रहस्यभेद – Rahsyabhed – Part 1

रहस्यभेद – Rahsyabhed | भाग १


तो रात्रीचा किरर अंधार होता. वाडा जणू त्या अंधारात हैवानी ताक्तिनी लखलखत होता..आकाशात विजांच्या गर्जना चालू होत्या.. ढग एकमेकावरती आदळत होते संपतराव वाड्यातील तळघरात होता.. त्या वाड्याच्या रौद्र रुपास पाहून आपल्या हातातील थैलीत काहीतरी भरून तो तळघरातून वाड्याच्या बाहेर पडला . एखादा लालसी माणूस आपल्या जीवाची पर्वा न करता जवळ चोरलेल्या अथवा त्या मिळालेल्या धनाची फिकीर फक्त करत धावतोय असा तो धावत होता आणि कशापासून तरी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत होता… जीवाच्या आकांताने तो वाडा सोडून जंगलाच्या मिळेल त्या वाटेने तो पळत सुटला होता…पळता पळता श्वास भरत सारखे सारखे तो मागे पाहत होता असे वाटत होते कोणीतरी त्याच्या मागावर होते… त्याच्या मागावर होते कि त्याच्या हातातील थैलीत असलेल्या त्या धातूच्या आणि काचेच्या तुकड्यासाठी त्याचा पाठलाग करीत होते कोणास ठाऊक.

Rahsyabhed Marathi Horror Story Part 1

Rahsyabhed Marathi Horror Story Part 1

पळता पळता तो दगडास ठेच लागून धडपडून तोंडावरती पडला. पडल्या नंतर त्याला जाणवले कि जे कोणी आपल्या मागावर होते ते नक्कीच जवळ आलेले असणार … असा विचार करीत संपत ने मागे पहिले. पण मागे पाहताक्षणी त्याला कोणाचेच चिन्ह दिसेनासे झाले… भीतीने त्याच्या अंगाचा थरकाप उडाला होता.. मागे कोणी नाही आहे पाहून तो जरासा सावरला..आणि हात जमिनीवर टेकवून उठू लागला ..आणि त्याचक्षणी संपत च्या समोर त्याला कोणीतरी उभे असेलेल दिसले… पुढ्यात उभा असणाऱ्या त्या संदिग्ध व्यक्तीचे ते रक्तानी भरलेले लालभडक पाय…अंगात पांढरा शुभ्र कपडा पण तो हि रक्ताच्या सड्यात भिजलेला.. ते काय होत स्त्री कि पुरुष ठाऊक नव्हते.. संपतच्या हातातील ती थैली आधीच धडपडीने पडून फाटली होती..आणि त्यातील वस्तू खाली जमिनीवर विखुरल्या गेल्या होत्या.. संपत स्वतःला सावरत उठला.. आणि त्याची त्या समोरील गोष्टीशी नजरानजर झाली त्याचे फक्त काचेच्या गोटीसारखे पांढरे डोळे.. चेहरा पूर्णपणे डोक्याच्या तापटसर काळ्या केसांनी झाकलेला होता.. संपत त्याच्या डोळ्यात पाहत होता.. ते डोळे एकवेळ संपत कडे आणि एकवेळ खाली पडलेल्या त्या धातूच्या तुकड्याकडे पाहत होते .. संपत पुढील काही कृती करणार तेवढ्यात.. तो मागे असलेल्या झाडाकडे आपोआप खेचला जाऊ लागला.. त्याचा आवाज निघेनासा झाला होता.. झाडातून एक वाळलेली फांदी अनुखुचीदार रीत्या बाहेर डोकावत आली होती आणि त्या संदिग्ध शक्तीने संपत ला एक जोरदार धक्का दिला त्या धक्याने संपत झाडास जाऊन धडकला आणि धडकताच ती फांदी त्याच्या छातीच्या आरपार झाली… आरपार होता क्षणी….संपतचे डोळे लालबुंद पडले..तोंडातून लाळेवाटे जणू रक्त बाहेर टपकु लागले संपत ने हळूवार आपली मान खाली झुकवली आणि तसाच राहून संपत..गतप्राण झाला.. त्याच्या छातीतून रक्ताचे ओघोळ त्याच्या अंगावरती ओघळत खाली येत होते आणि पायावरून जमिनीवर पाण्यासारखे त्याचे थर जमा होऊ लागले.. मान खाली टाकून.. संपतच प्रेत त्या झाडास अडकून राहिले.. इकडे ती संदिग्ध शक्ती ती विलक्षण गोष्ट.. नाहीशी झाली आणि त्या सोबतच ते धातूचे आणि काचेचे तुकडे देखील…
***

सुनील हातात पांढरा कंदील घेऊन त्या तळघरात जाणाऱ्या गूढ अंधारातील पायऱ्याच्या सुरुवातीच्या टोकास उभा होता.. खाली जाणाऱ्या कोणास तरी हाका मारून तो थांबवण्याचा प्रयत्न करीत होता.. अनि मला सोडून जाऊ नकोस .. मित्रा अस नकोस करू मला सोडून जाऊ नकोस … थांब अनिरुद्ध थांब… असे तो झोपतेच बेड वर पडून ओरडत होता कि अचानक .. ट्रिंगट्रिंगssss…ट्रिंगट्रिंगssss.. अंथरुणात पहुडलेला सुनील.. त्या खनखन करणाऱ्या आवाजाने खडबडून जागा झाला..आत पडलेल्या स्वप्नाने तो बावरून गेला होता ते स्वप्न रोज त्याला येऊन सारखे असे त्याला जाणवून द्यायचे कि त्याचा जवळचा मित्र अनिरुध्द कसल्यातरी संकटात आहे ते इकडे तो फोन वाजत होता सुनील ने स्वतःस सावरले चेहऱ्यावरील घाम पुसला आणि बाजूला असलेल्या ग्लासाने घटाघटा पाणी प्यायला व थोडा श्वास घेऊन सुनील फोन उचलला तिकडून जणू कोणत्यातरी उच्चपदाधिकाऱ्याच्या आदेश ऐकत असल्यासारखा.. सुनील फोन वर सर्व काही ऐकत होता.. आणि आदेश फक्त मानत असल्यासारखाच.. आदराने इकडून होकारार्थी उत्तरे देत होता.. .. सुनील एक व्यवसायाने.. सरकारी चाकरच म्हणा पोलीस खात्यात.. एक प्रशस्थ असा डिटेक्टीव्ह जासूस होता.. आणि त्याने.. आपल्या जीवनात बऱ्याच गुन्हेगारांना त्याच्या गुन्हानकरिता गजाआड केले होते… पण यावेळी त्याचा सामना कोणत्या गुन्हेगाराशी होणार होता यापासून.. तर सुनील अनभिद्न्य होता. त्या फोनवर सुनीलला त्याची एक नवीन केस त्याला मिळाली होती. आणि ती केस होती.. रामचंद्रराव यांच्या थोरल्या मुलाच्या म्हणजे संपतराव यांच्या खुनाची.. केस होती ती.. तीच केस सोडवण्यास आजच्या आजच .. सुनीलला निघायचे होते..बऱ्याच दिवसांनी त्याला वाटू लागले एक मेंदूस कसरत करायला लावणारी केस आहे वाटते हि… आणि सकाळी आपले सर्व उरकून सामान सार बांधून सुनील त्या ठिकाणी जाण्यास निघाला जिथे.. गूढ अंधाराची अनुमती घेतल्याशिवाय उजेडाचा किरण प्रवेश करत नाही. जिथे अंधाराचे साम्राज्य त्या वाड्यापासून सुरु होते आणि उजेडाचे राज्य तेथेच येऊन संपते.. एक काळे रहस्य जे वाड्याच्या गर्भात होते.. असे रहस्य भेदण्यास सुनील त्या गावी जात होता.. आणि त्या गावाचे नाव होते. “दिजाखेड”…. सुनील सकाळच्या ट्रेन ने बसला आणि मजल दरमजल करीत ट्रेन त्या ठिकाणी पोहोचली…. उतरता सुनील त्या गावचा नजारा पाहत भारावूनच गेला होता.. सर्वत्र उंच डोंगरे हिरवी शाल पांघरून गाढ झोपलेली आहेत असी वाटत होती…. वाऱ्याच्या नादाने त्याला साथ देत देत झुलणारी झाडे थिरकणारी झुडपे.. एक थंड गारवा सुनीलच्या अंगास झोंबत होता… सुनील त्या मनमोहक वातावरणाचा लुफ्त घेतच होता कि उतरता क्षणी एक टांगेवाला टांग्याच्याजवळ उभा असलेला एक वृद्ध लंगडा माणूस जरासा कान्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करीत इकडे तिकडे पाहत सुनील कडे येऊ लागला…. तो सुनील जवळ पोहचला.. आणि त्याने आपल्या कोरड्या दमात विचारले.. तुम्ही सुनील का? सुनील म्हणाला “हो मीच सुनील आणि आपण कोण ?” त्यावर तो समोर उभा असलेला वृद्ध उत्तरला

” मी नाथबा मला रामचंद्र यांनी तो बोलता बोलताच थांबला ” सुनील त्याला संशयी नजरेने पाहत त्याला म्हणाला ” हो कळले मला तुम्हाला रामचन्द रावांनी पाठवले आहे ते. मला फोनवर कळले होते ” तो तोंड वाकडे करीत म्हणाला ..”होय का? बरबर चला ” त्या माणसाने सुनील चे समान उचलले आणि टांग्यात टाकले तो त्याचा उर्मट असा आवाज सुनीलला सारखा परेशान करू पाहत होता तरी पण कसा बसा सुनील त्याला विचारण्याचा प्रयत्न करू लागला.. तो म्हणाला “तुम्ही सगळे जन वाड्यावर राहता होतात का? ” तो माणूस उर्मट रित्याच उत्तर देत बोलू लागला “नाही .. आम्ही वाड्यावर कोणीच राहत नव्हतो ते आमचे संपतराव .. अय्याश एक नंबरचे तेच फक्त राहत होते आम्ही आम्ही बाहेर गावी राहायचो ..पण जस कळले कि संपतराव गेले मग रामराव मालकांनी आम्हाला सगळ्यांना या वाड्यावर आणल ..मालक आता जरा आजारान त्रस्त हायत आणि छोटी मालकीण बी असत्यात आता आमच्या संग छोट्या मालकीण स्वभावान संपत रावच्या एकदम उलट … आणि बोलत बोलत त्याने सुनील ला सर्व काही पारिचारिक माहिती सांगितली… ” रामरावाना एक मुलगी देखील होती संपतरावाची लहान बहिण.. विद्याद्यिनी सर्व तिला विद्या म्हणायचे ती विदेशात डॉक्टरी करून आली होती … आणि तिझे वर्णन म्हणजे अप्सराच अत्यंत सुरेख.. रंग गोरा, उंच, मंजुळ आवाज..आणि दिसण्यास आणि राहण्यास सोज्वळ.. विद्या देखील वाड्यातच होती सध्या ती देखील तेथे होती.. बोलत बोलत..जंगलाच्या वाटेने.. रस्ता कापत कापत..सुनील आणि नाथबा जात होते …. लांबूनच डोंगराळ भागात जणू त्या गावच्या निसर्गाची शोभा वाढवेल असा तो शानदार वाडा सायंकाळ होत आली होती .. सूर्य अस्त होण्याच्या मार्गी होता… आणि त्याच्या शिखराचा अग्रभाग उंच उंच झाडामधून डोकावत स्वतःच स्वतःचा मान राखण्याचा प्रयत्न करू पाहत होता असे वाटत होते… टांग्याद्वारे ते वाड्यापर्यंत पोहोचले.. पण तो वाडा नसून एक प्रकारचा भव्य बंगला निघाला.. त्याची बांधणी वाड्याप्रमाणे होती … जणू इंग्रज कालीन बांधला होता आणि साबूत देखील असा जसा आताच नवीन बांधला आहे.. भला मोठा एकूण २० एक खोल्यांचा बंगला.. शानदार एक इंग्रजांचा राजवाडाच एक प्रकारे म्हणाल तर असा होता तो .. मुख्य द्वारजवळ पोहचण्याची ती सुंदर अरुंद वाट दोन्ही बाजूने हिरवळ गवताच्या शालुनी बाहरून आली होती… फाटक ओलांडून मुख्य द्वारा पाशी सुनील पोहचला .. नाथबाने ते मुख्य द्वार आपल्या दोन्ही हातानी जोर लाऊन उघडले.. तो दरवाजा कररक्र्रर्र आवाज करीत उघडला सुनील आत पोहोचला.. आत शिरताक्षणी.. त्याला एक वेगळाच अनुभव आला.. एक कुबट वासाचा गारवा त्याला शिवून गेला त्या गार वाऱ्याच्या हेलकाव्याने सुनील भांबरला …त्याला जसा तो एका स्वप्नाच्या जगातच आहे.. आपण स्वतः सध्या काय करतोय कसे आहोत याचे तो भान पूर्ण विसरून जाऊ लागला हे प्रथमच त्याला भासत होते.. तिथपर्यंत पोहचता पोहचता अंधार झाला होता हि गोष्ट तर वेगळीच… अश्याच अंधारात.. तो बंगला एकप्रकारे आपल्या रौद्र आणि हैवानी अलौकिक ताक्तींचा वास असल्यासारखा भासत होता… हातातील सामान नाथबानी हॉल मधील सोफ्यावर ठेवले आणि आजूबाजूच्या लाईट्स लावल्या.. सुनील प्रथमच एवढा मोठा बंगला आपल्या आयुष्यात पाहत होता.. समोरून दोन्ही बाजूनी यु आकाराच्या पायऱ्या वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी होत्या.. आणि हॉल मध्ये थेट सुनीलच्या डोक्यावरती.. एक लटकणारे स्टायलिश असे झुंबर होते.. खाली पूर्ण हॉल मध्ये कार्पेट होते.. मखमली सोफा.. सुनील हे सर्व डोळ्यांनी पाहतच होता कि.. कि एका भारदास्त असा आवाज त्याला आला.. “वेलकम सुनील साहेब!” समोरील उजव्या बाजूच्या पायऱ्याहून … रामराव चालत खाली होते.. अंगात एक प्रकारचा सूट घातला होता.. भरदार बांधा दिसण्यास एकदम कडक वृत्तीचे.. त्यांच्या बोलण्यातून वाटत होते कि त्याच्या मनावर जड ओझे आहे ..अर्थातच असणार कारण एकुलता एक मुलगा वारला होताना वंशाचा दिवाच मालवला होता.. तरीही त्यांनी चेहर्यावरती कोरडे हसू आणून.. सुनीलचे स्वागत केले.. त्यांना पाहून सुनील म्हणाला धन्यवाद !! असे म्हणत रामराव सोफ्यावरती बसले आणि सुनील ला हि त्यांनी बसण्यास आग्रह केला … मला दुख झाले आपल्या मुलाबद्दल ऐकून..सुनील बसत बसतच म्हणला ..रामराव हवेत हात हलवत म्हणाले .. नाही त्याची गरज नाही … “जे आपल्या नशिबात लिहलेल असत ते घडतेच आपण त्याला बदलू शकत नाही रामरावाचे डोळे पाणावल्या सारखे झाले .. होते. तेवढ्यात तेथे विद्या आली.. आणि क्षणभर तिला पाहताच सुनील स्वतःला हरपून गेला.. इतकी सुंदर मुलगी त्याने आपल्या जीवनात प्रथमच पाहिली होती… ती येताच तो तिच्यावरील नजर बाजूला काढूच शकत नव्हता,…. तेवढ्यात त्याला नाथबाचे बोलणे लक्षात आले होते कि.. रामरावास एक मुलगी देखील होती तीच होती विद्या… एकदम साधारण येताच क्षणी तिने सुनील ला नमस्कार केला… आणि ती देखील आपल्या वडिलांच्या बाजूला येऊन बसली.. बसता बसता तिने आपल्या बाबास…एका लहान मुलासारखेच विचारले…” बाबा तुम्ही औषधे घेतली?” तिच्या त्या प्रश्नांनी रामराव बावरले.. आणि त्यांची थोडी चलबिचल झाली….विद्याने बाजूला ठेवलेल्या टेबलावरील गोळ्या घेतल्या आणि.. रामरावाना खाण्यासाठी आग्रह केला.. विद्याच्या त्या हट्टापुढे त्यांना नेहमी झुकावेच लागे.. विद्या आपल्या मंजुळ आवाजात सुनील ला म्हणाली “दादा गेल्या पासून विद्या थोडीशी पाणावली पण पुन्हा तिने स्वतःला सावरत म्हणाली ” बाबांची तबियत काही ठीक नाहीये राहत…आणि ते स्वतःहून कधी औषधे घेत नाहीत ..म्हणून त्यांना मलाच पहावे लागते ..” रामरावानी औषधे घेतली आणि म्हणाले ..”अहो तुमची ओळख करून द्यायचे राहिलेच कि .. हि आमची मुलगी विद्यादिनी …आम्ही लाडाने विद्या म्हणतो… आणि बर का? आमच्या विद्याने आताच डॉक्टरी पास केली आहे .. MBBS आहेत आमच्या विद्या.. ” विद्या बाबांना अडवत हलक्या स्वरात हसत म्हणाली …” बाबा ते आताच आले आहेत.. थकले असतील त्यांना.. चहा वगेरे तुम्ही विचारले का नाही ?” रामराव भानावर आल्यासारखे म्हणाले “अरे हो.. पण आता इतकी रात्र झाली आहे …तर सुनील राव तुम्ही तुमच्या केस करिता येथे आला आहात .. पण आमच्या संपतचे कोणी शत्रू वैरी नव्हते .. बोलता बोलता रामराव पुन्हा थांबले आणि जणू त्यांनी स्वतःस भक्कम दाखवण्याचा प्रयत्न करीत .. म्हणाले ते जाउद्या या विषयावर आपण सकाळी बोलुत ..सध्या जेवण्यास चला.. तिकडे किचन कडे जेवणाची खोली आहे.. या विद्या आधी आत मध्ये गेली आणि टेबलावरती तिने सर्व जेवणाची मांडणा मांडणी केली.. आणि सुनीलकडे आली रामराव जेवणाच्या मेजवर पोहोचले… आणि सुनीलला हात धुवायचे होते .. म्हणून तो इकडे तिकडे काही तरी हुडकत होता.. तेवढ्यात विद्या त्याच्या जवळ आली आणि म्हणाली … या बाहेर पाण्याचा नळ आहे सध्या बाथरूम वरती आहे म्हणून ..बाहेरील नळ जवळच आहे.. तिचा आवाज खूप मंजुळ होता.. तो जणू स्वत:ला विसरूच लागला होता.. दोघेही बाहेर आले.. आणि विद्याने सुनील ला नळ चालू करून दिला आणि ती हातात टोवेल घेऊनच उभा होती… ती त्याच्या कडे केआ आशावादी नजरेने पाहत होती .. ती त्याला पाहत म्हणाली “mr सुनील बरे झाले तुम्ही आला आहात येथे ते.. आम्ही इथे राहण्यास आल्या पासून इथे खूपच विचित्र गोष्टी घडताहेत… खूपच विचित्र.. मी बाबांना नाही सांगू शकत कारण दादा चे दुख आधीच त्यांच्या मनात घर करून आहे.. आणि दादा बद्दल सांगायचे झाले तर.. दादा थोडक्यात उठायगिऱ्या सारखे राहत होते.. बाबांनी त्यांना बरेच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण दादा ऐकत नव्हते ते सारखे बाबाकडून जबरदस्ती पैसे घ्यायचे ..मग ते म्हणाले मी हा बंगला विकून टाकीन यातली एक एक वस्तू विकीन जर तुम्ही मला पैसे नाही दिलेत तर पहा.. दादा आम्हाला सोडून इकडे निघून आले आणि त्यानंतर थेट त्यांच्या मृत्यूचीच बातमी आम्हाला कळली आणि आम्ही मग येथे आलो..दादाची खोली आम्हाला पोलिसांनी जशीच्या तशी ठेवण्यास सांगितली..आणि त्यांनी खोलीस बाहेरून कुलूप लावून त्याची चावी बाबा जवळ ठेवली.. ” सुनील ला विद्या सर्व काही नकळत सांगून गेली.. तो उठायगिऱ्या, अय्याश होता, जुगारू होता.. संपतची बरीच ओळख.. विद्या द्वारे सुनील ला झाली.. विद्याने सुनील ला टोवेल दिला.. आणि तो तिला म्हणाला ..”तुम्ही नकळत मला खूप माहिती संगीतीली आहे.. धन्यवाद आणि तुम्ही विचित्र गोष्टींबद्दल बोलताहात म्हणजे कशा प्रकारच्या..कोण्या अनोळखी व्यक्तींचे पत्र अथवा धमकीचे फोन अथवा तुम्हाला कोणी परेशान तर नाहीं न करत..” मला आरेतुरे म्हणाल तरी चालेल… विद्या स्मित हस्य करीत सुनील ला म्हणाली.. सुनील देखील तिला पाहून थोडासा हसला विद्या पुढे बोलू लागली ती म्हणाली तुम्ही म्हणता त्या पैकी एक असते तर ते मी स्वतः पाहिले असते.. पण अश्या गोष्टी ज्यांना मी कधीच नाही समजू शकणार ..एकवेळच अचानक कोणत्यातरी कोपर्यातून कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येतो..आणि तोही साधारण नाही खूपच खिन्न हसण्याचा ….घरात कोठे एकटे जात अथवा फिरत असल्यास कोणीतरी पाठलाग करतय आणि दादाच्या खोलीतून कोणीतरी श्वासाच्या ओघात मला हाका मारते..आम्ही जेव्हादादाच्या खोलीस कुलूप लावले..तेव्हा आतमध्ये कोणीसुद्धा नव्हते राहिले… आणि नाथबा रात्री मध्यरात्रीच उठून काहीतरी घरात फिरतंय अशी दोन तीनदा बातक्रार माझ्याकडे घेऊन आला होता.. सुनील तुम्ही एकवेळ घर फिरून पाहावे अशी माझी इच्छा आहे… तेवढ्यात “विद्या अग बाळ विद्या” आतून रामराव विद्यास हाक मारीत होते.. विद्या सुनील ला पाहत आत गेली आणि जाता जाता त्याला आत येण्यास ती म्हणून गेली.. सुनील टॉवेलने हात पुसत आत जाण्यास निघाला.. तो जिथे उभा होता तेथून किचनची खोली बऱ्यापैकी लांब होती.. सुनील जाण्यास निघाला.. पण जेव्हा त्याने बंगल्यात प्रवेश केला जी अनुभूती त्याला झाली होती.. तीच अनुभूती त्याला आता होऊ लागली.. त्या पूर्वी त्याच्या मनात विचार चालू होते. कि दरवेळी प्रमाणे केस सिम्पल आहे.. कि एखाद्या उठायगीर्या माणसाचे बरेच वैरी असतील आणि त्यांच्या पैकीच कोणीतरी एक असेल.. अश्या माणसांना शत्रूंची कमी नसते.. हाच विचार त्याच्या मनात चालू होता.. त्याच्या फाईल मध्ये संपत च्या मृतदेहाचे आणि सर्व इतर माहिती होती.. सुनील ला आत्मविश्वास होता कि तो नक्की दरवेळी प्रमाणे.. हि देखील केस तो आरामात सोल्व करेल… पण सुनील.. मुख्य मुद्यापासून तर लांबच राहिला होता.. त्याने विचार केला होता उद्यापासूनच तो सर्व काम सुरु करेल.. आणि त्याची ती होणारी अनुभूती त्याला त्या घराबद्दल वेगळेच जाणवत होते… जणू या घरात अजून कोणीतरी नक्कीच आहे.. सुनील आतमध्ये आला आणि त्याने जेवण वगेरे उरकली रामरावानि त्याची थोडीफार विचारपूस केली आणि सुनील ने हि न दिरंगाई बाळगता सर्व काही सांगितले.. आणि झोपण्यासाठी तो जाऊ लागला जाता जाता विद्या देखील त्याच्या बरोबर होती ती त्याला त्याच्या खोली पर्यंत सोडण्यास येत होती.. पायऱ्याहून वरती जात असताच.. मध्यभागी वरती बसण्या करिता एक फायरप्लेस होते तिथे दोन आराम खुर्च्या होत्या.. आणि शेकोटीचे फायरप्लेस होते… तो बंगला अत्यंत विशाल होता.. कोणती जणू प्रत्येक खोली आपापल्या शिस्तीत आणि लाईनमध्ये लावल्या सारख्या वाटत होत्या आणि प्रत्येक खोली इंग्रजी मेजपोषणी वात होती.. विद्या सुनील ला त्या खोली कडे घेऊन जाऊ लागली .. जात जात सुनील विद्यास म्हणाला “जेवण, स्वयंपाक एकदम उत्कृष्ट होता… ” नाथबा सुनील ला आणण्या करिता स्टेशन वरती आला होता… तेव्हा विद्याने स्वतः स्वयंपाक करून ठेवला होतां.. त्याचे ते बोलणे ऐकून विद्या गालातल्या गालात हसली.. आणि तो पर्यंत ते दोघे सुनील च्या खोलीत पोहचले.. विद्याने सुनील ला दार उघडून दिले … दार उघडले आणि सुनील आत मध्ये आला.. आतमध्ये एकदम आलिशान असा दिवाण होता.. बसण्यास लोड तक्के आणि गद्दी,,.. सुनील आत आला त्याच्या उजव्या अंगास एक सुंदर अशी एका भरदार पहिलवानाची पिताळाची मूर्ती एका कोपरयात होती.. जणू ती त्या कोपऱ्याची शोभा वाढवण्यासाठीच ठेवली होती आणि तिने हातात एक धातूचा ठोकळा घेतला होता. इकडे विद्या आपल्या वडिलांच्या औषध गोळ्या पाहण्यास गेली होती.. सुनील त्या मूर्ती जवळ गेला आणि…. त्याने ती मूर्ती नीट निरखली.. एकदम उत्तम कारीगरी होती तिची.. आणि तिच्याच हातात तो धातूचा ठोकळा होता… आणि हा तोच ठोकळा होता ज्यांचा ढीग चोरून संपत जीव मुठीत घेऊन धावत होता… सुनील त्या ठोकळ्यास हात लावण्यास पुढे सरसावला….
***
आणि त्याने तो उचलला..उचलता क्षणी त्याला असे वाटले कि जणू कोणीतरी मागून त्याच्या अंगावर धावून आलंय अस त्याला वाटले त्याचे सर्व अंग आकसून जाऊ लागले.. मानेवरचे केस त्याच्या ताठ उभे राहिले.. सुनील च्या मानेवरती कोणाचातरी श्वास थडकत होता.. सुनील च्या खोलीतील वातावरण पूर्ण पालटून गेले होते.. त्याला जाणवू लागले कि नक्कीच त्याच्या खोलीत अजून कोणीतरी त्याच्या व्यतिरिक्त तेथे आहे.. समोरील ती मूर्ती जणू त्याच्याकडे क्रूर घ्रुनात्म्क रीत्या पाहतेय असे त्याला जाणवू लागले होते.. सुनील ने क्षणाचाही विलंब न करता तो धातूचा ठोकळा होता त्या ठिकाणी मूर्तीवर ठेवून दिला…. आणि त्या खोलीतील वातावरण वापस साधारण झाले.. सुनीलला प्रथमच एक अस्वस्थतेचे भान होऊ लागले.. त्याच्या माथी त्याला नकळतच घामाचे ओस निर्माण झाले होते.. आणि अश्या वातावरणात झोप येन ते तर अशक्य होत..म्हणून सुनील आपल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर… चंद्रास निहारत बसला होता.. अचानक त्याच्या चेहर्यावर एक हस्य आले.. असे वाटत होते तो चंद्रामध्ये… विद्यास पाहत होता… भावली होती ती त्याच्या मनाला… चंद्रास पाहत पाहत तो एव्हाना झोपिदेखील गेला होता..
. सकाळ झाली… सुनील त्याच्या आरामखुर्चीत केव्हा झोपी गेलेला होता त्याचे त्यालाच कळले नाही… सकाळ होताच सुनील उठला … आपल्या अंगातील आळस झटकून तो खिडकीपाशी हवा घेण्यास आला… त्याने केस कडे लक्ष देण्याचा विचार केला आणि आपले सर्व काही उरकून तो खाली आला… खाली विद्या रामरावास चहा देत होती.. आणि तिने सुनील ला पाहत दुसरा कप देखील तैयार केला होता.. पण सुनील येथे चहा घेण्यास आला नव्हता…. त्याने आदराने विद्यास चहा करिता नकार दिला.. आणि थेट फोन पाशी वळला… सुनील ने तेथील लोकॅल पोलीस इन्स्पेक्टर गावढे यांना फोन केला आणि ताबडतोब खुनाच्या ठिकाणी येण्यास सांगितले… इन्स्पेक्टर गावढे.यांच्याबद्दल सांगायचे झाले तर दिसण्यास… जरासे सावळे.. भरदार मिश्या… चपचपीत चमेलीच तेल लावून.. कुरळे केस कसे बसे दाबून ठेवणारे… बाहेरून दिसण्यास वाटायचे कडक पण आतून.. सश्या पेक्षा हि जास्त भित्रे..पण सदैव मदतीस तत्पर इन्स्पेक्टर गावढे.. फोन करताच घटनास्थळी पोहोचले.. तेथे सुनील.. जागेची पाहणी करीत होता… आत मध्ये कोणी येऊ नये अश्या रीतीने पोलिसांचा घेरा आणि पोलीस असे नाव असलेल्या… बंधांनी .. तेवढी जागा आरक्षित केली होती… त्या झाडास ती फांदी जशीच्या तशी होती..ते वाळलेलं झाड.. एकमेव संपतरावाच्या खुनास त्या घटनेचे.. निर्जीव साक्षीदार होते… त्या फांदीस .. संपतरावाचे लालभडक रक्त माखलेले होते… तेथे असणाऱ्या पावलांच्या खुणा देखील जसाच्या तश्या होत्या.. सुनील ने त्या नीट निरखून पाहिल्या… त्यात फक्त एकाच व्यक्तीच्या वाटत होत्या… आणि तो होता संपत.. सुनील खाली पाहतच होता कि.. तेवढ्यात धडपडत.. कोणीतरी.. स्वतःचे जाड पोट (ढेरी ) सावरत येत होते… हातात काठी.. आणि एका बगलेत पोलसांची टोपी.. त्यांना पाहताच क्षणी.. सुनील ओरडला .. “थांबा तेथेच !” ते होते इन्स्पेक्टर गावढे ज्यांना सुनील ने अडवले होते… इन्स्पेक्टर चा एक पाय हवेतच होता.. गावढेना कळेना सुनील ने त्यांना का थांबवले सुनील त्यांच्या जवळ आला आणि त्याने गावढेना आपला हवेत असणारा पाय मागे घेण्यास सांगितला… .. गावढे म्हणाले ..”काय ? काय झाले साहेब ?” सुनील त्यांना काहीच बोलला नाही.. त्याने स्वतः हुन गावढे यांचा पाय हाताने मागे सरकावला.. आणि खाली नीट निरखून पाहिले… तर तेथे लालसर माती.. जी आधी ओली झाली होती कोणत्यातरी..द्रवपदारथाने एखादा घट्ट द्रवपदार्थ… लाल.. आणि त्याच्या पुढ्यातच होते काही चौकोनी आकाराचे… ठसे.. एखाद्या ठोकळ्यांचे असावेत बहुदा सुनील ने त्यांचे आपल्या मोबाईलवर फोटो काढून घेतले… आणि ती ओली माती देखील पाहून सुनील समजून गेला कि ते रक्त होते.. आणि ते देखील जणू एखादाच्या तळपायाच.

 

रहस्यभेद – Rahsyabhed – Part 2

You may also like...

45 Responses

 1. janu says:

  please next bhag lavkr update kra

 2. sonam says:

  hya pude kay?

 3. akshay says:

  Next part kuthey?

 4. Sap says:

  Part 1 is totally different aani part 2 aani 3 madhe tya case ch kahich ullekh nahi.

 5. Sap says:

  Rahsyabhed ya kathe sambatit lihil aahe me

 6. Somnath says:

  Rahasyabhed Part 2 kuthe ahe?

 7. AABHA says:

  SEND MORE. PPPPPPLLLLEEEAAAASSSSSEEEEEEEEE……

 8. mayur musale says:

  Are plz plz konitari saga yar 2parta kote ahe te….

 9. ketan patil says:

  nice story but next part when will update?

 10. RASHMI says:

  ARE rahasya bhet part 1 ,2,3 aahai pan part 1 abhura aahai….. aniruddha kon aani kasa aala , kachechya tukdyache kay kahicha samjat nahi. story apuru vatte aahai .
  tumi ti neet post karayla havi .

 11. soniya says:

  Dear Poonam,
  Rahasyabhed cha part 2 upload ni zalay,,,part 3 la part 2 ase naav dilele ahe,,,story purn wachlya nntr part 2 cha andaz yeto pn tarihi wachayla awadel,,,
  Soniya

 12. nagesh thorat says:

  nice horror story.but where is remaining story.i m really eager to read it.

 13. suraj sarvande says:

  nice story pan pudil pat kewa yenar

 14. समीर भोसले says:

  मला फक्त 1 आणि 3 भाग आला. Where is 2nd part?

 15. salim says:

  2ra part kuthe ahe direct 3/4part taklaa ahe lavkar 2ra part post kara

 16. आतिश पाटील says:

  पार्ट 2 लवकर येऊ दया.

 17. saee says:

  pudhachi story kadhi yenar

 18. Mana says:

  Next part lavkar upload kara yaar plz…

 19. vishwanath utekar says:

  katha apurna vatali part-1, natar part-2 cha kuthech dhaga julat nahi

 20. sntosh vitthal kambli says:

  vatavaran nirmiti atyanta chhan jamun ali ahe, bhashetil ashudhimule rsbhang hoto. krupaya kalji ghya. mazya apeksha tumhi khup vadhavlya ahet.

 21. poonam says:

  I think first part ardhvat aahe if you possible please update the first part of rahasybhed.

 22. patil aniket narayanrao says:

  Yarr eK tar half stories lihu naka plz. part 1 CH Kay zal? case close zali ka nahi?
  ka tumhala vel nahiye story complete karayla?

 23. supriya says:

  Goshticha vishay jari changla asla tari Mala vatata lekhak navkhe ahet tyamule lekhanat barich ashuddhi asun chukiche shabda chukichya thikani vaparnyat alele ahet. tyane vachakanchi nirasha hote krupaya he lakshat gheun lihave ani lekhanat vyakaran vyavasthit aslyachi khatri karun post karave.

 24. Rajeshri says:

  Story chan ahye ,pls tee update kara.

 25. Mrunmayi says:

  Story complete l8hita yet nasel tar lihat jau naka please karan part1 ani part2 3 kahich julat nahiyet….Jar part1 cha pudhcha asel tar plz lavkar post kara….
  Ani ya part baddal bolaycha tar ekdum bhari ahe mast lihila ahe.

 26. Snehal says:

  Vachun khup chhan vatal….vachtana as vatat hot ki hi gosht pratykshat doly samor ghadtey….

 27. Snehal says:

  He bagha guys apan ekhadyla tika karnya peksha tynchy lekhnicha aadr kela pahije mg to lekhak navin aso va juna….at least tyni lihaicha tri praytn kela jo kitekana karta hi yet nhi…so i think apn yung gereration ne tyna prosahan dil mahije….

 28. prem says:

  next part 2 aani 3 bhaltach lihalela aahe kahich kalat nahi aahe

 29. Aniket says:

  Khupch chan lihalay pn each part madhe story half ahe
  Pllzz
  Update

 30. Rohit says:

  कथेचा पुढील भाग अपडेट करा नाहीतर app मध्ये तरी उपलब्ध करा किंवा त्याची लिंक द्या.

 31. JIT says:

  PART 2 ANI PART 1 CHA SAMANDH KUTHECH NAI ……PLEASE PART 2 UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *