Problem – एक अनोळखी मित्र – भाग ९ – Ek Anolkhi Mitra

नेहाशी भेट – एक अनोळखी मित्र – भाग ८ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

दोघे चालत चालत बाहेर येत होते. सिद्धू खूप खुश होता. नेहुडीचे बाबा सिद्धुकडे कौतुकाने पाहत होते. ते मनात विचार करत होते, कि ‘ह्याने बोललेला शब्द खरं करून दाखवला तर पोरगी ह्यालाच द्यायची’.

दोघे बरेच दूर आले. बाबा आत गेले. कोणी काहीच बोलत नव्हतं. फार सकाळ नव्हती. नऊ वाजले होते.

आजूबाजूला झाडावर चीलीबील आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणार्या एखाददुसर्या गाडी व्यतिरिक्त काहीच आवाज येत नव्हता. दोघे चालत चालत बरेच दूर आले.

“आता फक्त अभ्यास एके अभ्यास. मार्क्स स्कोर करा आणि जोब शोधा. एकदाचं डोकं शांत झालं. काय बोलतो, चिन्याभाय ?”

चीनुने काहीच उत्तर नाही दिलं.

“चिनू, party करायची का?”

चिनू बघतच नव्हता.

“काय झालं?”, सिद्धूने खूप वेळाने विचारलं.

“सिद्धू..”, चिनू विचारात करत म्हणाला, “तुला कॉलेजला सोडू का?”

“आज चल न party करू. आजतर double party. बोल काय बोलतो?”, सिद्धूची excitement शिगेला होती.

“रात्री कॉल कर. मी ऑफिसला जातो”, चिन्या अजूनपण नीट बोलत नव्हता.

“का रे लौ* भाव खातो? जॉर्ज बुश सोबत मीटिंग आहे का तुझी? VIP आहेस काय?”, सिद्धूच्या चेहेर्यावर भली मोठी smile होती.

चिनू गालात जबरदस्ती हसला. पण त्याचे डोळे हसत नव्हते. “तसं नाही रे माझी जान. जर समजून घे. मी आधीच दोन दिवस पुढचा मागचा विचार न करता दांड्या मारल्यात. आणि तिथे पण माझ्यावर काही लोक responsibility टाकून आहेत.” चिनू हळू आवाजात म्हणाला.

“ठीक आहे. पण मी काय करू आता? तू नसेल तर मी पण नाही. मी bore होईन”, चिनू कधी नव्हे ते मोठ्याने बोलत होता.

“जा कॉलेजला जा. Enjoy the freedom, my boy.”, चीनुचा आवाज अजूनही बारीक होता.

“ठीक आहे. जातो मग. रात्री कॉल करतो”, सिद्धू निघाला. सकाळ होऊन बराच वेळ झाला होता.

“ओ भाई. कुठे चाललात? मागे बस. सोडतोय.”, चिनू गाडी start करून म्हणाला. त्याने सिद्धुला मागे बसवून कॉलेज गेट जवळ सोडलं.

“सिद्धू. जरीही आदीचा matter close झाला आहे, तरीही सांभाळून राहा.”, चिनू जाता जाता म्हणाला.

“ठीक आहे”, सिद्धुही थोडा गंभीर झाला.

चिनू गेला.

सिद्धू कॉलेजात गेटजवळ गेला.

सगळे वळून वळून त्याच्याकडे पाहत होते. कोणी आदराने, तर कोणी बिचकून. आदिचा ग्रुप तिथे नव्हता. फक्त आकाश आणि त्याचा एक मित्र तिथे होता.

तो खूप खुन्नसने सिद्धुकडे पाहत होता.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

सिद्धूच्या डोक्यात तिडीक गेली. त्याने पण थांबून त्याला खुन्नस दिली. आकाशच्या बाजूला एक मित्र होता. ‘जाऊदे आकाश. बघू नंतर’, तो आकाशच्या कानात बडबडला. आकाशने नजर बाजूला केली.

सिद्धूच्या चेहेऱ्यावर पुन्हा मोठी smile चिकटली.

तो वर्गात जाऊ लागला. तसं लेक्चर चालू व्हायला थोडा वेळ होता.

“सिद्धू. सिद्धू.”, एक ओळखीचा आवाज कानावर पडला.

तो शैलान होता.

“काय रे”, सिद्धू म्हणाला. शैलानच्या चेहेऱ्यावर मोठी smile होती.

“तू ग्रेट आहेस यार. सिद्धू. तू कसा काय? म्हणजे मला कळतच नाही आहे यार. तुने कैसे किया?”, शैलानला कळतच नव्हतं कि काय बोलू. पण सिद्धुला कळल कि त्याला काय म्हणायचं आहे ते. सिधू काहीच नाही म्हणाला. फक्त हसला.

“झंडूर बोल न यार. मस्त वाटत”, सिद्धू हसला.

शैलान शरमला. पण म्हणाला, “शायद अब कभी ragging नाही होगी. क्या मालूम कब कौन झंडू सिद्धू बन जाए. तुने किया वही जायज था. पण साला मला वाटला नव्हता कि तुझ्यात इतका दम असेल”

“सरळ हिशोब आहे शैलानभाई. कितना सेहेन करता? बोललो जे व्हायचं ते होऊ दे.”

“बरोबर केलास सिद्ध. तुझ्या जागी कोनपण असता तर तेच केला असता. ये बात अलग कि सब लोग इतनी हिम्मत नही जुटा पाते. अभी सब लोग देख तो. सब तेरी इज्जत कर रहे हे”, शैलान म्हणाला.

“ती काय इज्जत नाही आहे शैलान. इज्जत तर तेव्हा होईल जेव्हा मी final exam मध्ये मी कॉलेज top करेन. ही इज्जत म्हणजे ते बोलतात न, गां* लगी फटने खैरात लगी बटने. तशी खैरातवाली इज्जत नको आपल्याला. खरंच इज्जत होईल असं करून दाखवू”, सिद्ध डोळा मारून म्हणाला.

“क्या बात है भाऊ. लगा रेहे confidently. मी आहे तुझ्यासोबत”, शैलान म्हणाला. त्याने सिद्धूला समोरून एक कड्डक टाळी दिली आणि निघून गेला. शैलानच्या डोळ्यात खूप आदर होता.

सिद्धू आत कॉलेज मध्ये गेला.

सहज म्हणून कॅन्टीन मध्ये गेला. तो आल्या आल्या समोरच्या टेबलवरून चार जण त्याला घाबरून उठले आणि बाजूला झाले. सिद्धूने दुर्लक्ष केलं. तो जाऊन बसला. तसा एक canteen-boy मुलगा आला, आणि ‘काय आणू दादा?’, असं विचारू लागला.

वास्तविक पाहता कॉलेज कॅन्टीन मध्ये हे लाड होत नाहीत. ते कॉलेज आहे, हॉटेल नाही. सिद्धू चपापला. त्याने विचार केला, ‘सगळे अशे का वागत आहेत? आधीतर सगळे आदिराजला असे वागवत होते. तो गुंड होता. मी गुंड नाही’

“अरे दादा. तू विचारतोय का? हे हॉटेल नाही. कॉलेजचं कॅन्टीन आहे. काही हवं असेल तर मी तिथे जाऊन घेईन. इथे कोणी कोणाला serve नाई करत”, सिद्धू हसून म्हणाला.

“चूक झाली दादा”, तो canteen-boy अजूनही त्याच accent मध्ये बोलत होता. सिद्धुला guilty feel होत होतं.

“सिद्धू नाव आहे माझं. मला सिद्ध बोल. सगळे मित्र तेच म्हणतात मला”, सिद्धू त्याला निरवत होता.

सिद्धूने घडाळ्यात पाहिलं. साडेनऊ होणार होते . पहिलं lecture तर miss झालं होतं. दुसरं lecture चालू होणार होतं. सिद्धू त्याच्या classroom जवळ गेला. Lecture चालू होतं. पुढचं सगळं कॉलेज आणि सगळे lectures सिद्धयाने मन लावून attend केले.

दुपार झाली होती. सिद्धूने त्याचा घरून आणलेला डबा खालला. सगळं पहिल्यासारखं normal झालं.

जे काही घडलं त्याची कोणीही चर्चा करत नव्हतं. न इतर विद्यार्थी, न शिक्षक, न इतर वर्गातील मुल. सगळे सगळे एकदम सामान्य होते. सर्वांना माहित होतं कि सिद्धची काही चूक नाही. आणि खरंतर सिद्धूचा सगळे आदर करत होते.

आता सिद्धूने अभ्यासाचं खूप मनावर घेतलं होतं. lectures नंतर तो सरळ library मध्ये गेला. दोन तास काही notes आणि पुस्तके वाचून त्याने स्वतःला नेहमीप्रमाणे update केलं.

लहानपणीपासून एकपाठी, पण गरज नसली तरी प्रत्येक गोष्ट खूप खोलात जाऊन शिकायची आणि जाणून घ्यायची हौस.

त्याने भरभर सगळं संपवत वेळ कधी गेला कळलं नाही.

संध्याकाळ होणार होती. सिद्धूला बाबांचा फोन आला. ते म्हणाले कि ते उशिराने घरी येणार आहेत. लगेच दुसरा फोन सिद्धूने चिनूला लावला.

“हेल्लो”, सिद्धू म्हणाला.

“कोण बोलतय? सिद्धू आहे का? आवाज ओळखीचा वाटतोय”, एका मुलीने उत्तर दिलं.

“हो मधु. मीच आहे. चीण्याला दे फोन”, सिद्धू म्हणाला.

“सिद्धू. तो अजून ऑफिसमधून आला नाही आहे. तुझा काही मेसेज?”

“काही नाही. सहज फोन केला सांग. आणि लवकर मला फोन करायला सांग”, सिद्धुचा चेहेरा पडला.

“तू घरी ये कि. तो येईल कदाचित लवकरच”, मधुरा insist करत होती.

“बर”, सिद्धूची पाउले राजयोग प्रस्थकडे वळली.

ninth floor, room number ९०३.

सिद्धू बेल दाबणार, इतक्यात त्याला काहीतरी आठवलं. त्याने पाकिटातून चीनुने दिलेलं कार्ड काढलं, आणि lock मध्ये swype केलं.

दार उघडलं.

सिद्धू आत गेला. “मधु, चीण्याला फोन लाव. बघ कुठे पोचला?”

“not reachable. मी पुन्हा try करतेय”, मधुराचा आवाज आला.

तो पर्यंत सिद्धू चपला काढून kitchen मध्ये गेला. त्याने पाणी पिउन “मधु, चहाची भांडी कुठे आहेत?” असं विचारलं.

“मी करते चहा”, मधु म्हणाली. घरात vending मशीन होती. मधूने सांगितलं, “चिनू, cup collect कर.”

चहा घेत घेत सिद्धू म्हणाला, “चिनुची रोजची घरी यायची वेळ काय आहे?”

“सकाळी ९ ते संध्याकाळी ५ हा ऑफिस time आहे. बाकी तो कधीही येतो”, मधुरा म्हणाली.

सिद्धूने bookshelf मध्ये नझर टाकली. खूप पुस्तके होती. इतक्यात सिद्धुला काही आठवलं. त्याने आपली bag खोलून काही पुस्तके काढली. आणि कॉलेजमध्ये काही assessments दिल्या होत्या ते सगळं लिहायला लागला.

“तुला काही हवं आहे का?”, मधु म्हणाली.

“शांतता”, सिद्धू पुटपुटला.

सिद्धू लिखाणात हरवून गेला. दीड तासात जवळजवळ वीस पाने लिहून त्याने मान वर केली. पुन्हा मधुराला म्हणाला, “चिनूला बोल मी येउन गेलो. तो काय येणार नाही असं दिसतंय. बाबा येतील. मला घरी कामे आहेत. मी जातो.”

“ठीक आहे”, मधु म्हणाली.

तो सगळी पुस्तके college-bag मध्ये भरून त्याने चपला घातल्या आणि, तो तिथून बाहेर पडला.

घरी आला.

घरात तेव्हा कोणीच नव्हतं. बाबा अजून आले नव्हते. त्याने वेळ पाहिली तर संध्याकाळचे साडेसात. सिद्धूने घाईघाईने दिवाबत्ती करून स्वयपाक घरात उडी मारली. तासाभरात सगळं आटपून तो बाहेर आला.

थोड्यावेळाने बाबा आले. दोघांनी जेवण केलं, आणि मग ते संपवून बरीच रात्र झाल्यावर दोघे झोपी गेले.

सिद्धू नेहाला खूप miss करत होता. आणि तो दाखवत नसला तरी मनाच्या सातव्या कोपऱ्यात का होईना, त्याला नेहाची काळजी होतीच. तिचे बाबा हो म्हणाले होते, पण त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. तिचा विचार करत करत तो झोपी गेला.

अचानक फोन आला.

त्याने घड्याळ पाहिलं. मध्यरात्र झाली होती. बाजूला बाबा झोपेत होते.

“हेलो”

“सस.स. सिद्धू मी आहे”, कोणतरी अडखळत बोलत होतं.

“चिनू ? काय रे काय झालं?”, सिद्धू दबक्या आवाजात बोलत होता.

“मला? मला? मला कुठे काय झालं?”, चिनू म्हणाला.

“आत्ता फोन का केलास?”

“नको करू का? मला वाटलं मी केला”

“अरे यार तसं नाय, पण अचानक? रात्रीचे २ झालेत”, सिद्धू हसून म्हणाला.

“ओये जंगल बुकके बगीरा, ऐक. च.चल बाहेर ये. मी इथेच उभा आहे. ”

“तू बाहेर आहेस?” तातडीने उठला. खिडकीतून बाहेर पाहिलं. चिनू उभा.

ऑफिसच्याच कपड्यात होता. फक्त shirt-in बाहेर आली होती. वरची दोन बटणे खोलून cuffs कोपरापर्यंत फोल्ड करून चिनू बाईकवर बसलेला. केस विस्कडलेले होते. डोळे लाल.

“चल रे. लौ*. बाहेर ये”, चिनू म्हणाला.

“आलो”, सिद्धूचा आवाज बारीक झाला. सिद्धूने चप्पल घातली, आणि तो अलगद दार लावून बाहेर आला.

“का रे. फो*ऱ्या. एकदा बाहेर ये बोललो तर सतराशे साठ questions काय विचारतो?”, चिनू full tight होता. हातात एक beer ची bottle होती.

“चिनू.. यार.. तू.. तू..”

“मी? काय मी? अरे आड. . आड. आड. अडखळतो काय? दारू कोण प्यायला आहे? तू कि मी?”, चिनू हसत होता.

“जाऊदे. सोड. चल इकडून वंटास होऊ चल. बाबा झोपलेत. ते जागे होतील”, सिद्धू चिन्याच्या मागे बाईक वर बसत म्हणाला.

“का? तुझ्या बापाला घाबरतो काय मी?”, चिनूचे शब्द अडखळत होते.

“तू नाही रे बाबा. मी घाबरतो. चाल इथून तू. दुसरीकडे जाऊ. कोणी बघेल आपल्याला”

“नाही. इथेच बोल. येऊ दे कोण येत असेल. भे**. एकेकाची गां* मारू. तू सिद्ध? तू घाबरतो? तू अजून घाबरतो?”, चिन्या बाईक वरून उतरला. त्याला चालवत नव्हतं इतका प्यायला होता.

“मागे बस”, सिद्धूने गाडी start केली.

“कुठे नाही जायचं मला. मला इथेच रस्त्यावर झोपायचं”, चिनू रस्त्यावर अडवा होऊ लागला. सिद्धूने त्याला उचललं, आणि गाडीवर मागे बसवलं.

“अरे माणसा. जर ऐक. कशाला अब्रूचं खोबरं करतोय?”, सिद्धूने गाडी सुरु केली.

“पण खरच सिद्धू, यार. काहीपण बोल. तूच एक माझा मित्र आहेस यार. तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही”, चिनू ओरडत होता.

“हो हो. माहितीये”, त्यावर सिद्धू फक्त हसत होता. सिद्धूने गाडी चालू केली.

“येह दोसती हम नाही छोडेंगे'” चिनू मोठमोठ्याने ओरडून गाणी बोलत होता. “सिद्धू गाडी side ला घे. थोडा timepass करू”, चिनू म्हणाला.

सिद्धूने बाइक दूर खाडीपाशी आणली. त्यावर जुना पूल होता. त्याच्या आधी एक खूप मोठं झाड होतं. झाडाखाली मोठे मोठे खडक होते आणि एक road lamp होता. सिद्धने गाडी side ला घेतली.

“सिद्ध ऐक न”

“बोल. गाडीच्या मागे बघ एक गम्मत आहे”, सिद्धू अडखळत बोलत होता.

“काय रे?”

“अरे जा ना माझी जान. बघून तर ये”

चिनूच्या गाडीच्या मागच्या बाजूला एक पिशवी होती. त्यात तीन चार beer होत्या.

“मारतो का?”, चिनू विचारात होता.

“तुला कोण सांभाळेल?”

“अरे यार. आत्ताशी फक्त दीड quarter झाली आहे. I am still normal”

“तुझं काही होणार नाही”, सिद्धू tension मध्ये होता.

“सिद. ऐक न.”

“हा बोल”

“काहीच नाही”

“बर ठीक आहे. तुझी उतरायला किती वेळ लागेल?”

“अरे यार. भे**. तू डोक्याची iz करू नकोस. अजून तर बराच…”, चिनू चालता चालता अडखळून पडला. सिद्धूने उचलून त्याला एका दगडावर बसवलं.

“नीट रे बाबा. सांभाळून”

“सिद्धू ऐक न..”

“हा बोल”

“तुला एक बोलायचं होतं”, चिनू स्वतःला दगडावर adjust करत होता.

“बोल बोल”

चिनू काहीही बडबड करत होता. “ए दगडा. माद***. हलू नकोस. नीट उभा राहा. मला तुझ्यावर बसायचं आहे”, चिनू पुन्हा सिद्धुला म्हणाला, “यार सिद्धु. आपण काय मारली न त्या आदीची. साला कधी आता बघणार नाही आपल्याला. बोल काय बोलतो?”, चिनू हसत होता.

“हम्म”, सिद्धू घड्याळात बघत होता. तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. “चिनू. घरी जाऊ.”

“थांब न यार. ती घरी आहे न. असा tight-fight होऊन गेलो, तर ती हिडींबा गळा दाबेल माझा”, चिनू म्हणाला.

“तू इतका का दारू प्यायलास?”, सिद अजून tension मध्येच होता.

“जाऊदे रे. तू खुश आहेस न. यार काहीपण बोल सिद्धया. तू माझा खरा मित्र आहेस”, चिन्या परत काहीतरी बोलत बोलत राहिला.

“मी तर खुश आहेच. पण तू हा काय अवतार करून घेतला आहेस?”, सिद्धच्या चेहेऱ्यावर अजूनपण कसली भीती होती.

“माझी मर्जी. वाटलं म्हणून प्यायलो”, चिनू बोलला.

“मला समजत नाय कि तुझ्यावर चिडू कि नको. तू नशेत आहेस. यार. चल घरी जाऊ. फुकट time-pass होतोय. सकाळी कॉलेज आहे”, सिद्धू उठून बाईकपाशी गेला.

“घरी नको. इथेच थांब”, चिनू सिद्दचा हात झाडत म्हणाला.

“चल रे ए बाबा, लवकर चल. अडीच तीन झाले झाले असतील”, सिद्धू म्हणला. चिनू ऐकत नव्हता.

तो पुन्हा त्या जागेवर जाऊन म्हणाला, “सिद्धू ऐक न”

“बोल. आणि लवकर घरी चल”, सिद्धू खाडीकडे पाहत होता.

“यार ती नेहा जाम कडक item आहे रे. तू तुझी ती स्टोरी अजून बोललाच नाय रे”, चिनू हसत म्हणाला.

सिद्धूने मान खाली घातली. “बाईकवर बस रे. काय फालतुगिरी लावली आहेस?”

“कसली फालतुगिरी?”, चिनू म्हणाला.

“चल चल. साल्या वाजले किती. लवकर आवर”, सिद्ध विषय ढकलत होता.

“सिद्धू यार. मला सांग. नेहाला कशी पटवली?”

“सकाळी सांगतो. आता तू शुद्धीत नाही आहेस”, सिद्धुला वाईट वाटत होतं.

“इतका मोठा item bomb. item नाही Atom BOMB. तुला हो कशी बोलली यार? साला आदीच पण काय चुकलं? कोणपण पोरगा तिच्यासाठी वेडा होईल.”

सिद्धू फक्त हसला.

“साला हसतोय तू?”, चिनू बोलत होता.

“मग काय करू? तू यार असा नको बोलूस रे. चिनू मला वाईट वाटत”, सिद्धू थोडा upset झाला.

“काय नको बोलू? बोल न यार. तुझ्यासाठी जान आहे. बोल तू. का वाईट वाटत तुला? काय केलं मी?”

“अरे यार. नेहाबद्दल रे”

“नेहाबद्दल काय? हेच कि ती item आहे?”

सिद्धू काहीच बोलला नाही.

“अरे भाऊ. तू भ्रमात आहेस. तुला सांगतो ते ऐक. नेहा वैगरे कोणी नाही. मुलगी म्हणजे प्रोब्लेम. मला वाटलं तुला काही त्रास आहे. तुला पोरीमुळे वाईट वाटत असेल तर त्यावर उपाय करू. पण पोरीसाठी वाईट वाटत असेल तर तुझ्यासारखा एडझ* तूच”, चिन्या हसत होता.

“नाही रे. माझी नेहा तशी नाही”, सिद्धूने मान खाली घातली.

“मग कशी आहे ती ‘तुझी नेहा’?”, चीनुने एक भुवई वर केली.

“ती तर लाखात एक आहे”, सिद्धू हसत होता.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“ओ मजनू the great. जमिनीवर ये. मुली भयंकर चंचल असतात. त्यांना आत्ता एक वाटतं पुढच्या क्षणी दुसरं. त्याचं त्यांनाच माहित नसतं कि त्या काय करतात आणि का करतात. तू उगाच डोक्यात गैरसमज असतील तर काढून टाक. उद्या तिचा interest गेला तर? तू चोळत बस. मला माहित आहे ह्या पोरींची नाटकी. आधीच सांगतो. use करून घे, नाहीतर उद्या तिचं मन बदलेल आणि तेव्हा तू परत माझ्याकडे येशील. चिनू नेहा सोडून गेली व्हाआआआआ.”, चिनू हसत होता. शेवटचं वाक्य बोलताना तो रडायची acting करत होता.

“अस काहीच नसतं. पण दारू प्यायल्यावर तू छान तत्वज्ञान सांगतोस”, सिद्धू चिनूची मजा घेत होता.

“तुला असं नको वाटून देऊस कि मी दारू प्यायलो आहे म्हणून बोलतोय”, चिनू serious होत होता.

“चल चल. झा* chill मार”, सिद्धू तिथे side ला relax होत होता.

“अरे यार. मी १०१ टक्के खरं बोलतोय. पुरावे घे न यार. सगळ्या internationally reputed psychologists न विचार. मुलींच्या मेंदूत chemical imbalances होतात कि नाही ते.. त्यांचे decisions नाही स्थिर राहत. विचार कोणाला पण.”

“असू दे असू दे. थंड घे जरा”, सिद्धू साफ ignore करत होता.

“तुला नसेल पटत तर सोड. पण आपला हिसाब रोकडा प्रेम चोपडा. पोरी असतात पटवण्यासाठी”, चिनू फुल determined होत होता. “काम फीट पिच्चर हिट. बोल काय बोलतो”.

“शहाणा असशील तर लांब रहा. तू जे बोलतोय ते पाप आहे”, सिद्धू अजून पण lightly घेत होता.

“अरे हटा. कसलं आलाय पाप? भूक लागली कि जेवायचं. हे काय पाप आहे का?”, चिनूची भाषा स्पष्ट होत होती.

“तुझी उद्या उतरली कि बोलू”, सिद्धू वैतागत होता.

“सिद्ध माझी जान. माझा stamina खूप आहे. मी शुद्धीत आहे. आणि राहता राहिला प्रश्न पोरींचा, तर आपला view clear आहे.”

“तू फालतू बडबड थांबव. तुला काय करायचं ते कर. मला interest नाही.”

“का? gay आहेस काय?”, चिनू हसत होता.

“तसं नाही. पण मर्यादा संस्कार हे काहीतरी आहे माझ्याकडे.”

“तू अजून कोणत्या जमान्यात आहेस मित्रा? जमिनीवर ये. ती एक पोरगी हो बोलली तुला. तशा कित्येक खाल्या मी. मला शिकवू नकोस”, चिनू बोलत होता.

“चिन्या बस कर यार. माझं प्रेम आहे तिच्यावर तू तिला कोणाशी compare करतोयस?”, सिद्धुला वाईट वाटत होत.

“प्रेम? प्रेम? हाहाहा. अरे झंडू. प्रेम वैगरे काही नसतं. सगळी भूक असते भूक. उंदीर पाळला तरीही त्यावर जीव अडकतो. ती तर पोरगी आहे. कशाला स्वतःला फसवतोय?”

“अरे राजा आपण माणसे आहोत. तुझी भुकेची भाषा जनावरे वापरतात. तुझी नशा उतरली कि समजावून सांगेन मी”, सिद्धू हसत होता.

“जनावर तर जनावर. पण वाघ आहे कि नाही आपण?”

“छे. तू कसला वाघ? त्यांचा पण एकत्र येण्याचा नियम आणि ऋतू असतो. तू तर जनावरापेक्षा खराब भाषा वापरतोय”, सिद्धू कडक बोलला.

“यार. एक नेहा काय भेटली, तू तर माझा गुरु बनायला लागलास”, चिनू चिडला.

“बस क्या भाई. मित्राची चूक दाखवणे माझं काम आहे”, सिद्धू शांत होता.

“कसली चूक?”

“पोरींचा आदर कर. त्या जशा आहेत, तशाच आहेत. त्यांना purposefully देवाने तसंच केलं आहे. त्यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत, म्हणून त्या चंचल आहेत. त्या चंचल आहेत, कारण प्रत्येक चंचल गोष्ट, जिला एक सुनिश्चित form असतो ती गोष्ट सुंदर असते.”

“सुंदर तर आहेच न यार. काय यार ती आहे नेहा. तिचा figure. आज अक्खा दिवस मी तिचाच विचार करत होतो”, चिन्या विषय वाढवत होता.

“ती तुझी वाहिनी आहे चिनू बेटा. जरा नीट बोल रे.”

“नीट? अरे यार. सिद्ध ऐक माझं. आयुष्य एकदाच मिळतं. तू आत्ता ह्या क्षणी enjoy कर. संस्कार वैगरे बोलायच्या गोष्टी आहेत रे. तू तुझ्या रटाळ पुस्तकी mentality मधून बाहेर ये यार.. कधितर मोकळा श्वास घे. समोर लाडू आहे. पोटात भूक आहे. आधी खा. simple.”

“आणि नंतर दात सडतील, पोट बिघडेल त्याला जबाबदार कोण?”, सिद्धू शांत होता.

“सडले तर सडले. dentist आहेत. तसाही youth आहे इन मीन २० वर्ष. पुढे म्हातारपणी काय उपयोग तुझ्या मोठ्या मोठ्या बोलायच्या गोष्टींचा?”, चिनू हसला.

“तुला कळत नाही आहे चिनू. तू भानात नाही आहेस”, सिद्द म्हणाला.

“तुलाच कळून घ्यायचं नाही आहे. ऐक, सरळ हिसाब आहे. किती वय आहे आपलं? तुझं २०, माझं तेवीस. किती आयुष्य आहे आपल्या कडे? जास्तीत जास्त ८०? म्हणजे one fourth life गेलाय रे. आणि आपल्याला वाटतं तस काही नाही. पकडल्या गेलो तर चोर. सुमडीमध्ये तुमडी, बोल काय बोलतो? हिसाब रोकडा प्रेम चोपडा. काय बोलतो?”

“अरे भाऊ. तू नशेत आहेस. तू गेलास कामातून. आवर स्वतःला”, सिद्ध शांत होता. पण त्याला काळजी, भीती आणि राग येत होता, “राहता राहिला प्रश्न वयाचा, मी तर पुढच्या जन्माची पण planning करतोय”, सिद्धू बळेच हसला.

“अरे बो*त गेला पुढचा जन्म. तिला पाहिल्यापासून मी वेडा झालोय सिद्द. please यार. एकदा मला तिच्यासोबत थोडा time spend करू दे.”

सिद्धूच्या डोक्याची नस फडफड करायला लागली. संताप होऊ लागला.

“चिनू यार. मी तिच्यापेक्षा छान मुलगी शोधतो तुझ्यासाठी. तो पर्यंत नेहाशी माझं लग्न पण नाही होणार जो पर्यंत तुझी गाडी track वर येत नाही हा माझा शब्द आहे. पण तू नेहाबद्दल असलं कसं काय बोलतोय रे?”, सिद्धू खूप दुःखी झाला.

“अरे वेडा सिध्द. तूच भानात नाही आहेस. ती फक्त एक मुलगी आहे. काय किंमत आहे तिला? आपण पुरुष आहोत. विचार कर. सगळा market बघ. हि अक्खी जिंदगी बघ. आपल्याला enjoy करायचा आहे फक्त. तू एखाद्या मुलीसाठी senti का होतोय? तशा किती पोरी भेटतील पुढे”, चिनू सिद्धुला एकदम प्रेमाने कसाबसा बोलत होता. त्याची जीभ अडखळत होती.

सिद्धूच्या डोक्यात वादळ उठलं. तो मनात विचार करू लागला,

‘बाबा बरोबर बोलले होते. मित्र जपणे कठीण आहे. हा मुलगा लहानपणीपासून अनाथ आहे. ह्याच्यावर संस्कार नाहीत. आता ह्याला माणसात कसा आणू? जरा धीराने घ्याला हवं. आणि तसाही हा अजून नशेत आहे. दारूची नशा, कि यशाची, कि अहंकाराची ते माहित नाही. पण हा शुद्धीत नाही.’

“चिनू सोड रे. उद्या बोलू आपण”, सिद्धू विषय सोडत होता.

“का? का सोडू? यार तुला खरंच सांगतो सिद्ध. इतक्या पोरी पहिल्या मी. पण नेहाच्या पायाची सर नाही रे. काय दिसत होती ती. मला कामात ध्यान नाही लागत. तिचा चेहेरा दिसतो फक्त. नेहा नेहा नेहा यार . मी प्रेमात पडलोय रे.”

“Attraction ला आवर चिनू. तू उगाच overreact करतोय. आणि हा विषय बंद कर रे.”

“का? का बंद करू? यार. मला नाही आवरता येत स्वतःला. तू मला आणि तिला थोडा time privacy देतोय बस. बाकी काईच नाही”, चिन्या वैतागत होता.

“चिनू. तू यार limit cross करतोय. बस कर please”, सिद्धूला खूप वाईट वाटत होतं.

“काही लिमिट वैगरे काही नाही. तूच फुकट तिला खूप हस्त importance देतोय”

पहाटेचे साडेतीन होत होते.

“देणारच यार. माझी प्रेमिका आहे ती. तुला इतर पोरींची काय कमी आहे? त्या एकीवाचून काय अडलंय?”, सिद्धूचा आवाज बारीक होत होता.

“अरे यार. थोडा वेळ. आणि मी कुठे तिला insist करणार आहे. तिला नसेल पाहिजे तर मी सोडतो न विषय”, चिनू हसत म्हणाला.

तसा सिद्धू उठला आणि चिनूच्या खाडकन कानफडात आवाज काढला.

चिनू उभ्या उभ्या चार पाउले लांब जाऊन शेवटी खाली पडलाच. त्याने वर मान करून पाहिलं. त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी येत होतं. दोन मिनिटे तो काही बोललाच नाही.

“सिद्धू यार. हीच दोस्ती न आपली? एका पोरीसाठी तू माझ्यावर हात सोडलास भे**”, चिनू first-time इतका loose पडला. त्याच्या डोळ्यातून पाणी. म्हणजे impossible गोष्ट घडली.

“मी बोललो होतो कि तू नशेत आहेस. मी बोललो होतो कि तू limits मध्ये रहा. मी बोललो होतो. एकदा तरी माझं ऐकत जा. तू चुत्या आहेस चिनू.”

“मी? मी चु* आहे?”, चिनू खूपच hurt झाला होता. “अरे यार. तुझ्यासाठी काय काय नाही केला मी. अक्खा career अखी life, freedom सगळा धोक्यात घातला मी. आणि तू त्या पोरीसाठी मला शिवी देतोय? आज तुझ्यासकट मी पण एकतर jail मध्ये किवा hospital मध्ये किवा मरून ढगात असतो. तू विसरला पण? तीन दिवस झालेत फक्त”, चिनूचा आवाज दबत होता.

“तू माझ्यासाठी जे केलं त्यासाठी जीव घे न यार माझा चिनू.. माझ्या दोस्तीवर संशय घेतो तू? भे**. आपल्या दोघात नेहा कुठून आली? तूच तिचा topic काढलास. मी तर विषय टाळत होतो”, सिद्धू पण थोडा थोडा तापायला लागला. तरीही चिनू शांत होत नवता. “चिनू कशाला overacting करतोय? काही झालं नाही आहे.”, सिद्धू शांत होता. “ती कानाखाली फक्त तुला गप्प करायला मारली. तू शांत बसतंच नव्हता.”, सिधू थंड डोक्याने म्हणाला.

“तू एका मुलीसाठी माझ्यावर हात सोडला? का रे यार. हीच दोस्ती आपली?”

“साला लहान पोरासारखं सगळं समजवू काय? चिन्या यार. तू माझ्यासाठी हे केलं ते केलं. मी कुठे काय नाही म्हणालो? पण मी उपकरात दबून राहू काय? तुला समजून घेता घेता थकलो रे मी. तू प्रत्येक गोष्टीत शिवी देऊन बोलतो. माझ्या वडलांना तो म्हातारा म्हणून बोलतो. नेहाला तू कोणाशी call-girls शी compare केलंस? मी एक पैशाने कधी दुखावलं तुला? तुझ्यापुढे तू माझं काही चालू देत नाही. मी कधी काही बोललो का तुला? तू ऐकतच नव्हता. म्हणून माझा हात सुटला. आता सोड ते. चाल सकाळी बोलू. घरी जाऊ.”

“अरे जा रे. भोस** गेली दोस्ती. साला, तू तू. यार सिद्धू”, चिनू हातपाय झाडत होता.

“चल रे. ए नौटंकी. मागे बैस. घरी जाऊ”, सिद्धू समजावत होता.

“नाही मला नाही यायचं, मी खाडी उडी मारेन”, चिनु bridge वरून जात म्हणाला.

‘ह्याची अजून उतरली नाही’, सिद्धूने विचार केला.

“ए जालीम दुनिया.. मै जा रहा हू.. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना राहा”, चिनू गाण बोलत होता. तसा चिनू पुलावरून उडी मारायला जाणार इतक्यात सिद्धूने त्याला मागून खेचलं.

“चल रे बेवड्या. साला नौटंकी. कधी सुधारणार नाही.”, ओढत ओढत चिन्याला सिद्धूने गाडीवर बसवलं आणि तो जाऊ लागला.

“सोड मला सिद्ध. तू हागलास मैत्रीवर”, चिनू ओरडत होता. वाटेत एक पोलिस आले. त्यांनी पाहिलं कि काहीतरी गडबड आहे. त्यांनी थांबवून पाहिलं कि चिन्या नशेत आहे, तसे ते हसले आणि ‘जाऊदे जाऊदे’, असा हात दाखवला.

सिद्धूने गाडी society च्या compound मध्ये आणली. त्याने जबरदस्ती चिनूला लिफ्टमधून वर नेउन घरात भरलं, आणि बेड वर आदळलं.

“मधु, ह्याची उतरल्यावर मला कॉल कर”, तो मधूला म्हणाला.

“का? तू माझा बाप आहेस काय?”, चीनु म्हणाला.

“जा रे. फालतू साला. डोकं फिरवलं आज”, सिद्धू वैतागला होता. पण हसत होता.

दोन मिनिटात ‘सिद तू मुत्लास सिद , आपली दोस्ती खतम’ अस बडबडत चीनु झोपी गेला.

सिद्धुला चिंता वाटत होती.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

Murder – एक अनोळखी मित्र – भाग १० – Ek Anolkhi Mitra

You may also like...

10 Responses

 1. Sunny says:

  काय राव चिन्या पण च** निघाला . हा तर आदिपेक्षा पण जास्त ह** दिसतोय . सिदची मदत याच साठी केली होती का त्याने . पोरींना बघुन हा पण गेला कोमात . झा* मैञी काय कामाची . Writer साहेब चांगलाच Suspense बनवलाय यार तु. आता फक्त एकच सांगतो . सिद्धला शेवटपर्यंत मरु देऊ नको म्हणजे झालं . ही Lovestory काही झालं तरी Complete होऊदे Plzzzzzz plzzzzzzz plzzzzzz .

 2. Dipali says:

  Very nice story

 3. Sunny says:

  Ye dipali nice kay . Aapla Hero prt tention mdhe aahe aani tu mhnte . Changal aahe. Ankit bhauni khup suspense vadhaun thevlay . Next story taka lvkr plzz .

 4. Very sweet story..Plz nxt part lavkar taka

 5. anant says:

  I read this story at 9-10 times.It’s a nice story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *