गहिरा अंधार – Gahira Andhar – Part 2

गहिरा अंधार – Gahira Andhar | भाग २

गहिरा अंधार – Gahira Andhar | भाग १

दीक्षा आणि अश्विनी ..त्या दोघींच्या मनात चलबिचल चालू होती..पण आत जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता.. आणि रॉकीच्या अश्या वागण्याने अश्विनी अजून घाबरली होती.. तिला काही कळेनासे झाले होते.. आपल्यां पोटातील बाळा बद्दल अमित ला सांगाव कि त्या घरातील पिशाचाबाद्द्ल सावधान कराव.. किलगेच अश्विनीच्या लक्षात आले ..त्या म्हाताऱ्या आजीने तिला अंगारा दिला होता.. तो अंगारा तिने मुठीत घट्ट आवळला होता.. दीक्षा समजून चुकली होती.. कि अश्विणीस तिच्या बाळाची चिंता होत आहे आणि आतील असणाऱ्या धोक्यापासून वंचित राहिलेला अमित…ते तिघे आत मध्ये आले आत शिरताच दिक्षास ..एक हलकेसे हसण्याचा आवाज आला ..”ह्ह्म्हह ह्ह्ह ..ह्ह्स्सस” दीक्षा तात्काळ अमित कडे गेली आणि म्हणाली जीजू.. तुम्हाला काहीतरी म्हत्वाच बोलायचं आहे..

Gahira Andhar Marathi Horror Story Part 2

Gahira Andhar Marathi Horror Story Part 2


..”बोल ना दीक्षा ! काय म्हणतेयस थांब ह मला जरा बूट काढूदेत ..हा झाले .आता बोल ” जीजू इथ या घरात .. दीक्षा त्या घडलेल्या घटना बद्दल अमित ला सांगणार होती ..पण तिने अचानक विषय बदलला .. का नाही माहित तिला अस जाणवल कि हे सांगणे आता बरोबर नाही राहणार..म्हणून ती थांबली आणि आनंदाने ओरडत म्हणाली … “जीजू ताई आई होणार आहे…” दीक्षा च्या तोंडून ते वाक्य ऐकून अमित च्या हातातील बूट खाली पडला त्याचे डोळे आश्चर्याने ..मोठे झाले होते.. अमित ला आनंदाचा धक्का बसला होता.. तो तसाच बूट खाली टाकून उठत अश्विनी जवळ जाऊ लागला त्याच्या चेहऱ्यावर हलके हलके हास्याचे प्रहर उमटू लागले होते…. तो बोलण्याचा प्रयत्न करीत होता …”म ममी मी ..मी बाबा मी वडील म्हणजे तू आई ..मी बाबा ..खरच !! अश्विनीने होकारार्थी लाजत मान हलवली ..कि अमित “ .oh myy god woooo hhhoo आशु आशु ..जानु आज आज तू मला जगातलं सगळ्यात सुंदर आणि गोड गिफ्ट दिलयस ” असे म्हणत तो तिला उचलणार होता .. कि थांबला नाही नाही ..अश्या अवस्थेत ..उचलन बरोबर नाही .. ओह god ..आशु I love you आशु .लव यु ..डीअर ..thanks देवा ..आणि आशु तुझ हि .. तुम्ही तुम्ही डॉक्टर कडे गेलात का ” अश्विनी म्हणाली नाही ..मला इथेच कळाले ..अमित समजला .. “ओह ठीक ठीक आहे आपण डॉक्टर कडे जाउयात आताच चल लवकर.. ” अश्विनी त्यास अडवत म्हणाली अरे पण ..इतक्या रात्री “अग सात तर वाजले आहेत.. तू चल आधी “अमित म्हणाला अश्विनीस नाईलाज होता तिला जावच लागणार होत.. दीक्षाच्या हि आणि अमितच्या हि डोळ्यात आनंदाश्रू आले होते.. अमित अश्विणीस मिठीत घेऊन ..पाणवला होता.. अश्विनी त्यास सरकवत म्हणाली “अरे दीक्षा पाहतेय” दीक्षा थोड दुसरीकडे चेहरा करून स्मित हस्य करू लागली… तिला पाहून अमित अश्विनी पासून दूर झाला आणि म्हणाला “चल मग जाऊन येउत..” अश्विनी तैयार होण्यास जाऊ लागली ..दीक्षा पुन्हा सतर्क झाली..आणि ती अश्विनीच्या मागोमाग गेली .. पण अमित ने तिला थांबवले ..”दीक्षा ..!” दीक्षा थांबली आणि अश्विनीला पाहत पाहतच म्हणाली “काय जीजू ?” मी अश्विनी साठी रॉकी आणला खरा आणि तुझ्या साठी पण काहीतरी आहे … येईल लवकरच .” दीक्षा समजू शकली नाही ती म्हणाली ”काय येतय? काय आणलय जीजू तुम्ही ?” अमित स्मित हस्य देत म्हणाला “येईल आल्यावर कळेलच तुला ” दीक्षा ठीक आहे म्हणत अश्विनी कडे जाऊ लागली ..पण समोरून अश्विनी तैयार होऊन आली..दीक्षा ने तिला थांबवल आणि म्हणली “आत बेडरूम मध्ये काही ?” अश्विनी गंभीर भावात म्हणाली “नाही काही नव्हत आत सध्या “… बर ठीक आहे जा तू .. अमित अश्विनीचा हात हातात घेऊन जाऊ लागला जाता जाता त्याचं बोलन सुरु होत..बोलता बोलता अश्विनी सहज म्हणून गेली अमित अरे ती खोली मागच्या बाजूची काही उघडत नाहीये… त्या कोपर्यातील तेव्हा अमित म्हणाला अग काय आशु तू पण हि वेळ काय कामाचे बोलण्याची आहे का ? काय आशु तू पण न ? चल जाऊ ..? तेवढ्यात इकडे दीक्षा ते ऐकून ताड्कन मागे वळली आणि तिने अश्विणीस हाक मारली ..”ताई थांब ! ” तिच्या त्या हाकेने अश्विनी दचकून थांबली .. आणि मागे वळली .आणि तिने हलकीशी मान हलवून विचारले.. “काय झाले ?” अमित पुन्हा म्हणाला काय झालय दीक्षा .. अहो काही नाही जीजू ..ताईला म्हणत होते कि त्या खोलीच्या चाव्या मला देता का मी साफ करते ती उघडून “ अमित म्हणाला “अग पण“ अश्विनीस कळून चुकले कि .. दीक्षाला काहीतरी तिथे सुगावा हवाय ..तिने पुढचे काही न बोलता आपल्या पर्स मधील चाव्या बाहेर काढल्या आणि दीक्षा कडे सोपवल्या आणि ते दोघे गेले .. ते जसे गेले तसा एक अनर्थ झाला … घरातील … लाईट गेली …

लाईट जाताच ..दीक्षाच्या तोंडून ..एक दचकून भीतीपोटी आवाज निघाला “नाहीईईइ..!!!” आणि या वेळी तो क्रूर रीतीने हसण्याचा आवाज …”ह्ह्हम्म्ह्ह्ह ह्ह्ह..” दिक्षाने तरी आपले मन आपल्या ताब्यात ठेऊन भानावर राहण्याचा प्रयत्न करीत होती… तीला अंधारात काहीच दिसत नव्हते .. दिक्षाने आपले एक पाउल उचलले .. तिच्या लक्षात होते ती जिथ उभा होती तेथून काही ६-८ पावलांवरती किचन होत आणि किचन मध्ये टेबलावरतीच मेणबत्ती आणि काडेपेटी होती .. दीक्षा हळू हळू चाचपडत चाचपडत जाऊ लागली… ती भिंतीवर एक हात ठेऊन जात होती… हा अंधार तिच्या जीवावर बेतणार कि काय असे तिला वाटत होत कारण अश्याच अंधारात पिशाचाच दुगन राज्य असत… तीच मन नकारात्मकतेने भरू लागल होत.. तिच्या मनात भीती निर्माण झाली होती आणि तेच तिच्यावर होणाऱ्या पुढच्या वाराच कारण होत… दीक्षा चाचपडत किचन मध्ये गेली..जाताच ती कशाला तरी जाऊन धडकली तो तिच्या नशिबाने टेबल होता आणि त्यावरच मेणबत्ती व काडे पेटी होती दीक्षा ने काडेपेटी उचलली तिचा हात भीतीने थर थर कापत होता प्रत्येक क्षण तिला जीवघेणा वाटत होता …आता काय होईल ? कधी कुठून कसे काय? पुढे येईल अंगावर धावेल कसला वार कोण करेल हे सगळे प्रश्न तिच्या मनात घूमत होते कि अचानक तिने काडेपेटीची काडी पेटवली ..कि समोर तिला एक विचित्र स्त्री उभा असेलेली जाणवली..तीचा पांढराशुभ्र चेहरा ..ती भयानक स्त्री वाटत होती,.. डोळ्यात काळेभोर काजळ ओठ लालभडक अंगात काळी साडी पांढरे केस आणि सूळे दात जिचा उजवा हात रक्तानी माखलेला होता ती.. दीक्षाला आणि दीक्षा तिला पाहतच उभे होते कि अचानक काडी विझली… दीक्षाच्या माथ्यावरती घामाचे थर जमा होत होते ..पुढची काडी पेटवताना ती सारखी सारखी तिच्या हातून सटकत होती. तरी हि कशीबशी करून ती पेटली ..”ख्ख्स्सस्स्स….” कि समोर कोणीच नव्हते यावेळी..दीक्षा ने मेणबत्ती पेटवली कि मागून तिच्या कोणीतरी पळत गेले दीक्षा चरकन मागे वळली कि मागे कोणीच नव्हते कि अचानक हॉल मधून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज दिक्षास आला दीक्षा हातात मेणबत्ती घेऊन हॉल कडे जाऊ लागली आणि हॉल मध्ये एक लहान मुलगी पांढऱ्या शुभ्र फ्रॉक मध्ये कोणाकडे तरी हाक मारत होती ..पण त्या हॉल मध्ये तिथ समोर कोणीच नव्हत पण ती मुलगी हॉल च्या मधोमध उभा राहून म्हणत होती कि ..”आन्ट्टी . मला उचलून घेना .. आन्ट्टी हिह्हिही…” तिने दिक्षास पाहिले आणि तीझ हसणे बंद झाले आणि ती रडू लागली …”मला ..मारू नका मी काही नाही केल प्लीज नका मारू मला “ असे म्हणत ती पळू लागली ..तिला पळताना पाहून दीक्षाही तिच्या माग धाऊ लागली.. ती मुलगी धावत धावत एका कोपऱ्यातील खोली जवळ जाऊन थांबली .. आणि आत पाहत रडू लागली… ती दीक्षा कडे मदत मागत होती… वाचव वाचव माझ्या आईला ताई “ बाबा मारतायत तिला .. ती तीच खोली होती जी अश्विनी उघडण्याचा प्रयत्न करीत होती .ती खोली उघडली होती आपोआप… आणि आतून एक प्रकाश बाहेर आला होता ..आतून दोघ जनाच्या साउल्या बाहेर पडत होत्या एक पुरुष जो चलताना हातात कुऱ्हाड घेऊन लंगडत आहे अस वाटत होत आणि एक स्त्री जी हात जोडू लागली होती गडगडून खाली लोळत होती . दीक्षा हळू हळू त्या मुलीकड जाऊं लागली ती मुली दीक्षा जवळ येताच त्या खोलीत धावली.. दीक्षा हि खोली जवळ पोहचली तिच्या हातात मेणबत्ती तशीच जळत होती.. ती जशी त्या खोली जवळ पोहचली त्या खोलीतील त्या साउल्या आणि ती मुलगी नाहीसी झाली आणि ती खोली उघडी राहिली..दीक्षा त्या खोलीजवळ पोहचली कि त्याच क्षणी.. आत तिला फक्त एक पियानो दिसला ..धूळ खात असेलला…पण स्थिती जणू नव्या सारखीच होती .. दीक्षा आत मध्ये गेली.. आत ती थेट पियानो जवळ जाऊन बसली.. तिथ अचानक तीच मुलगी आली . ती दिसण्यास जरा गोड होती .. दीक्षाला तिला पाहून जरास बर वाटले ..ती मुलगी तिला म्हणू लागली .. ताई वाजव न आई पण वाजवायची वाजव न ताई “ दीक्षा तिच्या कड पाहतच राहिली होती तिच्या मनात जरा भीती कमी झाली होती.. तिने पाहिलं बीप वाजवता क्षणी दीक्षा समोर एक लक्ख प्रकाश आला .. त्या प्रकाशात वेगवेगळे दृष्य दिसत होते… आणि त्याच प्रकाशात अचानक तिला एक एक करून सगळे दिसू लागले त्या घराचा इतिहास … आणि शेवटी दिसले कि त्या घरातील मुख्य सदस्याने .. आपल्या पत्नीस आणि मुलीस वेडाच्या भरात येऊन राक्षसा सारख्या निर्घृण वूत्ती ने त्या इवल्याश्या जीवाच्या आणि आपल्या प्रेमळ पत्नीच्या छातीत वार करून करून ठार केले होते… आणि स्वतः त्याने आत्महत्या केली होती…. दीक्षाच्या समोर काही तरी ठेवल होत तो एक कागद होता त्यावरती एक धून लिहिली होती .. दीक्षा पियानो वाजू शकत होती तिने ती धून वाजवण्यास सुरुवात केली ..ती बाजूची मुलगी .. उड्या मारू लागली.. पण आजूबाजूचे ठेवलेलं सामान धाड…!!धाड!!! हलु लागले.. दीक्षा ने वाजवणे बंद केले आणि ती बाहेर पळाली ती मुलगी मागून तिला ओरडू लागली “बाहेर नकोस जाऊ…. हॉल मध्ये बाबा आहेत त्या त्यांना झुंबलावर दोरीला झोका खेळतायत त्यांना आवडत नाही कोण तिथ आलेलं…” असे बोलत बोलत त्या मुलीच्या छातीतून रक्ताचे ओघोळ बाहेर पडू लागले बघता बघता तिचा पांढरा फ्रॉक रक्ताने माखला गेला… दीक्षा ते पाहूनच बाहेर धावली ..कि हॉल मध्ये अचानक येताच झुंबरावर कोणीतरी फाशी घेऊन लटकलेल तिला दिसल.. दीक्षा ते पाहून स्वतः ला सावरू शकत नव्हती.. त्या लटकनाऱ्या माणसाचे उघडे असणारे अन तिला पाहणारे ते भयंकर डोळे.. आणि विचित्र रित्या बाहेर आलेली त्याची जीभ आणि थेट खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली.. ती कुऱ्हाड दीक्षा सर्व विसरून दाराच्या दिशेने धावली..कि दार आपोआप धाडदिसिने बंद झाले दीक्षा दीक्षा सैरवैर पळू लागली रडू लागली.. पण काहीच उपाय नव्हता… अंधारात आता मेणबत्ती देखील खाली पडली होती आणि विझण्याच्या कगारीवर येऊन ठेपली होती .. कि कशाला तरी अडखळून ती खाली पडली.. खाली पडताच तिच्या समोर तोच फाशी घेतलेला माणूस उभा होता.. जो या वेळी हातात कुऱ्हाड घेऊन दिक्षास मारण्याकरिता आला होता.. दीक्षा अडखळून खाली पडली होती… आणि ते प्रेत तिच्यावर घाव घालणार तेवढ्यातच दाराच्या पलीकडून एक आवाज आला खूप मोठा आवाज त्या घरात घुमला .. “भ्वाऔ….व्ब्भह्ह…. भ्वाऔ ” दीक्षा दरवाज्याकड पाहू लागली दरवाज्याच्या पलीकडून रॉकी उभा होता आणि त्या सोबतच आणखीन कोणीतरी होत ज्याने रॉकीस धरल होते दीक्षा त्या व्यक्तीस अंधारात ओळखू शकेना … कि अचानक दरवाज्यावर जणू कोणीतरी मोठ्याने लाथ घातली आणि दरवाजा उघडला… दरवाजा उघडता क्षणी रॉकी अजून एकदा जोरात भुंकला..कि अचानक दीक्षा पासून ते प्रेत दूर जाऊ लागले ते रॉकीच्या भुंकण्यास घाबरून निघून जात होते कि अचानक ते नाहीशे झाले.. ज्याने रॉकीला धरले होते त्याने आता रॉकीला सोडले रॉकी धावतच जाऊन दिक्षास बिलगून तिला चाटू लागला… दीक्षा त्या दारात उभा असलेल्या ओळखीच्या साउलीस… पाहण्याचा प्रयत्न करीत होती… कि अचानक लाईट आली …. आणि……….. दारात……… उभा होता

..

.
..
आदित्य ..

 

गहिरा अंधार – Gahira Andhar | भाग ३

You may also like...

5 Responses

 1. neha ghawali says:

  Khupch chan story ahe shevati vijay satyachach hoto ajunhi dev ahe mhnch hya asha shitani shkticha kdinakadi ant hotoch

 2. kanishk says:

  Thanks to post my stories and readers thank u also..

 3. Yashashri says:

  Nice story….

 1. January 2, 2015

  […] गहिरा अंधार – Gahira Andhar | भाग २ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *