घात भाग २ – Marathi Horror Story, Bhaykatha

कधी ही रात्र संपते अस झाल होत… आज झोप येतच नव्हती… अस्वस्थ आणि उतावीळ मन थोड भुतकाळात गेल… मला आमची ती भेट आठवली… नेहमी प्रमाणे मी आणी मित्र गप्पा मारत होतो. तो च्विंगम चघळत college च्या भिंतीला शेजारी उभा होता.. लांबुन आपली gf येताना दिसताच तोंडातील च्युईंगम भिंतीवर चिकटवुन तीच्यावर impression मारायला गाडी घेऊन तीच्या मागे गेला तशी आपली मैत्रिणी ‘सुहानी’ सोबत बोलत समोरून ‘ती’ येताना दिसली.. ‘ती’………देखणी, गोरीपान, कपाळावर बारीकशी टिकली, साजरी .. मोठे आणी स्वच्छ पाणीदार डोळे..काळेभोर मोकळे सोडलेले केस … नाकावर चष्मा, छानसा पंजाबी ड्रेस. आणि वा-याच्या झोक्यासोबत चेह-यावर येणा-या केसाना एका हाताने बाजुला करणारी…. खुपच साधी रहात होती तरीही सहज एखाद्याच्या मना भरेल आशी ‘ती’… मी दोन वर्षापासुन तीच्यावर एकतर्फी प्रेम करायचो .. तीला पाहील्याशिवाय दिवस पुर्णच होत नसे… ती समोर दिसताच काळजाची धडधड जास्तच वाढायची… पन आजवर तीच्याशी बोलण्याची हिम्मतच झाली नव्हती.. समोरून येत ‘ती’ तीथेच उभी राहीली… माझ्यापासून थोड्याच अंतरावर … आणि त्या वेळी माझ्या लक्षात आल की माझ्या मित्राकडून खुप मोठी चुक झाली… ते च्विंगम तीच्या केसाच्या शेंड्याला चिकटल होत… मी तीला सांगण्याचा प्रयत्न करत माफी मागितली त्या वेळी तीचही लक्ष्य केसाकडे गेल.. तीला इतका राग आला की माझ काही ऐकायच्या आतच खाडकन माझ्या कानाखाली वाजवली.. आपल्या पासुन दुर रहा म्हणून दम भरला… तीच्या सोबत असलेल्या सुहानी ने ही भरपुर तोंडसुख घेत माझी तक्रार प्रिंसिपल कडे करून तीखट मीठ लाऊन खुप काही सांगितल .. दोन आठवड्यासाठी मला रस्टिकेट केल गेल… ज्या गैरेज मधे पार्ट टाईम काम करतोय तीथे पंधरा दिवस फुल्ल टाईम कराव लागणार होत… केबीन मधुन बाहेर येताच दोघी समोर दिसल्या… मी काही न बोलता… तसाच निघून गेलो… काही न करता माझ्या प्रेमाचा असा शेवट होईल अस स्वप्नातही वाटल नव्हत.. आधी निदान तीला चोरून का असेना पहाता येत होत पन आता तीन लांबच रहा म्हणून दम दिला होता…. त्या नंतर ती दिसताच मी रस्ता बदलु लागलो… आणि मला पहाताच नाक मुरडत तीही निघुन जायची.. ती काही मैत्रीणीसोबत रहायची… एक रात्रि खुप पाऊस पडत होता… तीला खुप ताप भरलेला आणि तीची मैत्रीण सुहानी आपला boyfriend उमेश birthday celebrate करायला बाहेर गेलेली.. रात्र खुप झाल्याने कोणि डॉ. तीच्या मैत्रीणिचा call घेत नव्हता… आणि जे घेईल ते त्यानाच hospital ला यायला सांगत.. तीची तब्बेत बिघडतच चालली तशा सर्वजणी खुप घाबरल्या .. त्यांच्यातील एका मुलगी मला तीचा आशिक म्हणून ओळखत होती.. तीने मला call करुन तीची तब्बेत बरी नसल्याच आणि डॉक्टर भेटत नसल्याच सांगितल… क्षणाचाही विलंब न करता मी तीथल्याच एका डॉक्टरला उचलला.. आणि त्यांच्या रुमवर आलो पन आत न जाता त्यांच्या रुम बाहेरूनच तीला पाहील.. डोळ बंद करून ती पडून होती, तापाने अंग थरथरत होत… थांबलो.. डॉक्टरने लिहुन दिलेली औषध आणायला बाहेर पडलो मुसळधार पाऊस त्यातच खुप रात्र झालेली… तासभर फिरून शेवटी एक मेडिकल सापडल.. औषध घेऊन त्यांना दिलीत आणी त्या डॉक्टरला घेऊन घरी परतलो… ती बरी व्हावी एवढी अपेक्षा होती… त्या नंतर माझी मैत्रिण वर्षा ने तीचे सगळ दुर केले तसे sorry बोलायला मला शोधु लागली..पन मला काहीच कल्पना नव्हती.. तीला पहाताच मी नेहमीप्रमाने आपला रस्त बदलतच होतो… त्या दिवशी ती हॉस्टेल वरून ती सुट्ट्यांसाठी घरी निघाली होती… रात्रि ९ ची गाडी असल्याने ती ८ वाजता बाहेर पडली… ती बसमधुन उतरली तीथेच मी गैरेज मधे पार्टटाईम काम करायचो… तीला पहाताच देवाचे आभार मानले…तीच लक्ष माझ्याकडे नव्हत.. एक् शॉर्टकट ने ती चालत स्टेशन कडे निघाली… तसा मी घाबरलो.. कारण रस्ता खुपच धोकादायक आणी सुनसान असल्याने वाटमा-या व्हयच्या.. आपल्या दोन्हा बैग सावरत तीच चालण सूरु होत… पन अचानक तीच्या लक्षात आल की कोणीतरी आपला पाठलाग करतय… मागे पहाण्याची हिम्मत होत नव्हती… तीन आपला चालण्याचा वेग तसाच ठेवला.. पन मागुन कोणीतरी झपाट्यान पावल टाकत आपल्या दिशेन येत असल्यासारख वाटु लागल.. थोड धाडस करत थांबुन तीन मागे पाहील तर काही अंतरावर अंधुक प्रकाशात चार ते पाच मुल चोरट्या नजरेने तीच्याकडे पहात आपापसात काहीतरी कुजबूजत होते… तशी तीच्या काळजाची धडधड वाढली… आपल्या बैग उचलुन तीन चालण्याचा वेग वाढवला तसे मागुन येणा-या मुलांच्या चालण्याचा वेग हि वाढु लागला.. तीला आता चांगलाच घाम फुटला होता.. जोरात ओरडाव म्हण्टल तरी आजुबाजूला अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग तेवढ्याच होत्या, दहा मिनीटाचा हा शॉर्टकट खुप महागात पडतोय अस वाटत होत… भीतीने तीच्या डोळ्यामधे पाणी आल, घशाला कोरड पडली… थरथरत्या हातानी बैगेतून मोबाइल काढायचा प्रयत्न केला आणि नेमका मोबाइल खाली पडला… ती मोबाइल उचलायला खाली वाकली तसा त्या मुलानी तीच्या दिशेेने चालण्याचा वेग वाढवला… तीच्या जवळ पहोचाले तोच ” hello madam..” म्हणून मी तीला जोरात हाक मारली तशी तीन झटकन उभा राहात माझ्याकडे पाहील.. तसा मी म्हणालो.. ” बर madam… तुम्ही म्हणताय तर दहा रूपये हमाली द्या… पन बैगा खुप जड आहेत हो… आजकाल महागाईच्या जमान्यात एवढ कमी पैसे घेऊन परवडत नाहीत…” तीच्या चेह-यावर भीती स्पष्ट दिसत होती.. पन मला पहाताच तीची भीती नाहीशी झाल्यासारखी वाटली… मला समोर पहाताच ती टवाळखोर मुल बेत फसल्यासारखी वैतागुन मागे परतली… तीच्या नजरेत न पहाता मी म्हणालो .. ” sorry गायत्री … मी खोट बोललो.. पन नाइलाज होता… हा रस्ता चांगला नाही… मी तुम्हाला तीथपर्यन्त स्टेशन सोबत देतो…” तशी माझ्याकडे पहात म्हणाली… ” आजुन रागावला आहेस….sorry रे.. आणी thanks.. त्या रात्रि आणि पुन्हा आज मदत केल्याबद्दल… गैरसमज झाला होता रे माझा..” ती चक्क माझ्याशी बोलत होती… माझा आनंद गगनात मावेनासा झाला… तीच्या सोबत चालता चालता माझी बडबड सुरु झाली… तर ती काही जास्त न बोलता गालात फक्त हसत होती… तीला ट्रैवल मधे बसवून मी खाली उभा खिडकी शेजारी येत म्हणलो… ” madam… दहा रूपये राहीले तुमच्याकडे..” ती खुपच खळखळू हसु लागली.. मी खुप आनंदने तीच्याकडे पहात होतो…ती निघुन गेली तसा थोड्या वेळातच whatsapp वर तीचा मेसेज आला… त्या दिवसापासुन फोनवर गप्पा मारण नेहमीच झाल…या काही दिवसात आम्ही खुप जवळ आलो होतो. एकमेकाशी बोलल्याशिवय दिवस पुर्ण होत नसे.. college च्या पहील्या दिवशी तीला प्रपोज करणार होतो… ती ही भेटायला तीतकीच आतुर होती.. पन college सुरु व्हायला दोनच दिवस शिल्लक होते.. आणि अचानक तीचा मेसेज येण बंद झाल…फोन पन स्विच अॉफ दाखवत होता… आज महीना होत आला तीच्यासोबत काहीच contact झाला नव्हता….सगळीगडे तीचा शोध घेतला पन कुठेच तीचा पत्ता लागत नव्हता उद्या तीला भेटायला घरी जायच होत म्हणून खुप खुश होतो…..त्याच रात्रि अनिकेत एकटाच घरीच होता… अनिकेत… उमेश चा जिवलग मित्र… देखणा, जीम मधे जाऊन छान तब्बेत कमावलेली.. जिवलग मित्र गेल्याच्या धक्याने खुप निराश झालेला… एकटाच आपल्या रूम मधे बसुन मोबाइल वर टाईमपास करत होता… तो एक निनावी फोन आला… त्यान कॉल रिसीव्ह केला… ” हैलो….” पन पलीकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता… दोन तीन वेळ हैलो म्हणाला पन काहीच नाही …. शेवटी वैतागून call बंद केला आणि पुन्हा मोबाइल वर गेम चालु केली…. तोच पुन्हा मोबाइल ची रिंग झाली… call घेत हैलो म्हणाला पण काहीच प्रतीसाद येत नव्हता…तो तसा मोबाइल कानाला लाउन अनिकेत शांतपने ऐकु लागला… समोरील व्यक्तिच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकु येत होता… अनिकेत ला प्रचंड राग आला समोरच्या व्यक्ति ला चार शिव्या हासडत त्यान call cut केला आणि मोबाइल बाजुला ठेऊन त्याच्या कडे पहातच बेडवर आडवा झाला… थोडा वेळ एक निरव शांतता पसरली पन पुन्हा मोबाइल ची रिंग झाली… अनिकेत रागातच उठला आणि फोन उचलुन शिव्या हासडणार तोच समोरची व्यक्ति बोलु लागली… ” है……है ….हैलो….. म……म…….मला वाचव अनिकेत……” आवाजात कमालीची भीती जाणवत होती, वेगाने धावत असल्या सारख त्या व्यक्तिच्या श्वासाची गती आणि धडधडणार काळीज.. जणु एक भयन मृत्यु त्याचा पाठलाग करतोय आणि पुर्ण पणे असहाय्य पने तो जीव वाचवण्यासाठी मदतीची भिक मागतोय…… अनिकेत खुपच घाबरला…. आवाज त्यान ओळखला होता, पन हे कस शक्य आहे…. भय आणि आश्चर्य दोन्ही अनिकेत च्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होत… घरातुन बाहेर येत बोलु लागला…. ” कोण…..बोलतय…..काय झालय तुम्हाला….. ” तशी पलीकडील व्यक्ति बोलु लागली… ” अ……अनिकेत….मला नाही ओळखलस…अरे मी…तुझा मित्र…….. उमेश……” अनिकेत च्या अंगावर सर्रर्रर्रर्रर्र कन काटा उभा राहीला… त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनासे झाले… तोच समोरील व्यक्ति जिवाच्या आकांताने ओरडली आणि कोणीतरी झुडपातून ओढत, फरपटत नेत असल्याचा आवाज होऊन फोन बंद झाला…. अनिकेत ने मोबाइल समोर धरून call history मधे नंबर पाहीला पन तो नंबरच नव्हता… काही वेळापुर्वी आलेला फोन चा नंबर मोबाइल मधेच नव्हता… अनिकेतला काहीच सुचेनासे झाले… तो धावत घरात गेला…त्यान किशोर आणि दिपक या आपल्या दोघा मीत्राना झालेली घटना सांगितली पन कोणिच विश्वास ठेवला नाही….. या घटनेन अनिकेत मात्र खुप घाबरून गेला होता… आज तो घरी एकटाच होता… घरचे सर्व लग्नाला गेले होते…. त्यान दरवाजा निट बंद केला आणि आपल्या रूममधे आला… मित्राना फोन करून घरी येण्यास सांगु लागला… पन आज त्याचे सर्व मित्र आपापल्या कामात व्यस्त होते… पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवस असल्याने आकाश ढगानी व्यापल होत… आणि पावसाची रिपरिप सुरुच होती…मोबाइल बाजुला ठेऊन तो बेडवर आडवा झाला….एव्हाना रात्रिचे साडे बारा वाजुन गेले होते… अजुनही तो फोन मधील व्यक्तिच्या विचारातच गुरफटला होता… काही वेळातच त्याचा डोळा लागला.. तोच एक चाहूल त्याला जाणवली आणि खाडकन डोळे उघडले… बाहेरील हॉल मधे कोणीतरी चालत असल्याच जाणवल, थोडी कुजबूज ऐकु येत होती… कार्यक्रमाला गेलेली घरातील मंडळी आली असतील म्हणून तो ऊठला आणि बाहेर हॉल मधे आला पन कोणीच नव्हत… एक भयान शांतता त्याच्या सभोवताली पसरली होती… अनिकेतच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले… आजुबाजूला पहात तो आपल्या रुमकडे वळला.. थोड पाणी पिऊन पुन्हा बेडवर पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागला… पन आज त्याची झोप उडाली होती… त्याचे कान आजुबाजूच्या हल्का आवाजही टीपत होते… या भयान वातावरणात तो आपल्या मोठ्या आलिशान घरात एकटाच होता… सर्वत्र इतकी शांतता होती की भिंतीवरील घड्याळ काटे स्पष्ट ऐकु येत होते… इतक्यात आपल्या रूमच्या बाहेर फर्शीवरुन कोणालातरी फरपटत नेत असल्याचा आवाज येऊ लागला… तशी अनिकेतची नजर दरवाजाच्या खालच्या फटीतून आत येणा-या प्रकाशाच्या हलचालीवर स्थिरावली… पलीकडे कोणीतरी होत ज्याची चाहुल अनिकेत ला लागली होती… भितीने त्याला अक्षरशा: घाम फुटला होता… जास्त हलचाल न करता त्यान आपल्या पायाने हळुच चादर वर ओढत अंगावरुन डोक्यावर घेतली आणि किलकील्या नजरेने तो दरवाजाच्या पलीकडील हलचाल मुक पणे पाहु लागला… बाहेरून एक विचीत्र आवाज येत होता…धरधर चाकुने शरीराचा एखादा अवयव हळु हळू कापत असल्याचा आवाज… अनिकेतला काय करावे सुचत नव्हते… इतक्यात कोणालातरी फरटत ओढत नेत असल्याची चाहुल त्याच्या रुमच्या दरवाजाच्या पलीकडून येऊ लागली… तो आवाज पुढे पुढे सरकत होता… आवाज थोडा दुर जाताच त्याची नजर बाजुच्या टेबलवर ठेवलेल्या मोबाइल वर गेली… जास्त हलचाल न करत त्यान तो मोबाइल उचलला… तोच मोबाइल व्हायब्रेट झाला आणि भितीने त्याच्या अंगावर काटा उभा राहीला… स्क्रिनवर पाहीला पण अनोळखी नंबर होता… नंबर कोणाचा का असेना आपल्याला मदत मिळेल..त्या फोन रिसीव्ह केला पण काही बोलायच्या आतच समोरची व्यक्ति बोलु लागली…. “अनिकेत ……मी उमेश ….. प्लिज…प्लिज मला वाचव रे…. ‘ती’ मला जीवंत नाही सोडणार…. ” त्याच्या आवाजातली भीती आणि जीवंत रहाण्यासाठी चाललेली धडपड स्पष्ट जाणवत होती…. पन अनिकेतच्या मेंदुत मात्र लाल मुंग्यांच वारुळ उठल होत… उमेश दोन आठवड्या पुर्वीच मेला होता… अनिकेत ची वाचा बसल्यासारखा तो सुन्न होऊन ऐकत होता… तोच पुन्हा असह्या वेदनेण कण्हत असलेल्या आवाजात समोरील व्यक्ति बोलु लागली… ” अनिकेत….. मी तुझ्या रुमच्या बाहेरच आहे रे… वाचव रे मला…” एवढ बोलुन फोन कट झाला तोच कोणीतरी धावत त्याच्या रुमच्या बाहेर आल आणि जोरजोरात दरवाजा बडवू लागल… ” अनिकेत…बाहेर ये…..’ती’ तुझ्या रुम मधेच आहे…..” A.C रुम असुन अनिकेतच सर्व अंग घामान भिजल होत.. लकवा मारुन गेल्या सारखा कोणतीच हलचान न करता तो पडुन होता… त्यातच बाहेरुन आलेल्या त्या आवाजा शरीरातील उरलेल आवसानही संपल होत… आपल मरण त्याला जणवत होत… तोच त्याच्या बेडखालुन कोणीतरी सरपटत बाहेर येत असल्याच जाणवल… रुम मधे पसरलेल्या मंद प्रकाशात एक मुलगा सरपटत भिंतीकडे जात तीचा आधार घेऊन बसला… त्याच तोंड अनिकेत कडे होत… त्याचे डोळ फोडले असल्यान चेहरा रक्तान माखला होता… अनिकेत अंगावर घेतलेल्या चादरीतुन भयभीत नजरेने फक्त पहात होता… तो उमेशच होता… रुम मधील मंद प्रकाशात त्याचा रक्ताळलेला चेहरा आणखी भयान वाटत होता… त्याचा चेहरा स्थिर होता जणु तो एकटक अनिकेत कडे पहात तुझ मरण आलय हेच सांगत होता… आचानक उमेश न थरथरत्या आवाजात बोलायला सुरवात केली… ” अनिकेत……. ती तुझ्या मागे उभी आहे …. आणि तुझ्याकडेच पहाते आहे…रे ” पुर्ण ताकतीने ओरडावे किंचाळवे अस अनिकेतला वाटल पण भितीन त्याचा आवाजच गेला होता…. आणि इतक्यात आणखी एक भयानक गोष्ट घडली… त्या आपल्या मागे कोणाचीतरी चाहुल जाणवली आणी दुस-याच क्षणाला सर्व लाईट्स चर्रर्रर्रर्रर चर्रर्रर्रर्रर आवाज करत बंद झाल्या…आणि मघापासुन अंधुक प्रकाशात चाललेला जिवघेणा खेळ आणखी भीषण झाला… कोणीतरी तोंड दाबुन धराव तसा अनिकेतचा ऊं…ऊं…ऊं…असा आवाज येत होता आणि एखाद्या धारधार हत्यारान मांस कापावे असा भीषण आवाज हळु हळु त्या खोलीत घुमू लागला. खाडकन वा-याने खिडकी उघडली तसा थंड वा-याची झुळूक आत आली.. कोणीतरी स्पर्श करुन जाव तसा अंगावर सर्रर्रर्रर्रर्रर्ररर्र कान काटा आला तसे झट कन डोळे उघडले… रात्रिचे तीन वाजायला आले होते… पुन्हा तीचे जुने मेसेज वाचत झोपी गेलो… दुस-या दिवशी ठरल्या प्रमाणे वर्षा आणी मी तीच्या घरी बाईवरून निघालो.. मेन रोड वरुन आम्ही नेहमीच्याच वेगात जात होतो.. पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होत… गप्पा मारता मारता रस्ता आम्ही कधी पोहचलो समजलाच नाही.. पत्ता शोधायला खुप वेळ लागला नाही …. खुपच छान बंगला होता… लोखंडी गेट सरकवुन आम्ही आत गेलो… माझ ह्रदय मात्र धडधडत होत… दरवाजा ‘ती ‘ उघडेल की आणखी कोणी… माझ्या चेह-यावरील आनंद आणि किंचितशी भिती पहुन ‘वर्षान’ आपली मान हालवत स्वताच डोअरबेल वाजवली… काही वेळातच दरवाजा उघडण्याची चाहुल लागली तशी माझ्या ह्रदयाची धडधड आणखीच वाढली… क्रमशः
Ghaat Part 2 – Marathi horror story

You may also like...

5 Responses

 1. Kailas Mishra says:

  Solid story..

 2. priti sheteye says:

  nice story….all the best for more stories..I also want to share my paranormal experience…with u..

 3. Bharati says:

  Nice ……………

 1. August 18, 2015

  […] घात भाग १घात भाग २ […]

 2. August 18, 2015

  […] विचार न करता मी ही घरी परतलो… क्रमशःघात भाग २Ghaat Part 1 – Marathi horror […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *