राजयोग प्रस्थ – एक अनोळखी मित्र – भाग ७ – Ek Anolkhi Mitra

शाही दरबार – एक अनोळखी मित्र – भाग ६ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

चिनूने card swipe केलं आणि घराचा security कॅमेरा automatic चालू झाला. चिनूचं Face-detection झालं, आणि दोघे घरात गेले.

“Welcome चिन्मय. Welcome guest !”, घरात गेल्या गेल्या एक metallic-voice ने दोघांचं स्वागत केलं.

घर fully automated होतं.

“चिन्या. हा आवाज?”, सिद्धू घराची शोभा पाहत होता.

“अरे तो कॉम्पुटर आहे. मी घरात खूप sensors लावले आहेत”, चिनू दरवाज्यापाशी भिंतीला उभं राहून shoes काढत होता.

“मी घर बघतो थांब”, सिद्धू म्हणाला.

“हा. ok”, चिनू दरवाज्यापाशीच असलेल्या छोट्या कपाटात shoes ठेऊन सोफ्यावर अडवा झाला.

सिद्धू घरात गेला.

तीनंच खोल्या होत्या. पण प्रशस्त. खूप मोठ्या. एक स्वयपाक घर, एक बेडरूम, आणि एक हॉल. घरात गेल्या गेल्या सिद्धूचं सर्वात पहिले लक्ष गेलं ते घरात लावलेल्या झुम्बराकडे. काचेच्या मण्यांनी सजवलेला खूप सुरेख झुलोरा होता. सर्व भिंतींना plastic paint ने खूप सजवलं होतं. त्यावर खूप छान नक्षी केली होती. wallpapers आणि color combinations लाजवाब होते. हॉलमध्ये पुढे एक मोठा गद्देदार सोफा होता, आणि त्याच्या पुढे एक काचेची बुटकी चौपाई होती. त्याला दोन थर होते. वरच्या थरावर एक पाण्याची बाटली होती, आणि खाली काही वर्तमान पत्रे होती. त्या सोफ्याच्याच थोडं मागे छताला लागून एक खूप हलका आणि मजबूत असा झोका होता, ज्यावर दोघे बसू शकत होते, आणि तो हवं तेव्हा काढता आणि लावता येण्यासाठी सोपा होता. डाव्या कोपऱ्यात एक छोटासा टेबल आणि त्यावर चीन्याचा कॉम्पुटर होता. समजून उमजून तो असा बनवला होता कि त्यावर फक्त एक कॉम्पुटरच मावेल. त्यावर काही पुस्तके होती. बाजूला एक थोडं मोठंस काचेचं कपाट होतं. त्यात काही शोभेच्या वस्तू ठेवल्या होत्या. आणि सर्वात महत्वाचं, त्यात एक फोटो होता, त्यात चिन्या थोडा वयाने लहान दिसत होता. बाजूला काही certificates आणि trophies होत्या.

पुढे चिनू बेडरूममध्ये गेला. एक गोलसर असा मोठा पलंग होता, त्यावर त्याच आकाराची मोठी गादी आणि दुधासारख्या स्वच्छ शुभ्र चादरी होत्या. बाजूला एक dressing-table होता. त्यावर उंचसा एक आरसा होता. त्यावर perfumes, talcum powder अशा काही वस्तू ठेवलेल्या. एकदम नीटनेटकं आणि जागच्या जागी. तिथे दोन कपाटे होती. त्यांना दरवाजे नव्हते, पडदे होते. एका कपाटाच्या hangers ना खूप सारे jeans, tee-shirts, semi-formals, trousers, असे कपडे होते. दुसर्या कपाटात suits, formals, neck-ties असे कपडे होते. आणि तीन शेरवानी होत्या.

बेडरूमच्या बाजूला मोठी gallery होती. त्यातून संपूर्ण परिसर दिसत होता.

सिद्धूने तिथून पाहिलं, कि सूर्य अस्ताला जात आहे.

सिद्धूने त्याला नमस्कार केला.

मग सहज म्हणून सिद्धू स्वयंपाक घरात गेला. सगळं काही एकदम perfect होतं.

तो आत गेल्या गेल्या लगेच आवाज आला, “कोण आहेस तू?”

“ए ए च्च.च… चिनू. इथे भूत आहे कि काय?”, सिद्धू थोडा बिचकून मोठ्याने म्हणाला.

“काय झालं?”, चिनू हॉलमध्ये सोफ्यावर अडवा पडून त्याच्या mobile वर गेम खेळत होता.

“अरे यार, इथे कोण तरी बोलतय”, सिद्धू म्हणाला.

“हाहाहा. नाही रे. ती मधुरा आहे. बोल तिच्याशी”, चिनू म्हणाला.

“पण दिसत नाही आहे कोणी”

“पण तिला तू दिसतोय. wait.. दाखवतो तुला”, चिनू kitchen मध्ये येत म्हणाला.

“तो कॅमेरा आणि हे sensors बघ” चिनू भिंतीकडे बोट दाखवत म्हणाला. “मधुराला त्या कॅमेऱ्यातून तू आला आहेस ते कळतं”.

“पण ती आहे तरी कोण? आणि आत्ता कुठे आहे? घरात तर कोणी दिसलं नाही मला”, सिद्धू विचारत होता.

“तुला काय वाटतं?”, चिनू मिश्किलपणे हसत होता.

“ती तुझी बायको तर नाही? पण तसं असतं तर इतकी खुफियापंती करायची गरज नाही. किवा मैत्रीण असेल दुसऱ्या रूममध्ये असेल. किवा घराची caretaker असेल आणि तुझा नोकर असेल”, सिद्धू म्हणाला.

“हे सगळं बरोबर आहे. ती माझी मैत्रीण आहे. ती दुसऱ्या रूममध्ये आहे. caretaker पण आहे. नोकर नाही म्हणता येत. मी पगार नाही देत तिला”, चिनू कोड्यात बोलत होता.

“तू कोडी काय घालतोय? कोण आहे ती? लवकर सांग”, सिद्धू वैतागला.

“ये दाखवतो”, चिनू हसत म्हणाला. तो सिद्धुला घेऊन हॉलमध्ये आला. sideला कोपर्यात computer ठेवला होता.

“मधूरा. Please turn on the computer”, चिनू म्हणाला.

“Computer is switching on”, पुन्हा मुलीचा metallic voice आला.

दोन मिनिटात जशी मोठी led screen समोर दिसली, एक चेहेरा समोर आला. फक्त outlined चेहरा. त्यातही फक्त डोळे, ओठ आणि नाक.

“मधुरा, please say hello to my pal. he is Siddhu”, चिनू screen कडे पाहून बोलत होता.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“चिनू, मी त्याच्याशी बोलत होते. but he didn’t reply to me. मी विचारलं होतं त्याला कि तू कोण आहेस म्हणून. I suppose he is not that friendly”, screen मधल्या मुलीने उत्तर दिलं. बोलताना उच्चार स्पष्ट होते. आणि ओठ एकदम नैसर्गिक पद्धतीने हलत होते, जणू खरेच असावेत, आणि डोळेपण एकदम स्पष्ट बोलत होते.

“सिद्धू, हि आहे मधुरा.”, चिनू नझरेने हसत होता.

“चिनू, कुठे सापडला तुला हा सिद्धू?”, मधुराने विचारलं.

“ती एक मोठी story आहे. नंतर सांगेन फुरसत मध्ये”, चिनू म्हणाला.

“तसं त्याचंही बरोबर आहे. माझ्यासारख्या मुलीला कोण पसंत करणार?”, मधुरा बोलत होती.

“तसं नाही, पण मी ओळखलं नाही तुला. असा अचानक आवाज आला मला वाटलं कि कि , कि .”, सिद्धू म्हणाला.

“कि काय? भूत आहे?”, मधुरा म्हणाली.

“हो”, सिद्धू म्हणाला.

“तो मला first time भेटला तेव्हा मलापण भूतच समजला होता”, चिनू हसत होता.

“Sorry मधुरा”, सिद्धूपण हसत होता.

“please call me मधु”, ती एकदम मादक आवाजात म्हणाली.

“मधुरा, no flirting please with my friend”, चिनू म्हणाला. तो हसत होता.

“अरे हा काय प्रकार आहे? कोण आहे हि मुलगी?”, चिनूच्या कानात सिद्धू पुटपुटला.

“तो मी design केलेला एक computer program आहे. Artificially intelligent computer program. त्यात काहीप्रमाणात आपल्यासारख्या emotions आहेत. आणि ती बर्यापैकी एखाद्या मुलीसारखी विचार करते आणि वागते. तिच्या reactions आणि attitude एखाद्या छपऱ्या पोरीसारखा आहे”, चिनू हळू आवाजात म्हणाला.

“अह्म्म अह्म्म. माझे sensors खूप powerful आहेत. कितीही हळू म्हणालास तरीही मला ऐकू येतं. तू छपरी कोणाला म्हणालास? चिनू, सिद्धूला सांगू का एक एक secrets?”, मधुरा खासून म्हणाली. थोडी चिडली होती.

“अरे यार. तू रागावू नकोस रे please. मधु. यार माझी item आहेस न तू?”, चिन्या computer प्रोग्रामला म्हसका लावत होता.

मधुरा सांगू लागली, “तर सिद्धू ऐक, हा चिनू आहे न तो मागच्या रविवारी.. ”

“मधुरा शांत बैस नाही तर तुझ्यात virus घालेन. शांत बस. एक शब्द बोललीस तर, तुझा main fuse बंद करेन”, चिनू हसत वैतागून ओरडून मधुराचं बोलणं मध्येच तोडत बोलला.

“पण आपली ओळख नाही आणि तू direct flirting?”, सिद्धू चीनुकडे बघत हसत मधुराला म्हणाला.

“Why no flirting? चिन्मय तर भाव नाही देत. आता मलाच कोणतरी दुसरा मुलगा शोधायला लागेल.”, मधुरा बोलत होती. ते डोळे पुन्हा सिद्धूकडे वळले, “So, Siddhu. बोल. तुला कशा मुली आवडतात?”

“मला? खऱ्या”, सिद्धू हसायला लागला.

“चिनू, हा पण भाव नाही देत”, मधुर एकदम nervous झाली.

“तुला भाव देऊन काय करणार? तू फक्त एखादी p*rn video play करशील? बाकी तुझा उपयोग नाही”, चिनू दाताखाली जीभ दाबून बोलत होता. चिनू आणि सिद्धू मजा घेत होते.

“करायला मी खूप काही करू शकते. Try कर न मला”, मधुरा एकदम determined होऊन बोलत होती.

“चिनू. साल्या असा प्रोग्राम तूच design करू शकतोस. काय आहेस यार. आवर हिला. हरामी”, सिद्धू हसत होता.

चिनू म्हणाला, “नको रे. असू दे. हि नसेल तर मी bore होईन. म्हणून तर अस design केलं मी. हि सोडून माझं कोणीच नाही यार”, चिनू first time भावूक झाला.

“I love you too, sweetheart. चिन्मय. come on. kiss me”, duck face करून डोळे मिटून मधुरा मध्येच म्हणाली .

“हि पोरगी ऐकत नाही”, सिद्धू म्हणाला. तो आणि चिनू वेड्यासारखे हसत होते.

“पण मी चिनू नाही हे मधूला कसं कळलं?”, सिद्धू म्हणाला.

“कारण मला बुद्धी आहे”, मधुरा म्हणाली.

मधुराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत चिनू म्हणाला, “घरात १६ कॅमेरे आहेत. आणि त्या कॅमेऱ्यातून तुझं face detect होतंय. म्हणून तिला कळलं कि तू चिन्मय नाही आहेस.”

“सही यार”, सिद्धू चकित होत होता.

“आणि अजून एक. आपण एकत्र घरात आलो म्हणून नाहीतर तुला intruder समजून घर lock झालं असतं आणि लगेच पहिला automatic call पोलिसांना आणि दुसरा call मला आला असता.”, चिनू पुढे बोलू लागला.

“मधुरा. मी असो किवा नसो. सिद्धूला घरात केव्हाही कधीही एन्ट्री आहे. ओके? दरवाजे उघडत जा.”, चिनू मधुराला म्हणाला.

“हो हो. कळलं. इतका explain करायची गरज नाही आहे”, मधुरा वैतागून बोलत होती. “coffee ready आहे”

“आयला. हिने स्वतःहून coffee केली”, सिद्धू म्हणाला.

“सगळं स्वताहूनच करते मी. हा तर काही करतच नाही”, मधुरा हसून बोलत होती. “तुला गरम करता येते का?” मधुरा सिद्धुकडे डोळा मारून बोलत होती.

चिनू आणि सिद्धूने डोळे मोठे केले.

“coffee रे. . .”, मधुने वाक्य पूर्ण केलं.

“No double-meaning jokes please, मधु.. सिद्धू थोडा साधा आहे”, चिनू म्हणाला.

“ok ok. sorry”, मधुरा म्हणाली. “थोडे दिवस राहा माझ्यासोबत. मी शिकवेन तुला सगळं… coffee कशी करायची ते”, मधूने सिद्धुला पुन्हा डोळा मारला.

तसा चिनू आत दोन मोठे cups coffee घेऊन आला.

“अरे बाबा, तिच्या नदी नको लागुस. बिघडवून टाकेल ती तुला. अशा loose-character मुलीच मुलांना बिघडवत असतात. आणि नाव फक्त मुलांचं खराब होतं”, चिनू सिद्धूच्या हातात coffee चा cup देत म्हणाला.

“असुदे असुदे”, मधुरा तोंड वाकडं करत म्हणाली.

चिनू आणि सिद्धू गप्पा मारत होते.

सिद्धुला चीनुने स्वतःबद्दल सांगितलं. आणि काही गोष्टी सिद्धुला अपोआप कळल्या.

चिनू अनाथाश्रमात वाढला. Born talented होता हे तर त्याच्या trophies सांगत होत्या. sports, अभ्यास, शिक्षण आणि नोकरी मध्ये best employee असे अनेक awards त्याच्या नावावर होते. त्यातले काही त्याने बाहेर showcase मध्ये लावले होते.

त्याने एका reputed college मधून computer engineering complete करून तो with honor एका MNC मध्ये ethical hacker म्हणून कार्यरत होता आणि security sector सांभाळत होता होता. मोठा package ने पगार घेत होता. तो नव्याने श्रीमंत झाला होता आणि लहानपणी गरिबी पहिल्याने त्याला पैशाची किंमत होती. तो लहानपणी एकटाच असे. म्हणून त्याला माणसाची आणि मैत्रीची किंमत होती.

कुटुंबात न वाढल्याने स्वभावतः थोडा टपोरी. पण त्याचं घर एकदम शिस्तबद्ध. खूप बुद्धिमान.

त्याचं घर त्याने स्वतः सजवलं होतं.

त्याच्याकडे शिक्षण, पैसा, घर सगळं काही होतं.. नव्हता तो फक्त एक मित्र.

Professional life बद्दल बोलायचं झालं तर, चिनूच्या programming skills चा best उदाहरण म्हणजे मधुरा. त्याने computer प्रोग्राममध्ये almost प्राणंच ओतला होता. ती खरंच एखाद्या मुलीसारखी बोलायची. आवाजात चढ उतार असायचे. डोळे आणि ओठ स्पष्ट बोलायचे. ही चीनुची कसब होती. आणि विचार करायची.

सिद्धुनेही चिनूला स्वतःबद्दल सगळं सांगितलं.

चीनुकडे पैसा होता, पण कुटुंब नाही. सिद्धुकडे छोटसं का होईना, पण कुटुंब होतं; पण पैसा फार नव्हता.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

सिधू चिनुची श्रीमंती पाहून भारावून जावून बोलत होता. हे लक्षात घेऊन चीनुने ‘सगळ्यात जास्त किमंत कुटुंबाला असते’ असं सिद्धुला सांगितलं. त्यातही आईला खूप जास्त, हे चीनुने सिद्धुला वारंवार सांगितलं. आईतर सिद्धुकडेही नव्हती.

दोघांना काही सुख आणि दुःख होतं.

चिनू हा खूप कडक होता. सिद्धू थोडा loose आणि हळवा होता. चिनू कधीही senti होत नसे, पण सिद्धूसमोर तो एखाद्या कापडाच्या थैली सारखा मोकळा झाला. आत काहीही ठेवलं नाही. चिनू वयाने थोडा, म्हणजे एखाद वर्ष मोठा होता.

सिद्धू आणि चिनू दोघेही देखणे होते. दोघांकडे काही दुःख आणि काही सुख होतं. त्यांनी ते वाटून घेतलं. त्यामुळे त्याचं दुःख नष्ट झालं आणि सुख अजून वाढलं.

बोलत बोलत खूप वेळ झाला.

चिनूला कसला तरी फोन आला. तो बोलत बोलत side ला गेला.

“office मधून फोन होता. एक दिवस नाही गेलो तर लगेच मचमच चालू”, चिनू वैतागून बोलत होता.

“चिनू मी घरी जातो. खूप वेळ झाला. आठ वाजलेत. दादा घरी एकटे असतील. मला पुन्हा जावून जेवण बनवायचं आहे”, सिद्धू म्हणाला.

“बर. जा. नंबर दे तुझा. आणि कधीही ये. हे घर तुझं आहे. नसलो तरी हे कार्ड घे. मी आहे इथेच. फ्री झालास कि भेट”, चिनू म्हणाला.

“हो ठीक आहे”

सिद्धू तिथून बाहेर पडला.

“Bye handsome. miss me.”, मधु म्हणाली. ती खूप वेळ शांत होती, जेव्हा चिनू आणि सिद्धू बोलत होते.

दोघे पुन्हा हसले, आणि सिद्धूने elevator चं button press केलं. जसा सिद्धू lift मध्ये आत गेला, चीनुने ‘मधु, दरवाजा बंद कर’ म्हणून हाक मारली.

“Stop you always ordering me. I am not your wife”, मधुरा बोलत होती. आणि जसा सिद्धू लिफ्टमध्ये गेला, त्याला दोघांचा आवाज येईनासा झाला.

सिद्धूने elevator च्या आत जाऊन G button press केलं, आणि तो राजयोगप्रस्थ मधून बाहेर पडला.

सगळ्या गडबडीत उशीर झाल्याने घाई घाई मध्ये घरी आला.

आज तो खूप दिवसांनी खुश होता. डोकं वैगरे काहीही दुखत नव्हतं.

घरी बाबा एकटे बसले होते.

“मी आलो बाबा”, तो वडिलांना म्हणाला.

“कुटे होतास बाळ? मला तुझी काळजी वाटत होती.”, त्याचे वडील म्हणाले.

“मी कॉलेजात होतो. चौथ्या मजल्यावर अभ्यास करत होतो.”

“काही खाललस ?”

“शाही दरबार. तंदुरी. बिर्याणी. आणि कबाब”, सिद्धू हसत होता.

“शाही दरबार? पैसे कोणी दिले?”, बाबांना संशय आला.

“एक अनोळखी मित्र”, सिद्धू हसत होता.

(मित्रांनो, सिद्धूच्या बाबांचा आणि त्याचा झालेला हा संवाद डोळ्यात प्राण आणून वाचा)

“बेटा, तू त्याच्याकडून जे घेतलेस, ते आत्ता तू परत नाही देऊ शकत. ऋणात राहणे योग्य नव्हे. आणि नीती सांगते कि ऋण आणि रोग, साप आणि स्वामी, शत्रू आणि मंत्र ह्या गोष्टींना कधीही लहान समजू नये”.

“बाबा. मैत्रीमध्ये ऋणाची भाषा का?”, सिद्धू गोंधळला.

“मैत्रीमध्ये निरपेक्षता असावी सिद्धू. आज ह्या मुलाने तुझ्यासाठी खर्च केला. उद्या तुला नाही करता आला तर न्यूनगंड उभा राहील. आणि विश्वास हे काचेचं भांड आहे सिद्धू. एकदा तडा गेला कि गेला.”

“मला मैत्री म्हणजे काय समजावून सांगा बाबा”, सिद्धू ऐकू लागला.

“बाळ, मैत्री हि निरपेक्ष असते. त्यात जो भाव आहे, आणि विश्वास आहे त्याला कोणाचं न बंधन न कोणता नियम. मैत्रीमध्ये दोघांना एकमेकापासून काहीही नको असतं, तरीही ते एकमेकांच्या सुख आणि कल्याणासाठी कोणत्याही हद्दी पर्यंत जातात. मैत्रीमध्ये जो स्वतःच्या दुःखाच्या पर्वताला धुळीचा कण, आणि मित्राच्या दुःखाच्या थेंबाला समुद्र मानत नाही त्याचे तोंडही पाहू नये अशी नीती मी ऐकली आहे. मित्र तर सुखाचा आगर असतो. तो जीवाचा जिवलग आणि आयुष्याचा सांगती असतो. मित्र तर तोच असतो जो वेळेला भाऊ बनून खांद्याला खांदा लावून उभा राहतो, आणि वेळेला बाप बनून तडखपणे मित्राच्या हितासाठी कडू बोलतो. जसा एखादा वैद्य असतो जो रोग बरा करण्यासाठी रोगी व्यक्तीला त्रास होत असेल तरीही औषध देतो. मित्र तर ईश्वराचा आशीर्वाद असतो. मित्र तर तो असतो, जो तोंडावर निंदा करतो, आणि मागे स्तुती करतो. मित्र तर तो असतो जो मित्राच्या चुकीच्या वागण्याला कधीच सहमत होत नाही आणि विरोध करतो. पण तीच चूक कबुल करून मान्य केली, तर मात्र तो कधी त्या गोष्टीचा उल्लेख स्वप्नातही करत नाही. मित्र तर तोच असतो, जो मित्र असतो. त्याला दुसरी उपमा नाही. हे मी थोडक्यात मित्राचं वर्णन केलं”, बाबा थांबले.

“बाबा. मैत्री कोणत्या कारणाने होते?”, सिद्धू ध्यान देऊन ऐकत होता.

“मैत्रीही नेहमी विनाकारण होते. पण हेही तितकंच खरं आहे, कि खूप श्रीमंत आणि खूप गरीब, खूप मूर्ख आणि खूप विद्वान, खूप सुखी आणि खूप दुःखी ह्यांच्यात मैत्री होऊ शकत नाही. मैत्री शक्यतो कुळ, वित्त, आणि ज्ञान ह्यात साम्य असेल तरंच करण योग्य असते. पण जर तो भगवत्भक्त असेल, तर पुढे मागे विचार न करता त्याच्याशी मैत्री करावी”.

“असं का बाबा? जर मित्र निरपेक्ष असतो, तर श्रीमंती आणि विद्वत्ता हि अशी बंधने का?”, सिद्धू चिंता करू लागला.

“माझ्या राजा, त्याचं कारण सोपं आहे”, बाबा हसून म्हणाले. “खूप पारखलेलं असलं तरीही सोनार सोनं तापवूनंच त्याची पात्रता ठरवतो. मैत्रीही तशीच असते. तिला वेगवेगळ्या परिस्थितीच्या आगीत तापून चमकावं लागतं. त्यात जर संशय नावाचा गंज लागला, तर ते नाणं खोटं ठरतं. मग जो पश्चाताप होतो, त्याला फक्त आतताईपणा जबाबदार असतो. पण कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दाबून मैत्री केली, तर परिस्थिती भयानक होईल”.

“सर्वात उत्तम मैत्री कोणती?”, सिद्धूने विचारलं.

“जेव्हा दोघांना कळतंच नाही कि नक्की मैत्री का झाली. ती मैत्री खरी, कि दोघांनाही नक्की आठवतच नाही कि नक्की मैत्री कधी झाली, कुठे झाली.”, बाबांनी सुरेख उत्तर दिलं.

सिद्धू विचार करत करत kitchen मध्ये गेला.

मित्रहो. सिद्धूचे बाबा अलबत पैशाने गरीब आहेत. पण त्यांची श्रीमंती त्यांच्या विचारांत आहे. कोण बाप आपल्या मुलाला मैत्रीच्या बाबतीत असे सांगेल, जे सिद्धूच्या बाबांनी अगदी सहज सांगितले. असो. त्यांनी मुलाच्या मानसिकतेचा विचार करूनंच त्याला योग्य सांगितले. कारण आधीपासून एकता राहणारा सिद्धू कधी नाही ते इतर कोणात रमला. आणि कितीही लहान किवा मोठा असला, तरी बापाच्या दृष्टीने मुलगा नेहमी असमंजस असतो.

बाप म्हणजे सल्ला देणारंच. गरज असो किवा नसो. पण हा सल्ला तितकाच खरा आहे, जितका सिद्धूचा त्याच्या वडिलांविषयीचा विश्वास.

पण सिद्धूच्या बाबांनी जे सांगितलं आहे, ते किती महत्वाचं आहे ते ह्या कथेच्या पुढे समजेल. हळू हळू गोष्ट पूर्ण होत आहे.

बाबांच्या बोलण्याचा विचार करत करत सिद्धू देवासमोर दिवा लावून तो kitchenच्या कामाला लागला. दोघांचा स्वयपाक करून रात्री थोडावेळ अभ्यास करू कि काय करू अशा मनस्थितीत होता. त्याला राहून राहून चिनूच्या बाबतीत विचार पडत असे. तो थोडा बिथरला होता.

कि तो काही विसरत होता?

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

नेहाशी भेट – एक अनोळखी मित्र – भाग ८ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

4 Responses

  1. Dipika says:

    माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट…..Thank u

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *