शाही दरबार – एक अनोळखी मित्र – भाग ६ – Ek Anolkhi Mitra

उपाय – एक अनोळखी मित्र – भाग ५ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

इथे आदिने वडिलांना फोन केला. जयराज पाटील त्यांच्या कार्यालयात काही काम करत होते.. त्यांचा personal cell-phone वाजला.

“हा बोला आदिराज. काय झालं”, जयराज पाटलाने फोन उचलला.

“हेलो बाबा,” आदि घाबरून उत्तर देत होता.

“हा बोल कि..”

“बाबा, आम्ही हितं कॉलेजात आहोत”, आदिला कसं सांगावं ते कळतच नव्हतं.

“बरं मग? तुम्ही घाबरून का बोलताय? आदिराज. सगळं ठीक आहे न बेटा?”, जयराज पाटीलांना काळजी वाटू लागली.

“नाही बाबा. इथे एक problem झालाय”, आदि म्हणाला.

“का रे काय झालं?”, जयराज पाटील आता थोडे घाबरले.

“हो बाबा. एका मुलानं माझी गाडी जाळली. आणि तीही भर ground वर”

“किती पोरं होती? मी लगेच माणसं पाठवतोय”

“तो एकटाच होता.”

“पण असा केलंच का त्याने?”, जयराज पाटलांना वाटत होतं कि त्यांच्या राजकारणात असल्यामुळे त्यांच्या अंतर्गत वैरामुळे हा प्रकार झाला असेल.

“बाबा. कारण . कारण. “, आदीची जीभ अडखळली. त्याला काय सांगू तेच कळत नव्हतं. काय सांगणार? मी त्याची ragging करायचो. आणि म्हणून त्याने संतापून माझी गाडी जाळली.

“पुढे बोल आदिराज”, जयराज पाटील ओरडले.

“कारण मला माहित नाही”, आदिने पळवाट काढली.

“आम्ही स्वतः तिथे येतोय”, जयराज पाटील खुर्चीमधून उठत म्हणाले. त्यांनी लगेच landline फोन उचलून P.A ला सांगितलं कि, “गाडी काढा”.

“बाबा नाही तुम्ही यायची गरज नाही”, बोलेपर्यंत तिथून त्यांनी फोन cut केला.

अक्या विचारू लागला, “आदि, काय म्हणाले काकासाहेब?”

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“ते स्वतः येतायत”, आदि अजून tension मध्ये आला.

“पण ह्या झंडूरमध्ये इतका दम आला कुठून? साला आपल्याकडे वर मान करून बघत पण नव्हता, आणि आता हे तर बघ”

गाडीची आग थोडी शांत झाली. कॉलेजमधल्या माळी आणि peonsने पाणी वैगरे टाकलं. गाडीवर नव्हे तर ते सध्या भोळ्या सिद्धूच्या चुकीवर पांघरून घालत होते. तिथे पोलिस आणि इतर काही लोक जमा झाले. सगळे लोक mob-psychology ला बळी पडले होते. अर्धे बघे तर पोलिस आल्याआल्या पळून गेले.

पोलिस वारंवार विचारत होते, कि हे कोणी केल. पण सिद्धू आणि चिनूच नाव घ्यायची हिम्मत कोणाची होईना.

‘जो भर ground वर खासदाराच्या मुलाची गाडी जाळून राख करू शकतो, तो आपण साक्ष दिल्यावर आपल्याला काय सोडणार आहे काय?’, सगळे लोक हाच विचार करत होते.

तरीही पोलिसांना टीप लागली, कि गाडी त्याच मुलाने जाळली ज्याला आदल्या दिवशी आदिने मारलं होतं.

पोलिसांना साधारण माणूस बघूनच समजतं कि तो गुन्हेगार आहे कि नाही. कारण त्यांनी अनेक वर्ष हजारो माणसांना पाहिलं असतं.

आणि आदल्याच दिवशी त्यांनी ते सगळं पाहिलं होतं. त्यामुळे आता पोलिसांच्या मनात प्रश्न होता कि करायचं तर काय करायचं. त्यांनी निर्णय घेतला कि आधी सिद्धुला ताब्यात घ्यायचं. त्याचं कारण म्हणजे, आता जयराज पाटील काय त्याला सोडणार नाही. सिद्धूचा जीव जाणार म्हणजे जाणार. तो न कुठे पळू शकतो न लपू शकतो. एकाच जागा आहे, जिथे त्याला काहीही होणार नाही ती म्हणजे पोलिस station.

आदिराजला पोलिसपण ओळखून होते. फक्त ‘खासदाराचा मुलगा’, म्हणून ते तडक कारवाई करू शकत नव्हते.

सिद्धू आणि चिनू दोघे शाहीदरबार धाब्यावर पोचले. गाडी बाहेर लावून “waiter, दोन special तंदुरी आणि one by two बिर्याणी”, चिनू आत जाता जाताच ओरडला.

सिद्धू मागे मागे चालत होता. दोघे एका table वर बसले.

“चिनू, आदीचा matter close ?”, सिद्धुला tension होत होतं.

“येडा-बीडा आहेस काय? लौ*. खासदाराच्या पोराची गाडी जाळून तंदुरी खायला धाब्यावर येतोस, आणि बोलतो कि matter close?”, चिनू मोठ्याने हसत होता.

“आता पुढे काय?”

“सिद्धू मेरी जान. अब तो असली मजा आने वाला है. चल रे. फोन ला इधर”, चिनू खुर्चीवर मागे सरकत म्हणाला.

सिद्धूने चिन्याला त्याचा फोन देत देत “कोणाला लावतोय?”, अस विचारलं.

“तू तुझं तोंड बंद ठेव आणि फक्त मजा बघ”, सिद्धू नम्बर dial करत बोलला.

चीनुने कोणाला तरी फोन लावला. .

“हा. हेल्लो. मला साहेबांशी बोलायचं आहे. मी? मी सिद्धू बोलतोय.. नाही नाही साहेब ओळखतील मला. तुम्ही त्यांना द्या तर. urgent आहे.. हो हो.. हो माहित आहे मला तुमचे साहेब busy असतात ते.. पण आम्ही पण महत्वाचं काम असल्याशिवाय फोन नाही करत साहेब. अरे हो..

त्यांना सांगा ज्याने कॉलेजच्या ground वर आदिराज पाटीलची गाडी जाळली आणि त्याला धमकी दिली त्याचा फोन आहे”, शेवटचं वाक्य चिनू थोडासा मोठ्याने बोलला.

हे बोलल्या बोलल्या कदाचित चौधरी साहेबांचा P.A थोडा गांगरला. त्याने ताबडतोब साहेबांना तसं सांगितलं. चिनूने सिद्धूकडे बघून डोळा मारला आणि तो हसला.

इतक्यात त्यांची तंदुरी आणि बिर्याणी आली.

चिनू पुढे फोनवर बोलू लागला, “हा जय महाराष्ट्र साहेब. हा एक matter झालाय. मी शाहीदरबारमध्ये आहे.. खातोय.. हो कदाचित मला शोधत असतील ते. ठीक आहे”.

सिद्धूने काहीच विचारलं नाही. दोघे हसत हसत जेवत होते.

सातव्या मिनिटाला दोन तीन tinted scorpio तिथे येउन उभ्या ठाकल्या. त्यातून पंधरा वीस पोरं उतरली. विचारात विचारात ती चिनू सिद्धू जवळ आली

“सिद्धू तूच का?”

“तू कोण आहेस बे?”, चिनूच्या तोंडात घास होता.

“दादा, मी गणेश जाधव. मी सेवाभाव पक्षाचा इथला नगरसेवक आहे. साहेबांचा फोन आला मला. ही सगळी माझी पोरं आहेत. तुम्हाला पोलिस आणि जयराज पाटलाची माणसे शोधत आहेत. तू please आमच्यासोबत चल. आत्ता matter होईल”, गणेश घाईघाईमध्ये बोलत होता.

“अरे हो भाई. जर थंड घे. माझी तंदुरी बाकी आहे अजून. आणि कोंबडी तर मला पोरीपेक्षा जास्त आवडते. आणि घाईघाईने तर मी न हे खातो, न ते”, चिनू तोंडात घास ठेऊन हळू speed बोलत होता आणि सिद्धुकडे पहात हसत होता.

“दादा तू जोक काय करतोय? आपल्याकडे time कमी आहे”, गणेशचा एक पंटर बोलला.

“अरे हो.. साहेबांना मी आत्ताच फोन केलेला. तू पण ये बस.”, चिनू गणेशकडे वळला, “गणीभाई. body एक नम्बर आहे रे तुमची. कोणती gym?”, चिन्या असं वागत होता जसं काही झालच नाही आहे.

तिथे जमलेल्या सगळ्या पोरांना वाटत होतं कि चिनू इतका मोठा मचांड करून इतका शांत राहतो, आणि असा वागतो कि जसं काही झालच नाही आहे. ह्याचं कारण हेच असेल कि त्याने ह्याही पेक्षा मोठे matter केले आहेत. आणि हा खूप मोठा भाई आहे.

काही मिनिट झाले असतील. चिनू हळूहळू खात होता आणि timepass करत होता इतक्यात बाहेरून कसला तरी आवाज आला.

तर तिथे ३ ते ४ innova आल्या. त्यातून बारा पंधरा मुलं उतरली. त्यांच्याकडे hockey च्या sticks होत्या.

“इथ सिद्धू कोन ए?”, एक काळा लंबू मुलगा आला. त्याचा आवाज पात्तळ होता. अंगाने बराच होता.

“का रे? सिद्धुला का शोधतोय? तुझ्याकडे job साठी vacancies आहेत का?”, चिन्या त्याच्याकडे पाहून हसला.

“तू कोण आहेस बे?”, सिद्धू कडक आवाजात बोलला.

“अरे सिधूदादा, ही त्या जयराज पाटलाची पोरं आहे”, गणेश जाधवचा पंटर, बाळा म्हणाला.

“ए माद्दर**, साहेबांचं नाव नीट घे”, लम्बुच्या बरोबर आलेला एक पोरगा बोलला, हातात लोखंडी रिप होती.

सिद्धू थोडा घाबरला, पण चिनू सोबत असल्याने, त्याच्याकडे पाहत तो काहीच बोलत नव्हता.

चिनू तर, “waiter, अजून दोन रोटी”, तो सिद्धुकडे पाहून म्हणाला, “सिद्धया खाणार का ?” सिद्दुने नाही अशी मान डोलावली. “बर एकच आण”, चिनू पुन्हा ओरडला. “सिद.. हग्डून घे. आज पैसे आपल्याला नाही द्यायचे आहेत”, चिनू गपचूप सिद्धूच्या कानात पुटपुटला आणि हसला.

इथे बाजूला matter चालू झालाच होता. पण चिनू आणि सिद्धू खाण्यात मग्न होते.

गणेश जाधव बोलला, “कोण साहेब? इथे एकच साहेब आहेत. ते म्हणजे आमचे चौधरी साहेब.”

“ए झा*, आवाज खाली कर”

“दाखवू का तुला? बाळा समान काढ”, गणेश जाधव बोलला.

“तुझ्या आईला, जास्त फडफड करतो का रे?”, आणि त्या लंबुने येउन गणेश जाधवची कॉलर धरली

तशी बाळाने जाऊन लंबुच्या कानफडात वाजवली, आणि तिथे गल्ला चालू झाला. “धर त्याला भे**”, “फोड “, सगळा आरडओरडा चालू झाला. कोण कोणाला बुक्का देताय, तर कोणी दोघे एकाला मारत आहेत.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

सगळे राहिले बाजूला आणि चिनू आणि सिद्धू चीकेन खातायत. सिद्धू फक्त चीनुकडे पाहतोय, आणि मनात हसतोय.

“थांब मी आलोच”, चिनू म्हणाला आणि sideला गेला. लगेच एक मिनिटात आला. .

हॉटेलमधे तोडोफोड होऊ लागली.

इतक्यात siren वाजला. धडाधड पोलिसांच्या ५ ते ६ गाड्या आल्या.

त्यांच्यासोबत मागून एक land-rover आली. त्यात जयराज पाटील होते. त्यांच्यासोबत आदिराज, आकाश, शैलान मोहोम्मद, अमित, आणि दीपक हे लोक होते.

दुसर्या दिशेने एक Hummer आली. तिच्यातून चौधरी साहेब उतरले. त्यांच्यासोबत तीन main लोक आणि ACP साहेब होते.

आत राडा चालू होता, तो लगेच थांबला.

गणेश जाधव पुढे आला आणि लगेच त्याने चौधरी साहेबांना आणि त्या काळ्या लंबूने जयराज पाटील साहेबांना वाकून नमस्कार केला.

चौधरी आणि पाटील साहेबांची ठस्सन होती. आणि जयराज पाटीलना खालीपण आणण्यासाठी मुद्दामहून चौधरी सिद्ध्याला वाचवत होते. शिवाय, चौधरीचे पोलिसात खूप कडक contacts होते. चौधरीला गेल्या निवडणुकीत पाटील साहेबाने पाडलं होतं.

“नमस्कार पाटील”, चौधरी साहेबांनी कडक हाक मारली आणि हसले.

“ओ चौधरी बुवा. काय म्हणताय? सगळं ठीक न?”

“तुमचा आशीर्वाद आहे साहेब आणि काय. काय म्हणताय सरकार?”, चौधरी साहेबांच्या डोळ्यात सत्य दिसत होतं.

“या बसा. पोरांनो खुर्च्या मांडा रे.”, पाटील साहेबांनी पोरांना सांगितलं. तशी ती पोरं एकमेकांना खुन्नस देत चिनू आणि सिद्धूच्या table पुढे तीन चार खुर्च्या मांडून मागे उभी राहिली. गणेश जाधव आणि त्यांची पोरं चौधरींच्या मागे. आणि काळा लंबू आणि त्याची पोरं आदि आणि त्याच्या group सकट जयराज पाटलांच्या मागे.

मध्ये दोघे राजकारणी मांडीला मांडी लावून असे बसले, जसे दोन जिवलग मित्र आहेत. ते एकमेकांची खुशाली विचारात होते. हसत होते. ACP साहेब पण त्यांच्यात मिसळत होते.

“वेटर,रूम washroom दाखव”, चिन्या ओरडला. त्याचं खाऊन झालं होतं. सिद्धूपण त्याच्यासोबत त्याच्या मागे गेला.

दोघे हात धुवून आले.

आणि समोर उभे राहिले.

“सिद्ध्य काही बोलू नकोस. तू काही केलं नाही आहेस. मी बोलतो.”, चिन्या बोलला.

“नको. माझा विषय मलाच बोलु दे”.

“ठीक आहे बोल. पण loose नको पडूस. आणि एकदम सेंटी नाही व्हायचं”, चिनू सिद्धूच्या कानात अलगद पुटपुटला.

“आदिराज, कोन आहे त्यो? बोलवा त्या पोराला. गाडी कोणी जाळली?”, जयराज पाटील म्हणाले.

तसा आदिने सिद्धुकडे बोट दाखवलं. चीनुने आदिला खुन्नस दिली आणि आदिने घाबरून मान खाली घातली.

आधीतर सिद्धूने मान खाली घातली. पण नंतर वर पाहिलं. खूप वेळ जयराज पाटील सिद्धुकडे टक लावून पाहत होते.

सावळासा नाजूक मुलगा. थोडा उंच. चेहेरा एकदम कोवळा. आणि कपडे इतके साधे. सगळ्या मवाली मुलांमध्ये सिद्धू एकटाच एकदम शांत सभ्य आणि नाकासमोर चालणारा दिसत होता. जयराज पाटीलांनी नक्की केलं कि हा मुलगा असं काही करूच शकत नाही.

त्याला पाहूनच जयराज पाटलांचा राग गेला. पण तरीही त्यांना काळजी वाटू लागली होती.

“बाळ, इथे ये. आणि बैस”, पाटलांनी विचारलं.

सिद्धूने मागे वळून पाहिलं. चिनूने हो म्हणून मान डोलावली. सिद्धया पुढे सरकला आणि खुर्ची मागे ओढून बसला.

एखाद्या मुलीला पाहुणे पाहायला येतात, तेव्हा ती जशी बसते, तसा सिद्धू मान खाली घालून बसला.

“पाटीलसाहेब, अहो हा तो धनगर. चिन्मय धनगर. ज्ञानमंदिर विद्यालय शाळेचा topper आहे हा. माझ्या हातून ह्याचा शाळेत सत्कार झालाय”, ACP खैरनार म्हणाले.

“काय सांगताय?”, पाटील एकदम चकित झाले.

पुन्हा एकदा खूप शांतपणे सिद्धूला ते म्हणाले.

“आदिराजची गाडी तू जाळलीस बेटा?”, जयराज पाटीलांचा चेहरा फिका पडला होता.

“हो”, सिद्धू मान खाली घालून हळू आवाजात म्हणाला.

“तू माझ्या पोरासारखा गुंड नाहीस. अस का केलस?”, हे बोलताना पाटील आदिकडे रागाने पाहत होते, आणि आदिने मान खाली घातली, “आणि तू धमकी दिलीस कि तू आदिला मारशील?”

“हो”, सिद्धूची मान अजून खालीच होती.

“असं का केलंस तू?”,पाटील सिद्धूच्या निरखून चेहऱ्याकडे पाहत होते. कोणजाणे का, पण त्यांना सिद्धूचा राग येत नव्हता. इतर जमलेले सर्व मुलं, सगळी स्तब्ध होती. कोणीच काहीच बोलत नव्हतं.

“मला आधीचा खूप राग आला”, खूप वेळाने सिद्धू शांतपणे म्हणाला.

“ह्याने काय केलं? आम्हाला सगळं सांग”, पाटील साहेब थोडे पुढे सरकून म्हणाले.

“ह्याने मला खूप वेळा मारलं. मी काल पण त्याचा भर कॉलेजमध्ये मार खालला. आणि गेल्या आठवड्यात पण त्याने मारलं.”

“का? का? सिद्धू. आदिराजने तुला का मारलं.”

आदिराज थरथरू लागला होता. त्याच्या बाबांपुढे आदीच काही चालत नसे.

“कारण मी त्याला सलाम नाही केला.”, सिद्धूने आवंढा गिळत उत्तर दिलं.

“सलाम?”, ते गोंधळून आदिराजकडे पाहत होते.

आदिने झटकन उत्तर दिल, “अरे सिद्धू आम्ही तर मस्करी करत होतो. तू बाबांना ते सगळं कशाला सांगतोय?”

“आदिराज”, पाटील साहेबांनी आवाज चढवला, “बोल तू सिद्धू.”

“ती मस्करी होती? नाक तोंड फुटे पर्यंत लाथा बुक्क्यांनी तुडवलं, सगळ्या कॉलेजमधून जे माझे तमाशे केले, ती मस्करी होती?”, सिद्धूच्या डोळ्यात पाणी येता येता राहिलं. पाटील साहेबांना वाईट वाटलं. त्यांनी आदिराजकडे खूप रागाने पाहिलं.

“नाही बाबा, खोटं बोलतोय तो”, आदिराज झटकन म्हणाला.

इतक्यात तिथल्या गर्दीमधला एक मुलगा पाटील साहेबांच्या कानात काहीतरी पुटपुटला. साहेबांनी ते ऐकलं आणि, “ठीक आहे” म्हणून मान डोलावली.

“पाटीलसाहेब. पोराला आवरा. त्याच्या लई तक्रारी आल्यात. तुमचे चिरंजीव म्हणून किती सहन करायचं? गरीबाची पोरं शिकायला येतात. ह्या पोराने सहन नाही झाली म्हणून वाकडं पाउल टाकलं. जर इतर कोनात हिम्मत नसती तर कमजोर कमजोर म्हणून सहन करत राहायचं का?”, चौधरी साहेब म्हणाला. जसा काय स्वतः मोठा धुतल्या तांदुळासारखा आहे. फक्त पाटील साहेबाला नीचा दाखवण्यासाठी नौटंकी.

“पोरगा साधा आहे. साहेब. ह्याची सगळी चौकशी केली आहे आपण”, ACP खैरनार साहेब म्हणाले.

पाटील उठले. त्यांनी रागाने डोळे लाल केले. साहेब उठले, आणि आदिराजच्या दिशेने वळले. “आदिराज, आम्ही तुम्हाला कॉलेजात शिकवलं कारण आम्ही अडाणी राहिलो. आमचं स्वप्न होतं कि आमचा मुलगा शिकून मोठा होईल आणि तुम्ही आमच्या मोठेपणाचा हा वापर केलात? खासदार जयराज पाटीलांचा मुलगा एक गुंड?” त्यांनी आदीच्या खाडकन तीनचार कानफडात ठेऊन दिल्या.

तसे चौधरी आणि ACP ही उठले.

“आम्हाला वाटलं कि कोणी मोठा भाई, किवा राजकारणी असेल ज्याने हे केलं. पण ह्याच्याकडे पहा तर. शाळेत पहिला. कॉलेजात scholarship. हुशार गुणी मुलगा. आदिराज, तुम्ही आमची मान खाली घातलीत. आणि दादागिरी करायची असेल तर इतर आपल्या बरोबरीच्या लोकांवर करा. राजकारणात एकाचढ एक खूप आहेत. साध्या गरिबावर अत्याचार केलात? आपल्या खानदानात अस कधी कोणी केलं नव्हतं. आपल्या घराण्याला काळिमा फसलात”, असं बोलून त्यांनी चौधरींकडे पाहिलं.

ते पुढे बोलू लागले, “आम्हाला वाटलं कि कोणी मोठा राजकारणातला काहीतरी असेल. पण ह्या पोराकडे बघून कोण बोलेल का कि ह्याचा कोणाशी काही संबंध आहे ते?”

काही पोरं आणि आदीचे मित्रमध्ये पडले, “माफ करा काकासाहेब. आमच्याकडून चूक झाली”. सगळी पोरं पाटीलसाहेबांच्या पायात पडली.

“मागायची असेल तर त्या पोराची माफी माफा. त्याची माफी मागा”, पाटील साहेब थोडे शांत होत म्हणाले.

सगळी पोरं एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होती. त्यांच्याकडे दुसरा option नव्हता. ते सिद्धुकडे वळले, “sorry सिद्धू. पुन्हा अस नाही होणार”.

फक्त आकाश सोडून सगळी पोर शमली होती. आकाश तर डोळ्यात रक्त उतरल्यासारख्या सिद्धुकडे खूप रागाने बघत होता.

सिद्धूने वळून मागे वळून पाहिलं. चिनू गालात हसत होता. त्याने होकारार्थी मान डोलावली.

“ठीक आहे. माझं पण चुकलं. मी रागाच्या भरात खूप बोललो आज तुम्हाला.”, सिद्धू हळू आवाजात बोलला, “मी बाईकचा खर्च देईन.”

“त्याची गरज नाही बाळ. आदिराज उद्यापासून बसने किवा चालत कॉलेजला येतील”, पाटील साहेब खडसावून म्हणाले. “घरातून मिळणारे पैसे आणि सगळी ऐयाशी बंद. आणि तुम्ही काहीही करत असाल, तर त्याच्याकडे आमचं लक्ष असेल”, पाटील साहेब आदिला म्हणाले.

“बेटा, घरी कोण असतं तुझ्या?”, पाटील सिद्धुला म्हणाले.

“मी आणि बाबा”

“आणि आई?”

“नाही आई लहानपणीच गेली त्याची. भाऊबहिण कोणी नाही त्याची”, ACP साहेब म्हणाले.

पाटील साहेबांना वाईट वाटलं.

“तुम्हाला कसलीही गरज लागली किवा काहीही कसलाही त्रास झाला, तर थेट माझ्याकडे यायचं. काय? झालं गेलं ते खूप झालं. ह्यापुढे चर्चा होता कामा नये”, आदिराजकडे वळून पाटील साहेब म्हणाले, “गाडीत बसा”.

तिथल्या इतर दोन मुलांच्या कानात पाटील काहीतरी पुटपुटले. इतर वातावरण पण निवळल. सगळी जमलेली पोरं आपापसात बोलू लागली.

“ACP साहेब, आम्ही येतो. पोरांनो, गाड्या काढा.”, पाटील इतांना म्हणाले.

तशी निरवानिरव करून चौधरी साहेबही तिथून निघाले. पोलिससाहेबही निघाले. पोरं आपापल्या गाड्यांत बसली.

सगळे कमी होऊ लागले. लास्टला फक्त गणेश जाधव होता. तोही थोडसं बोलून निघून गेला.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

सिद्धू आणि चिनू आता ढाब्यात एकटेच होते. चिनू आणि सिद्धूही तिथून निघाले.

दोघं बाहेर धाब्यातून बाहेर पडले . दुपार उलटून गेली होती. ते दोघेच होते. खूप वेळ ते काहीही न बोलत फक्त हसत होते. सिद्धू तर खूप हसत होता आणि चिनू गालातल्या गालात हसत होता.

“काय रे शहाण्या कावळ्या. इतका मोठा गेम केलास तू?”, सिद्धू चकित होऊन चीन्याकडे पाहत होता.

“साधी psychology आहे रे.. झम्या… विचार कर. आदिराज हा over-protected आहे. त्याला लहानपाणी पासून खूप जास्त attention मिळालं आहे. त्याचे खूप लाड झालेत. त्यात individual अशी जास्त मानसिक ताकद नाही. जर ताकद असती तर तुला त्याने त्रास नसता दिला. ज्यात खरंच ताकद असते, तो कधीच कधीच कोणाला कमजोर नाही समजत. आपण इतका मोठा risk घेतला. कारण फक्त आदिला घाबरवायचं होतं”.

चिनूच्या बोलण्यात तत्वज्ञान आणि मानसशास्त्र आहे.

“आणि तो घाबरला नसत तर?”, सिद्धूने योग्य प्रश्न विचारला.

“असा होणारंच नव्हतं”. चिनू थोडा हसून म्हणाला. “उलट तो इतका घाबरला, कि त्याची भीती त्याच्या मित्रांत reflect झाली. आपण तर फक्त त्यांच्या भीतीला project केलं. simple logic होतं”.

“म्हणजे तिथे ती डायलॉग मारत होतो, ते सगळं तू विचार करून जाणूनबुजून केलं होतं. पण इतर जमा गर्दीचं काय?”, सिद्धू चिनूच्या खांद्यावर हात ठेऊन बाहेर येत होता.

“गर्दी कधीच काहीच करत नाही. जेव्हा एक trigger होतो तेव्हाच सगळी लोकं तुटून पडतात. गर्दी तर जाणून बुजून जमा केली. म्हणून तर गाडी मुद्दाम groundच्या centerला आणली. आणि आपण सर्वांनाच अशा attitude ने घाबरवलं, की कोणीच पुढे यायला मागत नव्हतं. basic mob-psychology”, चिनू आणि सिद्धू बाहेर पडत होते, तेव्हा चिनू म्हणाला, “मला सगळ्यात जास्त tension होतं ते म्हणजे जयराज पाटलाचं”, चिनू म्हणाला.

“तुला tension होतं? म्हणजे तुला tension पण येतं?”, सिद्धू चिनूचं तोंड बघत म्हणाला.

“अरे यार. मी दाखवत नसलो म्हणून काय झालं? मी पण माणूस आहे यार. मी फक्त दाखवत नव्हतो कारण तू आधीच गां* फाट्या. मी घाबरत नव्हतो म्हणून तू घाबरत नव्हतास. नाहीतर तू रडायला लागला असतास. नेहमीप्रमाणे. आणि आता तू तुझी बाइलेगिरी बंद कर सिद्ध्य आणि माणसात ये. रडतोस काय? चू* आहेस काय?”, चिनू आणि सिद्धू धाब्याच्या बाहेरपडून गाडीवर बसून बोलत होते.

“ठीक आहे. पण तुला tension कसलं होतं?”

“मला तर हे tension जास्तं होतं, कि त्याचा बाप direct पोरं पाठवून आपला गेम करेल”, चिनू गंभीर होऊन म्हणाला..

“आणि त्याने तस केलं सुद्धा”, सिद्धू seriously बघत म्हणाला.

“नाही. माझा अंदाज आहे, कि त्याने पोरं पाठवली ती आपल्याला उचलायला.. मारायला नव्हते आले ते.”, चिन्यापण firsttime serious होऊन बोलत होता. “पण तरीही मला रिस्क घ्यायचा नवता. आता सेवाभाव विरोधी पक्ष party आहे. म्हणून मला वाटलं कि चौधरीला फोन करू. सिद्धया यार. lucky आहोत आपण. खोटा शिक्का चालला आपला”, चिन्या हसत म्हणाला.

“आणि नशीब चौधरीची पोरं अगोदर आली. जर पाटीलची पोरं आधी आली असती आणि त्यांनी direct उचललं असतं तर आपलं काही खरं नव्हतं. म्हणून मी लगेच चौधरीला सांगितलं कि आपण कुठ आहोत ते”, चिनू बाईकला kick मारत बोलला.

संध्याकाळ झाली होती.

“नंतर मला doubt आला कि कदाचित पाटीलाची पोरं पण इथेच येतील”, चिनू बाइक वर बसत म्हणाला, “मागे बस. घरी जाऊ”.

“आणि तू चीकेन खाताना मुद्दाम जास्त वेळ लावलास, कि जेणेकरून दोन्ही side ची पोरं एकाच ठिकाणी येतील”, सिद्धू चिन्याच्या मागे बसत म्हणाला.

“exactly”, चिनूने बाईक start केली आणि जाता जाता सिद्धुला डोळा मारून म्हणाला, “पोलिसांना फोन मीच लावला”.

“जेव्हा तिथे राडा चालू झाला आणि तू मध्ये एक मिनिटासाठी बाजूला गेलेलास”, चीण्याची बात मध्येच तोडत चिनू बोलला.

“तू बाप आहेस चिन्या यार. मला वाटलं पण नव्हतं कि आदी. . म्हणजे माननीय नामदार श्रीमंत खासदार जयराज पाटील ह्यांचे चिरंजीव आदिराज पाटील मला sorry बोलतील. जयराज पाटील माणूस चांगला आहे. त्याने खूप soft-heartedly घेतलं म्हणून आपलं निभावलं. ”.

“त्या ACP ने तुझी side नसती घेतली तर तू गेला होतास, आणि मी ही”,

चिनू आणि सिद्धू बोलत बोलत एका उंच मोठ्या बिल्डिंग पाशी आले. Top-class society.

“चल घरी जाऊया”, चिन्या बाईक park करत होता.

“सिद्धू मला उशीर होतोय”, सिद्धू थोडा संकोच करत होता. चीनुचं घर जबरदस्त society मध्ये होतं.

“काय रे? तुला जॉर्ज बुश सोबत meeting आहे काय? लौ* भाव खातोस?”, चिनू वैतागला.

“घरी कोण असेल?”, सिद्धू विचारत होता.

“मी एकटा असतो रे. माझ्या पुढे मागे कोणी नाही”, चिनू सहजपणे बोलत होता.

“चिनू मी पुन्हा कधीतरी येईन. आजकाल माझं संध्याकाळी डोकं खूप दुखतं”, सिद्धू म्हणाला.

“नाही दुखणार रे चल, आणि भाव खाऊ नकोस येड्या बु*. आणि बहाणे काय मारतोय?”

“अरे नाही खरच. माझी वाट लागते रे”, सिद्धू बोलत होता.

“तू मेलास तर तुला पोचवेन मी. आत्ता घरी चल”, चिनू elevator चा ९ button press केलं.

“वाईट मी बाबांना call करतो”, सिद्धू म्हणाला.

“हा… बोलून घे म्हाताऱ्याशी कि मी आत्ता college मध्ये fourth floor वर study करतोय”.

“तू नाही सुधारणार”,सिद्धू म्हणाला. हसून सिद्धूने बाबांना call केला आणि त्याला यायला उशीर होणार आहे हे सांगितल.

पहिला मित्र. .

आणि पहिला matter.

सिद्धू आणि चिनू जिंकले होते.

काय माहित पुढे काय होणार होतं?

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

राजयोग प्रस्थ – एक अनोळखी मित्र – भाग ७ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

4 Responses

  1. Punam Salgarkar says:

    superbbbbbb……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *