नेहाशी भेट – एक अनोळखी मित्र – भाग ८ – Ek Anolkhi Mitra

राजयोग प्रस्थ – एक अनोळखी मित्र – भाग ७ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

भयाण अंधारी रात्र होती. जाता जाता वाटेत एक मोठं रान लागलं. खूप दाट झाडी होती. त्यातून कशीबशी वाट काढून सिद्धू चालला होता. मध्येच एखादा साप सळसळून जात होता, आणि मध्येच पायात काटा रुतत होता.

तिथे कोणतरी सिद्धुला हाक मारत होतं, आणि बोलावत होतं.

आणि खूप आर्द्रतेने रडत होतं.

“सिद्धू कुठे आहेस तू? काय चुकलं माझं? का विसरलास मला? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. राजसा. तुझा गोड चेहरा कधी दाखवशील? मी तरसले आहे रे.”

त्या हाकेत अशी आत्मीयता होती, कि मला कळत नाही आहे कि काय उपमा देऊ.

त्या भयाण वातावरणाने जे आपसूक भय वाटायला पाहिजे होतं, ते तिथे काहीच नव्हत. तर उलट त्या हाकेच्या आवाजात जी करुणा होती, तिने रानातल्या भयानक रातकिड्यांच्या, वाटवाघुळाच्या, घुबडांच्या आणि सळसळणार्या सापांच्या आवाजाला सिद्धूच्या कानापर्यंत पोचूच दिलं नाही.

सिद्धू आवाजाचा मागोवा घेत घेत पुढे जात होता.

तो जसा जसा पुढे जात होता, ती हाक आणि ते शब्द अजून स्पष्ट होत होते.

“काय चुकलं माझं? हेच, कि तुझ्याशी ताटातूट होऊनही माझा जीव अजून शिल्लक आहे. आणि तू जर आला नाहीस, तर मी नक्कीच ती चूक सुधारेन. पण मी तरी काय करणार? तू म्हणाला होतास कि तू मला घ्यायला येशील. त्याच आशेवर मी एक एक क्षण पुढे ढकलत होते. तू का नाही आलास? किती वाट पहिली मी तुझी. राजसा. ”

सिद्धू पुढे गेला. त्याच्या तळपायाला काहीतरी ओलं लागत होतं. पण अंधारात काही दिसत नव्हतं.

तो अजून पुढे गेला, तसे काही हुंदके ऐकू येत होते.

कोणतरी रडत होतं.

तो अजून पुढे गेला. तिथे एक दरी होती.

दरी नाही.. झाड होतं.

त्या झाडाखाली नेहा बसली होती. केस विस्कटलेले होते. कपडे फाटले होते. डोळे रडून रडून सुजले होते. ती दोन्ही गुडघ्यात डोकं खुपसुन रडत होती. तिच्या अंगावर खूप माती आणि धूळ होती. सिद्धूने धावत जाऊन तिला दोन्ही हातांनी उचललं, अनो तो लगेचच तिने अंग टाकलं..

“नेहु. इथे बघ मी आलोय. मी आलो बघ. मी सिद्धू. तुझा सिद्धू.”, सिद्धू घाईघाईने बोलत होता.

इतक्यात त्याने पाहिलं कि नेहा उत्तर देत नाही आहे. आणि एकदम निपचित पडली आहे. तिचे डोळे बंद होते. आणि हालचाल मंदावत चालली होती.

एकदम हळू आवाजात ती काही तरी पुटपुटत होती.

“सी.सिद. . सिद्धू. तू आ.आलास?”, नाजूक ओठ उघडून ती खूप कष्टाने बोलत होती.

“हो हो नेहा मी आलो. चल उठ. आपल्याला जायचं आहे”, सिद्धूचा कंठ दाटत होता.

“खूप उशीर केलास सिद्धू”, नेहा म्हणाली.

सिद्धुचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. तिच्या हाताची नस कापली होती. आणि त्यातून रक्ताची भयानक धार लागली होती. भळाभळा रक्त येत होतं. तेच सिद्धूने नेहाला उराशी धरल्यावर सिद्धूच्या अंगावर पसरलं होतं. अजून वाहत होतं.

“का नाही आलास? मी किती वाट पहिली?”, नेहा अर्धमेली होऊन पुन्हा पुन्हा बोलत होती.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“नेहा. मला नाही जमलं. मी तुझ्यासाठीच खूप मोठं धाडस केलं. मी माझं स्वातंत्र्य, माझा जीव, माझं सगळं काही आज पणाला लावलं होतं. काय काय केलं मी तुझ्यासाठी!. आणि तू अशी मला सोडून चाललीस? आणि त्याच भरात तुझा विसर कसा पडला माझं मलाच माहित नाही. पण मी आत्ता आलोय कि”, सिद्धू तिला छातीशी धरून कसाबसा बोलत होता.

“खूप उशीर केलास”, नेहा थंड पडत होती.

नेहाच्या शरीरातून वाफा येत होत्या. हळू हळू ती नाहीशी होत होती.

सिद्धूच्या हातातून आणि जीवनातून.

धुमासारखी ती निसटत होती. दूर जात होती.

सिद्धू “नेहा.. थांब. .नेहा जाऊ नकोस. मी आलोय. नेहु. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकणार. नेहा थांब थांब” बोलेपर्यंत नेहा “खूप उशीर केलास सिद्धू.” अस बोलत बोलत त्या अंधारात धुरासारखी दूर जाऊ लागली.

“नेहा नेहा. नेहा थांब. नेहा थांब. नेहा नाही. मी येतोय”, सिद्धुला अंथरुणात जाग आली. त्याला दरदरून घाम फुटला होता. आणि छाती धडधड करत होती.

ते एक स्वप्न होतं.

ते एक स्वप्न होतं, जे कधीही खरं होऊ शकत होतं. सिद्धू थरथर करत होता. बाबा बाजूलाच होते. ते जागे झाले.

“काय झालं बेटा? ठीक आहेस न? स्वप्न पाहिलंस?”, बाबा उठून बसत म्हणाले.

“नाही बाबा. हे ठीक नाही आहे. हा अपशकुन आहे. मला जायलाच हवं”, सिद्धू तडक उठत म्हणाला.

“पण वेळ तर पहा. रात्रीचे दोन झालेत. काय झालंय नक्की?”

“बाबा तुम्ही झोपा. मी नंतर सांगेन सगळं”, सिद्धू शर्ट घालत म्हणाला.

बाबा गोंधळून गेले पण, “ठीक आहे” म्हणून पुन्हा झोपी गेले.

पोरगा तरुण आहे. बाप जास्त ताब्यात नाही ठेऊ शकत. जास्त डांबून ठेवल्याने पोरं अजून हाताबाहेर जातात. कारण त्यातून दोघांच्याही मनात अविश्वास निर्माण होतो.

आणि सिद्धू तर सिद्धू होता. त्यामुळे बापाला तस काही tension नव्हतं.

तो घाईघाईने धावत धावत चिनूच्या घरी पोचला. Doorbell दाबली.

“सिद्धू तू? आणि आत्ता ह्या वेळी?”, मधुराने activate होऊन विचारलं. “माझ्यासाठी आलास? इतका miss केलस तू मला? awwwww. so sweet!”

“no. फालतू बडबड नको करूस. please”, सिद्धू म्हणाला.

दरवाजा automatic उघडला. सिद्धू आत गेला

“का रे काय झालं? सगळं ठीक आहे न?”, मधु म्हणाली .

“चिनू कुठे आहे?”, सिद्धूने मधुराला विचारलं.

“काय प्रश्न आहे? झोपलाच असणार नाही का?”, मधु म्हणाली.

“उठव त्याला”, सिद्धू म्हणाला.

“मला नाही शिव्या खायच्या. तूच उठव”, मधु म्हणाली.

सिद्धू बेडरूममध्ये गेला. चिन्या बेडवर उताणा पडून रेड्यासारखा घोरत होता. एक पाय चादरीत, आणि दुसरा पाय बाहेर.

“चिन्या उठ. एक प्रोब्लेम झालाय”, सिद्धू बोलला.

“अम्म.. नाही बोलू नकोस न. please. फक्त एकदा..”, चिनू अर्धवट झोपेत बडबड करत होता.

“अरे उठ. बैल. उठ”, सिद्धू भडकला..

“उठ उठ का बोलतेस? मी उठलोच आहे. आता नाही नको बोलूस please”, चिन्या अजूनही झोपेत हळूहळू बडबडत होता.

सिद्धने चादर खेचली. आणि चिनू चादरीवर असल्याने गडगडत बेडवरून खाली पडला.

“नाही sorry sorry आता पुन्हा नाही तस करणार sorry”, चिनू झोपेतून जागा होत ओरडत होता.

समोर सिद्धुला पाहून, तो उठून बसत म्हणाला, “अरे यार, सिद्धू तू? आत्ता? तीच्च्या आयला. मला वाटलं कि. ती आहे..”

“ती कोण?”

“कोणी नाही सोड. काय रे काय झालं?”

“नेहा”, सिद्धू tension मध्ये होता.

“हा तिचं काय झालं?”, चिनू उठत डोळे चोळत म्हणाला.

“अजून तरी काही झालं नाही”

“मग? इथे का माझ्या स्वप्नाची गां* मारायला आलास? हो बोललीच होती यार”, चिन्या वैतागला होता.

“तुझी स्वप्न राहूदे. यार. आपण नेहाला विसरून गेलोस यार”, सिद्धू घाबरत होता.

“तू विसरलास. मी नाही”, चिनू शर्ट घालत म्हणाला. सिद्धू बेडवर बसला.

“आता काय करायचं?”, सिद्धू चीन्याकडे बघत म्हणाला.

“चल”, चिनू सेंडलस् घालत होता.

“कुठे?”

“त्य पोरीला भेटून येऊ”, चिनू दर उघडत म्हणाला. “मधु doors lock कर”

“पण आत्ता?”

“त्याला काय होतं?”, चिनू म्हणाला.

“काही लफडा झाला तर? लोक चोर समजतील”, सिद्धू म्हणाला.

“तू कोणत्या नक्षत्राला पैदा झाला रे? जेव्हा बघावं तेव्हा negative”, चिनू आणि सिद्धू दरवाजातून बाहेर पडले. “चल. नेहाला बरं वाटेल”

“पण ती झोपली असेल आत्ता. शिवाय त्या दिवशी मी गेलो होतो तेव्हा तिच्या घराला आतून कुलूप होतं”

“ठीक आहे थांब”, चिन्या घरात गेला आणि दोन मिनिटांनी बाहेर आला.

“काय झालं? कुठे गेलेलास?”, सिद्धू म्हणाला आणि त्याने लिफ्टचं button प्रेस केलं.

“थोडे पैसे जवळ ठेवलेत. घरात नसेल ती तर गावी जाऊ तिच्या. शोधून काढून पळवून आणूया”, चीनु म्हणाला.

“बाबांना मी काही सांगू कि नको? मी त्यांना विचारल्या शिवाय काही करत नाही”

“अरे यार. सोड न. नंतर बघू”, चिनू म्हणाला.

दोघे bike वर बसले. आणि त्यांनी सलग कॉलेजचा रस्ता धरला. नेहाचं घर कॉलेजपासून जवळ होतं.

“सिद्धू”, गाडी बऱ्याच वेगात होती.

“हा बोल न”, सिद्धू मागे बसला होता.

“आहे कशी रे पोरगी? item आहे का?”, चिनू विचारत होता.

सिद्धू काहीच बोलत नव्हता.

“का रे काय झालं?”, चिनू पुन्हा म्हणाला.

“काही नाही. सोड”, सिद्धू म्हणाला.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

ते तिच्या घराजवळ पोचले. गाडी थोडी दूर लावून दोघे गेले. नेहा जिथे राहत होती, तिथे बरेच row-houses होते. Typical चाळ नव्हती. Area थोडा sophisticated होता. सिद्धू आणि चिनू दोघे तिच्या society च्या आत गेले. watchman झोपला होता. दोघांनी compound चा दरवाजा उघडला.

Third compound, seventh house. ते चालत चालत आत गेले. नेहाच्या घरासमोर येउन उभे राहिले. आणि आता पुढे काय? दोघे एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते.

“चल पाहूया”, थोडा विचार करून चिन्या आवाज होऊ न देता म्हणाला.

“हा ठीक आहे”, सिद्धूने घराच्या आजूबाजूला नजर टाकली.

सुदैवाने एक खिडकी उघडी होती. दोघे आत गेले. आत नेहाचा बाप झोपला होता. आणि बाजूला आई होती. बाप घोरत होता.

मग ते घराला वळसा घालून मागच्या बाजूला गेले. तिथेही एका खोलीची खिडकी उघडी होती. त्यात एक छोटासा दिवा लावला होता. तिथे नेहा भिंतीला पाठ लावून बसली होती.

“नेहा नेहा. इथे बघ. मी आहे. नेहा. ”

नेहा खूप प्रसन्न झाली. “सिद्धू तू?”, नेहा धावत येउन म्हणाली. “किती बरं वाटल तुला पाहून. मला वाटल कि तू मला विसरलास”, नेहाचा आवाज कांपत होता.

सिद्धू आणि खिडकीच्या गजावर नेहाचा हात धरला. “तुला कसा विसरेन नेहु? मी तर तुला हेच सांगायला आलो, कि आदि आता आपल्याला त्रास नाही देणार. चिनूने आपल्याला सोडवलं.”

“कोण चिनू ? आणि कसं सोडवलं?”, नेहाच्या डोळ्यातून अजूनही धारा वाहत होत्या.

“एक अनोळखी मित्र”, सिद्धू बोलत होता. “ऐक मी तुला जे सांगतोय. मी तुला घ्यायला येईन. मला विचार करावा लागेल कि नक्की काय आणि करू तर कसं करू? तू आत्ता धीर धर. मी इथे फक्त तुला हेच सांगायला आलोय. तू खूप त्रास करून घेत आहेस. मला तुझी फार जास्त काळजी वाटली म्हणून मी इथे आलो. ”

“मला माहित होतं कि तू येशील”, नेहा आणि सिद्धू गजाच्या अडून एकमेकांशी गुज करत होते. चिनू दूर होता.

“सिद्धू आवर यार. पकलो मी”, चिनू वैतागला होता..

“मला इथून बाहेर काढ सिद्धू. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय”, नेहा म्हणाली. तिला जास्त बोलावत नव्हतं.

“तू धीराने घे. मी उद्याच करेन जे काही करायचं ते. मी आत्ता जातोय. पण उद्या परत येईन.”

“मी वाट पाहेन”, नेहा म्हणाली.

त्यांच्याकडे वेळ कमी होता. कोणीतरी जागं झालं होतं. चिनू आणि सिद्धूने घाई घाई मध्ये bike स्तर्त केली आणि राज्योग्प्रस्थ गाठलं.

“आलात दोघे? काय झालं होतं? कुठे गेला होता दोघे?”, मधूने विचारलं.

“मी बोललो होतो. मला माहित होतं. अरे यार. सिद्धू. त्या मुलीचा खूप जास्त जीव अडकला आहे तुझ्यात. हिला पळवू. नाहीतर हि नाही वाचणार”, चिनू मोठ्याने बोलत होता. excite होत हात झाडत बोलत होता.

“पळवून काय डोक्यावर ठेऊ? Final exam झाली कि काहीही करून छोटासा job शोधेन. आणि नेहाला घ्यायला जैन. त्याला अजून दोन महिने आहेत. Job मिळायला अजून एक महिना. तीन महिने पकडून चाल.”

“ती काय म्हणाली?”, चिनू म्हणाला.

“ती तयार आहे. पण जरी तिला उचललं तरी पुढे काय? मला वाटत नाही मी पळवून काही फायदा होईल. आधीच तिला माझ्यामुळे खूप त्रास होत आहे. अजून risk कसा घ्यायचा? थोडा दमाने घ्यायला हवं.”, सिद्धू म्हणाला.

“नक्की सांग. काय करायचं?”

“तू सांग”

“तिच्या बापाशी बोलू”, चिनू म्हणाला.

“आणि डाव उलट पडला तर?”

“अशीही नेहा हातातून जाईल. पण कदाचित तू थोडा हिमतीने घेतलास तर काही chances आहेत”,

“उद्या सकाळीच”, सिद्धू म्हणाला.

“ठीक आहे.”, चिनू म्हणाला. “आता झोप इथेच. घरी नको जाउस. “,

“उदयाला कपडे नाहीत रे? मी जातो घरी”, सिद्धू विचार करत होता.

“हे घर आहे राजा. माझ्याकडे सगळं आहे. तू का tension घेतोय?”, चीण्याने अंथरून होतं तेच वाढवलं.

दोघे काही वेळातच झोपी गेले.

आज नेहाला पाहिल्यावर सिद्धुही थोडा निश्चिंत झाला होता. त्याला छान झोप लागली.

सकाळी दोघांनी भरभर आवरलं. चिनू ऑफिसची तयारी करत होता.

“अरे यार. चिनू काय घालू? इतके कपडे आहेत”

“घाल काहीही”, चिनू बाथरूम मधुन ओरडला. त्याने कडक formals घातले. सिद्धुला प्रश्न पडला होता कि इतक्या कपड्यातून नक्की घालू काय? चिनूच घर म्हणजे showroom होतं.

दोघांनी coffee घेतली.

“पुढे काय करायचं?”, चिनू म्हणाला.

“पुढे काही नाही. तू ऑफिसला जायचं. मी जातो आणि नेहाच्या वडिलांशी बोलतो.”

“अरे बाबा. पण त नक्की बोलशील तरी काय? मला नाही वाटत कि तू हे manage करू शकशील. मी सोबत येतो.”, चिनू म्हणाला.

“नाही चिनू. आज मी एकता नडतो. आज होऊनच जाऊदे. प्रेमाने सांगून बघतो नाहीतर नेहाला उचलू”, सिधू फुल confident होता.

चिनूसोबत राहून सिद्धू पार बदलला होता. नाहीतर स्वत त्याने कधीच इतकी हिम्मत आणली नसती.

“वाह रे वाह मेरे कागज के शेर. नक्की तू सिद्धूच आहेस न? कालपर्यंत जो मुंगीला पाहून घाबरत होता, आज direct ही मजल?”, चिनू चेहेर्यावर भली मोठी smile आणून बोलत होता.

“ये तो आपकी सांगत का असर हे मेरे मालिक”, सिद्धू बोलत होता. सिद्धू आणि चिनू हसले.

दोघे बिल्डिंग मधून खाली येत होते.

“प्रगती आहे. चल तुला तुझ्या सासुरवाडी पर्यंत लिफ्ट देतो”, चिनू म्हणाला.

“हा चल”, सिद्धू चिन्याच्या मागे बसला.

गाडी सुरु करून तो नेहाच्या घरासमोर पोचला.

“थोडा दमाने घे. लगेच react होऊ नकोस. समोरचा चिडला तरीही आपण समजून घ्यायचं”, चिनू वारंवार बोलत होता. “आणि loose पडायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेव. काही झालं तर फोन कर. मी आहेच इथे.”

“अरे हो. तू जा आता. मी बोलतो बरोबर”, सिद्धू म्हणाला.

“काळजी वाटते मला राजा. तू मागणी घालायला चालला आहेस. तीही मुलीला. आणि तुझ्याकडे धतुरा आहे फक्त. बाजारातून वांगी आणण्यासारख नाही हे”, आता हे बोलताना चिनू घाबरत होता. आणि सिद्धू निश्चिंत होता.

“बघूया”, सिद्धू विचार करत म्हणाला. पण आता हे बोलताना त्याच्या चेहेर्यावर थोडी चिंता दिसत होती. तो ती लपवू शकला नाही.

दोघांना काळजी होती.

“चल, मी पण येतोय.”, चिनू शेवटी बोललाच.

“नाही. नको. तुझं ऑफिस?”, सिद्धू म्हणाला. त्यालाही चिनू सोबत हवा होता.

“आईच्या गावात जाऊदे. बघू आपण त्याचं काय ते नंतर. अधिहे sort out करू”, चीण्याने बाईक side ला लावत तो म्हणाला.

“चल, पण काही बोलू नकोस”, सिद्धू म्हाणाला.

“हो गड्या. गड तूच लढ. मी तलवारीला धार लावतो.”

दोघांनी हात हातात घेतला आणि ते नेहाच्या घराच्या दिशेने चालू लागले.

दोघांचीही छाती धडधड करत होती.

दोघे दरवाज्यावर उभे राहिले.

दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.

होकारार्थी मान डोलावली.

“होऊन जाऊदे”

सिधू आणि चीनुने doorbell दाबली.

छाती धडधडधडधड.

दोघांनीही एकमेकांचा हात घट्ट धरला होता.

नेहाच्या बापाने दर उघडलं. तो सिद्धुला न्याहाळत होता. इतक्या सकाळी कोण आलं?, तो विचार करत होता.

“कोण आहेस तू?”

“मी. मी . मी ”

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“”पुढे बोला कि. . “, हडकुळा बनियन आणि लेंगा घातलेला म्हातारा बाप गोंधळून बोलत होता.

“मला तुमच्याशी बोलायचं होतं”, सिद्धू कसाबसा बोलला.

“कशाबद्दल? आणि कोण तुम्ही? या आत तर या”, त्यांना वाटलं कि काय काम असेल.

सिद्धू काहीच बोलत नवता. सिद्धू आणि चिनू दोघे आत गेले. सिद्धू खुर्चीवर बसला. चिनू मागे उभा राहिला. दोघेही फुल tension मध्ये होते. कोणालाच काहीच माहित नव्हते कि पुढे काय होणार आहे.

“नेहा आतून पाणी आन बाळ. कोणतरी आलय”, नेहाचे बाबा ओरडले.

नेहा पाणी घेऊन आली.

सिद्धुला पाहून नेहाला आनंद पण झाला आणि तितकीच काळजीही वाटू लागली. ती काहीच बोलेना.

सिद्धूने पाणी घेतलं. चीण्याने नाही म्हणून सांगितलं.

कोणीच काहीच बोलेना. खूप वेळ झाला.

नेहा खाली मान घालून तिथेच उभी होती.

“आता बोल. काय काम होतं ?”, नेहाचे बाबा खुर्चीला मागे सरकून बसले होते. त्यांना अजून खरच माहित नव्हतं कि दोन दिवसापूर्वी काय झालं ते. नेहुच्या आईने ते लपवलं होतं. आणि नेहाला शपथ घातली होती कि बाबांना काही सांगू नकोस. नेहाला आता प्रश्न होता, कि पुढे काय.

“मी सिद्धू. टिळक चौकात माझं एक घर आहे. मी नेहासोबत शिकतो”, सिद्धूला काळत नव्हतं कि नक्की विषयाला हात कसा घालू.

“बर मग?”, काका म्हणाले.

“मामा. मी तुमच्याकडे नेहा मागायला आलोय”, सिद्धूने direct निखारा उचलला.

“काय? ए पोरा भानात आहेस काय?”, म्हातारा खड्बडला, “काय समजलास काय? काय बोलतोय तू?”

सिद्धू घाबरला पण तरीही बोलला, “माझं ऐकून घ्या. काका”

“काहीही नाही. बाहेर निघ. बाहेर निघ नाहीतर मी पोलिसांना फोन लावेन”, काका बिथरला.

ह्याचीच भीती होती.

“काका शांत व्हा आणि माझं ऐकून घ्या. नाही पटलं तर मी जातो. पुन्हा तुमच्या वाटेला येणार नाही”, सिद्धूने आवाज चढवला.

“तुझ्याकडे पाच मिनिटे आहेत. भरभर बोल. मग मी पोलिसांना फोन लावेन”, काका अजूनही गडबडीत होता.

“तुम्ही समजत आहात तस काहीही नाही ओ काका. माझं तुमच्या मुलीवर प्रेम आहे. हे खरं आहे. पण ह्याचा अर्थ असा नका लावू, की तुमच्या मर्जीविरुद्ध काही होणार आहे. मला नेहा हवी आहे, ती तुमच्या आशीर्वादाशिवाय नाही. माझ्या बाबांनी मला असंच घडवलं. त्यांनी मला हेच शिकवलं, की आपल्या ज्या कृतीने आई आणि बाबा दुखावले जातात, त्याच्या सारखं दुसरं पाप नाही. माझा माझ्या संस्कारावर तितकाच विश्वास आहे, जितका नेहाचा माझ्यावर. मी आज इथे आलो नसतो तर कदाचित काही अनर्थ घडला असता. काका. थोडं समजून घ्या. माझ्या मनात जर पाप असतं तर मी इथे तुमच्या मुलीला मागणी घालायला का आलो असतो?”

“अरे बाबा. तुझं डोकं ठिकाणावर नाही. तू तुझ्या पायावर उभा नाहीस. स्वतः काय खाशील आणि माझ्या पोरीला काय सांभाळशील? तुझ्या बापाचं नाव सांग. आला मोठा हात मागायला. बापाने घडवलं म्हणतोस, तो बाप कुठे आहे? तू का आलास?”

“तुम्ही रागाच्या भारत त्यांचा अपमान कराल, ह्या भीतीने मी त्यांना नाही आणलं. कादाचीत एका मुलीसाठी मी माझ्या वडिलांचा अपमान सहन नसतो करू शकलो. तुम्ही तर मला वडीलासमान आहात. म्हणून तुम्ही माझा अपमान केलात तरी मला लागणार नाही. ह्या भावनेने मी विश्वास ठेऊन इथे एकटा आलो.”

हे ऐकताच नेहाच्या बापाचा राग कपूरच्या वाती सारखा उडून गेला.

त्याच्या मनात सिद्धू विषयी आदर निर्माण झाला.

नेहतर सिद्धुवरून जीव ओवाळून टाकत होती. तिला मनात सिद्धूच्या धाडसच इतका कौतुक वाटत होतं कि ह्याच क्षणी त्याला गच्च मिठी मारायचं मन करत होतं. पण बाबासमोर हे शक्य नाही.

बाबांच तर सिद्धूविषयीचं मत आता पक्क झालं होतं. त्यांनी ओळखलं कि मुलगा वाघ आहे. धाडसी आणि जबरदस्त संस्कारी आहे. तरीही ते खात्री करून घेत होते.

“लहान तोंडी मोठा घास. बाता तर खूप मोठ्या मारतोस. पण त्याने पोट नाही भरत.उद्या कमावशील काय? स्वतः काय खाशील आणि माझ्या पोरीला कसा सांभाळशील? काही यश मिळवलास कि फक्त मोठ्या गोष्टीच बोलत राहतोस? “, वडिलांनी खेकसून विचारलं.

आता नेहाला राहवलं नाही. “बाबा सिद्धू शाळेत पहिला होता. कॉलेज मध्ये खूप पुढे आहे. त्याचं वाचन भयानक आहे. व्यासंगी आहे. आणि त्याच्या नावावर बर्याच scholarships आहेत. त्याचे बरेच सत्कार आणि वर्तमानपत्रात कौतुक झालं आहे. तो बरेचदा वर्गात सर्वांना शिकवतो. आणि त्याने मलाही..”, नेहा बेभान होऊन सिधुच कौतुक करता करता अचानक भानात आली आणि तिचा आवाज मंदावला आणि तिने मान खाली घातली. बाबा तिच्याकडे रागाने पाहत होते. नेहाने मान खाली केली.

“म्हणजे तुलाही हा मुलगा आवडतो तर”

“मी माझं कौतुक स्वताच्या तोंडून नाही करू शकत. पण तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत होऊन दाखवतो. मग पोरगी द्या. मला फक्त.. मला वेळ हवा आहे.”, सिद्धू कडक आवाजात नेहाच्या बापाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. चिनू मागे उभा होता आणि नेहाकडे विक्षिप्त नाझरेने पाहत होता.

“किती वेळ?”, बाबा म्हणाले.

“नेहा fybcom ला आहे. तिचं graduation दोन वर्षात होईल, मी दोन महिन्यात final exam झाली कि पदवीधर होईन. मला दोन वर्ष द्या. दोन वर्षात पक्की नोकरी शोधेन स्वबळावर उभा राहेन आणि नेहुडीला घ्यायला वरात घेऊन येईन”, सिद्धू म्हणाला.

“आणि तस नाही झालं तर?”, बाबा म्हणाले.

“तसं होणार नाही. पण सुर्य पश्चिमेकडून उगवला, तर पोर तुमची आहे. काहीही करा. मी मध्ये नाही पडणार. हे माझं वचन आहे”, सिद्धू हसत म्हणाला.

“नाही नाही. मी M.Com. पण करेन न. दोन वर्ष वाढतील”, नेहा मध्येच पुन्हा घाबरून बडबडली. आणि बाबांनी रागाने पाहताच तिने मान खाली घातली.

“नेहा मध्येच काय बडबड करतेस? शांत बैस”, सिद्धू म्हणाला.

आता मात्र बाबांना हसू आलं.

“धन्य आहे तुझा बाप, आणि आई ज्याने तुला जन्म दिला. धन्य आहे तुझे संस्कार आणि तुझा निश्चय. तुझा स्वतःवरचा विश्वास धन्य आहे. आणि तुझी नम्रता. कुठून घडलास माझ्या मुला. जा आत्ताच घेऊन जा मुलीला. तुझ्यासारखा हिरा नसता सापडला मला.”

“नाही काका. मी आत्ता जातो. मला फक्त आशीर्वाद द्या”.

सिद्धूने त्यांच्या पायाला हात लावला.

जाता जाता तो नेहुडीकडे वळला, “माझी वाट बघ. मी तुला घ्यायला येतोय.”

नेहाला खूप मन करत होतं कि, सिद्धुला कवटाळून भेटावं. पण तिने स्वतःला आवरलं. समोर बाबा होते. तिला लाज होती.

“बेटा. तू जा. आणि स्वतःच्या पायावर उभा राहा. नेहा लहान आहे. तुही अल्लड आहेस. जे बोललास ते करून दाखव आणि नेहाला घ्यायला ये. वरात घेऊन..”, बाबा प्रसन्न होते.

इतक्यात नेहाची आई आली. सिधुला पाहून तिचा पारा चढला. तिने आरडा ओरडा चालू करणार, इतक्यात बाबांनी शांत केलं आणि सांगितलं. हा तुझा कदाचित जावई होणार. आणि म्हातारे काका हासत होते.

आई गोंधळून गेली होती. पण बाबांनी निरवल.

सगळी निरव निरव झाली.

सिद्धू आणि चिनू घरातून बाहेर पडले. दोघेही काहीच बोलत नव्हते.

सिद्धू full determined होता. पण चिनूच मन अस्वस्थ होत.

“चिनू यार. आपण जिंकलो. पुन्हा एकदा”, सिद्धू म्हणाला. “आता फक्त final exam आणि job. firstclass score केला तरी कुठेतरी छोट्या company मध्ये programmer होतो. एक वर्ष experience. दोन लाख तरी कामावेन वर्षाला.”

चिनू काहीच उत्तर देत नव्हता.

त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच वादळ चालू होतं.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

Problem – एक अनोळखी मित्र – भाग ९ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

6 Responses

 1. Sunny says:

  आजच्या एका राञीतच या कथेचे सर्व भाग वाचले. सिद्ध्या आणि नेहाची Lovestory खुपच Cinematic आहे . चिन्या भावा सलाम तुझ्या दोस्तीला . अश्या दोस्तीसाठीच DIL तडफडतोय . Writer ने खुपच जीव घालून लिखाण केलय. कथेचे पार्ट लवकरात लवकर पोस्ट करत जा . इथे Next भागाची अतुरता वाढलीये .

 2. Sunny says:

  आजपर्यंत एवाढ्या कथा वाचल्या , पण ही पहीलीच अशी स्टोरी आहे जीला मनापासुन कमेंट केली.

 3. supriya pawar says:

  part- 9 Ka nahiye ya mdhe?? story Intresting hot astanach mood off zala. please part-9 v pudhche part kadhi yel te sanga

 4. Sunny says:

  Hey Buddy Part 9 Aalay vach to

 1. April 24, 2017

  […] नेहाशी भेट – एक अनोळखी मित्र – भाग ८ – Ek … […]

 2. April 25, 2017

  […] नेहाशी भेट – एक अनोळखी मित्र – भाग ८ – Ek … […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *