंगप्पा मागे वळून रवींद्रला पाहत एका गंभीर मुद्रेत येऊन उतरला “दार उघडण्याची चूक ” त्यावर रवींद्र त्याच्याकडे गोंधळलेल्या चेहऱ्याने पाहू लागला.. आणि त्याने लिंगप्पाला विचारले “म्हणजे ?” त्यावर लिंगप्पा ते टाळत उडवत म्हणाला “हे घ्या साहेब माज घर आल बघा ” असे म्हणत लिंगप्पा ने रवींद्रला आपल्या घरात यायला आमंत्रण दिले आणि ते घरात आले घरात येताना दारातच चप्पल सोडते वेळी रवींद्रला त्या घराच्या दारावर लाल अक्षरात कन्नड मध्ये काहीतरी शब्द लिहलेले दिसले
रवींद्रला वाटले हे लिंगाप्पाचे नाव वगैरे असेल.. असा विचार करत तो आतमध्ये गेला.. आत लिंगप्पा ची पत्नी सुमैया होती.. रविंद्र त्यांच्या घरी पाहुणा आणि लिंगप्पा चा वरिष्ठ अधिकारी म्हणून आला होता.. लिंगप्पाने रवींद्रचा चांगला पाहूणचार केला. तेव्हा ( लिंगप्पाच्या पत्नीने लिंगप्पाला प्रथम कन्नडमध्ये काहीतरी विचारले.. आणि लिंगाप्पाने एकवेळ रवींद्रला पाहून आपल्या पत्नीकडे पाहिले व तसेच कन्नडमध्ये उत्तर दिले
तेव्हा सुमैयाचा चेहरा आश्चर्य आणि भीतीने लिंगप्पाला पाहत पुन्हा चिंतेच्या स्वरात म्हणाली “अस रात्री कस हो ?” तेवढच रवींद्रला सुमैया बोललेली समजल)
आणि रवींद्रने लिंगप्पाला विचारले “काय झाल लिंगप्पा काही परेशानी आहे का ?” त्यावर लिंगप्पा हसत उद्गारला “नाही साहेब अवो ते रात्री घरी नाहि ना आलो, म्हणून माझ बायको रागवल बघा ”
त्यावर रविंद्र “ओह माफ करा सुमैया ताई माझ्या मुळे लिंगप्पा येऊ शकल नाहीत (सुमैया ने तर त्या बाबतीत बोललेच नव्हते ती म्हणाली होती “अहो तुम्ही यांना आणायला सायंकाळी गेला होत् ना ?”
लिंगप्पा म्हणाला होता “हो पण ट्रेन लेट झाली मग मला रात्र झाली स्टेशनवर जायला आणि मग आम्ही रात्रीच जंगलाच्या रस्त्याने आलो ”
रात्री गावाबाहेर हे ऐकता सुमैया तेव्हा चकित झाली होती.. आणि तिने तेव्हा मराठीत म्हणाली होती कि “अस रात्री कस हो ?” हे होत त्याचं संभाषन)….. लिंगप्पा आणि रवींद्र आता जायला निघाले होते.. सुमैयाने त्यांना रात्री जेवायला यायला आमंत्रण दिले होते.. आणि ते दोघे हि बाहेर जायला निघाले जाता जाता रवींद्रला दाराच्या दुसऱ्या बाजूला नेमप्लेट दिसली.. त्यावर कन्नडमध्ये नाव होत तेव्हा रवींद्रने विचारले कि “लिंगप्पा अरे हे कोणाच नाव आहे ?” तेव्हा लिंगप्पा उत्तरला
हे होय साहेब हे माझ नाव बघा लिंगप्पा त्रीचीपल्ली अय्यर आणि तेव्हाच रवींद्रने आपला हात दुसऱ्या बाजूच्या दरवाज्याकडे वळवत म्हणाला “आणि मग हे काय लिहील आहे ” तेव्हा लिंगप्पा उडवत उत्तरे देऊ लागला “नाही साहेब इथ पोर खेळतात न त्यांनीच हे केल असल चला मी बाकीच्या ठिकाणी नेतो तुम्हाला ” रविंद्र देखील ठीक आहे अस म्हणत पुढे निघाला आणि आजुबाजूच्या काही मुख्य लोकांच्या ओळखी करून तो परत आपल्या ऑफिसला आला..
ऑफिसमध्ये जास्त काही काम नव्हत फक्त २० एक पत्र होती त्यावर पोस्टचा शिक्का मारायचा होता व ते लिंगप्पाच्या हाताने स्टेशनला पाठवायचं एवढच. रविंद्रला ऑफिसच काम झाल्यानंतर आतमध्ये थोड उबल्यासारख वाटत होत.. काही काम नसल्याने आणि लिंगप्पा हि स्टेशनवर गेला असल्यामुळे रविंद्र गाव फिरण्यासाठी बाहेर पडला..
गावात बऱ्याच ठिकाणी तो जाऊन आला.. बरेच लोक कन्नड बोलणारे होते.. म्हणून रवींद्रने काही कोणाशी न बोलता आपले गाव फिरू लागला.. मंदिरात गेला इकडे तिकडे करतो तो काही जुन्या घरजवळून जाऊ लागला.. तेव्हा त्याला तेच शब्द दिसले जे लिंगप्पाच्या घरावरच्या दारावर लिहिले होते..
[एक नाही दोन नाही तर तेथे असलेल्या संपूर्ण घरावर तस लिहील गेल होत. सायंकाळची वेळ होत आली… तेव्हा रवींद्रला वेगळच पहायला मिळाल.. सायंकाळ होताच लोक जणू घाई घाई करून इकडे तिकडे धावत होते. जणू अस की लवकर घरात पोहोचाव अस रवींद्र आजूबाजूने धावणाऱ्या कोणाला विचारणार तरी कसा त्यांना तर मराठी एवढी समजत हि नव्हती.. कोणी थांबायला हि तयार नव्हत. काही लोक त्याला कन्नड मधून ओरडू ओरडू सांगत होते कि जा इथला थांबू नकोस सायंकाळ होत आलीय
तेव्हा लिंगप्पाने रवींद्रची पहिली ओळख श्रीरामअण्णा शि करून दिली होती तेच दैवाने त्याला भेटले.. आणि त्यांनी रवींद्रला मराठीत सांगितले “साहेब सायंकाळी इथ या गावात अस एकट्याने फिरन बरोबर नाहीये हे लोक काही कारणाने पळतायत तुम्ही देखील जा इथून ऑफिसमध्ये आणि बाहेर नका येऊ” त्याचे तसे बोलणे ऐकून रवींद्रला आता एक पक्क वाटल कि नक्कीच या गावात चोर दरोडेखोर येत असतील रात्री. आता त्याला हि वाटल कि आपण हि इथून निघावं.. बघता बघता सबंध गाव जणू ओस पडल
कुत्रदेखील बाहेर दिसेनास झाल होत पोस्टाच ऑफिस देखील गावाच्या कोपऱ्याला होत.. रवींद्रला तेथे पोहोचायला उशीर होणार हे नक्कीच होत.. रविंद्र पावले झपझप उचलून चालू लागला.. आजुबाजूस कोणीच दिसत नव्हत सगळे लोक घरात जणू दडून बसले होते.. कोठेतरीच एका ठिकाणी कंदील पेटलेला होता. रवींद्रच्या डोळ्यावर अंधारामुळे झाकण पडू लागले..
दिसण जवळपास तरी मुश्कीलच झाल होत रविंद्रला सोबतीला देखील कोणीच दिसेनास झाल लिंगप्पाच्या घरी तरी कस जाणार त्याला अंधारात मार्ग हि माहित नव्हता. आणि लिंगप्पा देखील स्टेशनवर गेलेला होता . रविंद्र चालू लागला.. आणि त्याच्याकडून एक चूक झाली.. जे नव्हत व्हायला पाहिजे तेच झाले. रवींद्र रस्ता चुकला
आणि चुकीच्या रस्त्याने जाऊ लागला.. बराच वेळ चलत राहिल्यावर त्याला समजेनाच कि आपले ऑफिस का येत नाहीये ते. अजून काही अंतरावर गेल्यास त्याला कळून चुकल कि तो रस्ता चुकला आहे.. त्याला हे माहित नव्हत कि तो ज्या रस्त्याने सरळ जात होता. तो रस्ता स्टेशनचा होता.
पण आलो त्याच रस्त्याने परत फिरलं तर.. हो तसच करतो आलो त्या रस्त्याने परत जातो.. आणि रवींद्र परत माघारी फिरला व गावामध्ये जाऊ लागला.. गावात परत जात तो स्वतःचे अंग आकसून चलत होता. आजूबाजूस थोडीजरी हालचाल झाली तरी तिच्याकडे न पाहता पुढ चलत जात होता. आणि तितक्यातच त्याला एक चाहूल लागली
कोणाच्या तरी पावलाची ते पावले आणि त्या सोबत छन छन आणि खण खणट असा एक आवाज येत होता.. तर मध्येच सररर असा आवाज यायचा त्या आवाजामध्ये कोणाच्या तरी झपझप पडणाऱ्या पावलांचा आवाज होता.. रविंद्र ला समजले कि मागून कोणीतरी आपला पाठलाग करीत आहे. रविंद्रने आपल्या पावलांचा वेग अजून वाढवला ..
आणि त्या सोबतच त्याच्या मागून येणाऱ्या देखील पावलांची गती वाढली.. रविंद्र आता धावण्याच्या मुद्रेत येणारच होता कि मागून त्याला “शश्शकशुक ” असा आवाज आला तो आवाज ऐकताच रविंद्रच्या छातीत धडकीच भरली.. त्याने थेट देवाच नाम जपायला सुरु केल आणि अजून पावलांचा वेग वाढवला कि तितक्यात मागे असलेल ते संदिग्ध धावतच रविंद्रकड आले आणि त्याने गचकन रविंद्रचा खांदा पकडला.. रविंद्रचा प्राण अर्धा गेलाच होता तो पळणारक होता
कि मागून त्याला एक ओळखीचा आवाज ऐकू आला “साहेयब मी असत अव लिंगप्पा ” रविंद्रचा जीव परत आला. आणि त्याने चटकन मागे वळून पहिले तर लिंगप्पा खरच मागे उभा होता आणि ती देखील चैन पडलेली सायकल घेऊन त्या सायकलचाच आवाज होता तो छन खण करणारा व चैनचा असा आवाज होता तो..
रविंद्रला त्याला पाहून अस वाटल कि देवच आला त्याला वाचवायला… लिंगप्पा समजून गेला कि रविंद्र नक्कीच रस्ता चुकला असेल.. ते दोघे आता सोबत निघू लागले… लिंगप्पा रविंद्रला म्हणाला “साहेब आपण जेवढ लवकर होईल तेवढ लवकर चलल पाहिज बघा ” रविंद्रने त्याला चालता चालता विचारलेच “लिंगप्पा हे सगळ काय चालल आहे ? या गावात काय आहे नेमक चोर दरोडेखोर येतात का ?” त्यावर लिंगप्पा म्हणाला “नाही साहेब त्यापेक्षा पण हेदारीकेये म्हणजे बघा तुमच्या भाषेत ते भयंकर ”
रविंद्र पुढच बोलणार कि तितक्यात त्या दोघानाही दूरच्या झाडावर एक मोठी फांदी हलताना दिसली आणि तिचा तिचा मोठा आवाज झाला आणि तेव्हा लिंगप्पा आणि रविंद्र दोघांची नजर तेथे गेली आणि ते पाहताच लिंगप्पा रविंद्रच्या हाताला धरून त्याला धावण्यास ओरडू लागला. रविंद्रला समजले कि नक्कीच काही तरी धोका आहे
रविंद्र आणि लिंगप्पा धावू लागले.. झप झप पावले उचलत मध्येच अडखळत ते धावत होते.. मागून त्या झाडांच्या फांद्याचा जोरजोरात हलण्याचा आवाज येऊ लागला अस वाटत होत कि कोणीतरी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत त्यांच्या दिशेने येतय.. लिंगप्पा आणि रविंद्र आता जीव मुठीत घेऊन धावत होते. धावत धावत ते गावाच्या मधोमध आले… रविंद्र ने आता मागे वळून पाहिले… पण कोणीच नव्हते…. त्याला आता वाटले की.. धोका टळला…. लिंगाप्पा ने त्याला आपल्या घरी यायला सांगितले… ते दोघेही भितीने घामाघूम झाले होते.. तसेच ते लिंगाप्पा च्या घराच्या दिशेने चालू लागले…. घरा जवळ येताच.. लिंगाप्पा ने दार ठोठावले… आणि सुमैय्या ला हाक मारू लागला… आतमधे सुमैय्या हडबडून जागी झाली…तिला वाटत होते.. दारावर ”नाळे बा ” असे लिहिले असून देखील दार कस काय वाजत आहे….. तिने आतून लिंगाप्पा ला हाक मारून खात्री करून घेतली…तेव्हा लिंगाप्पाच बाहेर आहे.. हे पाहून तिने दार उघडले….
: आणि त्यांना आतमध्ये घेतले. ते दोघेहि आतमध्ये आले. आणि काही न बोलता दोघेहि घाबरलेले तसेच झोपी गेले.. त्यांनी सुमैयाला देखील काही सांगितल नाही कारण ती देखील घाबरली असती. सकाळ झाली होती. सकाळपर्यंत रविंद्रला लिंगप्पाने देखील काही सांगितल अथवा बोलल नव्हत.
रविंद्रने सकाळी उठून लिंगप्पाचे आभार मानले कि त्याने रविंद्र प्राण त्या जनावरांपासून वाचवले.. लिंगप्पालाकळून चुकल कि रविंद्रला अजून कळल नाहीये कि ते काही जनावर नाहीये तर ती दुसरीच गोष्ट आहे.
लिंगप्पाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला कि “साहेब तुम्ही इथ थांबू नका इथ या गावात राहण तुमच्यासाठी धोक्याच आहे या मी तुम्हाला सगळ सांगतो आज हा काय प्रकार आहे ? ” रविंद्र त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. आणि लिंगप्पाने त्याला सांगण्यास सुरुवात केली ” साहेब १ ते दीड वर्षापूर्वी बघा आमच्या गावात विचित्र घटना घडू लागल्या होत्या.. कोणी जर रात्री अपरात्री बाहेर निघाल तर ते जगत नसायचं बगा. कोणतरी त्याला मारायचं अस रोज रोज होऊ लागल.
मग आमच्या गावातल्या लोकांनी ठरवल कि सगळ्यांनी पहारा द्यायचा आम्ही सगळे रात्री गावाच्या एका मंदिरामाग ठिकाणी लपून राहिलो… आणि आमच्यातील एक जन असा धीट होता गुरुअण्णा तो त्या गोष्टीची वाट पाहत होता जशी ती विचित्र गोष्ट येईल तसे आम्ही सगळे तिच्यावर धावा बोलून तिला पकडावं सगळ्यांना आम्हाला वाटत होत कि जनावर आहे येऊदेत आम्ही सगळे मिळून पकडू त्याला पण” असे बोलत लिंगप्पा थांबला अनिदोन श्वास घेत तो पुढे म्हणाला ” साहेब जे विचित्र आल त्या रात्री ते पाहून आम्हा सगळ्यांची अवस्था सुकलेल्या पानासारखी झाली.”
रविंद्र म्हणाला “काय होत ते ?” लिंगप्पा पुढे बोलला “साहेब ते एक चेटकीण होत. लांबून ते घराघरावरून उड्या मारत आली होती आणि पहिल्याच घावात तीन आमच्या डोळ्यासमोर गुरुअण्णाला फाडल कि ओ सगळ रक्तच रक्त होत पसरलेलं आमच्या समोर आणि मांस ”
रविंद्र ते ऐकून हसू लागला.. “हाहाहा तुम्ही ..तुम्ही लोक आजच्या जगात या गोष्टी मानता का ? अहो ते नक्कीच जनावर असेल चेटकीण वगैरे काही नसत तस ” त्यावर लिंगप्पा गंभीररित्या उद्गारला “साहेब तुम्हाला काय वाटत तुमच्या आधीच्या पोस्टमन च काय झाल ?” रविंद्र उत्तरला “काय झाल त्यान इथून नौकरी सोडली आणि निघून गेला त्याच्या जागी मला भेटली नौकरी ”
त्यावर लिंगप्पा म्हणाला “नाही साहेब त्यान नौकरी नाही हे दुनिया सोडल ” रविंद्र थोडा गंभीर मुद्रेत आला आणि म्हणाला “म्हणजे ?” लिंगप्पा पुढे म्हणाला “साहेब जेव्हा ती चेटकीण आली तिने गुरुअण्णाला आमच्या डोळ्यासमोर फाडून टाकले.. आम्ही सगळे घरांनी पळालो पण आमच परेशानी इथच नाही संपल ते चेटकीण रोज रात्री येऊन आमच्या घरच्या लोकांच्या आवाजात आम्हाला हाक मारत आणि त्या हाकेला उतर देत जो कोणी बाहेर जाई ती त्याला मारत असायची कि वो त्यानंतर आम्ही लोक ठरवल कि गाव सोडायचं पण आमच मजबुरी अस होत कि आम्हाला ते पण जमत नव्हत मग आम्ही गावतल्या जुन्या लोकांना विचरल बघा तेव्हा त्यांनी सांगितल कि हे आम्ही आमच्या दारावर लिव्हून ठेवाव “ನಾಳೆ ಬಾ” असे कन्नडमध्ये लिहिलेला कपडा लिंगप्पाने रविंद्रच्या हातात ठेवला. त्यावर लिहील होत “नाळे बा ” रविंद्रने त्याचा अर्थ लिंगप्पाला विचारला “काय अर्थ होतो याचा ?” त्यावर लिंगप्पा म्हणाला “नाळे बा अर्थ असत साहेब याचा…. म्हणजे “उद्या ये ” आम्ही लोक आमच्या घरच्या दारावर हे कुंकून लिहल आणि जेव्हा जेव्हा रोज रात्री ती चेटकीण येत आणि हे वाचत तेव्हा ती जाऊन दुसऱ्या दिवशी यायचं अस रोज रात्री होत बघा साहेब पण जे तुमचे जुने पोस्टमन आले होते त्यांनी आमच ऐकल नाही आणि त्यांच्या दारावर हे लिहू दिल नाही बघा आणि त्या चेटकीणन त्यांना मारून टाकल दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी त्याचं प्रेत भेटल अस घडल साहेब हे सगळ तुम्ही माझ ऐका आणि निघून जा इथल नाहीतर अडकून पडताळ बघा तुम्ही इथ.”
रविंद्रने त्याच बोलन मनावर घेतल आणि लिंगप्पाने त्याला स्टेशनवर सोडल.. रविंद्रने देखील नौकरीपेक्षा जीव महत्वाचा समजला आणि तेथून काढता पाय घेतला.

*मित्रहो या ठिकाणी आजदेखील काही जुन्या घरावरती “नाळे बा” अस लिहिलेलं आढळून येत…. वरील दिलेल्या फोटो मध्ये ते दाखवण्यात आल आहे लाल वर्तुळामध्ये.
तेथील लोकांच अस म्हणन आहे कि ती चेटकीण जी रोज रात्री यायची ती…, ते वाचून वाचून तीच रोज गावात येन बंद पडल काही कालावधीनंतर लोकांना रात्री अपरात्री आवाज ऐकू येन किवा हाक ऐकू येन बंद झाल त्या कारणास्तव त्या चेटकीनेच नावच पडले
”नाळे बा ” आणि आज ती फक्त सापडते काही Urben legend लेखामध्येच …..

पण काय सांगाव कोणत्या हि रात्री त्या गावात लोकांना तिची हाक ऐकू येईल…….

 

Nale Ba – marathi horror story

You may also like...

16 Responses

 1. Shalaka Bhojane says:

  Chan ahe story pan intesting nahi

 2. Dhiraj says:

  Mala hi story faar aawadli. Jasta dramatic nasalyamule khari watate.

 3. Abhi Patil says:

  Hey mi proper belgaum cha aahe….lahan pani aamche mama amala sangay che…it’s real

 4. Abhi Patil says:

  Mi proper belgaum cha…aata kolhapur madye rahato… Juni manase hi story ajun sangtat

 5. Patil Kishor says:

  Mala hi story khup Awad li, pan mala he Kalat Nahi Jaya post masterla Kanada bhasha yet nahi tyachi posting tya gawat kshi zhali ?

 6. darshana says:

  Chaan ahe an interesting ahe

 7. Praju says:

  मला खुप आवडली ही गोष्ट

 8. Varsha pawar says:

  nice but not horror

 9. varsha says:

  nice but not horror

 10. Kamini vaity says:

  Khup chan story aahe..next story sathi all the best
  keep it up

 11. snehal says:

  nc story,, pan chetkinila vachata pan yet hot? next story sathi all d best …

 12. Shamli Bichkar says:

  Nice Story…..I like it

 13. yuvraj says:

  1 number… stuti sathi shabd nahit maza kade… kharo khar 1 number

 14. raj says:

  not interesting……………dont waste ur time ro read this one…………..

 15. riskrider says:

  gadhinglaj talukya madhye dekhil kityek gharavar he lihile hote mi svata vachale aahe.. pan 1989 sal navhe tar 1993-1996

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *