हा खेळ सावल्यांचा – भाग ३ – Ha Khel Savlyancha Marathi Horror Novels

हा खेळ सावल्यांचा – Ha Khel Savlyancha – भाग २ – Marathi Horror Novel

भाग शेवटचा

मध्यरात्र होऊन गेलेली तरी वडील अजुन परतले नव्हते… सुमित असह्य वेदनेने कण्हत जागाच होता आणी त्याच्या जवळ काळजी घेत पुजा ही तशीच बसुन होती… आई दारात ऊभी वडिलांची वाट पहात होती., धावतच वडिल परतले… हताश , असहाय, पुर्णपणे हतबल झाल्यासारखे ते आत येऊन लहान मुलासारखे रडत ते जमिनीवर कोसळलेच…
आईलाही हुंदका आला… काळजीच्या स्वरात ती विचारु लागली.
” आव… काय झालय… आस हातपाय घळुन गेल्यावानी का बसलायसा. आण यवढ्या घईत कुठ जाऊन आलासा….”

भरल्या डोळ्यांनी बेडवर पडलेल्या सुमित कडे पहात म्हणाले
” देवळात जाऊन आलो…. ( दोन्ही हातानी मस्तक पकडत म्हणाले) स……..स…….सपल सगळ…..” बोलताना त्यांची जिभ अडखळु लागली…
त्यांची अवस्था पाहुन पुजाला हुंदका आवरण कठीण झाल… “बाबा….काय झालं हो..”

ते काही बोलणार तोच घरघरणा-या आवाजाने सर्वच हादरून गेले… सर्व श्वास रोखुन तो आवाज ऐकु लागले.. रात्रीची निरव शांतता भेदत एक विचित्र भयान घरघरणारा आवाज आला…
” तुच संपवलस सगळ… स्वताच्या हातानी…”

Ha Khel Savlyancha – Marathi Horror Novels

तीघेही त्या आवाजाच्या दिशेन पाहु लागले..
मजघरात पसरलेल्या अंधुक प्रकाशात जमिनीवरून एक सावली हळु हळू बाहेर सरकत येऊ लागली… कोणीतरी बाहेर येत असल्याच जाणवू लागल..
” क….कोण हाय ते..” भितीन थरथरतच आई न विचारल. तसे ते मजघरातुन दरवाजाच्या चौकटीत ऊभ राहील…
विस्कटले काळे पांढरे केस, कपाळावर गडद्द काळ कुंकू, हिरवेगार डोळे, गडद्द काळ्या रंगाची साडी , मनगट भरुन घातलेल्या काळ्या बांगड्या . पांढरी निस्तेज सुरकुतलेली त्वचा जी हाडांच्या सापळ्याला चिकटलेली होती…

एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा घरघरणारा तो भिषण आवाज ऐकताच आई ची दातखिळीच बसली त्या जागेवरच बेशुद्ध झाल्या… वडिल थरथर कापत जमिनीवरच बसुन समोर पहात होते…पुजा तर डोळे सताड उघडे करून ते अमानवीय दृष्य पहून हादरुन गेली होती…

” नं…..नंदा मावशी…” पुजाच्या तोंडातुन शब्द बाहेर पडले तशी त्यांनी आपली मान गर्रर्रर्रर्रर्र कन मागे वळवली… धड जागेवरच पन मस्तक १८०° कोनात मागे वळल होत… ते अमानवीय हिंस्त्र श्वापद बेडवर तळमळत असलेल्या सुमित ला आधाशासारख पाहु लागल… पांढ-या सुरकुतलेल्या चेह-यावर सैतानी हास्य आणि त्या हिरव्या डोळ्यांमधे शिका-याला आपल सावज गवसल्याची आणि त्याच्यावर झडप घालण्याची व्याकुळता स्पष्ट दिसत होती… त्यान आपला उजवा हात पुढ करायला सुरवात केली तसा तो लांब आणखी लांब होत पंधरा फुट अंतरावरील सुमित पर्यंत आला… पुजाच्या सर्वांगावर भितीने काटा येत होता… त्या अमानवीय दृष्याने तीच्या तोंडातुन बाहेर पडणारी आर्त किंकाळी तोंडातच दबून गेली होती… लांबसडक बोटं पांढरी आणी लालसर काळी पडलेली नख आता सुमित च्या चेह-यावरून फिरत होती.. पुजान तो हात झटकण्याचा प्रयत्न करताच त्या श्वापदाने भयंकर संतापाने पुजाकडे पाहील आणी जोराचा हिसडा मारला तशी पुजा बेडवरून खाली आदळत मागे भिंतीपर्यंत फरपटत गेली….
सुमितच्या वडिलांनी थरथर कापत त्या सैतानाचे पाय धरत आपल्या मुलांच्या प्राणांची भिक मागीतली… ते लहान मुलासारखे रडत होते… तसा त्यांना जोराचा हिसडा दीला ते ही दुरवर फरपटत गेले… पुजा तळमळत होती रडत होती किंचाळायचा प्रयत्न करत होती पन तीचा कंठ फुटत नव्हता. सैतानाने सुमित आपल्या हाताने घट्ट पकडल आणि एखाद पाखरू फडफड करत जाव तस दरवाजा तुन बाहेर झेपावल… तशी मघापासुन दबलेली आर्त किंकाळी पुजाच्या तोंडातुन बाहेर पडली… आणि सर्व काही शांत झाल…

*****

Ha Khel Savlyancha – Marathi Horror Novels

डोळे उघडले तस आकाशातील नितळ चांदण्यात पौर्णिमेच्या चंद्राच मोहक रुप आणखीनच खुलुन दिसत होत… वा-याच्या झोक्याबरोबर वेगात पुढ सरकणारे शुभ्र ढग ते ते चंद्रबिंब झाकत होते आणि पुन्हा वारे त्या ढगांना दुर आणखी दूर लोटुन नेत होते… अंग खुपच जड झालेल… जीव गुदमरत होता… कानावर काहीतरी शब्द ऐकु येत होते.. काही मंत्र.. कोणीतरी पुटपूटत होत…
“ऐं …-हीं…… चामुण्डा….”
डोळे जड झालेले तसेच किंचीत उघडण्याचा प्रयत्न करत नीट पाहील तर समोर पेटवलेल्या अग्निच्या लाल तांबूस प्रकाशात कोणितरी बसलेल, पांढरे धोतर तेवढेच अंगावर होते. वाढलेल्या जटा, शरिरावर ठिकठीकानी लावलेले भस्म..एक जाड माणुस बसलेला आणि मंत्र पुटपुटत एक एक सुमिधा त्या अग्नित अर्पण करत होत…. .. ती खाडकन उठली तसे तीचे सासरे तीला शांत रहाण्याची सुचना देऊ लागले…
मंत्रांचा आवाज तीच्या कानात घुमू लागला…
“ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाये विच्चे
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाये विच्चे…”
ती गावच्या मंदिरात होती..बाजुला सासुबाई हात जोडुन बसलेल्या बाकी पाच ते सहा अनेळखी व्यक्ति त्या कुंडाच्या भोवती डोळे बंद करू बसलेल्या…

कुंडासमोर बसलेल्या त्या व्यक्तिन पुजाकड एक कटाक्ष टाकला…” आज जीथ तुजा न्हवरा हाय, त्या जागव तु आसतीस, (बोट सास-यांकडे करत पुन्हा बोलु लागला) तुला सपवायला यानं एका सैतानाच्या तोंडी तुज ‘रगात’ (रक्त) लावल व्हत, पर जे तुज रगात आणाया आलेले त्याना चुकुन सुमितच रगात गवसल., ती हडळ ( नंदामावशी) तुझ्या घरात रहात व्हती ती फकस्त तुमास्नी हीतवर आणाया साठी.. ”

पुजा हादरुन गेली..ती भुतकाळात गेली.तीला तो दिवस आठवला तीच बोट कापलेल सुमित न नुकतीच पट्टी बांधल्ली आणी सुमित ची आत्या नव-यासोबत आलेली… पन त्याच वेळी सुमितचही बोट कापल होत. कापसाचा बोळा धरतच तो त्यांच्याशी बोलत होता.. आपल्या बेटवरची जखम पाहुन कदाचित आत्यांनी वाटले की हा बोळा पुजाच्या जखमेचा आहे…

” बाळ इकड बग…( पुजाकडे पहात म्हणाले) तुझा न्हवरा आजुन जीत्ता हाय.. आज पुनवची रात हाय . तवा ते पिशाच त्याच रगात (रक्त) पिऊन त्याच मास चेटकीणीच्या हडळीच्या हवाली करल.. आजची रात तुझ्या नव-याची शेवटची रात हाय…”

त्यांच बोलण ऐकताच भरल्या डोळ्यांनी हात जोडत ती म्हणाली..
“अस बोलु नका हो.. हव तर माझा जीव घ्या..माझ्या रक्तान त्या सैतानाची तहान भागवते.. पन सुमित ला परत आणा…” बोलता बोलता ती हुंदके दे रडू लागली…

पुजाच बोलन ऐकताच त्यांनी आपले डोळे बंद केले… आणि पुन्हा पुजाकडे एक कटाक्ष टाकत म्हणाले.. “ठीक हाय… मी तुला तो मार्ग दाखवीन जीत तुझा न्हवरा हाय .. पर ते पिशाच तुला तीथुन जीत मागारी यवु देणार न्हाय…तीथ गेलीस की ‘मराण’ ठरल्यावाणी हाय.. बग.. इचार कर…”

मन घट्ट करत पुजा म्हणाली… ” प्रेम केलय त्याच्यावर .. मी त्याला वचन दिलेल … सुख दुखा:त तुझ्या सोबत असेन आणि जेव्हा मरण येइल तेव्हा तुझ्या पुढे मी असेन..आणि आज मला माझ वचन पुर्ण करायच आहे…”

त्यांनी पुजाला मार्ग दाखवला..” तुला वर डोंगरात जायाच हाय . हीतन चार कोस दुर उगावतीला.( पुर्वे दिशेला) एक भल मोट वडाच झाड हाय . दहा गड्यांचा घेरा कमी पडल यवडा घेरा हाय त्याचा.. त्या खाली यक मोट काळ पाषाण हाय . त्यावर तुझ कुकू ( पती) हाय… पर तीथवर जाताना हडळी ,चकवा चेटकी तुजा रस्ता आडवतील.. आई चामुण्डा देवी तुजी राकान (रक्षण) करल..तुला पाहाट होईपर्यन्त झुंज द्यावी लागल त्या नंतर ते त्याचा बळी नाही घेणार…. पहाट झाली की इकड ढोल वाजऊन तुला इशारा देतो….” एक धागा तीच्या मनगटावर बांधुन आशिर्वाद दीला..

भरल्या डोळ्यांनी हात जोडत सासरे म्हणाले… ” पोरी… समद म्या केल आण फळ तुमास्नी भोगाया आल्याती.. तु खालच्या जातीची म्हणुन माझी भावकी मला टोचुन बोलायची.. रगात नासक निघल म्हणुन बोलायचे माफ कर पोरी….. आता मी ही यतो तुझ्या संग”

त़्याच्या समोर हाच जोडत पुजा म्हणाली..
” नको बाबा… तुमच्या पासुन तुमचा मुलगा मी हिरवून घेतला.. ( सासुबाईंकडे पहात म्हणाली) आता त्याच्या पासुन त्यांचा नवरा नाही हिराऊन घ्यायचा…आणी एक सांगु का बाबा…”
बोलता बोलता ती थांबली…आणी त्यांच्या डोळ्यात पहात म्हणाली…
“आपल कोण आणि परक कोण हे आपन संकटात सापडल्या शिवाय नाही कळत… तुम्हाला बोलणारे आता मदतीला नाही येणार… ” तीच्या डोळ्यातुन घळाघळा आश्रु वाहु लागले…

*****

Ha Khel Savlyancha – Marathi Horror Novels

या शापित पौर्णिमेच्या रात्री हाती एक कंदील घेऊन ‘ती अपराजिता’ एक अघोषीत युद्ध लढण्यासाठी निघाली होती.. रात्रीचे दोन – अडीज वाजलेले… किर्रर्रर्रर्रर दाट जंगलातुन एका चिंचोळ्या पायवाटेने ती तरातरा चालत होती… तीला कसलीच भिती , तमा, भय काहीच नव्हत… कदाचित तीन आपल मरण पाहील होत जे दूरवर तीचीच वाट पहात बसलेल…
चालत चालत तीन अर्धा रस्ता पार केला होता..
चंद्र पश्चिमेकडे झुकलेला त्यामुळे पुर्वेकडे चालताना तीला आपली सावली आपल्या पुढे पडलेली दिसत होती… गाव खुप मागे राहील तस तीन थोड माग वळुन पाहील.. देवळातील अग्नीच्या प्रकाशाचा केवळ बिंदुच तो लांबुन दिसत होता… अचानक दुरवरून कोल्हेकुई ऐकु आली.त्यासरशी गावातील भटक्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडु लागला… हिंस्त्र श्वापद आपल्या शिकारीला निघाल्याचा जसा कौलच देत होतीत. पुजा झपाझप पावल टाकत होती… घनदाट जंगल त्यातुन जाणारी ती पायवाट आजुबाजुला वाढलेले गवत. अशात हलक्याशा हवेन होणारी ती पानांची सळसळ… मंद सुटलेला थंडगार वारा.. आणि अधुन मधुन ढगांच्या मागे लपुन बसणारा चांद . जाणा-या प्रत्येक क्षणात तीच्या काळजात होणारी धाकधूक वाढत होती… पुढे काय होणार याची पुसटशीही कल्पना नव्हती तरी ती आपल्या नव-याच्या , प्रियकराच्या जीवीतासाठी स्वता: मरणाच्या दाढेत निघाली होती..

खुप वेळ चालुन तीला थोडा थकवा जाणवू लागला.. पन ती चालत राहीली या जीवघेण्या एकांतात कोणीतरी होत जी तीला पहात होत.. या अंधारात तीला काही स्पष्ट दिसत नव्हत… चालण्याची गती थोडी कमी करत आजुबाजूच्या परीसरावर नजर ठेवत निघाली… अचानक बाजुच्या एका झाडावर तीची नजर गेली तसा काळजाचा ठोकाच चुकला… एका मोठया झाडाच्या फांदिवर एक पांढरी आकृती ऊभी तीच्या कडे पहात होती… रखरखती भेदक नजर काळीज चीरत जात असल्यासारख वाटत होत.. अंगावर सर्रर्रर्रर्र कन काटा उभा राहीला पन दुस-याच क्षणी तीन स्वताला सावरल… पुजा दुरवर जाईपर्यंन्त ती आकृती पुजीकडे पहात होती..
चालता चालता तीची नजर जमिनीवर पडली… तीची सावली…?
लख्ख चांदण असुनही तीला तीची सावली दीसत नव्हती… कुठेच… ती बेचैन झाली
पन न थांबता तशीच चालत राहीली..तस आपल्या सोबत आणखी कोणीतरी चालत येत असल्याच जाणवू लागल.. श्वासातील ती घरघर स्पष्ट ऐकु येत होती… या सर्वच घटनानी तीच अंग शहारत होत… पन तीला आपल्या सुमितचा चेहरा आठवला की पुन्हा उर्जा येई.. त्याला परत आणण्याची…. तीन आपल्या चालण्याचा वेग वाढवला… तशी काही अंतरावर जमिनीवरून एक सावली तीच्या सोबत चालत येत असल्याच तीला दिसत होत… हे आपल्या वाटेतील अडथळे आहेत हे तीन ओळखल. तीन आजुबाजुला न पहाता आपली वाट धरली… त्या डोंगराच्या माथ्यावर पोहचायच होत…आता गर्द झाडीतुन ती वाट काढत होती… बाभळाच्या काट्यांनी अंग जखमी होऊ लागल पन तमा नव्हती…
” पुजा… ” कोणीतरी हाक दिली…तशी ती जागेवरच थांबली…
” पुजा मला वाचव ग…”
तिन आवाज ओळखला..
” सुमित कुठे आहेस… ”

ती आवाजाचा वेध घेऊ लागली पन तो आवाज चौफेर घुमु लागला.. ” पुजा….. वाचव मला…..वाचव…..पुजा….”
आवाज कर्कश्या आणखी कर्कश्य होऊ लागला… या भयान दिशाहीन आवाजाने तीच्या डोक्यात मुंग्यांच वारुळ ऊठल.. तिन आपले डोळे गच्च मिटवले आणि क्षणात पुन्हा निरव शांतता पसरली… तीन हळु हळू डोळे ऊघडले तशी समोर काही अंतरावर ‘ती’ आकृती दिसली… बघता बघता आणखी एक काळीकुट्ट सावली तीच्या दिशन वेगात येऊ लागली… तशी पुजा दचकुन जागेवरच थांबली…
मनात देवाच नाव घेत ती आपला मार्ग काढत डोंगराच्या दिशेने वर वर चालु लागली… त्या झाडाझुडपातुन चित्र विचित्र आकृत्या नाचत होत्या किळसवाण हास्य करत तीच्या भोवती थैमान घालत होत्या.. पन ती चालतच राहीली.. धाप लागली .. शरिर… . थकल होत पन इतक्यात थांबुन चालणार नव्हत.. ती डोंगर माथ्यावर पोहचली… हातपाय भरून आले होते.. घशाला कोरड पडली.. काळजी जोरजोरात धडधडत होत.. तास दीड तास चालुन चंद्राच्या शितल प्रकाशात अखेर दुरवर तीला तो भला मोठा वट वृक्ष दिसु लागला… खप मोठी रीकामी जागा आणि त्या जागेत तो दैत्याकार वटवृक्ष… जसे त्या जागेवर , त्या परिसरावर आपलच अधिराज्य आहे हे सांगत होता..

हातातला कंदिल सावरत ती निसंकोच चालत त्या वटवृक्षाकडे निघाली… तीला ते काळेकुट्ट पाषाण दिसले… त्यावर कोणीतरी पालथे पडले होते. अगदी निपचीप. निष्प्राण असल्यासारखे. ती त्याच्याकडे धावली त्याच अंग जखमी झालेल…” सुमित…. सुमित.. डोळे उघड..सुमित….” तो अजुन जिवंत होता… पुजा न त्याच मस्तक आपल्या मांडिवर घेतल तोच तीला त्या वटवृक्षामागुन कोणीतरी चालत येत असल्याच जाणवल… पन निटस काही दिसत नव्हत.. तीन मान वर करून आजुबाजूला पाहील… पाच. सहा… आकृत्या चालत येऊ लागल्या.. तीच्या काळजाचा थरकाप उडाला… गडबडीत आपल्या हातातील धागा सुमित च्या हाती बांधला आणी हातातील कंदिल घेऊन ताडकन उठली…. त्यांच्या सभोवती झाडामागुन हडळी, चेटकी आपल्या भक्ष्यावर तुटून पडण्याची आज्ञा मागत होत्या… कानाचे पडदे फाटावेत असा कर्कश्य आवाज करत हसत किंचाळत त्या पुढ सरकत होत्या… पुजाच्या डोळ्यातुन पाणी येऊ लागल… तीन सुमितला उराशी कवटाळल आणी देवाचा धावा करू लागली तस त्या वटवृक्षाखाली कोणीतरी ऊभ दिसल… भेदरलेल्या नजरेन ती त्याला पाहु लागली… सात आठ फुट उंच. अंगाने बलदंड, हिरवेगार डोळे. लांब गुडघ्यापर्यंन्त हात. तशीच लांब नखे.. किंचीत कमरेत झुकलेले…तोंडातुन हिरवी लाळ गाळत ते हळु हळू त्या दोघांकडे पाहु लागल.. मघापासुन एकवटलेला तीचा धीर या दृष्यान मात्र आता सुटू लागला…

कोणतीही हलचाल न करता ते रखरख्या नजरेन त्या दोघांना पहात होत… आजुबाजूच्या त्या सावल्या किळसवाण हास्य करत तीच्या दिशेने सरकु लागल्या.. पुजा मात्र त्यांच्याकडे पहात थरथर कापत होती.. तीच्या डोळ्यातुन घळाघळा आसवे येऊ लागली.. पन तीन सुमीत घट्ट पकडुन धरलेल.. तोच एक आकृती भिरभीरत तीच्या जवळुन गेली जस वटवाघुळ जाव … काय होत हे कळायच्यात आणखी एक आकृती गर्रर्रर्र कन तीच्या जवळुन गेली…. तशी पुजा थरारली… सुमीत तीच्या जवळ नव्हती… वर पाहील तर त्या आकृतीन आपल्या पंजात सुमीतला पकडलेल.. ते दृष्य पाहुन पुजा पुरती हादरून गेली… ती जीवाच्या आकांताने ओरडु लागली जोरजोरात किंचाळू लागली…रात्रीची ती निरव शांतता भेदत तीची आरोळी दुरवर त्यांच्या गावच्या मंदीरात देवीसमोर हात जोडुन बसलेल्या तीच्या सासु सासरे आणी पुजा-याने ऐकली तसा सास-याच्या अश्रुंचा बांध फुटला… आपल्या मुलाला आणी सुनेला त्या पिशाच्यानी खाल्ल अशी त्यांची समजुत झाली आणी मंदीरात एकच आक्रोश झाला……

गिधाडासारख त्या चेटकी आणी हडळी सुमित च शऱीर घेऊन त्या झाडाभोवती घीरट्या घालु लागल्या.. पुजा त्यांच्या मागे घावत होती.. पडत होती …. रडत हंबरत ती सुमितला साद घालत होती.. पायात काटे घुसून जखमी झाली पन पुन्हा ऊभी रहात आपल्या नव-यासाठी धावत होती….अचानक धावताना जोराची ठेच लागली तशी ती खाली कोसळली… डोक दगडावर आदळून जखम झाली.. रडत विव्हळीत वर पहात तीन हात जोडले. आपल्या नव-याची अशी अवस्था तीला पहावत नव्हती… आपल्या गडघ्यावर बसत तीन अंगातली सारी शक्ती एकवटुन आभाळाकडे पहात जोराची आरोळी ठोकली….
” हे चामुण्डा देवी… धाव ग धाव…”
तसा त्या चेटकीच्या पकडीतुन सुमीत निसटला आणी पुजा समोर आदळला… सुमित कण्हत होता पन भान नव्हत… पुजा उठली आणी धावत सुमित जवळ गेली.. बाजुचा कंदील हातात घेतला तशी तीच्या अंतरावर झेपावणारी हडळ जागेवरच थांबली… तीन धाडसान आपल्या हातातील कंदिल त्या झाडाखाली फोडला तस मघापासुन झेपावणा-या चेटकी आता दुरून आक्रोश करू लागल्या… पुजाच्या अंगात जणु एक प्रकारची शक्तीच संचारली होती… आजुबाजूला पडलेला पालापाचोळा गोळा करून ती त्या आगीत टाकत चालली तशा आगीच्या ज्वाळांनी आपल रौद्ररूप धारण केल…. वाळलेला पाला पाचोळा चर्रर्रर्रर चर्रर्रर्रर करत पेटु लागला… त्या आग्निच्या प्रकाशात ते चित्र विचित्र चेहरे त्या आकृत्या आणखी भयान वाटु लागल्या..पण त्या पुढ येण्याच धाडस करत नव्हत्या… सुमित त्या अग्नीसमोर पडुन होता..
त्या अग्निच्या प्रकाशात झाडाखाली तीला ते पिशाच्च दिसल… मघापासुन भीतीन थरथर कापणारी पुजा आता त्या पिशाच्याच्या डोळ्यात डोळे घालुन पहात होती तस ते ही पुजाकड शांतपने पहात होत..
त्या पेटत्या अग्निसमोर पडलेला तीचा नवरा, त्याच्या समोर ऊभी ती, डोक्यावरील जखमेतुन वहाणार रक्त चेह-यावर पसरलेल…मोकळे सुटलेले केस… जस दुर्गेच रूपच भासत होत.. आपल्या हातातील वाळलेला पाला पाचोळा देवाच्या मुर्तीवर फुल उधळावी ताशी त्या अग्निमधे उधळत ती मंत्र उच्चारू लागली..
“ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाये विच्चे
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाये विच्चे…”
प्रत्येक मंत्रासोबत तीचा आवाजातील गर्जना वाढु लागली…
आजुबाजूला त्या हडळी, चेटकींचा आक्रोश वाढु लागला..ओरडु लागल्या किंचाळु लागल्या पन पुजा त्या अग्निच्या ज्वालांना वाढवतच राहीली… तोच जोरजोरात ढोल वाजत असल्याचा आवाज येऊ लागला…
त्या बरोबर दूरून शांतपने पहाणारे ते पिशाच्च पुजाकडे पहात म्हणाले..
” आजवर अनेकांच रक्त पिऊन त्यांच मांस चेटकींना खाण्यासाठी फेकुन दिल पन आपल्या घरच्या लोकांच ते मृत शरिर न्यायला येण्याच धाडस दिवसाही गावातील कोणी केल नाही पन तु तुझ्या नव-यासाठी इथवर आलीस… कोणती दैवी शक्ति आहे तुझ्या सोबत….”
पुजा सुमित जवळ गेली आणी त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली….

” त्याला प्रेम म्हणतात.. खर प्रेम स्वता:मधेच एक दैवी शक्ती आहे… ज्याच्यावर खर प्रेम करतो त्यासाठी कुठल्याही संकटाला हसत मुखान तोंड देतो…”

ते पिशाच्च पुजाकडे पहात म्हणाल..
” जर तुझ्या नव-याचा जिव घेतला असता तर तु मोठा तांडव केला असतास.. कारण तुझ्यातल ते दुर्गेच रूप मी पाहील …. जिंकलीस तु , तुझ धाडस, तुझ प्रेम.. घेऊन जा तुझ कुंकू…..”

आणी सर्व काही शांत झाली.. पुजा खाली बसली.. डोळे मिटुन देवाचे आभार मानसे ..तोच….
” ओह शीट…. मी पुन्हा झोपेत चालत आलो…इतक्या दुर…. जंगलात… आय एम सो सॉरी शोना…..” सुमित शुध्दीवर आला.. त्याचा अशक्तपना गायब झालेला.. एकदम तरतरीत जसा आधी होता तसा.. त्याला पहात पुजाच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटले…. हुंदके देतच ती सुमितच्या कुशीत शिरली..
त्याची बडबड मात्र सुरूच होती…
” ए स्टुपिड … एवढ कस लागल तुला… आणी ही आग का पेटवलीस… मला थंडी वाजते म्हणुन… किती काळजी घेते माझी बायको….”
ती मात्र त्याचा प्रत्येक शब्द काळजात साठवत होती… पुजाला दोन्ही हातात उचलुन घेत सुमित बडबड करत घराच्या दिशेने चालु लागला….
“मैडम वजन खुप वाढलय हो…”

समाप्त….

Ha Khel Savlyancha – Marathi Horror Novels

You may also like...

18 Responses

 1. Anil ghule says:

  Superb…. Mind blowing…keep it up

 2. Punam Salgarkar says:

  Awesome story……keep writing such beautiful stories……..

 3. GAURANG MATAL says:

  mind blowing ……….this story is true love story………

 4. snehal says:

  awesome story………..

 5. Komal Gaikwad says:

  Awesome Story…..mind blowing

 6. sonam munj says:

  good

 7. shweta khapre says:

  Superb mast??

 8. SWATI says:

  awesome story………..??

 9. Reshma shinde says:

  Awesome story

 10. Madhavi says:

  Superb Story…

 11. Swarnima says:

  Great story…

 12. Rajashri says:

  Interesting story .

 13. Lakhan says:

  very horror story i love it

 14. Roshani says:

  superb story…….true love…..

 15. Pramod says:

  Owsom. … khoop chaan story aahe

 16. Yamini says:

  Chan Hoti….apratim…Shevat Chan vatla

 17. MASTCH HOTI STORY SHEVAT CHAAN HOTA…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *