गहिरा अंधार – Gahira Andhar – Part 3

गहिरा अंधार – Gahira Andhar | भाग ३

गहिरा अंधार – Gahira Andhar | भाग १

गहिरा अंधार – Gahira Andhar | भाग २

आदित्याला पाहून दिक्षाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता तिला रडू का हसू काहीच कळेनासे झाले होते .. पण तिला त्याचा आलेला राग अजून तिच्या मनात होता.. आदित्य .उंच असा लांब सरळ नाक….सुटसुटीत मउ केस.. अंगात..पांढरा शर्ट पायात जीन्स ची pant… हातात एक bag.. आणि हसमुख तेजस्वी गोरा चेहरा…आणि गळ्यात श्री हरी पांडुरंग विठ्ठलाचे लॉकेट .. आणि डोक्याने थोडासा .. सनकी… जगापेक्षा वेगळा विचार ठेवणारा .. असा होता आदित्य… त्याला पाहून दिक्षास मनातल्या मनात खूप आनंद झाला होता… पण ती दाखवत नव्हती.. ती वरून त्यावरती रागवलीच होती… कारण न सांगता तिला सोडून तो काही कामा साठी विदेशी गेला होता…ते पण एकूण ७ वर्षासाठी आदित्य, अमित आणि अश्विनी हे एकाच कॉलेजात असायचे दीक्षा अश्विनीची लहान बहिण होती,,…पण आदित्याच्याच वयाची… सहज आदित्य आणि दिक्षाची भेट झाली मैत्री झाली आणि मग प्रेम..

Gahira Andhar marathi horror story part 3

Gahira Andhar marathi horror story part 3

 

ती आदित्यच्या जवळ गेली.. तिच्या डोळ्यात घळघळून पाणी आले होते ते तसेच घेऊन ती त्याच्या जवळ गेली… ती जवळ यत आहे पाहून आदित्य स्मित हस्य करत होता…ती जवळ गेली आणि

आणि तिने खणकन आदित्यचा कानाखाली दिली … .आदित्य तिच्या चापटीने इव्ह्ळला …”स्स्स आई ग …!! दिशू अग किती जोरात मारतेस ..लागले न मला ” दीक्षा चा तो प्रेमळ राग आदित्यला खूप आवडला .. .दीक्षा त्याला रागवू लागली …”तू … तू मूर्ख बेअक्कल, बेह्या बेशरम आदित्य गुप्ता,,नालायक…..कशाला आलास माघारी तिकडेच मेला असतास तर बर झाले असते .. आणि ”..ती पुढच काही बोलणार तेवढ्यात आदित्यने आपला उजवा हात तिच्या कंबरेत घातला आणि तिची कंबर गच्च आवळून तिला आपल्यावरती खेचले… आणि तीझ्या ..शिव्या चालू असणाऱ्या सुंदर ओठांमध्ये त्याने आपले ओठ सामावले आणि तिचे चुंबन घेतले ..त्या प्रेमळ ह्र्द्यभेदी स्पर्शाने दीक्षाचे डोळे आपोआप झाकले जाऊ लागले.. … तिच्या झाकलेल्या डोळ्यातून ..घळाघळा पाण्याचे थेंब बाहेर ओघळत तिच्या गालावर येऊ लागले.. आदित्यने आपले ओठ तिच्या ओठातून बाहेर काढले.. तशी दीक्षा त्याला कडकडून बिलगत मिठी मारत रडू लागली,….. तिच्या रडण्याने आदित्य हसला आणि म्हणाला …”ए वेडूबाई …काय झाल ग अस रडायला? ” ..ती रडत रडत म्हणू लागली ..”का रे ? का अस सोडून गेला होतास न सांगता ? तुला काहीच कस वाटल नाही रे माझ्या बद्दल..किती वाट पाहिली मी तुझी ..साधा एक फोन तरी करायचा जिवंत आहे म्हणून ” असे म्हणत म्हणत ती त्याच्या छातीवर हलके हलके मारत रडू लागली .. कि आदित्यने तिला अजून बिलगून घेतले .. कि खाली रॉकी भूकू लागला लाईट हि आली होती .. बाहेर गाडीचा आवाज आला गाडीतून अमित आणि अश्विनी बाहेर पडले… आदित्यस पाहून दोघे हि खुश झाले .अमित दिक्षास म्हणाला पाहिलस मी म्हणालो होतो न तुझ्या साठी पण एक गिफ्ट आहे हे होत ते गीफ्ट .. अश्विणीस आदित्य ने शुभेच्छा दिल्या .. आणि अमित कडे वळला तेव्हा अमित म्हणाला ..”काय रे भूत माझ्या या गोड मेहुणी ला तुला सोडून जावस कसे वाटले रे ” आदित्य म्हणाला अरे माझ खूप म्हत्वाच काम होत तिकडे एका पिशा ,,,…. अश्विनी मला खूप भूक लागली आहे बघ तू आणि दीक्षा आमच्या करिता काही तरी जेवण बनवान तो पर्यंत मी आणि अमित येथे बोलत बसतो ..आदित्य बोलता बोलता थांबला आणि त्याने दीक्षा व अश्विनीस जेवणाची तैयार्री करण्यास सांगतिले.. आदित्य आणि अमित ..बाहेरच सोफ्यावर बसले …आदित्य जरा गंभीर मुद्रेत होता आणि अमित ने ते हेरले अमित म्हणाला काय रे काय झाले असा चेहरा का पाडलास .. तेव्हा आदित्य त्या कडे वळला आणि म्हणाला .. तुला आठवतय का .. एक वेळ मी तुला तिकडून मला मिळालेल्या केस बद्दल सांगितले होते कोणती ती तीच ना एक प्रेत एका कुटुंबाच्या मुली मागे लागलेले आणि त्याने म्हणे त्या घराच्या मुख्य सदस्यात त्या मुलीच्या वडिलाच्या आत घुसून सर्व घरादारास मृत्यू तोंडी ढकलले.. आदित्य म्हणाला” हो हो तीच तीच केस “ “मी त्या घरातील मुलीच्या विनंतीने ते घर पिशाचमुक्त केले.. मी आज पर्यंत असले जुनुनी पिशाच नव्हते पाहिले.. त्या पिशाचा मुळे मला इथून जावे लागले.. म्हणून मला इथ येण्यास वेळ लागला ..” “हो अस पण तू हे मला पुन्हा का सांगतोयस ” तेव्हा आदी उत्तरला… इथ आपल्या इथ पण याच शहरात अशीच एक केस घडली होती…पण त्यात पिशाच नव्हते ..एका माणसाने वेडाच्या भरात येऊन आपल्या मुलीस आणि पत्नीस कुर्हाडीने जीव मारले.. आणि जिथ असे घडले होते ,,,.. ते घर हेच होते… ..” तेव्हा ते ऐकून अमित म्हणाला ”तुला काय म्हणायचं आहे नेमके ?” आदित्य म्हणाला मला संशय आहे कि या घरात पिशाच्च आहे…. त्याने आता पर्यंत दोन वेळा आपले वास्तव्य साध्य केल आहे ..तू चिंता करशील म्हणून… अश्विनीने तुला सांगितले नाही.. “तेव्हा अमित हसला “ह्हा हाहाह … काय तू पन अरे .. ज्या घरात खून झालेला असतो तिथ भूत असेलच अस काही नसते .. तू उगाचच कलजी करतोयस .. मला तर तस काही जाणवले नाही .. आणि अश्विनीस या घराबद्दल नाहीये तस काही तू खर्च काळजी करू नकोस .. अरे वा मस्त वास येतोय जेवण तैयार आहे वाटते..चल जेवण करूयात ” आदी त्याला थांबवत म्हणाला तुला जर वाटत असेल मी चेष्टा करतोय.. तर तस नाहीये . तरी पण … तू सावध राहा माझ काम तुला इथ असलेल्या धोक्या पासून सावध करन आहे मीत्राच्या नात्यान.. “ अमित उतरला “ठीक आहे चल आता नाहीतर जेवण थंड होईल ..” सर्वांनी जेवण उरकून घेतले.. सर्व उरकून झाले अमित आणि अश्विनी झोपण्यास जाऊ लागले अश्विनीस दीक्षा नि थांबवले आणि तिला एका कोपरयात नेऊन तिने तो अंगारा अश्विनीच्या माथी लावला .. आणि तिला म्हणाली “ताई काही चिंता करू नकोस आता आदी पण आला आहे आणि अमित जीजू तुझ्या सोबत आहेत त्यांना घडलेला प्रकार नकोस सांगू ” अश्विनी भीत भीत होकारार्थी मान हलवत झोपण्यास गेली आदित्यचा गंभीर चेहरा दिक्षाला गोंधळात टाकत होता कारण आदि आणि दीक्षा आदी कडे आली त्याचा चेहरा तेव्हाच गंभीर व्हायचा जेव्हा एखादी परेशानी असेल ती पण साधी नव्हे एखाद्या प्रेताची . असेल तर अमित इकडे झोपण्यास गेला होता.. पण जात जात त्या पूर्वी तो बाथरूम मध्ये जाण्यास निघाला.. तो आत मध्ये गेला… आणि रॉकी हि त्याच्या जवळ आला होता रॉकी दारात बसला होता आणि बसूनच त्याला पाहत होता ..अमित आत मध्ये गेला…त्याने आपले तोंड धुतले आणि आरशात पाहिले पाहताच क्षणी आरशात त्याला एक काळी प्रतिकृती दिसली त्या आरशात त्याला दिसली त्याच्या हातात एक कुऱ्हाड होती आणि तो दिसण्यास अतिशय विचित्र वाटत होता तो माणूस त्या आरश्यातून बाहेर येऊ लागला अमितला आपल्या जागेवरून हलता येईनासे झाले होते… तरी हि तो प्रयत्न करीत होता रॉकी बाहेरून भुंकत होता.. आदित्यने रॉकीचा आवाज ओळखला त्याला समजले काहीतरी नक्कीच गडबड आहे .आदित्य धावला आणि बाथरूम कडे जाऊ लागला ..आणि ते प्रेत अमित मध्ये त्याच्या श्वासाद्वारे प्रवेश करण्यात समर्थ झाले… होते ..आदित्य बाथरूम कडे धावला आणि त्याने रॉकीस बाजूस घेऊन शांत केले… आदित्यास अमित ला पाहून खूप वेगळ वेगळ वाटत होत.. त्याच्या हावभावात बोलण्यात फरक जाणवत होता… पण आदित्य त्याला काही बोलला नाही.. अमित आपल्या रूम मध्ये जाऊ लागला.. जात जात त्याने रॉकी कडे एका रागीट नजरेने कटाक्ष टाकला.. आणि बेडरूम मध्ये गेला.. पण तो अश्विनीचा जीव घेण्यास आत जात होता ते आदित्यच्या लक्षात आले नाही.. आदित्यनेत्याकडे थोड दुर्लक्ष केल आणि तो परत दीक्षा कडे आला.. आणि म्हणाला दिशू आता पर्यंत झालेल्या सर्व घटना मला सांग लगेच ताबडतोब दीक्षा ने सर घटना क्रमाक्रमाने सांगितल्या त्या ऐकल्या नंतर आदित्य शेवटी एका निष्कर्षावर येऊन ठेपला… आज पर्यंत त्याने exorcism च्या प्रयत्नाने बऱ्याच लोकांना मुक्त केल होत… आदित्यने दिक्षास त्या खोली कडे चलण्यास म्हणला जिथे तो पियानो होता दीक्षा आणि आदित्य त्या पियानो कडे जाऊ लागले आदित्यने त्या खोलीचा दरवाजा उघडला… कि आतून एक थंडगार वाऱ्याचा झुळूक त्या दोघांना भेदत त्यांच्या आरपार झाला.. तो झुळूकाचा भेद असहनीय थंड होता. त्या ठिकाणी अंधार होता . आदित्यने खिशातील लाईटर बाहेर काढून पेटवले..दीक्षा त्याच्या कडे रागाने पाहू लागली ती म्हणाली “हे केव्हा पासून मिस्टर “ आदित्य भांबरला अग नाही हे माझ नाहीये हे तर अमितच आहे “ “बर!! जीजुच आहे होय हे ठीक आहे” तेवढ्यात आदी विषय बदलत म्हणाला ..”अग हाच का तो पियानो..” आदी समोरील हूल खात असलेल्या पियानो जवळ गेला आणि बोलला ,,, आदी त्या वरती बसला आणि त्याने एक बीप वाजवल ..काहीच होईना … दीक्षा पुढे सरसावली.. कि अचानक तो पियानो आपोआप वाजण्यास सुरुवात झाली… त्या पियानो भोवती काही साउल्या फिरू लागल्या .. आदी ते समजण्याचा प्रयत्न करू लागल्या त्याने आपल्या खिशातून एक क्रिस्टल बाहेर काढला तो एका साखळीस लटकत होता आदिने तो आपल्या मुठीत बंद करून त्यावर त्याने काही तरी मंत्र म्हणाला … आणि त्याने त्या क्रिस्टल वर फुंकर मारत तो तळहातावर धरला तळहातावर धरता क्षणी समोरील साउल्या एका जागी थांबल्या त्या थांबताच आदिने क्रिस्टल दीक्षाच्या हातात ठेवला.. पण इकडे अमित आपल्यात असलेल्या पिशाच शक्तीस अडवू शकत नव्हता .. त्या पिशाचाने ज्या प्रमाणे वेडाच्या भरात आपल्या पत्नी आणि मुलीस कुऱ्हाडीने ठार केले होत तसेच अमितला त्याने पछाडले होते.. आणि अमित आज अश्विनीचा जीव घेणार होता… इकडे आदी त्या साउल्या जवळ जाताच त्यांना रंग रूप आकार आले चेहरा आला,,,… त्यात एक आई आणि तिची मुलगी खेळताना दिसत होते आणि त्यांच्या मागे,… त्या स्त्रीचा पती कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी येत होता… त्याच्या मानेवर कसली तरी खुण होती ..ते पाहून आदित्य ला काहीतरी आठवू लागले त्याला वाटू लागले कि त्याने कोठेतरी आधीपण पाहिली आहे ती खुण कि आदित्यच्या लक्षात आले त्याने ती खुण अमित च्या मानेवर बाथरूम मध्ये असताना पाहिली होती ” आदित्यला सर्व काही कळून चुकले कि अमित आता अमित नाही राहिला त्यात त्या पिशाचाने आपला समावेश केला आहे .त्या पिशाचाने आपल्या पत्नीस आणि इवल्याश्या जीवास मारले होते… म्हणजे अमित अश्विनीस आणि तिच्या पोटातील इवल्याश्या जीवास मारणार “ओह्ह नो” आदीच्या च्या तोंडून उद्गार बाहेर पडले ….. कि तो दिक्षास घेऊन अश्विनी कडे धावणार तेवढयातच त्याला मागून त्या साउल्या मधून कोणीतरी हाक मारले त्या लहान मुलीचा आवाज होता तो ती म्हणाली … ताई अजून एकदा वाजव न हे पियानो आई वाजवायची .. दीक्षा त्या मुलीस पाहून घाबरली आणि ती आदी जवळ आली.. आदिने तिला म्हणले .. वाजव तो पियानो … दीक्षा म्हणाली का ? आदी उत्तरला ”कारण याच्या आवाजाने तिला तृप्ती मिळते. आणि ती आपल्या खऱ्या पिशाची योनीत येऊन मुक्त होईल … तू वाजव मी आहे तुझ्या सोबत .. गो ! दिशू यु कॅन डू इट” दीक्षा तीच धून वाजवू लागली ती मुलगी चिरकू लागली तिचा आवाज जीवघेणा येत होता…त्या आवाजाने इकडे अश्विनी जागी झाली आणि समोर तिच्या अमित उभा होता तो देखील कुऱ्हाड घेऊन ..अमितने कुऱ्हाडीने तिच्यावर वार केला ….”य्याआआआह्ह्ह… खच्च” पण .. अमित ने केलेला तो वार निष्फळ होता .. ती कुऱ्हाड त्याने अश्विनीच्या पोटाकडे वळवली तो तिच्या पोटावर वार करणार होता कि त्याच क्षणी अमित दूर जाऊन पडला गेला.. त्याला जोरदार झटका बसला होता … अश्विणीस काही कळेना .. ती अमितला घाबरू लागली… अमित तसाच उठला अश्विनीचे लक्ष तिच्या जवळील आरश्यात गेल तीला आढळून आल कि आई जगदंबेचा आशीर्वाद त्या म्हातारी आजीचा अंगारा तिच्या माथी होता .. पण अचानक त्या कडे अमित चे हि लक्ष गेले आणि त्याने बाजूचा पाण्याने भरलेला जग घेतला आणि अश्विनीच्या तोंडावरती … भिरकावला तो जाऊन थेट तिच्या माथ्याशी धडकला आणि तसेच तिला इजा झाली आणि ती खाली पडली ती थेट तिच्या पोटावरच .. अश्विणीस भयंकर पोटात त्रास जाणवू लागला ती रडू लागली इव्ह्ळू लागली …. तिच्या त्या रडण्याचा आवाजाने अमित ला (त्याच्यातील पिशाचाला० ) अत्यानंद होऊ लागला… तिचा आवाज ऐकून आदी तिच्या कडे येऊ लागला दार आतून बंद होत… आदी दारा जवळ पोहोचला तेव्हा रॉकी चा मृतदेह दाराबाहेर पडला होता .. आदी संतापला आदी जोरजोरात बाहेरून धक्के देऊ लागला .. दार उघडेना झाले होते.. इकडे दिक्षाने ती धून चालू ठेवली होती… ती धून संपत येत होती आणि ती समोरील मुलगी देखील हळू हळू आपल्या पिशाच योनीतून मुक्त होत चालली होती….अश्विनी बेशुद्ध झाली होती पाण्याने तिच्या माथ्यावरील तो टिळा पुसला होता आणि अमित तिला मारण्यास पुढे सरसावत होता… अमित ने कुऱ्हाड हातात घेतली .. त्याने एका क्रूर नजरेने अश्विनीकडे आणि एकदा कुऱ्हाडी कडे हस्य करत पाहिले आणि तो घाव घालणार इतक्यात .. दरवाजा तुटला गेला ..आणि आदित्य आतमध्ये आला त्याने अश्विनी वरील वार आपल्या वर घेतला आणि त्याच क्षणी ती कुऱ्हाड आदित्यच्या छातीवर बसली आणि एक रक्ताची त्या सोबत च त्याच्या छातीतून काही मांसाचे चिथडे बाहेर पडले…. तरी हि त्याने न विचार करता घृण रित्या आदीच्या छातीतून,…. ती कुऱ्हाड त्याच्या छातीवर पाय ठेऊन ती उपसली आदीच्या तोंडून एक मोठा चित्कार बाहेर पडला …आदीस अमित च्या मागे काहीतरी विचित्र उभा असलेले दिसत होते एक प्रेत अमित ला नियंत्रित करीत होते ..ते त्याच माणसाचे होते ज्यानी आपल्या पत्नी व मुलीस मारले होते इकडे ती मुलगी मुक्त झाली होती….. आणि
पण त्या सोबत त्या मुलीची आईही त्या साउल्यामधून बाहेर पडली आणि ती देखील मुक्त झाली..तिने दीक्षाचे आभार मानले आंनी जात जात तिला सांगू लागली … “तया नराधमाचा जीव त्यांज कुर्हडीत हाय जर तुम्जा त्यास नष्ट करायचं तर त्याच्या कुराडीन त्याच मुंडक उडवा ..” एवढच बोलून ती नाहीशी झाली तिच्या बोलण्याहून दिक्षास कळाले कि हीच किचन मध्ये होती ते ..पन या वेळी ती काय म्हणाली होती हे तिला समजले… म्हणून दीक्षा धडपडत पळत आदित्यकडे जाऊ लागली… पण आदित्य इकडे जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता…..अश्विनी अमित कडे दयेची भिक मागत होती,… पण तो अमित नव्हता… अमित पुन्हा अश्विणीस मारण्यास सज्ज झाला होता या वेळी त्याने कुऱ्हाड उचलताच दीक्षा तेथे आली…. आणि रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडलेल्या … आदिकडे पाहून तिचे डोळे रागाने लालबुंद झाले होते… तिचा राग अनावर झाला होता तिने आपली सर्व ताकत एकटवून अमितला जोरदार धक्का दिला…..त्या धक्क्याने अमित अक्षरशः दूर जाऊन पडला … तिने अश्विनीस उठवले आणि आदिलाही कसे बसे बाहेर आणून तिने बाहेरून कडी लाऊन घेतली व आदीस आणि अश्विनीस हॉल मध्ये घेऊन आली तिथे ते दृष्य दिसत होत जे दिक्षाने आधी अंधारात पाहिले होते तोच झुंबरास लटकलेला माणूस त्याच ते देह लटकत होते… कि त्या आत्म्याने अमितचा देह सोडला आणि तो आपल्या मुळ शरीरात आला आणि त्या झुंबरास लटकणारे ते प्रेत जिवंत झाले.. डोळे पांढरे शुभ्र जणू त्यात बुभळे नव्हतीच .,,, रक्ताने माखलेली जीभ .. जेव्हा त्याने आपल्या मुलीस मारले होते तेव्हा त्याने कुऱ्हाडीच रक्त चाटून ती कुऱ्हाड साफ केली होती…वाढलेली केस … दिसण्यास राक्ष्सापेक्षा हि भंयकर .. आणि त्याने आपल्या गळ्यातील दोर तोडून तो जमिनीवर सावकाश सावकाश येऊ लागला.. सर्वत्र एक भयान वातावरण निर्माण झाले ह होते आला … त्याच क्षणी आदी थोडा फार शुद्धीवर आला होता…. आणि समोर त्यास दिसले कि ते प्रेत दीक्षा वर वार करण्यात येत आहे त्याच क्षणी आपल्या जखमांचा विचार न करता एका हाताने त्या पिशाचाची कुऱ्हाड पकडली… आदित्य उरले सुरले आवसान घेऊन उठला त्याने आपल्या गळ्यातील लॉकेट तोडून आपल्या मुट्टीत दाबून धरले तो पर्यंत त्या पिशाचाने आदीवर दुसरा वार केला आदिने तो हुकवला हुक्वता क्षणी ते पिशाच नाहीशे झाले आदी समजून चुकला.. कि ते नक्कीच दुसरी कडून परत अंगावर येईल इकडून अमित बाहेर आला ..अमित येताच आदी ओळखून राहिला कि अमित ठीक आहे आदिने सर्वांना घराबाहेर पाठवले…दीक्षा जाण्यास तैयार होईना ती म्हणू लागली” मी तुला एकवेळ हरवल आहे मला तुला पुन्हा नाही हरवायचंय ..मला थांबू दे रे आदी .. त्या नराधमाचा जीव तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा तू त्याला त्याच्या कुऱ्हाडीने मारशील ऐक माझे “ आदी म्हणाला “काय ?” दीक्षा म्हणाली होय ए तसेच आहे आणि त्याच्या कडून ती कुऱ्हाड घेण अशक्य आहे … आदी विचारात पडला आणि त्याने किचन मध्ये असलेल्या gas सिलिंडर कडे नजर टाकली आणि म्हणाला “ठीक आहे मी पाहतो त्याच काय करायचं ते ” असे तो म्हणाला पण त्याने तीच एक न ऐकता तिला घराबाहेर काढले आणि तो किचन कडे गेला त्याने ठरवले होते कि आज स्वत:चा जीव गेला तरी चालेल पण यांना वाचवायचच!.. म्हणून आदिने किचनचे दार खिडक्या बंद केल्या कि त्याच क्षणी मागून त्याला एक गुरगुरण्याचा आवाज आला ..”hhrhrhggggggg” आणि क्षणातच त्यावर कुर्हाडीचा वार झाला आणि यावेळी तो वार थेट आदी कडून हुकवताच gas सिलिंडर वर बसला आणि gas लिक होऊ लागला … आदीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले…. “चल ये आपण दोघ आता सोबतच यमलोकात जाउयात “ असे म्हणत आदिने आपल्या खिशातील लाईटर बाहेर काढले… आदिने जोरदार विठ्ठलाच नामस्मरण केले आणि क्षनार्धात आदिने हसत हसत एक वेळ डोळे झाकून दिक्षाचा चेहरा आठवला ..आणि लाईटर चा खटका खाली ओढला ….

.कि“”


ध…..डाsssssम!!!!!!
..

… पूर्ण किचन मध्ये सिलिंडरचा स्फोट झाला … आणि त्या सोबत आदित्य देखील .. किचनच्या खिडकीतून बाहेर पडला ….
त्याच्या छातीत एक गजाचा तुकडा घुसला होता आणि छातीतून ..घळघळ रक्त बाहेर पडत होत…. आणि पायात असंख्य काचा घुसल्या होत्या ,,,… आणि आदी तडफडत …. बाहेर येऊन दीक्षाच्या समोर पडला होता… त्याला पाहून दीक्षाने आपले अंग टाकून दिले तिच्यात काहीही अवसान नव्हते राहिले अमित ने आणि अश्विनीने त्या दोघास गाडीत टाकले .. आणि दवाखान्यात आणले .. इकडे येत येत अश्विनी ने दिक्षास शुद्धीवर आणले होते…. दीक्षा आदित्य ला आपल्या मांडीवर घेऊन रडत होती….. ते दवाखान्यात पोहचले कि
आदित्यास थेट आय सी यु मध्ये नेण्यात आले त्याचे ऑपरेशन झाले ऑपरेशन गृहाची बत्ती बंद झाली…
डॉक्टर आतून बाहेर आले

..
.
..
.
मी आज पर्यंत माझ्या मेडिकल करिअर मध्ये अशी केस कधीच पाहिली नव्हती… हा एक चमत्कारच आहे यांच ह्र्दय जणू घोड्या सारख दौड करतय… he is steel … ठीक आहेत ते आता तुम्ही भेटू शकता त्यांना जाऊन ,, पण कोणीतरी एकच जा …. अश्विनी आणि अमित ने दीक्षाच्या खांद्यावर हात ठेवत तिला जाण्याचा इशारा केला .
आणि दीक्षा त्याच्या जवळ गेली … आदी आणि दीक्षा एकमेकास पाहून रडत होते…
..
आदिला बर होण्यास जास्त काळ लागला नाही एक आठवड्यातच तो ठीक झाला…
अश्विनीच्या देखील पोटातील बाळ ठीक आहे असे सांगण्यात आले
अमितने या वेळी स्वतः चे घर बांधले आणि दीक्षा ने देखील आदी सोबत लग्न करून आपले नवीन घर घेतले… आणि ते सर्व सुखाने नांदू लागले

. आदिने ..सर्व गहिरा अंधार आता प्रकाशात ने नाहीसा केला होता ,,,.. पण .. एक गोखले नावाचे कुटुंब तेथे त्या घरात राहण्यास आले होते … आणि दुसऱ्या दिवशी पेपरात आदिस एक विचित्र बातमी…. एक विचित्र बातमी आढळून आली.. ती बातमी पाहून आदीस जोरदार धक्का बसला … .कि गोखले नावाचा एक कुटुंब एका रात्रीत एका घरात विना मुंडक्याचे मृत आढळून आले आणि घराच्या मुख्य सदस्याने आत्महत्या केली होती … आणि त्या घराचा फोटो पण त्या सोबत होता ते तेच घर होते ,,,,,………समाप्त ” धन्यवाद !!!!

You may also like...

62 Responses

 1. Khupch chan story post krta tuhmi blog vr tyasathi kharch manapasun thanks…. Plz asech post krt ja story…

 2. Kajal s. j. says:

  very nice stories……………..
  such a horror story. mhanaje stories vachatana ekdam narayana dharap yanchya stories vachatanacha feel aala. ajun stories lihit ja.
  keep it up……………………………………………..

 3. Somnath says:

  Nice story…!

 4. Sujit Chaudhari says:

  Nice story
  I like that…
  Ajun story lihit ja
  keep it up…

 5. Pradeep Ubale says:

  I loved this story

 6. Pradeep Ubale says:

  nice story

 7. PraShant Mali says:

  Nice story…!

 8. neha says:

  very nice story

 9. Sachin Deshmukh says:

  very nice story

 10. priyanka says:

  khup chan hoti story ….khup mast

 11. rasika says:

  khupch chan hoti story …khup avadli

 12. rasika says:

  khupch chna hoti story

 13. ashish burkule says:

  Very nice story

 14. shraddha says:

  Endless story but nice horror story..

 15. shabana says:

  nice story

 16. Akshay says:

  Mast imagination endlees pan khupach chan hoti story

 17. Nice story kip it up end was to good

 18. Jagruti Patil says:

  Hi
  Khup chhan stories aahet mast
  Please write more stories

 19. pawan dhawade says:

  Ek dam horror

 20. yash says:

  Khup mast hoti story ? Chan

 21. Vishwasrao says:

  Khar sangu ka
  Ya goshticha neet sandarbh lagat nahi
  Chatit kurhad ghusali gaj ghusla tri Aditya jagala kasa?

 22. Geeta says:

  He story khupach sunder hoti, bhayanak hoti.

 23. Abhijit Rahane says:

  It’s realy good story please aajun new story uplod kara na, I am waiting please

 24. khup chhan sagli story real ghadat aahe sagal as vatat hot…awsm story ..
  asech story shere krt ja
  thanks

 25. Anil says:

  Khup chhan aahe story

 26. cj says:

  jabardast ……

 27. सुनिल खंगार says:

  काय भयानक कथा आहे कि जणु सत्य

 28. Manjiri says:

  apratim katha , uttam mandani

 29. Akshat says:

  what a story man…………….I loved the story…..nice yar keep writing…best luck. ^_^ ……….. 🙂

 30. swati Pimple says:

  Chan ahe story

 31. swati Pimple says:

  Chan ahe story

 32. Kamini vaity says:

  Khup chan story aahe..waiting 4 ur next horrer story

 33. sudesh says:

  Ek no bhava vachatana angavar kata Ala jabardast yar

 34. Bharati says:

  Khupch chan…………..
  I liked this story.

 35. komal ghadage says:

  Nice story

 36. komal ghadage says:

  Nice story

 37. prashant dangre says:

  nice story …….i like it

 38. amol patange says:

  Story chan ahe book prakashit kara ekhad horror story ch

 39. Shamli Bichkar says:

  Wow superb story…..i like it

 40. Samrudhi Pol says:

  Wow wow wow wow wow wow wow wow very very very very very very very nice story khup ch mast love this story khup khup khup khup mast

 41. pradeep pawar says:

  Khup sunder gost ahe

 42. Khupach chhan ahe story??…pn mala Shevat kalala nahi ki gokhle kutumbacha mmukhya sadasyane ka aatmhatya keli?? So ata ajunach utsukta aali ahe ki ata ajun pudhe ky ghadel???so continue the story if possible ??

 43. Neha says:

  Khup chaan .. .vachtana sagle agadi dolyapudhe ghadat aslya sarkhe vatate…varnan khup chaan kele aahe

 44. Neha says:

  Khup chaan aahe.. ..varnan etaka chaan aahe ki sagle dolyapudhe ghadat aslya sarkhe vatate

 45. savita says:

  story khup ch bhayanak ahe, wachtana sglch dolyasmor ghadty as watt hot….. pn mst ahe story… fkt ratri yache swpn pdu nyet… mhnj br hoil….

 46. Sushil says:

  Khupch chan. Asha prakaracha ankhi goshti liha. Barach kalavadhi nantar asha parakarchi ekhadhi gosht vachali kharach khup chan.

 47. Abhi bhosale says:

  Ekdam bhangar
  …..not thriller…..

 48. SWATI says:

  Khupach chhan ahe story…..

 49. Pratibha Kulkarni says:

  Nice

 50. ram says:

  so nice of this story………………………………….!

 51. ram says:

  so nice of this story………………………………….!

 52. Saurabh says:

  Khup Chan story hoti ekdm horrible…

 53. Saurabh says:

  Khup Chan story hoti ekdm horrible…….

 54. utkarsh says:

  Simply I thought like I was reading the narayan dharap’s novel. Great keep it up and write always!!

 55. Roshani says:

  ekdm must horrible ahe, last paragraph vrun as vatt ahe ki ajun tithe tya gharat bhut ahe tr…..

 1. January 2, 2015

  […] गहिरा अंधार – Gahira Andhar | भाग ३ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *