काव्यामन भाग १ – Marathi Horror Story, Bhaykatha

पूर्ण चंद्राची ती पुनवेची रात्र होती …. वाउऊऊsssssss….व्हा­उऊऊऊऊऊ …….. . करत स्मशाणाच्या दिशेने पाहून कुत्री जणू जिवाच्या आकांताने इवळत होती….. घनदाट
अश्या त्या काळोखात त्यांचा आवाज सर्वत्र कहर माजवत
होता इतका कर्णकर्कश….. त्या स्मशानातून जणू वटवाघळे आपापली झाडावरील
जागा सोडून …सैरवैर होऊन फडफड फड फड उडत होती….
त्या स्मशानाच्या एका कोपर्यातून घुबड जणू त्या अंधारात मृत्यूराग गात होत…. ते भयाण वातावरण… एखाद्या… अमानवीय ताक्तीच्या.. वास्तव्याची पुष्टी करत होत…. स्मशानातील चांडाळ(स्मशानातील तांत्रिक) आपल्या…. पडक्या जुनाट घरातून खिडकीतील दिवा लावत लावत…. बाहेर धुरकटलेल्या वातावरणात चालणार्या हालचाली पाहत होता …..आणि चिंतातुर होऊन म्हणाला “आई जगदंबे हे काय घडतय …. काय जाणवतय हे मला……
कोणाची चाहूल आहे ही…… काय आहे हे … ना मनुष्य…..! ना श्वापदं.. .आई . धाव! आई जगदंबे …. धाव! ” असे म्हणत त्याने बाहेरच्या वातावरणातील आपली नजर काढून … काठीच्या सहायाने लंगडत लंगडत आत आला आणि आत येऊन … त्याने राखेने … एक लहान वर्तुळ आखले….. आणि तोंडातल्या तोंडात … काहीतरी मंत्र त्याने पुटपुटला व खिशातून थरथरत… कवड्या काढून त्यावर फुंकर मारली….. आणि मुटठी फिरवत … त्या वर्तुळात फेकल्या…. फेकताच क्षणी जणू भयाण शांतता त्या स्मशानात पसरली ….. त्याने
आपल्या कवड्यांना निरखून पाहिले… हळू हळू जणू … त्या आपल्या रंग बदलत होत्या … लाल …. लाल…… लालभडक … विसतवा सारख्या त्या तापल्या होत्या…. की अचानक त्या करपून काळभोर पडून गेल्या ….. त्याने थरथरत्या हातात त्या उचलून घेतल्या … उचलून घेताच काही क्षणात त्याच्या तोंडून शब्द आपोआप बाहेर .. पडले “नाश …. नाश होणार…. खूप मोठा नाश आई जगदंबे …असे म्हणत तो लंगडत लंगडत जाऊन .. खिडकीतून बाहेर
वरती आकाशाकडे पाहत…कळवळीने हात जोडतो आणि म्हणतो “.मदत कर ग आई जगदंबे …. तो आलाय … तो परत उठला आहे या कबरीमधून ….. ” ….. त्याची गरज आहे…. असा जो … विचाराच्या पलीकडील विचार ठेवणारा असावा …. जो वाघाच काळिज ठेवणारा असावा आई …… तसे त्याचे बोलण थांबताच क्षणी खिडकीतून… बाहेर ढगाआड लपलेला चंद्र निखळत बाहेर येतो … व त्याच्या अंगवार त्या च्ंद्राचा लक्ख प्रकाश पडतो…. चिंतेच्याच सुरात स्मित हस्य करत… तो आकाशाकडे पाहून आपले हात जोडतो…..
***
“वुssssssss धदड..धदड…धदड..धदड धड…. ससस्ससस……. ” करत रेल्वे वाकवड स्टेशन वर थांबली …. त्यातून एक पंचीविशितील एक देखणा असा तरुण..कडक पण साधे वस्त्र घालून….असलेला …हातात एक बॅग आणि पाठीवरती एक बॅग… असे घेऊन तो उतरला … स्टेशन वरील थंड हवा त्याच्या अंगाला झोंबत होती तरी… ती सहन करतच
तो खाली उतरतो….इकडे तिकडे नजर टाकत असतो की अचानक त्याच्या नजरेस ‘ ती’ पडते..तिला पाहताच त्याच्या तोंडून एक स्वर निघतो “व्वा ..! किती सुंदर आहे ती…?”
ती ..अंगाला लागणारा गार वारा टाळण्यासाठी अंगाभोवती शाल गुंडाळून उभी होती…एका हातात कसले तरी पुस्तक होते ..तेच सांभाळत शाल आवळून धरत होती …. वार्याने आपल्या चेहर्यावर येणारे केस सावरत…होती चिंतेने आतुर होऊन एकवेळ स्टेशनच्या गेटकडे तर कधी आपल्या बॅगेकडे पाहत होती….जणू कोणाचीतरी वाट पाहत होती… इतकी सुंदर
की स्वर्गातील अप्सरा देखील तिच्यासमोर फिकी पडेल… जणू परीच होती ती… समुद्रा सारखे खोल वाटणारे, निष्पाप हरिणी सारखे सुंदर टपोरे डोळे… गुलाबाच्या पाखळीपेक्षा ही लाल ओठ …त्याला वाटत होते की तेथे चंद्राचा नाही…. तर तीचाच प्रकाश सर्वत्र पसरला आहे… इतकी ती सुंदर होती… खूप मनमोहक…. एवढ्यातच तिच्या जवळ कोणीतरी आले.. एक वृद्ध पण मध्यम वयाचा गृहस्थ .. जवळ येऊन जणू तो तिला उशीर झाल्याबद्दल माफी मागत होता .आणि भीत भीत गडबडीत तिचे सामान उचलत होता … तेवढ्यात याच्या ही जवळ कोणीतरी येत.. व त्यास म्हणते “साहेब टांगा ” तसे त्याचे लक्ष तिच्यावरचे हटून
त्या टांगा विचारणार्याकड जाते…. तो त्यास पाहत उत्तर देतो “हो पाहिजे टांगा ” तेवढे बोलून तो त्या मुलीस पाहण्यास वळतो…. पण ती तेथून नाहीशी होते … स्टेशन तसे खूपच लहान होत .. एकूण 10 – 15 च लोक
होती तिथ…पण ती त्याच्या नजरे पासून नाहीशी झाली होती…. हा ही मग निघतो … व टांग्यात जाऊन बसतो…. चक…चक …चक.. आवाज करत घोड्याच्या टापाना साथ देत टांगा पळत होता…. घनदाट अश्या जंगलातून .. जात जात जंगली श्वापद… पशू चित्र विचित्र आवाज करत.. होती… तेवढ्यात टांगेवाला … त्यास म्हणला “साहेब तुम्ही कुठल म्हणायच ? आणि इथ काय करताय आमच्या गावा मंदी ” तसा तो तरुण त्यास स्मित हास्य देत म्हणतो “मी अमन…. येथे तुमच्या गावात फिरायला आलोय… मस्त निसर्गरम्य आहे रे तुमची गाव… खूपच छान …. “असे बोलता बोलता तो अचानक थांबतो .. व एका गूढ विचारात बुडून जातो…. “कोण असेल ती ? याच गावातील असेल का? किती सुंदर होती …
आणि किती मनमोहक?”
त्याच्या विचारात बाधा बनत तो टांगेवाला त्याला विचारतो….. “साहेब कुठ न्यायच तुम्हाला ?

अमन म्हणतो “इथे तुमच्या गावात एखादे कोंटेज आहे का रे ? राहण्या करिता … ” होय न साहेब आहे लय मोठ बघा … पण काही दिसा पूर्वी तिथ एक कुटुंब राहयला आल होत … तुम्हाला म्हणून सांगतो साहेब.. ते कुटुंब आले त्याच्या दुसर्या दिवशीच गायब झालं बघा! म्हणून तिकड कोण जास्त फिरकत सुदिक नाही आम्ही बी नेत न्हाय …. पण तुम्ही नवीन दिसतात म्हणले न्यावे “असे बोलत बोलत तो टांगेवाला अचानक दचकून थांबतो…. जणू त्याचे घोडे पुढ जाण्यास तैयार नव्हते त्यास जणू कसल्यातरी अडखळीची चाहूल.. लागली होती….टांगयावाला ही जणू भांबरलेला… समोर काहीतरी पाहून…. अमनला कळलेच
नाही “टांगा का थांबला असेल?” असा विचार करत त्याने टांग्यावल्याच्या दिशेने बाहेर पाहिले … तर बाहेर पाहताच क्षणी … त्याच्या नजरेस ते ‘कोटेज’ पडले … इतके सुनसान… इतक भयंकर वाटत होत की विचारू नका …… .मोठे असे लोखंडी फाटक होत त्याला…. एकूण दोन- एकमजली होत ते कोटेज…. अंधारात बुडालेल फक्त
त्याच्या फाटकाशी दिव्याचा उजेड होता … .तसे टांगेवाला अमनला भीतभीत म्हणाला “साहेब तुम्ही जावा इथून पुढ!… मी नाय येऊ शकत … जावा तुमचं तुमी …” असे म्हणत तो टांगेवाला गरर्कन आपला टागा वळवून घेतो … व अमनला थोड्या दूरच सोडत निघून जातो… अमन आपले सामान घेऊन .. फाटका जवळ जाऊन इकडेतिकडे पाहतो…. तस समोरून अमनला फाटकातून दिसते हातात एक कंदील घेऊन … अंगाभोवती घोंगडे गुंडाळून एक माणूस त्याच्याकडे येताना त्याला दिसतो…. अमन त्यास … श्ंकाकुर नजरेने पाहतो…. तसे तो जवळ येत होता … तो खूपच जवळ आला होता …. जवळ येताच त्याने फाटकाच्या आतून .. अमनच्या चेहर्यावर कंदील धरला … तसे अमनने आपला हात उजेड
टाळण्यासाठी आडवा धरला…अचानक अमनला त्याच्या कानावर एक एक साधा आणि गावठा आवाज त्याच्या कानी पडला “कोण म्हणायच तुम्ही ?” अमनने आडवे धरलेल्या हातातूनच त्या माणसाला पाहिले… व म्हणला “मी… मी अमन… मी.. एक पर्यटक आहे …हे गाव पाहण्यासाठी आलोय येथे “….. तसे त्य माणसाने ते फाटक एका हाताने उघडले ” या आत….. हाय आमच्या हिथ राह्यला जागा …. रावू
शकता तुम्ही “असे त्याचे म्हणणे ऐकून अमन त्यास म्हणतो “ओह धन्यवाद!! हा खूप आभारी आहे मी आपला ” असे म्हणत अमन नी आपले सामान उचलले व त्याच्या मागे मागे जाऊ लागला …. सामान घेऊन जात असताना त्याची नजर
वरती एका खिडकीवर पडली … त्या खोलीतिल उजेडात आत कोणीतरी बसले
असल्याची साउली खिडकीवर पडत होती…. कोणी तरी जणू टेबलवर बसून काहीतरी लिहतय अशी साउली होती…. अमन थोडा वेळ नीट निरखून पाहू लागला … ती एक तरुण मुलगी वाटत होती…. …खिडकीतून तिची फक्त साउली पडली होती…. तसे अमन पाहत पाहत आत त्या कोटेजात जातो … आत जाताच सर्व पाहून तो अचंबून जातो.. इतके विचित्र वाटणारे ते कोटेज होत…..काही मोजक्या नेमक्या खोल्याच उजेडात होत्या… आणि दुसर्या मजल्यावर जाण्या करिताच्या दोन्ही बाजूस पायर्या होत्या त्याही … काळोखात होत्या ….त्या माणसाने कंदिलचा उजेड पायर्याच्या दिशेने केला…. व अमन ला वरती जाण्याचा इशारा केला व त्यास सौम्य आवाजात म्हणाला साहेब गाव आहे ना हे लाइट नसते आमच्या इथ जास्त म्हणून कंदील वापरताव आम्ही… तेवढ्यात लाइट येते .. व अमन चे त्या माणसा कडे लक्ष जाते त्याला पाहताच अमन एका विचारात पडतो…
to be continued….

 

Kavyaman Marathi Horror Story Part – 1

Kavyaman Marathi Horror Story Part – 2

You may also like...

6 Responses

 1. nagesh thorat says:

  nice story .a perfect atmosphere created by author.But what about remaining part of story?

 2. priti sheteye says:

  nice story….all the best for more stories..
  I also want u too share my paranormal experience…

 3. kavya says:

  nice story i love the all horror story

 1. May 29, 2015

  […] Kavyaman Marathi Horror Story Part – 1 […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *