मायेचा बंध – Mayecha Bandh – Marathi Horror Story

कथा:- मायेचा बंध – Mayecha Bandh – Marathi Horror Story

(भाग-1)
कथाकार:- राकेश
सहाय्यक :- ईश्वरी
————————————————————————-
ट्रिंगsss ट्रिंगsss फोन एकसारखा खणखणत होता….घरात वाजणाऱ्या फोनचा आवाज लिफ्टमधून वर येत असलेल्या प्रियाच्या कानी पडत होता… लिफ्ट त्या floor वर येताच ती घाईत बाहेर आली, तिने लिफ्टचा दरवाजा बंद केला… आणि धावत ती तिच्या रूमकडे गेली.. गडबडीने तिने रूम चा दरवाजा उघडला .. एव्हाना फोन वाजायचा थांबला होता… ती घरात शिरली.. तिने एकदा त्या फोनकडे पाहिलं तर त्या फोनचा रिसिव्हर फोनपासून बाजूला पडला होता… तिला थोडंसं आश्चर्य वाटलं, तिने घराचा दरवाजा आतून लॉक केला ….पाठीवरची बॅग खाली उतरवून ती त्या फोनच्या दिशेने गेली … रिसिव्हर हातात घेऊन ती इकडे तिकडे पाहू लागली.. रिसिव्हर कसा बाजूला पडला असेल? तिच्या मनात तिने स्वतःलाच प्रश्न विचारला, मनाचा गोंधळ उडाला होता ,तिने फोनचा रिसिव्हर कानाला लावून पाहिलं पण फोन कट झाला होता, तिने फोनचा रिसिव्हर फोनवर ठेवला आणि इतक्यात “म्याव” असा एका मांजराचा आवाज तिच्या कानी पडला …तिने त्या दिशेला पाहिलं तिला कपाटाखाली अंग चोरून बसलेली लिली नावाची मांजर दिसली… गेल्याच महिन्यात लिली प्रियाला तिच्याच दरवाजा जवळ सापडली होती…ती कोण होती? कुठून आली होती तिला माहित नव्हतं पण ती मांजर दिसायला खूपच cute होती, तिच्या आकर्षक रूपाने प्रियाला असं काही आकर्षित केलं होत कि प्रियाने तिला स्वतःजवळ ठेवून घेतलं होत.
” ओह,, लिली, हिनेच पाडला असेल रिसिव्हर आणि आता जाऊन तिकडे बसलीय..” ती लिलीकडे पाहून मनाशीच म्हणाली …तिच्या बाबांचा फोन आला असणार हे तिला ठाऊक होत आणि म्हणून तिने तिच्या बाबांना फोन केला

 

मायेचा बंध - भाग १

मायेचा बंध – भाग १

” हा बाबा , बोल?.. अरे नव्हते घरात मी,,, कॉलेजवरून आता आलेय.., नाही रे मी नव्हता उचलला फोन , लिलीने रिसिव्हर पाडला असेल .. हो .., आज जरा उशीरच झाला यायला ..हो … कसा आहेस तू?. आहे मी बरी ,, नाही ठीक आहे मी, तू काळजी नको करुस….स्वतःची काळजी घे….सुट्टी मध्ये येणारच आहे ना तुला भेटायला मी , हो ..,पक्का…. नाही रे मी नाही स्वतःहून आठवण काढत तिची.. पण आठवण येणारच ना .. .. हो नाही मी स्वतःला त्रास नाही करून घेणार … प्रॉमिस..? हो ..ऐक ना बाबा मी नंतर करु तुला फोन..आताच आलेय ना कॉलेजहून… बाय” तिने फोन ठेवून दिला, डोळ्यात चटकन पाणी आलं आणि बाबांचा फोन आल्यावर ते नेहमीच यायचं …डोळ्यातून टपटपणार पाणी तिने अलगद हातानी पुसलं आणि क्षणभर तिने समोरच्या भितींवर लावलेल्या तिच्या ताईच्या म्हणजे श्रुतीच्या फोटोकडे पाहिलं तिचा हसरा चेहरा पाहून तीने हि किंचित स्माईल केली .. आणि मग ती किचन मध्ये गेली … दिवसातून एकदा तरी तिच्या बाबांचा तिला फोन यायचाच.,आणि ते साहजिकच होत कारण तिच्या बाबांपासून दूर मुंबई मध्ये प्रिया एकटीच राहत होती…प्रिया लहान असताना आईला पोरकी झाली होती…आणि काही महिन्यापूर्वीच तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे श्रुतीचा हि एका अपघातात मृत्यू झाला होता.. पण तिच्या आकस्मित जाण्याचा प्रियाला मोठा धक्का बसला होता ..ताईच्या मृत्यूनंतर काही दिवस प्रियाने स्वतःला खूप त्रास करून घेतला होता .. तिच्या आठवणीत ती तासंतास रडत बसायची….जणू स्वतःच अस्तित्व हरवल्यासारखं तीच ते वागणं असायचं, ती खूप बदलून गेली होती, ताईच्या आठवणी तिला ताईला विसरू देत नव्हत्या..येणाऱ्या त्या आठवणी तिला कधी रडवायच्या तर कधी गालातल्या गालात हसवायच्या हि ..तिचे बाबा हे सगळं जाणून होते आणि म्हणून तिने आपल्यासोबत येऊन राहावं असं त्यांना वाटत होत पण इथेच या घरात ताईच्या आठवणीत राहण्याचा प्रियाचा हट्ट होता… तिचे बाबा एका मल्टि-नॅशनल कंपनीत काम करत होते आणि काही वर्षांपूर्वी त्यांची बेंगलोर ला बदली झाली होती.. बाबा बेंगलोरला जरी गेले असले तरी प्रिया मात्र मुंबईतल्या घरी एकटीच राहायची…पण एवढ्या लांब राहून हि बाबांनी तिला सगळं पुरवलं होत.. महिन्याला तिला ते पैसे पाठवायचे..तिला जे हवं नको त्या सर्व गोष्टीकडे त्यांनि लक्ष पुरवलं होत , घरातली कामं , जेवण वगैरे या सर्व गोष्टींसाठी एक सुनीता नावाच्या बाईला हि त्यांनी प्रियाजवळ ठेवलं होतं… सुनीता सकाळी १० वाजता येत असे आणि कामं आटपून दुपारी प्रिया आल्यावर १ वाजता घरी जात असे आणि पुन्हा मग संध्याकाळी ५ वाजता येत असे पण आज दुपारचे २ वाजले होते, आणि प्रियाला रोजच्यापेक्षा बराच उशीर झाला होता…त्यामुळे प्रिया जेव्हा घरी आली तेव्हा सुनीता घरी नव्हती ..प्रियाने किचन मध्ये जाऊन पाहिलं , किचन मधल्या गॅस वरच्या एका टोपात भात होता आणि दुसऱ्या टोपात डाळ … त्या टोपांमध्ये असलेल ते जेवण तिने ताटात वाढून घेतलं आणि ती तिच्या रूम मध्ये येऊन बसली..दोन चार घास खाल्ले असतील कि तिला आठवलं
” ओह .. डाळीच्या टोपावर झाकण ठेवायला विसरले” तिने स्वतःला आठवण करून दिली आणि मग ते ताट तिथेच ठेवून ती परत किचन मध्ये आली..पण पुढ्यात असलेल्या डाळीच्या टोपावर ठेवलेलं झाकण पाहून ती क्षणभर गोंधळलीच…थोड्या आश्चर्यानेच तिने त्या टोपाकडे पाहिलं …
” अरे, मी ठेवलं होत का झाकण? .. पण मला कस नाही आठवत?” ती मनातच विचार करत होती.. काय झालंय माझ्या बुद्दीला, काही लक्षातच राहत नाही हल्ली” स्वतःच्याच डोक्यात मारत ती म्हणाली आणि पुन्हा ती रूम मध्ये आली, जेवण आटपून तिने ते ताट किचन मध्ये तसंच ठेवून दिल आणि मग ती रूम मध्ये येऊन झोपली… तिला जाग आली ते दरवाजाच्या बेल वाजण्याच्या आवाजाने…घड्याळात पाहिलं तेव्हा ५ वाजले होते, तिने बाहेर जाऊन दरवाजा उघडला …सुनीता आली होती … घरात शिरत सुनीताने प्रियाला स्माईल केलं ..
” जेवला ना हो मॅडम आज..” सुनीताने विचारलं
” हो,.. ” प्रिया म्हणाली
” बरं झालं बाई ,,, म्हणलं आता मॅडम काय करायच्या..काय माहित .., एक तर तुम्हाला नाय बाहेरच काय आवडत.. अन त्यात घरी पण काय नाय” सुनीता आल्याआल्याच घर आवरत म्हणाली
” काही नाही म्हणजे .. डाळ भात केला होतास कि?” प्रिया तिच्या मागे जात म्हणाली
” अवो कूट करणार?, ती आमच्या शेजारची म्हातारी अचानक सकाळीच गचकली ना, म्हणलं शेजारचचं हाय तर कसं जायचं ?, म्हणून सकाळीच पोराला पाठवलं तुमच्याकडं हे सांगायला कि मी सकाळी नाय येणार,संध्याकाळी येन” सुनीता सांगत होती
” काय? मग आज जेवण कोण करून गेलं?” प्रियाने आश्चर्याने विचारलं
” आता ते मी कसं सांगू?, मी तर आलेच नव्हते ना? माझं पोरग नाय आलं का सांगायला तुम्हाला?” सुनीताने विचारलं.
” नाही .” गोंधळलेल्या प्रियाने उत्तर दिल…
” असं हाय बगा हे पोरग , एक काम सांगितलं तर धड करत नाय…घरी गेल्यावर त्याचा समाचार घेते” असं बोलून सुनीता किचन मध्ये गेली पण प्रिया मात्र शॉक झाली होती कारण जर सुनीता सकाळी आलीच नव्हती तर जेवण कोणी केलं होत? ती तिथल्याच सोफ्यावर विचार करत बसली होती असं कसं होऊ शकत, कोण आलं असेल?, आणि कोणी येऊ हि कसं शकत..किंवा का येईल? तिला काहीच सुचत नव्हतं.. तिने क्षणभर डोळे बंद केले, डोळ्यासमोर तरळून गेलं ते तिच्या ताईच चित्र …ज्यात तिला ताईचातो गोंडस हसरा चेहरा दिसला…तिचा हसरा चेहरा जणू तिला हे सांगत होता कि मी अजून हि तुझ्या साठी तुझ्या सोबत आहे..
” चहा घेणार का …” आवाजाने ती दचकली तिने पाहिलं सुनीता तिला विचारत होती..
” हो कर थोडा.. आणि हो लिली कुठेय बघ आणि तिला हि दूध दे,, सकाळपासून काही नसेल पोटात तिच्या, तोपर्यंत मी फ्रेश होतेय ” असं म्हणून ती उठली आणि फ्रेश व्हायला निघून गेली ….
” लिली ..ए …लिली ” सुनीता आवाज देताच कपाटाखाली बसलेली लिली पटकन बाहेर आली..
” ए.. चल, तुला दूध देते प्यायला ..ये माझ्या मागून” सुनीता लिलीला म्हणाली पण लिलीच लक्ष सुनिताकडे नव्हतंच तिची नजर एका विशिष्ट ठिकाणी खिळली होती , आणि तिकडे पाहून ती ओरडायला लागली
” ए लीले , अग, तिकड नाय .. इकड हाय मी” सुनीता लीली कडे पाहत बोलली
पण लिली ची नजर मात्र त्या समोरच्या कोपऱ्यातून तसूभर हि हलत नव्हती ती तिकडे पाहून ओरडत होती ..गुरगुरत होती, सुनीता ने तिच्या नजरेच्या दिशेला पाहिलं पण तिला मात्र कुणीच दिसेना
” ए , लीले … काय आहे तिकडं” तिने पुन्हा विचारलं आणि मग अचानक जणू कोणाच्या तरी मागे धावल्यासारखी लिली धावली आणि त्या घरातुन बाहेर गेली
” ए लिली , अगं कुठं चालली ” असं म्हणून सुनीता हि तिच्या मागे गेली …काहीवेळ त्या घरात शांतता आणि मग थोड्या वेळात त्या शांततेला भंग करत बाथरूम मध्ये असलेल्या प्रिया ने सुनीताला आवाज दिला …
” ए सुनीता ताई .. टॉवेल दे ग” .. आवाज देऊन प्रिया थांबली पण सुनीताचा काही आवाज नाही आला
” सुनीता ताई… ऐकलस का..” ती पुन्हा ओरडली यावेळेस हि सुनीताचा काही आवाज नाही म्हंटल्यावर प्रियाने बाथरूमची कडी उघडली आणि ती दरवाजा खोलणार इतक्यात त्या बाथरूमच्या दरवाजावर थाप पडली,
” काय ग, किती उशीर” प्रियाने दरवाजा आडून हात पुढे करून टॉवेल घेत तिला विचारलं, पण खरंतर यावेळेस हि काहीच आवाज आला नाही .. थोड्यावेळात तिने स्वतःच आटोपून मग ती बाहेर आली …आणि थेट तिच्या बेडरूम मध्ये शिरली …आरशासमोर उभं राहून केस विचारात असताना तिने पुन्हा सुनीताला आवाज दिला
” सुनीता ताई … चहा झालाय का?” .. पण यावेळेस हि सुनीताचा काही आवाज नाही आला ..
” हि आवाज का देत नाहीये?” स्वतःशीच बोलून ती तिच्या बेडरूम मधून किचनमध्ये आली पण तिथे सुनीता नव्हती ..तीने हॉल मध्ये येऊन पाहिलं तर तिथे सुनीता तिच्या नजरेस पडली नाही..
” लिली .. where आर u पिल्लू” तिने लिलीला आवाज दिला पण लिली हि कुठे दिसेना
” कुठे गेल्या ह्या दोघी?” ती विचारात पडली कि इतक्यात सुनीताच्या आवाजाने तीच लक्ष वेधलं
“ओ मॅडम तुमचं पिल्लू खाली पळालं होत.” सुनीता लीलीला घेऊन घरात शिरत म्हणाली.
“काय? .. तू आता खाली होतीस?” प्रियाने आश्चर्यांने विचारलं ..
” हो ..मॅडम हि लिली पळाली म्हणून हिच्या माग गेले , दूध बी पिली नाय हि..लय दमवती बगा ” सुनीता पुढे म्हणाली
” अगं पण मग .. मघाशी ..” प्रिया बोलता बोलता थांबली,
” मगाशी काय..” सुनीता ने विचारलं
प्रिया ने तिच्याकडे पाहिलं …आणि ती सावरत म्हणाली
” नाही काही नाही … तू जा ..” एवढ बोलून तीने पुन्हा श्रुतीच्या फोटोकडे पाहिलं आणि ती श्रुतीच्या फोटो जवळ आली … सुनीता लिली ला घेऊन आतमध्ये गेली होती ..
प्रिया आता एकटक श्रुतीच्या फोटोकडे पाहत होती आणि डोळ्यांतुन एक अश्रूचा एक थेम्ब घरंगळत तिच्या गालावरून हनुवटी पर्यंत आला होता
” ताई तू आहेस का..ग?” ती श्रुतीच्या फोटोकडे पाहून बोलली, तिचे डोळे पाणावले होते, तिने डोळे बंद केले.. आणि मग तिला आठवला तो भूतकाळ ..
ज्या दिवशी तिचा वाढदिवस होता … सकाळचे ८ वाजले तरी प्रिया बेडवरच निजली होती आणि मग ” हैप्पी बर्थडे to you ..” असा आवाज तिच्या कानात घुमला आणि तिची झोप मोड झाली .. तिने डोळ्यांच्या पापण्या किंचित उघडून पहिल्या आणि श्रुती ताईला समोर बघून तिच्या चेहऱ्यावर smile आली
” थँक you …ताई” ती उठत म्हणाली
” काय हे?.. आज वाढदिवशी पण इतका वेळ झोपायचं का?” श्रुती म्हणाली
” उशीर झाला ना झोपायला.. म्हणून” प्रियाने स्पष्टीकरण दिलं
” प्रिया … लवकर झोपत जा ग बाळा… आजारी पडशील अश्याने” श्रुती म्हणाली
” नाही ग… नाही पडणार मी आजारी .. आणि पडलीच तर तू आहेच ना माझी काळजी घ्यायला” प्रिया तिच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली
” हो आज आहे .. पण उद्या नसले तर?” श्रुती म्हणाली
” ए .. का नसशील तू?..तुला कुठे हि जाऊ देणार नाही हा मी, लग्न होऊन जिथे जाशील ना तिथे येईन मी… ” प्रिया नाक मुरडत म्हणाली दोघी हि हसल्या …
” हे बघ मी कुठे हि जाणार नाहीये , नेहमीच असें तुझ्या सोबत” श्रुती हसत प्रियाच्या डोळ्यात पाहत म्हणाली
प्रियाने तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे एकटक पाहिलं
“काय झालं? अशी का बघतेयस?” श्रुतीने विचारलं
” तुझ्या गालावरची खळी किती मोहक वाटते ग …असं वाटत तू असाच हसत राहावं आणि मी तुला बघत राहावं …खरं सांगू का ताई .. तुझ्या गालावरची हि खळी पाहिली ना कि खूप jeouls वाटत हा मला …” प्रिया इतकंच म्हणाली आणि श्रुती खळखळून हसली आणि ती प्रियाला बिलगली ..डोळ्यातलं पाणी जेव्हा हनुवटीपर्यंत येऊन खाली टपटपल तेव्हा ती त्या भूतकाळातून पुन्हा भानावर आली ..डोळ्यात आसवांच पाणी घेऊन ती तिच्या रूम मध्ये आली ..
” ताईच अस्तित्व इथेच आहे मग ती मला दिसत का नाहीये …ताई .. एकदा ये ग समोर .. बोल ना माझ्याशी..” कधी स्वतःशीच बोलत होती तर कधी ताईशी बोलण्याचा प्रयत्न करत होती…तीच रडणं आता वाढलं होत …रडता रडता जेव्हा ती शांत झाली तेव्हा तिच्या कानावर सुनीताच्या भांडण्याचा आवाज पडला ….” अंदर नही आनेका, अंदर नही आनेका बोलाना … दिया ना तुमको अभि भात .. जावो तुम अब..अरे सुनाई देता क्या .. जावो बोला इधर से ” सुनीता कोणालातरी सांगत होती…प्रियाने डोळे पुसले आणि ती उठून बाहेर आली पण तोपर्यंत सुनीताने त्या व्यक्तीला घालवलं होत आणि ती दरवाजा बंद करत होती..
” काय.. ग? कोण होत?” प्रियाने बाहेर येताच विचारलं
” आवो कुणीतरी बाबा होता .. भिक्षा मागत होता .. दुपारचा भात दिला त्याला” सुनीताने सांगितलं
” अगं पण भांडत का होतीस.. त्याच्याशी” प्रियाने विचारलं..
” भांडू नाय तर काय .. घरात शिरत होता … इधर कोई हे, इधर कोई हे ,. कोई शक्ती है,. असं कायतरी बडबडत होता.. त्याला म्हंटल मी इथं मी आणि आमच्या मॅडम हायत आणि ती लिली.. तुम जावो यहांसे ..पण ऐकतच नव्हता .. धोका हे..धोका हे करून डोकाच फिरवला त्यानं .. म्हणून ओरडले त्याला आणि केला दरवाजा बंद, तुम्हाला सांगते हे असले बाबा कायतरी निम्मित सांगून घरात शिरतात आणि घर साफ करून निघून जातात… ” सुनीताने सांगितलं.. पण प्रियाने तीच इतकं काही ऐकलंच नाही ती तशीच घाईत दरवाजाजवळ आली , आणि तिने तो बंद दरवाजा पुन्हा उघडला आणि बाहेर येऊन पाहिलं पण बाहेर कुणीच नव्हतं ..ती हिरमुसली ..तिला त्या बाबाला भेटावसं वाटलं होत, कारण बाबा म्हणल्याप्रमाणे घरात कुणीतरी नक्कीच होत, पण तो बाबा निघून गेला होता … ती पुन्हा घरात आली ..
” हे बघ जर पुन्हा तो आला तर मला आवाज दे.. असं तिने सुनीताला सांगितलं
” अहो पण मॅडम …मी ” सुनीता पुढे काही म्हणणार कि इतक्यात पुन्हा दरवाजाची बेल वाजली.. प्रियाने सुनिताकडे पाहिलं आणि मग लगबगीने तिने दरवाजा उघडला. तिला वाटलं तोच बाबा असेल पण तो बाबा नव्हता एक कुरिअर बॉय होता …
” प्रिया इनामदार ?” त्याने विचारलं
” येस ..मीच ” ती म्हणाली
” तुमच्यासाठी पार्सल आहे ..इथे साइन करा ” त्याने तिला एक कागद आणि पेन दिला ..तिने साइन करून ते पार्सल ताब्यात घेतलं आणि मग पुन्हा दरवाजा बंद करून ती पार्सल घेऊन आतमध्ये आली ..
” काय आहे वो मॅडम” सुनीताने तिच्या हातातल्या पार्सलकडे पाहत विचारलं
” बाबाने बेंगलोरहुन गिफ्ट पाठवलंय .. उद्या वाढदिवस आहे ना माझा ” प्रिया म्हणाली ..
” काय म्हणता .. हैप्पी बड्डे ” सुनीता हात पुढे करत म्हणाली ..
” अगं आज नाहीं.. उद्या आहे ..असो तरी पण thank you ” प्रिया स्माईल करत म्हणाली ..
” बघा कि उघडून काय हाय ते ” सुनीता उत्सुकपणे म्हणाली … प्रियाने गिफ्ट उघडलं .. एक सुंदरसा मोहक नेकलेस होता .. तिने तो बाहेर काढला..
” मॅडम काय झाक हार हाय वो ..खूप सुंदर हाय , मस्त वाटेल तुमच्यावर …” सुनीता तिच्याकडे आणि त्या नेकलेसकडे पाहत म्हणाली .. प्रियाने तिच्याकडे नुसतंच स्माईल करत पाहिलं ..
” बरं.. लिली ने दूध प्यायलं का? ..” प्रिया ने पुढे विचारलं
” हो .. दूध पिऊन लिली झोपली पण ..आणि चहा पण बनवलाय आणते मी” असं बोलून सुनीता किचन मध्ये गेली…प्रियाने तिच्या बाबाला फोन करून गिफ्ट मिळाल्याचं आणि आवडल्याचं हि सांगितलं थोड्यावेळात सुनीताने प्रियाला चहा आणून दिला..
” कोण होता तो बाबा? .. त्याला भेटायला हवं..तो माझी ताईशी भेट करून देऊ शकतो.. पण त्याला शोधू कुठे? चहा घेत ती मनातल्या मनात हाच विचार करत होती..
” सोसायटी मध्ये जस तो आपल्या घरी आला होता तसा आणखीन कोणाकडे गेला असेल?” तिने स्वतःला प्रश्न केला ” विचारून बघूया” ती स्वतःशीच म्हणाली आणि मग घराबाहेर आली … इमारतीत बऱयाच लोकांना विचारून पाहिलं पण त्याला कुणी ओळखत नव्हतं .. हतबल होऊन ती घरात आली …..निराश चेहऱ्याने तिने एकदा श्रुतीच्या फोटोकडे पाहिलं .. श्रुतीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून लटक्या रागाने ती म्हणाली
” तुला हसू येतंय ना?” .. पण बघ लवकरच तुला मी भेटेन कि नाही ते ….ए पण भेटल्यावर हि तुझं हसणं मला दिसायला हवं हा …तुला माहितीय ना हसल्यावर तुझ्या गालावर जी खळी पडते ती आवडते मला..”
आणि इतक्यात दारावरची बेल पुन्हा वाजली , प्रियाने दरवाजा उघडला .. एक साधारण ४० वर्ष वय असलेला माणूस उभा होता …
” येस?” तिने त्याला प्रश्नार्थक नजरेने विचारलं
” मी , जनार्दन कदम .. समोरच्या “बी” विंगेत राहतो” त्याने स्वतःची ओळख प्रियाला करून दिली
” मला जरा महत्वाचं बोलायचं होत तुमच्याशी…मी आतमध्ये येऊ शकतो” त्याने तिच्याकडे पाहत विचारलं ..तिने त्याच्याकडे पाहिलं , काहीतरी महत्वाचं आहे असं त्याचा चेहरा तिला स्पष्ट सांगत होता, तिने थोडा विचार केला आणि मग त्याला आतमध्ये येण्यास परवानगी दिली…तो घरात शिरत सोफयावर येऊन बसला
” बोला … ” प्रिया त्याच्या समोर बसत म्हणाली
” त्याने आधी घरात इकडे तिकडे पाहिलं आणि त्याची नजर भिंतीवरच्या श्रुतीच्या फोटोकडे गेली…एका अनामिक भीतीने तो त्या फोटोकडे पाहू लागला …
” काय झालं?” प्रियाने त्याच्याकडे पाहत विचारलं
” तुमच्या घरात काही आहे का?” त्याने अडखळत विचारलं
” म्हणजे ?” तिने प्रश्न केला
” म्हणजे काहीतरी , (श्रुतीच्या फोटोकडे पाहत) कुणीतरी आहे का?” त्याने पुन्हा प्रियाकडे पाहत विचारलं .. प्रियाने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि आणि मग एकदा श्रुती च्या फोटोकडे पाहिलं..ती थोडीशी थांबली आणि मग तिने पुढे विचारलं
” असं का विचारताय तुम्ही?”
” अं..actually , मघाशी ते बाबा तुमच्या दारात उभे होते …ते पाहिलं मी” तो माणूस प्रिया कडे पाहत म्हणाला ..
” हो होते,…पण मला अजून कळलं नाही .. कि तुम्ही हे सगळं का विचारताय मला?” तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला
” अं .. ते .. मला जाणून घ्यायचं आहे ,.. इकडे काय आहे?” तो अडखळत बोलला आणि त्याने प्रियाकडे पाहिलं ..प्रियाची नजर स्थिरपणे त्याच्या चेहऱ्यावर खिळली होती …त्याच्या चेहऱ्यावरची ती अनामिक भीती तिने टिपली होती पण तरीही तो इसम त्या घरातल्या गोष्टी जाणण्यास इतका उत्सुक का होता?,,..
…….
क्रमश:…

You may also like...

14 Responses

 1. Ramesh says:

  खुपच छान

 2. rachana says:

  Mastach ahe story…

 3. Snehal says:

  Khup chhan ahe storyyyy…..

 4. minakshi says:

  khoopach masta story

 5. AVINASH says:

  ek number. Heart touching. I love this story.

 6. Santosh says:

  1NO STORY

 7. Punam Salgarkar says:

  Superb……really heart touching story…..

 8. savita says:

  Khup ch mast

 9. Neha says:

  Khup khup khupch chan aahe story

 10. Shashikant Waghmare says:

  Kharach…..khup chan,
  Dolyat pani aal.

 11. Roshani says:

  storycha navapramane story ahe, aai hi aaich aste tichi jaga world mdhe konich gheushkt nahi…kuthehi dur asli tri kalji krte…khup chhan ahe, sglech aatma vait nsun changlehi astat 🙂 🙂

 12. अजित says:

  खुप छान आहे स्टोरी वाचुन डोळ्यात पाणी आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *