गाव तस चांगल ! – Gav Tasa Changla Marathi Horror Story

गाव तस चांगल ! – Gav Tasa Changla Marathi Horror Story

लेखक: कनिश्क हिवरेकर
भाग १ :

Gav Tasa Changla - Part 1

Gav Tasa Changla – Part 1

“सुरभा पटदिशी चल ग ! रात व्हाय पतूर आपल्यासनी गावात पहुचायचं हाय.. ” रामा आज दिवसाच आपल्या पत्नीच्या म्हणजे सुरभाच्या माहेरी गेला होता तिला परत आणायला… सुरभाच्या आईची तबियत जरा नाजूक होती म्हणून ती आपल्या आईच्या घरी आली होती तिला बघायला.. आणि तिथून परत निघताना काही कारणामूळ त्यांना निघायला उशीर झाला होता
रामा घाई करीत होता. आणि त्याच लवकर निघायचं कारण तुम्हाला पुढे कळेलच म्हणा. “आले धनी…!! ” आणि सुरभा आपल्या आईसह हळदी कुंकू उरकून घरातून बाहेर पडली… रामाने बैल गाडीला जुंपले होते तोपर्यंत सुरभाच सामान अन तिच्या आईन बांधून दिलेल्या काही भाकरी त्याने गाडीत ठेवल्या आणि सुरभाला देखील गाडीत चढवल.. आई पासून परत दूर जाताना तिचा
चेहरा बारीक झाला होता.. रामाच आणि सुरभाच नवीन नवीनच लग्न झाल होत.. बर असो “चल सुरभे बिगीबिगीन बस.! ” डोळ्यात पाणी डबडबून भरवत आणि आईला हात करत सुरभा गाडीत बसली… सुरभा त्याच्या बाजूला बसली होती सामानसकट आणि मध्येमध्येच तिचा हुंदक्याचा आवाज रामाच्या कानावर पडत होता गुडघ्याच्या ओटीत तोंड खुपसून सुरभा रडत होती .
रामा पुढ गाडी हाकत होता.. “सुरभे नग ग रडूस ! आय आता ठीक झालीय नव्ह तुझी मग फिकीर कशाला करती हा..म्या हाय नव्ह ये इकड .. ” अस म्हणत गाडी चालवत त्याने बाजूला बसलेल्या सुरभेचा हात हातात घेतला..तशी सुरभा सावरली अन तिने आपले ओले डोळे पुसले व रामाला पाहून त्याचा हात तिच्या हातावर पाहून ती लाजली.. रामा आपली बैल हाकणे चालूच ठेवत होता
दोघांच्याहि नजर समोर रस्त्याला गडल्या होत्या तेव्हा कच्चा रस्ता सुरु झाला.. गावचा मुख्य रस्ता अजून १० एक मैल दूर होता आणि तेव्हा गाव एवढ सुधारित नव्हत म्हणून रस्ता आपला जंगलाचा होता.. जंगल (?!) सायंकाळचा आभास रामाला झाला.. सुर्य मावळतीला झुकला होता.. आणि गाव अजून कोस कोस दूर होत..
रामाने थोडा वेग वाढवला.. “सोन्या …. गुण्या … हैक … क्रया..क्या कयाक … धावा पोरानु ” आपल्या बैलांची नाव घेत त्यांना रामा जोरजोरात हाकत होता… सुरभा मागे बसलेली तिच्या देखील लक्षात आल कि रामा घाई का करतोय.. इकडे सांज होत आली होती..आणि जंगलाचा रस्ता अजून देखील लागला नव्हता… सुरभा रामाच्या अगदी जवळ त्याच्या खांद्यावर हात रुतवून बसली होती… रामाने एकवेळ तिच्याकड पाहिलं आणि सुरभाने देखील त्याला पाहिलं दोघांच्या नजरेत एकमेकांना भीतीचा वावर दिसला..
आणि तेव्हा सांजेने सूर्याचा अंत केला.. तो लाल गोळा गिळून टाकला सायंकाळीने तशी इकडे बैलांची गती वाढली आणि रामाच्या तोंडून त्यांना हाकण देखील वाढल..रामाच्या सुरभेच्या दोघांच्या डोळ्यासमोर अंधारी आली झाकट पडली दोघांच्याहि डोळ्यावर.. अंधाराने दिसेनास झाल होत.. सुरभेन घाई घाईत कंदील लावला..
आणि बरोबर रात्रीच्या वेळीच ते दोघे जंगलाच्या रस्त्याला लागले.. भयान काळोख माजला होता त्या जंगलात.. घुबडांच “….व्हूउSSS ….व्हुऊSSS !! ” आणि रातकिड्याची “किर्र्रर्र्र्ररर ….किर्रर्ररर ” या ओरडा शिवाय दुसर काहीच ऐकू येत नव्हत ना कुठला श्वापद ना कुणी कुत्र… त्या घुबडांचा आवाज देखील .. मधून मधून बंद पडून परत सुरु व्हायचा आणि दरवेळी जसा तो बंद पडे आणि चालू होई त्या त्या वेळी तो वाढलेला असायचा
जस कि ते घुबड त्यांच्या जवळ आणखी जवळ येत आहे. बैलगाडीचा …खळलंग..खळलंग आवाज आता खडक खडक येत जात होता. रामाने बैलांचा वेग वाढवला होता. “चला पोरहो बिगी बिगी चल गुण्या … ” गाडी असच धावत मध्यजंगलात आली होती… आणि तो घुबडाचा आवाज शेवटचा बंद झाला होता.. आणि जसा तो अजून एकदा सुरु झाला तेव्हा तो आवाज एका क्रूर आणि अंगावर काटा आणणाऱ्या छद्मी हास्यात झाला होता…

“हीSSहीSSही……” तो आवाज ऐकताच बैल होते त्या ठिकाणी थांबले.. आणि रामा जागेवर उभा राहिला.. आणि चाबकाने आवाज करीत बैलांना हाकू लागला.. पण बैल काही पुढे सरकायला तयार होईना झाले होते… आणि आता दुसऱ्यांदा तो हसण्याचा आवाज परत ऐकू आला… “…ह्हीSSहीSSही… ” सुरभा घाबरून उठली आणि तिने रामाचा हात गच्च आवळून धरला इकडे रामा बैलांना हाकण्याचा जीवतोड प्रयत्न करत होता.. पण बैल काही जागेवरून हलायला तयार होत नव्हते…ते एका जागीच उभ राहून आपले पाय पुढे मागे करत होते..
आणि नजरा मोठ्या करून इकडे तिकडे बघत होते.. आणि माना गरगर फिरवत आजूबाजूला करत होते… अस जस कि त्यांच्या समोर ‘ कोणीतरी ‘ उभ आहे आणि ते त्याला न पाहण्याचा प्रयत्न करीत होते… रामाच्या बोलण्याचा त्यांच्या वर काहीच परिणाम दिसून येत नव्हता… आणि तितक्यात… त्या दोघांच्या हि मागून एक विचित्र काळी आकृती “खी… खी… खी..” हसत पार झाली.. रामाने आणि सुरभेने झटक्यात आपली नजर मागे टाकली आणि पाहिलं तर कुणी नव्हत… आणि असच पुढून पण झाल.. अजून एक दुसरी आकृती त्यांच्या पुढून पार झाली
सुरभा ओरडली “धनी……. !!!” आणि तीन आपल तोंड आपल्या नजर रामाच्या धरलेल्या हातात लपवण्याचा निरर्थक प्रयत्न केला.. रामादेखील घाबरला होता… त्याच अंग घामाघूम झाल होत दोघे हि सुरभा आणि रामा घामाने भीतीने थरथर कापत होते.. देव जाणो पुढ काय होणार होत ते..आणि तेव्हाच गाडीच्या खालून देखील खी खी खी हसण्याचा आवाज आला..आणि अचानक बैल तेव्हा सुटली… आणि सैरावैरा गाडीसकट धावू लागली…रामा त्या धक्क्याने खाली पडला.. कसा बसा त्याने लगाम हातात धरला होता म्हणून वाचला… आणि सुरभादेखील त्यालाच धरून होती म्हणून वाचली…
बैलांचा वेग अफाट वाढला होता… सुरभाने एकवेळ माग पाहिलं.. तर चित्रविचित्र काळ्या कुट्ट आकृत्या त्यांच्या गाडीच्या पाठी धावत उडत येत होत्या… सुरभे न आपला उलटा हात तोंडाला लावला आणि किंचाळली.. तसे रामाने देखील तेच पाहिले.. सुरभा ढसाढस रडत होती आणि रामा गाडीचा तोल सांभाळू पाहत होता.. पण गाडीच चाक एका दगडावरून गेल आणि घात झाला.. गाडीच लाकडी चाक गाडीपासून वेगळ झाल.. आणि त्या झटक्याने सुरभा आणि रामा दोघे हि गाडीतून उडून बाहेर पडले…सुरभाच डोक दगडावर आदळल.. आणि रामा काठाड्यामध्ये पडला.. त्याच्या अंगभर काटे रुतले होते..
रामाने दुरून पाहिलं.आणि “सुरभा ….सुरभा उठ ..उठ ” अस म्हणत तिला उठण्यासाठी प्रोत्साहित करू लागला…
तर सुरभा कण्हत उठण्याचा प्रयत्न करीत होती ..रामा रुतलेल्या काट्या सकट इव्हळत कण्हत उठला.. आणि तसाच आपल्या बायको जवळ गेला.. आणि तिला उठवू लागला.. सुरभा त्याच्या आधाराने उठली…
आणि दोघे हि जीवाच्या आकांताने धावू लागले.. मागून येणाऱ्या त्या आकृत्यानि त्यांना गाठलंच होत.. सुरभाच अचानक लक्ष रामाकडे गेल आणि तीन पाहिलं कि रामाच्या पलीकडून काहीतरी येतय.. आणि पुढच्याच क्षणी… रामाच धड आणि शीर एकमेकापासून वेगळ झाल…
आणि त्या भयान जंगलातून बाहेर पडली ती फक्त एकच गोष्ट … सुरभाची शेवटची किंकाळी….”धनी…..!!”
****

*प्रसंग गावच्या आडाजवळील *
“आव सरपंच पाटील…! काय म्हणायचं व हे? लय इपरीत घडलय चार दिसा आधी संतूचा मुडदा भेटला आन आज ह्ये अस..काय चाललय व पाटील हये ” एक गावकरी गावच्या सरपंचाना समोरची व्यथा व्यक्त करीत उत्तराची अपेक्षा करीत होता सर्व गावकरी आणि गावातले काही मोजकेमाजके मुख्य मंडळी गावातील मुख्य विहिरीपाशी जमले होते.. आणि त्यांच्या पुढ्यात रामा आणि सुरभाच प्रेत विना मुंडक्याच रक्तबंबाळ
कपड्यान झाकलेल पडल होत. रामाची आई रडून रडून डोळ सुजवून बसली होती..त्या माउलीला आजूबाजूला चाललेलं काहीच समजत नव्हत बस पुढ्यात आपल्या लेकाच आन सूनेच प्रेत दिसत होत.. काहीवेळ गप्प बसायची पुन्हा अजून हुंदके द्यायची डोक्यावर हाणून घ्यायची.. परत दुसरा गावकरी पुढ आला आणि
सरपंचाजवळ येऊन म्हणाला “पाटील अव सकाळच्याला भोर पतूर कोळग्याचा हानम्या तिकड लाकड आणायला गेला तवा त्यासनी हि दोन्ही पिरत (प्रेत ) दिसली बगा ! आन येऊन त्यान समदा बोबाटा केला तवा आमास्नी बी कळाल… अन आमी बिगी बिगी जाऊन गाडीत टाकून आणलीशी बघा”
त्यावर शिर्गे आप्पा डोक्यावर गांधी टोपी चढवत पुढ येत म्हणाला (सरपंच पाटलांचा मित्र) “आबा काय वाटतय व तुमास्नी कुणी केल असल ? गेली दोन चार दिस असच घडतय बगा गावात.. आधी तो संतू असाच भेटला बिना मुंडीचा अन आता हये दोग ” सरपंच काही बोलणार इतक्यात. दोन गाड्यांचा आवाज आला एक जुनी होंडा हि गाडी होती आणि एक फटफटी रॉकेलवर चालणारी वाटत होती.. काळा धूर सोडत फट.. फट.. फट.. फट सायलेन्सर मधून आवाज काढत
एक राजदूत गाडी सर्वांच्या समोरा येऊन थांबली..
***
एका गाडीवर बड्या मिश्या असलेला दांडगा माणूस आणि दुसऱ्या गाडीवर तो सडपातळसा माणूस असे दोघ जन उतरले. दोघांच्या हि अंगावर खाकी वर्दी होती… आणि त्यांना पाहून गावकरी एकमेकात बोलू लागले “आर फौजदार अन जमादार आल बगा !! पाटील ” त्यावर ते दोघे आले आणि त्यांना पाहून सरपंच त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना काहीतरी सांगितल… व त्या दोन प्रेतांकड इशारा केला..
फौजदार त्या प्रेताच्या दिशेने जातच होते.. कि सरपंचानि त्यांच्या खांद्याला धरून अडवल आणि अजून त्यांना काहीतरी सांगितल त्या वेळी त्यांनी रामाच्या आईकड इशारा केला.. ते अस सांगत होते कि जस त्यांनी आता तिच्याजवळ काही विचारपूस करू नये.. कारण त्या माउलीन आताच आपल लेकरू गमावलंय ती या स्थितीत नाहीये कि ती फौजदारच्या कोणत्याही प्रश्नाच उतर देऊ शकेल..सर्वजन काही वेळ शांत होते
तेव्हा एक गावकरी.. तोंडातली तंबाखू बाजूला थुंकत.. शिर्गे आप्पाकड गेला आणि शांतपणे घाबऱ्या आवाजातच आणि त्या दोन प्रेताकडे नजर टेकवत तो म्हणाला “आप्पा… ! ओ आप्पा … वाघ बिघ तर नव्ह घुसला गावात ?! ” त्यावर आप्पा हादरले आणि त्यांनी त्या गावकऱ्याकड पाहिलं आणि जोरात उठत उदगारले “आं …. वाघ ” तेव्हा झटक्यातच सर्व गावकऱ्यांच्या कानात ते पडल सर्वांच्या अंगातून एक भीतीची थंडगार लहर पसरली… सर्व बडबडू लागले …”काय वाघ ?? हॉ … या बाबो वाघ.. आप्पा काय म्हणतायसा ”
त्यावर सरपंच दोन्ही हात हवेत उचलत बोलले “गप्प बसा ..! काय बी बोलू नका.. अजून कळल न्हाई फौजदार आलेत तेच तपासणी करतील तेव्हा कळल.. ” त्यावर रामाची आईने दात खात आपले उद्गार बाहेर काढले “मुडदा बसो त्या मेल्याचा..! माझ्या पोरास्नी मारला त्यान त्याचा नास हुईल नासून मरल त्यो भाड्या माझा शाप हाय त्याला… ” असच बोलत बोलता ती परत आपल्या छातीवर हानुन घेत रडू लागली… तेवढ्यात तिथेच
वडाच्या झाडा मागुन एक खरडा आणि छद्मी हसण्याचा आवाज आला… “ह्या.. ह्या.. ह्या..मरSSSणार …… तुमी समदी मरणार…. ”
त्यावर सरपंच पुढे येऊन म्हणाले “कोण हाय तिथ म्होर ये जरा…ये म्होर ” आणि त्या झाडाच्या खोडामागून एक घाणेरडा हात बाहेर आला..आणि खोडाच्याच आधारे त्याने आपला चेहरा बाहेर काढला..”नग! नग! नग!. म्या बाहेर आलू तर त्यो मला बी मारणार….त्या दोगासारक नग ! नग ! खुळ्या बाहेर नग निघुस ” तो वर पाहत स्वतःशीच बडबडत बोलला.. तेव्हा सरपंचाने ओळखल तो गावतला एक वेडा होता त्याला खुळ्या म्हनत सर्व.
सरपंचानी त्याला दाब देऊन बाहेर बोलावला .. तो बाहेर आला.. वाढलेले पांढरे केस, काळ्या पांढऱ्या भुवया वाढलेली दाढी अंगात मळक धोतर आणि मळका सदरा …आणि एका गालाने त्याच हसन विचित्र दिसत होता तो.. आणि पुढ येत स्वतःशीच म्हणाला “खुळ्या .. मरणार हे समदे… त्यो परत आलाय म्या या डोळ्यांनी बगितली त्याला व्हय त्यो आलाय.. ” सर्वांच्या नजरा त्याच्याकड गढल्या होत्या .. रहस्यमयी बोलन होत त्याच.. त्याच हे उद्गार ऐकतच गावकरी अन शिर्गे आप्पा बोलले “कोण कोण आलाय ?” ते ऐकून खुळया धावू लागला
” हीही.ही..ही..ही म्या न्हाय सांगणार ” आणि अस म्हणत तो धावत जंगलाच्या दिशेने गेला.. आणि परत त्याने वळून गावकर्यांकडे खूनशी नजरेन पाहिलं.. आणि अजून एकदा तोंडातल्या तोंडात म्हणाला “समदी मरणार…! ” सरपंच पाटलांची नजर दूर जाईपर्यंत त्याच्यावरच गढली होती .. तेव्हा शिर्गे आप्पा पुढ आले आणि म्हणाले
“पाटील यांच कुणीबी दुसर नातेवायिक न्हायत बघा.. अंत्य विधी उरकावा म्हणतोय आपण समद्यांनीच ” तेव्हा सरपंच फौजदाराकडे आले आणि त्यांनी त्यांच्याकडून परवानगी मागितली.. तेव्हा फौजदारांना गावकर्या समोर काहीच बोलता येत नव्हत… त्यांनी परवानगी दिली..शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया तेव्हा अवगत नव्हती.. म्हणून त्यांनी अंत्यविधी उरकण्याची समती त्यांना दिली…त्या नंतर सुरभेच्या आईला देखील बोलावण्यात आल
त्या दोघी हि रामाची आई आणि सुरभेची आई दोघी ढाय मोकळून रडल्या.. आणि रामा व सुरभाचा अंत्यविधी गावच्या नदीकिनारी उरकला… दिवसाची दुपार झाली दुपारची संध्या आन संध्याची रात्र झाली एक एक करून सगळे गावकरी निघून गेले… शेवटी उरलेल्या सरपंच आणि शिर्गे आप्पानि त्यांच सांत्वन केल आणि आपल्या रस्त्याने निघाले
रामाची आणि सुरभेची आई दोघीहि इथच होत्या काही वेळे नंतर त्याहि तेथून चालत्या झाल्या एकमेकीना सावरत .. चिता जळत जळत तीच रुपांतर थंडगार काळ्या पांढऱ्या राखेत झाल होत. इकडे rरात्रीच्या १२ वाजता सरपंच अंधारात त्याच्या घरातून बाहेर निघाले.
सगळा गाव शांत होता.. फिरता फिरता..आणि हातात कंदील घेऊन बाहेर पडलेले सरपंच पाटील जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या अंधारात नाहीसे झाले…

 

You may also like...

70 Responses

 1. Vivek says:

  एकदम खतरनाक कथा खरोखर खुप मजा अािल गाव तस चांगल ! वाचताना तर खुपच िभति वाटलि

 2. Pranita says:

  Nice story .really feel like horrible

 3. Amol says:

  Out Standing story…Shabd apure aahet stuti karnyasathi.

 4. Amol says:

  Out Standing story…

 5. Sumedh patil says:

  Best story

 6. ajay gaikwad says:

  very good story to reed………….keep it up……..

 7. Mayur says:

  Jabarsast Story ! Shevati Datta gurunche aagman sukhavun jate….. ashyach utkanthavardhak and sakaratmak Bhaykatha Takat raha.

  Digambara ! Digambara !!

 8. riddhi says:

  nice story ..

 9. Nilesh Kamble says:

  Hi Sir,

  Khupach Jabardast story …….

  Navin Horror stories kuthe milatil vachayla

 10. santosh vitthal kambli says:

  Tumhi patil bog che lekhak utsahane katha lihayla jata, he khupach changle ahe. pan lihun zalyanantar ekmekana dakhvat ja. kuthe tari kahitari kami ahe, pan patkan lakshat yet nahi. darja ajun sudharla pahije. shabdancha upyog nako tithe jast hoto. jithe katha ajun vadli pahije tithe jabardastine sampavli ahe. katha ajunahi khulali pahije. tumhi lihita tyacha khup anand vatato. ekmekana katha dakhavlyane ajun kay have he patkan lakshat yeil. amhala ya pudhachya katha ankhin romanchak ani jalad gatine pahijet. amhi vat pahto ahe.

 11. Yogesh says:

  Awesom!!! Really scared… I read dis story @ midnight 1:30 am..15th Sep’16.. Te pan room var ektach astane…

 12. komal ghadage says:

  Khup chhan

 13. ajinkya shinde says:

  khup mast….

 14. Kamini vaity says:

  khupch mast aahe story threelar mast jamlay ajun horrer stories vachayla aavadtil next story sathi all the best & keep it up

 15. Shamli Bichkar says:

  Excellent story……..

 16. kirantaktode says:

  film fair award melel ya storila
  yawar movies banawaki tar
  masta khupach chan

 17. milind says:

  Lay bhaari. Ek number

 18. mala fakta 3nch gosti aavadattat
  1)friendship chi story
  2)Emoshanal story
  3)ani sarat aavadata manje horror story
  kar jevada mja horror story madhe te love story madhe pan nahi……….

 19. kya pan mana ekdum filmi story tyar kru shkto apn ya story var…..

 20. Gita Patil says:

  Eakdam jhakkas story……:)

 21. lalita says:

  suppb……

 22. The big surprise is a great thing, but it is very nice just like a play

 23. Navnath Kamble says:

  Cool but most the story I like it davidcool but most the story I like it david

 24. ujwal says:

  How mach to download

 25. Shubham Shete says:

  Nice story
  श्री गुरुदेव दत्त

 26. Story khupach mast ahe… superb !! kahi goshtincha varnan shariracha tharkap udvnara ahe…khup sundar lekhan👌👌👍Datt Maharaj nehami bhaktancha madatisathi yetat !!
  🙏|| Digambara Digambara Shripad Vallabh Digambara ||🙏

 27. balasaheb salgarkar says:

  Awesome story…… really vachatana farach bhiti ani excitement vatat hoti…. experienced a thrill moment while reading……

 28. Prashant sakat says:

  farach horror story aahe.sagal kahi perfect agadi jithlya tithe..mala far aavadali story.

 29. Atul says:

  Nice story rally feel like horrible

 30. minakshi d kokane says:

  khoopch bhannat story i like it

 31. minakshi d kokane says:

  bhannat story gav tasa changla

 32. Mangesh Holambe says:

  Khupach bhiti dayak pan tevdhich jabardast story ashach stories pathvat raha

 33. Ashwajit Ramteke says:

  Very well narrated …..awesome story ……full of thrilling experience ….starting was fadu….

 34. robit says:

  Kadakch hoti ajun pathva khup bhri ekdam horrer avdli …….

 35. vinod says:

  Nice story

 36. Abhi dole says:

  Khupch chan ahe….MLA khup avdli..

 37. pratik khodwe says:

  shri guru dev dattt

 38. Shubham Bansode says:

  Nice story…..I like it.

 39. Reshma Ubhe says:

  Mast

 40. TUSHAR says:

  MAST !! avdhoot chintan shree gurudev datta!!!

 41. swapnil s bagadi says:

  nice sir pan sir satye he satye raht

 42. raju sawale says:

  amzing

 43. Lalita says:

  एकदम छान. मनाला खिळवून ठेवणारी कथा. आवडली.

 44. suchitra says:

  khupch chan…………

 45. Ajay says:

  Lai bahri

 46. satish says:

  Very nice story l am proud of you

 47. satish says:

  Very nice story I am prud of you. You are jinias .you are story king .

 48. satish ozarkar says:

  Very nice story I am prud of you. You are jinias .you are story king .

 49. santosh jadhav says:

  outstanding story,film banli pahije yaaarrr………….

 50. chinmay says:

  shri gurudev datta

 51. Sairaj T. says:

  📖📖Khupach chhan GOSHTA hoti……..📖📖
  👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍.

 52. Rajashri says:

  Khup chan👌

 53. सुलेखा says:

  खुपच छान कथा होती.

 54. SHERA says:

  jabardast story !!! bhayanak pan hoti.

 55. Roshani says:

  khup chhan story aahe…full horrible ahe. ani dattyogi tyancha mule khup chhan ending zala…

 56. ketan patil says:

  sundar katha. vachayala khup changal vatal.

 57. Shridhar yadav says:

  Khup Sundar katha aahe.uttam paddatine mandnyat aali, ek gaonvakadcha touch bhetlyamule vachtana tya goshtincha imagination hoat hota ..mast…sir mla apla email I’d milel ka?

 58. खूप सुंदर कथा आहे…कथेला गावाकडचा touch दिल्यामुळे कथा खूपच छान वाटते वाचताना..पूर्ण कथा डोळ्यापुढे फिरते.

 59. खूप सुंदर कथा आहे…कथेला गावाकडचा touch दिल्यामुळे कथा खूपच छान वाटते वाचताना..पूर्ण कथा डोळ्यापुढे फिरते. Sir I need u r email I’d other wise contact source

 60. khupach mast aani pratek veli kathet navin kahi n kahi vachayala milal khupach chan bhitidayak aani manoranjak katha

 61. Akash says:

  1no…mast..

 62. prashant sankhe says:

  खुप खुप छान. मस्तच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *