एक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta – Part 2

एक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग २

एक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग १

Ek chuklela rasta part 2

Ek chuklela rasta part 2

सुशील चा पाय आता त्या track मधून सुटला होता. तो अगदी घामाघुम झाला होता, त्याच्या डोळ्यांत पाणी होते. भीती होती. पण पायाचं थोडक्यात निभावाल्याचा आनंददेखील होता. पण आनंद देणारे क्षण हे ” क्षणभंगुर” असतात ह्याची कदाचित त्याला कल्पना नव्हती. आताशी कुठे सुरवात झाली होती. ते “जे” कशाच्या जाळ्यात अडकत होते, हि त्याची केवळ एक पूर्वकल्पना, एक झलक होती… असली खेळ तर अजून बाकी होता…..

सुश्या च्या पायातील नखातून येणारी रक्ताची धार थोडी कमी झाली होती…त्याला त्या जखमेच्या वेदना कमी होत्या आणि भीतीच्या वेदना जास्त होत्या. त्याला भानच नव्हतं कि त्याच्या पायाला काही जखम आहे. सुब्या अजून शांत होता. जणू एक ध्यानस्थ साध्वीच!! त्याचं फक्त शरीर तिथं होतं, मन कुठे होतं काय माहित??? असो, त्या 6 मित्रांचा विनाशाकडील प्रवास आता अजून गंभीर होत चालला होता.. एवढं सगळं घडून सुबोध अगदीच भावशून्य होता, उलट किश्या चिंतातूर होता. त्याला कदाचित माहित असावं कि आता इथपर्यंत येऊन पुन्हा माघारी जानेदेखील धोक्याचे… हसीमचे मात्र अस्सल पुणेरी जोक चालूच होते आणि त्यावर मंग्या आणि सुश्या बळच हसल्यासारखे हसत होते. पण मनात भीती हि होतीच…

ते हळू हळू पुढे वाटचाल करीत होते, तस-तशी त्यांच्यावरील सावटाची छाया गडद होत चालली होती.. काही वेळापूर्वी सुश्यासोबत जे काही घडलं त्यातून सगळेजण सावरले होतेच… सुश्याची भीतीमधून काही सुटका होत नव्हती.. सगळे आता शांत होते… ते लोक पुढे पुढे चालत होते.. त्यांना आता पाऊलो-पाऊली भीती वाटत होती पण त्या गर्द रात्री त्यांना पुढे चालत जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.

चालत चालत ते एक वळणावर आले आणि त्यांनी एक डोंगर पार केला त्यामुळे काही वेळ त्यांच्या डोक्यावर असणारा चंद्र आता त्या डोंगराआडोशाला गेला आणि त्यांच्यावर अंधारी छाया पुन्हा पसरली.. ते पुढे चालत एक वळणावर येऊन पोहचले.

कळत न कळत वातावरणात अमानवीय शक्तींचा वावर असल्याचे जाणवत होतेच…. मध्येच कोणीतरी कृष्णाच्या पायावर पाय देऊन त्याच्या बाजूला गेल्याचा भास त्याला झाला… तो क्षणभर बिचकला…

पण तो सगळं जाणून अंजान होऊन चालत होता.. कारण त्याला माहित होतं कि जर त्याने ह्या गीश्तीची वाच्यता केली तर सगळे अजूनच घाबरतील… म्हणून तो शांत होता.. !

वेळ अघोरी झाली होती. आतापर्यंत सगळं जणू एखाद्या तांडवाच्या सुरवातीप्रमाणे घडत आलं होतं.. भीतीने सगळ्यांच्या मनावर जणू अधिराज्य करायचा बेत आखला होता… सुब्या ची शांत साधी ह्या सगळ्यांच्या चिंतेचा विषय होती. त्याने नेरळपासून चकार शब्द देखील उच्चारला नव्हता. आणि त्यातच भर कि काय म्हणून, सुष्याला पायाला वेदना होऊ लागल्या होत्या… कोणाला कळो न कळो पण किश्या ला कळून चुकले होते कि, हा प्रवास त्यांच्या विनाशाकडे चालू आहे… आणि ह्यातून हाती काहीच लागणार नव्हते….

चालत चालत ते एक वळणावर येऊन थांबले… ते वळण जरा विक्षिप्तच होते… त्या वळणावर track च्या दुतर्फा असणाऱ्या झुडूपांनी एक बोगादाच तयार केला होता. तो झाडेरी बोगदा एखाद्या असली बोगाद्यासारखा भासत होता.. त्याच्या अलीकडेच कोणीतरी वृद्ध व्यक्ती बसला आहे असे सतत वाटत होते… त्यांना ते कदाचित त्यांचे भ्रम असावे असे वाटले… म्हणून पुढे जाण्याच्या हेतूने त्यांनी काही पाऊले पुढे टाकताच….

ती वृद्ध व्यक्तीने तिथून हालचाल केल्यासारखी दिसली… ति व्यक्ती उठून त्या झाडेरी बोगद्यात कुठेतरी दिसेनाशी झाली. आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्ष कुणीतरी व्यक्ती दिसण्याची हि पहिलीच वेळ होती… सगळ्यांची जाम फाटली पण हसीम मात्र मस्करीच करत होता…. ते सगळे अजून थोडे पुढे म्हणजे अगदी त्या बोगद्याजवळ येऊन थांबले तिथे त्याने काहीतरी विलक्षण बदल जाणवू लागले..

ते सगळे जगाच्या जागीच थांबले… त्यांना वातावरणातील बदल प्रक्स्र्षाने जाणवू लागले… किश्या, हसिम, मंग्या नी रोह्या ला तिथे उष्णता जाणवत होती उलट सुश्या आणि सुब्या यांना थंडी जाणवत होती.. म्हणजे काहीतरी विक्षिप्तपण तेथीळ वातावरणात होते हे नक्की… सुश्याने थंडी वाजत आहे असे सांगून हसीम कडील उबदार स्वेटर काढून स्वतःच्या अंगावर घेतले.. सुब्याची देखील समाधी आता भंग पावली होती…

त्याच्या तोंडून आता गुरगुरण्याचे आवाज येत होते.. मंग्याला वाटले कि सुब्या मस्ती करतो आहे म्हणून मंग्या ने सुब्या जोरात शिव्या घालायला सुरवात केली. मंग्या च्या आवाजाचा जोर मोठा होता… सुब्या ने रागाने मंग्याकडे एक कटाक्ष टाकला..मंग्याच्या शिव्यांचा जोर हळू हळू ओसरू लागला… मंग्या सुब्याकडे पाहून घाबरला.. सुब्याच्या डोळ्यांत त्याने भयानकता पहिली होती.. ती भीती तो विसरुच शकत नव्हता.. तो असा एकदम शांत झाला कि त्याने पुन्हा तोंडच उघडले नाही…

ते सगळे आता त्या बोगद्याच्या तोंडावर उभे होते.. त्या बोगद्याच्या आजूबाजूला एक चपळाईने हालचाल झाली… जणू एक बाजूने दुसऱ्या बाजूकडे कोणीतरी धावल्याची हालचाल तिथे झाली… आजूबाजूला असणाऱ्या झाडांची पाने हलु लागली… झाडांच्या फांद्यांमध्ये एक हालचाल निर्माण झाली जणू एखादा सर्प तिथे वळ-वळत असावा… पण तो कोणी सर्प किंवा प्राणी नव्हता…. ती अमानवी शक्तिची झलक होती.. जिने आतापर्यंत सुब्या तिच्या वशिकरणात डांबून ठेवले होते…. झाडांच्या फांद्या हळू -हळू वेग घेऊ लागल्या… आणि झपाट्याने सळसळत येऊन त्या बोगद्याच्या दोन्ही कडांवर जणू एखादी मानवी रूपातील द्वारपाल बसावेत त्याप्रमाणे पसरल्या आणि शांत झाल्या… त्या बोगाद्याजवळ जाण्याची हिम्मत कोणाची होत नव्हती.. मंग्याचा धीर पूर्णत: खचला होता.. हसीम ने त्याची खिल्ली उडवत त्याला पुढे बोगद्याजवळ जाण्यास प्रवृत्त केले.. इज्जतीचा प्रश्न उभा ठाकल्याने मंग्याने तेवढी हिम्मत केली…

आणि मंग्या काही पाउले पुढे चालला इतक्यात….

त्याच्या मागून उष्ण प्रज्वालांचा एक गोळा सपकन् येऊन मंग्याच्या पुढे पडला.. जणू मंग्याची वाताच त्या आगीच्या गोळ्याला अडवायची होती… कोणाला काहीही कळायच्या आत मंग्या गेल्या पावलाने दुप्पट वेगाने परतला.. त्याला अगदीच चिमटीचं अतर धावून देखील धाप भरली होती, हे विशेष… मंग्याच्या डोळ्यांत भीती त्याच्या गळ्याशी आल्याची चित्रे दिसू लागली.. त्याला तो धक्का सहन होत नव्हता आणि पचवताहि येत नव्हता… भित्ने त्याची गाळण उडाली होती… त्याला काय बोलावे अन् काय नको तेच सुचत नव्हते…

हसीम ने वेळेचं गांभीर्य ओळखून रोह्याच्या bag मधील पाण्याची bottle काढून मंग्या ला पिण्यासाठी दिली… मंग्या अधाश्यासारखा पाणी पित होता… त्याला घाबरलेला पाहून सुश्या अजूनच घाबरत होता…

आता मात्र पूर्ण प्रवासात न घडलेली घटना घडत होती…

ती पाहून सगळेच अवाक् झाले होते…..

क्रमश:

एक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग ३

You may also like...

4 Responses

 1. Shubham says:

  This story is real?

 1. December 31, 2014

  […] एक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग २ […]

 2. December 31, 2014

  […] एक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग २ […]

 3. December 31, 2014

  […] एक चुकलेला रस्ता – Ek Chuklela Rasta | भाग २ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *