हा खेळ सावल्यांचा – भाग 2 – Marathi Horror Novels

संजयजी कांबळे यांची माय हॉरर एक्सपेरिअन्स पेज वरून हा खेळ सावल्यांचा – Marathi Horror Novels

हा खेळ सावल्यांचा – भाग १ – Marathi Horror Novel

भाग २:: Part 2

तीन ओळखल तीची भीती जवळ जवळ नाहीशी झाली….
” सुमित… तु पन ना… रात्रीचे तीन वाजलेत.. उद्या ड्युटीवर जायच नाही का…”
बोलता बोलता ती मागे वळली तशी सुन्न झाली… मागे कोणीच नव्हत… ती शहारली त्यातच हल्क्याशा वा-याने झाडांच्या पानांची होणारी सळसळ काळजाचा थरकाप उडवीत होती… ती स्वताला थोड सावरत होती तोच
समोरील भिंतीवर एका अस्पष्ट सावलीची हलचाल होत असल्यासारख वाटु लागल… ती थबकली… जागेवरच थांबली… आपली नजर तीन त्या भिंतीवरील सावलीवर रोखली… गडद्द…आणखी गडद्द …. आता ती सावली स्पष्ट दिसत होती… उंच, लांब मोकळे सोडलेले केस , भक्कम शरीर रचना, गुडघ्यापर्यंन्त लांब हात एका हातात भल मोठं कु-हाडीसारख हत्यार .. समोरच ते आक्राळ विक्राळ रूप पाहुन पुजाच्या काळजाचे ठोके वाढले… पाय जमिनीत रुतल्यासारखी ती सुन्न झाली इतक्यात त्या आकृती समोर आणखी एक सावली उमटली… आपल्या गुडघ्यावर बसलेली.. मान खाली झुकवलेली आणि दोन्ही हात जोडुन आपल्या प्राणांचा भिक मागणारी ती सावली…. जशी त्याची गुलाम असावी… ते दृष्य पाहुन पुजा पुरती शहारली ….गर्रर्रर्रर्रकन ती मागे वळली पन मागे कोणीच नव्हते… पुन्हा समोर पाहील तर त्या दोन्ही सावल्या भिंतीवर तशाच होत्या… हळु हळू त्या विचीत्र ऊभ्या सावलीने आपल्या हातातील ते धारदार शस्त थोड वर उचलत त्या गुलामाच्या कवटी वर खट्ट कन प्रहार केला.. पुन्हा दुसरा … तीसरा… खट्ट…खट्ट… खट्ट… आणि मग त्या ऊभ्या विचित्र सावलीने वर आकाशाकडे आपल तोंड करत मोठी आरोळी ठोकली. एखाद अजस्त्र रानटी जनावर ओरडाव तसा तो घोगरा आवाज एकुन कानाचे पडदे फाटतात की काय अस वाटु लागल….डोळे मोठे करुन पुजा त्याच्याकडे पहात होती… त्या अजस्त्र सावलीन हातातील शस्त्र हवेत उंच नेले आणि त्या गुलामावर जेरदार प्रहार केला .. खस्स्स्स कन धारधार पात मानेवरुन फिरल तस ते शिर धडावेगळे झाले… त्यासरशी पुजा जिवाच्या आकांतान ओरडली. पन तीच्या तोंडातुन शब्द फुटत नव्हते .. जशी तीची वाचा गेली हेती…. समोर ते धड जमिनीवर लोळु लागले आणी तुटलेले शिर पुजाच्या पायाजवळ येऊन पडले … ते मस्तक सुमित चे होते… आणि झटकन तीला जाग आली . अंग घामान अगदी भिजल होत. ..घसा कोरडा झालेला… घड्याळात पाहील तर तीन वाजायला आले होते…. पन तीची नजर बाजुला वळली तशी पुन्हा शहारली …. सुमित बेडवर नव्हता….
“सुमित. ” त्या साद घालतच पुजा बेडरुम मघुन बाहेर पडली.. सर्वत्र शोधल…. तो कुठेच नव्हता..
” टेरेसवर तर नसेल…” ती धवतच वर गेली…. सुमित दिसला….. वर…. बेशुध्द. …
सुमित ला शुद्धीवर आणल.. पन तीच्या डोक्यात हजार प्रश्नांच जस काहुर माजल होत..
******

Marathi Horror Novels – Ha Khel Savlyancha – Patilsblog.In

सकाळ झालेली… नवा दिवस उगवलेला… आज पुजाच लक्ष कशातच लागत नव्हत.. डोळ्यात प्राण आणुन ती कोणाची तरी वाट पहात होती…
मन बेचैन होत आपल्या नव-यासाठी…
‘ कुईईई’ गेटचा दरवाजा उघडलेले आवाज आला तशी ती सोफ्यावरून उठली… नंदामावशी आत आल्या… पुजा काही बोलणार तोच मावशी म्हणाल्या…
” साहेबांची तब्बेत कशी आहे…”
पुजा काहीच न बोलता मावशी ना घेऊन बेडरूम मधे गेली… सुमित शांत झोपलेला…. पन खुप अशक्त वाटत होता…
” तुम्ही येण्या आधीच झोप लागली त्यांना… डोक ठणकतय म्हणुन रात्रभर जागा आहे….”
नंदामावशींचा चिंताग्रस्त चेहरा पाहुन पुजाचे डोळे पाणवले.. मावशी तडक चालत किचन मधे गेल्या तशी पुजा ही मागोमाग गेली…
” रात्री काय घडल. ..?” ओट्यावरची भांडी बाजुला करत मावशी नी विचारले… पुजाने घडलेली सर्व घटना सांगितली तसे मावशींच्या चेह-यावर गंभिर भाव उमटले…
दिर्घ श्वास घेत त्यांनी विचारले…
” मागिल काही दिवसात कोणी भेटायला आलेल….? कोणाशी वाद …भांडण….”

“नाही मावशी… इथ येऊन सहा महीने झालेत.. पन कोणाशी कसलाच वाद नाही…” पुजा पाणावलेल्या डोळ्यातील आश्रु टीपत म्हणाली़…

तशी मावशी पुन्हा विचारु लागल्या….
“मग…..नातेवाईकांशी काही वाद…”

त्यांचे शब्द कानावर पडताच पुजाचे डोळे चमकले…
” हो….तुम्ही आमच्याकडे कामाला लागण्याच्या थोड आधी… म्हणजे आतापासुन महिनाभरा पुर्वी…”

Marathi Horror Novels – Ha Khel Savlyancha – Patilsblog.In

पुजा त्याना सांगु लागली….
” सकाळचे दहा वाजुन गेलेले त्या दिवशी सुमित ला सुट्टी होती.. आम्ही दोघेही किचन मधेच होतो… कांदा कापताना माझ बोट कापल म्हणुन मला मलम पट्टी केली आणि मदत करताना स्वताच पन बोट कापुन घेतल…तोच आमच गेट उघडल्याचा आवाज आला तशी मी किचनच्या खिडकीतुन पाहील… तसा कोणीतरी अनोळखी पती पत्नी दिसले.. नव-यान मळकट पांढरा सदरा आणि तशीच पांढरी वीजार घातलेली , उंच , किंचीत सावळ, पायात चामड्याच चप्पल… साधारण ४५ च्या वयाचे इसम आणि सोबत एक महीला होती… चाळीशीची… हिरवं लुगड नेसलेल. गडद्द हिरव्या बांगड्या, डोक्यावर पदर जो दातांमधे घट्ट पकडलेला… कदाचित डोक्यावरुन खाली सरकु नये यासाठी असेल… कपाळावर भल मोठ कुंकू.. आणि पायात तसच चामड्याच चप्पल…”
नंदा मावशी शांत पने ऐकत होत्या तशी पुजा पुढे बोलु लागली. ..

Marathi Horror Novel - Ha Khel Savlyancha

Marathi Horror Novels – Ha Khel Savlyancha

” त्यांना पहाताच आम्ही दोघे बाहेर आलो.. ती बाई सुमितची आत्या होती आणि तीचा नवरा.. ते आत आले सुमित त्यांच्याशी बोलत बसला तशी मी चहा नाष्ता करायला आत आले ..”

बोलता बोलता मंद हसत पुजा बेलु लागली
“आमच्या लग्नासाठी विरोध होताच. त्यांनी मला सोडुन दील तर भावकीत जागा मिळेल अस काही सांगत होते..पन सुमित चा चढलेला आवाज स्पष्ट ऐकु आला…”

बोलता बोलता पुजा थांबली… नंदा मावशी सगळ मन लाऊन ऐकत होत्या..
पुजा पुन्हा सांगु लागली…

” सुमीत त्यांना म्हणाला…तुमच्या मुलिचा नवरा दारू पिऊन तीला मारहान करतोय.. तीचा छळ करतोय . मग तुम्ही का तीला त्या नव-याला सोड म्हणुन सांगत नाहीत… त्यावर
सुमित ची आत्या म्हणाल्या..’ बाईच घर तीच सासर आसतया. न्हवरा काय बी करो.. तीन तीतच जगायच आणी तीथच मरायच…’
त्यावर किंचीत हसुन सुमित बोलला होता की.
‘ हो ना…मग आता ही माझी बायको आहे .. आणि बायकोच कर्तव्य आता तुम्हीच सांगितल..’ त्यांच्यात वाद झाला तसे सुमित रागाने घरातुन निघुन गेले.. ते दोघे तसेच काही वेळ थांबले आणि न सांगताच निघुन गेले…”

तीच बोलन ऐकुन मावशी म्हणाली
“म्हणजे ते त्यासाठी आले होते तर….”

“कशासाठी,,,,,?”

“याचा उलघडा होईल..पन त्यासाठी तुला आणी सुमित ला गावी जाव लागेल…”
तोच एका आवाजाने दोघीही शहारल्या… सुमित जोरात ओरडला..
पुजा बेडरूम कडे धावली
सुमित बेडवरच होता असह्य वेदनेन कन्हत होत… रक्त शोषुन घ्याव तस शरीर निस्तेज पांढर पडु लागल होत…पुजाला समोर पहाताच तो गयावया करू लागला..
” पुजा… खुप त्रास होतोय ग.. आधी फक्त डोक दुखत होत आता अस वाटतय की संपुर्ण शरीर आतुन कोणितरी कुरतडतय…आई ग..”
जोरात किंचाळत तो बेशुध्द झाला…
पुजा त्याच्या जवळ जात तोंडावर पाणी मारत उठवु लागली… नंदामावशी चौकटी बाहेर ऊभी सर्व पहात होती.. सुमित झोपलेल्या ठिकाणी डाविकडील भिंतीवर एक अस्पष्ट सावली उमटताना त्यांनी पाहीली…

“पुजा… थोड काम आहे, लगेच येते…” नंदा मावशी बाहेर पडल्या तसा पुजान डॉक्टरांना फोन केला …

Marathi Horror Novels – Ha Khel Savlyancha – Patilsblog.In

सुमितची परिस्थीती बघता त्याला रुग्णालयात दाखल करुन घेतल… डॉक्टरांनी सर्व टेस्ट करून पाहील्या पन निदान लागत नव्हत…
रात्रभर हॉस्पिटल मधे बसुन ती सुमित ला दरवाजा वर लावलेल्या काचेतुन पहात आश्रु ना वाट करुन देत होती… टीsss टीsss टीsss आवाज करणारी हॉस्पिटल मधली उपकरण न्यहाळु लागली तोच अचानक तीच्या अंगावरुन सर्रर्रर्रर्र कन काटा आला… पुजाच लक्ष त्या काळसर आकारावर गेल.. फिक्कट होता होता गडद्द होत चाललेली तीच सावली.. थोडी. अस्पष्ट झाली पण अस्थीर.. तीथ नाहीशी होत हॉस्पिटल च्या पांढ-या भिंतीवर दुसरीकडे उमटु लागली… आणि मग दिसेनाशी झाली….. पुजाला कळुन चुकल की हॉस्पिटल मधे त्याचा इलाज नाही होऊ शकणार… ती तशीच हतबल बेंचवर बसुन आपल्या सुखी संसाराची वाताहत पहात होती…

सकाळ झाली .. हॉस्पिटल च्या बेंचवर झोपलेली पुजा जागी झाली आणि सुमित च्या रुमकडे निघाली .. दरवाजा उघडाच दिसला… पुढ येऊन पाहील तर सुमित बेडवर बसुन पोहे खात होता… तो चक्क शुद्धीवर समोर नंदा मावशी बसलेल्या दिसल्या.. सोबत दोन मोठ्या बैगा होत्या…
केस नीट बांधत पुजा म्हणाली..
” मावशी…कुठे बाहेर जात आहात का…?”
” बाहेर तर जायच आहे…. पन मला नाही तुम्हाला….”
” म्हणजे…” पुजा थोडी अस्वस्थ झाली… तशा गंभिर आवाजात मावशी म्हणाल्या…
“तुझ्या सास-यांची तब्बेत बिघडली आहे… तुम्हा दोघानाही निघाव लागणार आहे…”

सुमितला थोड बर वाटत होत त्यामुळे नाईलाजाने डॉक्टरांनी काही precaution घेण्याच्या सुचना देत डिस्चार्ज दीला..

****

डोंगर उतारावरून एक पांढ-या रंगाची इंण्डिका गाडी सामान्य वेगात धावत होती. दिवस पावसाळ्याचे होते त्यामुळे अधुनमधून पावसाच्या तुरळक सरी येतच होत्या. हिरव्यागार झाडांनी वेली- फुलांनी डोंगर व्यापुन टाकलेले. दुरवर कड्या-कपारीतुन पांढरा शुभ्र पाण्याचा खळखळणारा झरा दिसला तस तीच मन भरून आल… बाजुला डोळे बंद करुन पडलेल्या सुमित कडे पाहुन तीचे डोळे पाणावले… त्याचा चेहरा निस्तेज पांढरा पडलेला… डोळे खोलवर गेलेले . एखाद्या दुर्धर , दिर्घ आजाराने ग्रासलेल्या रूग्णासारखी त्याची अवस्था झालेली ती ही मागील एक दोन आठवड्यात…

सुमितच बोलण, हसण, रागावण आणी प्रेमाने पुन्हा जवळ घेण…सार काही आठवत होत… घरच्यांचा विरोध झुगारून त्यान पुजा सोबत लग्न केल…वडिलांनी बाहेर काढल.. गाव सुटल.. रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली… आता दोघांनाच एकमेकाचा आधार होत.. पुजा आणि सुमितचा संसार खुप छान चालला होता… पण त्यांच्या सुखी संसाराला कोणाचीतरी नजर लागली..
तीच्या डोळ्यातील आसवे पहात नंदा मावशी म्हणाल्या….

” काळजी नको करू… ”

नंदामावशीनी सांगितल्या प्रमाणे सारी ऊत्तर तीला सुमित च्या गावी जाऊनच भेटणार होती.. गाडीच स्टेअरिंग सांभाळत पुजा काचेतुन आजुबाजूला पहात होती. भल्या मोठ्या विशाल डोंगरात कोणीतरी लपुन बसलय आणि आपल्या वर झडप घालण्याची संधी शोधत असल्यासारख वाटत होत, जसा हिंस्त्र श्वापद आपल्या सावजाकडे आधाशासारख पहात आहेत.. रस्त्याकडेच्या खोल द-यांमधुन वर सरकणार धुक, घनदाट जंगल, भयान जीवघेणी शांतता तीच्या मनाची बेचैनी आणखीनच वाढलत होती…. पन तीच जाण अपरिहार्य होत…

Marathi Horror Novels – Ha Khel Savlyancha – Patilsblog.In

त्यांची गाडी गावात आली तेव्हा सायंकाळ झालेली.. आसमंत गर्द काळ्या ढगांनी व्यापुन टाकलेल . एका भिषण वादळाची चाहुल लागावी तशी जिवघेणी शांतता त्या वातावरणात जाणवत होती… गाडी थांबलेल्या ठिकानापासुन उजवीकडे ग्रामदेवतेच मंदिर होत.. मंदिराच्या बाजुला एक मोठा वटवृक्ष होता… हात जोडत पुजा गाडीतुन उतरत म्हणाली…
” देवा…. आम्ही तुझ्या सावलीत आलोय… तारायच की मारायच तुच ठरव…” सुमित ला जागं करत तीघे चालत घराजवळ आले…

सुमित च घर तस प्रशस्त पन जुन्या पद्धतीच होत.. छोटस अंगण, बाहेर तुळशीकट्टा, तीन चार पाय-या नंतर मोठा लाकडी दरवाजा…
सुमित ला पहाताच त्याचा भाऊ धावतच बाहेर आला.. ” दादा … काय र अस झालय तुला…”
सुमित ला आधार देत आत घेऊन गेला पुजा आणि मावशी ही पाठोपाठ गेल्या…

रात्र झालेली… बाहेर बैठकीच्या खोलीत सर्व बसलेले पन कोणी शब्द ही बोलत नव्हत. बल्बचा मंद पिवळसर प्रकाशाभोवती चिलट गरगर फिरत होतीत. समोरच्या दरवाजा तुन दिसणारा लख्ख काळोख पहात सुमित एका खुर्चीवर मागे डोक टेकुन शांत बसुन होता… वडिल बरे होते. आणि खोट बोलुन आपल्याला इथवर आणल याचा राग मात्र सुमित च्या मनात होत… पन सुमित च्या आजारपणाबद्दल इकडे कोणाला काही कल्पना नव्हती… वडिल मात्र त्याची ही अवस्था पाहुन खुप अस्वस्थ झालेले… पुजा खाली चटई वर बसलेली तर सुमित ची आई त्यांच्या समोर काही अंतरावर असलेल्या लाकडी ‘माच्या’ वर बसुन संतापाने पुजा ला पहात होती.

” मला ह्या औदसेच तोंड पन बगायच न्हवत तरी बी का आनलस हीला… मला पुन्यांदा ह्या गुष्टीवर वाद घालायचा न्हाय… उद्या कोंबड आरवल की तुमी निगायच..” संतापाच्या भरात आई बोलली..

सुमित तसाच शांतच होता.. आणी पुजा काही बोलणार तोच नंदामावशी म्हणाल्या…

” ते स्वता:हुन आलेले नाहीत.. त्यांना येण भाग पडलय… ”

वडिल मात्र त्याची अवस्था पाहुन पुरते हादरुन गेलेले… ते ताडकन उठले आणि काही न बोलता घाईघाईत बाहेर पडले… त्यांच्या मागे सुमित ही निघाला पन अशक्तपनामुळे तो जमिनीवर कोसळला… तशी पुजा त्याला सावरायला धावली… “काय अवस्था करून टाकली माझ्या पोराची …ह्या सट्टवीन..” आई बडबड करतच होती…

*****

हा खेळ सावल्यांचा – भाग ३ – Marathi Horror Novels

You may also like...

2 Responses

  1. राहुल बदर says:

    खरंच खूपच छान
    मस्त आहे

  1. March 22, 2017

    […] हा खेळ सावल्यांचा – Ha Khel Savlyancha – भाग २ – Mar… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *