उपाय – एक अनोळखी मित्र – भाग ५ – Ek Anolkhi Mitra

एक अनोळखी मित्र – एक अनोळखी मित्र – भाग ४ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

सिद्धूने खुर्च्या जागेवर लावल्या आणि विचार करत करत तो त्या हॉलमधून बाहेर पडला. रस्ता ओलांडून तो घरात गेला. बाबा जागे झाले होते.

“कोण आहे? सिद्धू?”, बाबा अंघोळ करत होते. ते मोरीमधून ओरडले.

“हो दादा”, सिद्धूने उत्तर दिलं.

“काय रे कुठे होतास? रात्रभर बाहेर होतास काय?”, बाबांनी पुन्हा विचारलं. त्यांच्या महालात खबरपण नव्हती कि पोराच्या कॉलेजमध्ये काय चालू होतं.

“समोर हॉलमध्ये होतो”, सिद्धूने उत्तर दिलं.

“अभ्यास करत होतास काय?”

“हो”, सिद्धूने उत्तर दिलं. “दादा, मी बाहेर जाऊन येतोय.”

“आता पुन्हा कुठे चाललास?”

“हॉलमध्ये छत्री विसरलो”. सिद्धू धावत धावत पुन्हा हॉलमध्ये गेला आणि जवळच पडलेली छत्री घेऊन आला. तेवढ्याच वेळात बाबा आवरून चपला घालत असताना दिसले.

आता सिद्धू एकटा होता. तो ताबडतोब मोरीमध्ये गेला. अंघोळपांघोळ आणि सकाळच्या सर्व गोष्टी आवरून बाहेर येउन कपडे घालून त्याने स्वयपाकात हात घातला. तासाभरात सहा पोळ्या आणि तीन बटाटे उकडून त्याने तव्यावर परतले.

घरभर भाजीचा घमघमीत सुघंध पसरला. पण सिद्धूच्या डोक्यात तर वेगळच काही शिजत होतं. त्याला राहून राहून नेहाची काळजी वाटत होती. पण काय करावं हेच कळत नव्हतं. ग्लानी आली होती. डोकं जड होत होतं.

Problem खूप मोठा होता. पण उपाय सुचत नव्हता.

सकाळचे सात वाजले होते. पाउस उघडला होता. स्वयपाक उरकून त्याने कॉलेजच दप्तर घेतलं. घरातून बाहेर पडला. रस्त्यावरून चालू लागला. मान खाली घालत विचार करत होता. गेटपाशी आला. तिथे तेव्हा सकाळी कोणीच नव्हतं.

तो सरळ library मध्ये गेला. पुस्तक समोर ठेऊन आणि शून्यात पाहत तो विचार करू लागला.

सकाळी नऊ वाजता पहिलं lecture होतं. त्याच्या एक हात आला. काय रे कसला विचार करतोय?

अलगद मागे वळून पाहिलं तर त्याच्याच वर्गातला एक मुलगा होता. “काही नाही विचार करतोय”, सिद्धूने एकदम हळू आवाजात उत्तर दिलं.

“Lectureला नाही येणार आहेस का?”, त्या मुलाने विचारलं.

बघता बघता दीड दोन तास कधी गेले समजलंच नाही. सिद्धूने घड्याळ पहातपहात म्हटलं, “तू हो पुढे मी आलोच”.

तिथून पुढे तो washroomमध्ये गेला. तिथे तेव्हा कोणीच नव्हतं. basin चेहेरा धुवत वर आरशात पाहिलं. डोळ्याची सूज ओसरली होती. रुमालाने चेहरा पुसतपुसत विचार करत तो बाहेर आला, आणि त्याच्या classroom मध्ये गेला.

“may I come in, sir?”, सिद्धूने सर्वांना disturb केलं.

“yes”

सर्वलोक सिद्धुकडे विचित्र नजरेने बघत होते. सिद्धू साफ साफ दुर्लक्ष करत सर्वात शेवटच्या bench वर जाऊन बसला.

“So class. here we see.. .”, सरांनी lecture continue केलं. सर्वांना सगळं माहित होतं.

सिद्धूचं लक्ष तिथे नव्हतं. पण सर लक्षात येउनसुद्धा सिद्धुशी काहीच बोलत नव्हते. खरंतर, सिद्धुशी कोणीच काहीच बोलत नव्हतं. तो डोळे मिटून विचार करीत होता. सर्वांना काल काय झालं ते माहित होतं.

Lecture संपलं. सगळे निघून गेले. सिद्धू वर्गात एकटाच होता.

इतक्यात एक मुलगी घाबरत घाबरत गपचूप त्याच्याजवळ आली. “सिद्धू, सिद्धू. बाहेर ये.”, ती दबक्या आवाजात सिद्धुला classroom बाहेर बोलावत होती.

सिद्धूने अलगद मान वर करून पाहिलं. ती नेहाची मैत्रीण सिद्धिका होती. “काय झालं ?”

“बाहेर ये मग सांगते”, ती सारखी इकडे तिकडे कोणी बघत नाही आहे ह्याची खात्री करून घेत होती.

“हा बोल”, सिद्धूने बाहेर येत विचारलं.

“हे घे”, तिने एक चिट्ठी सिद्धूच्या हातावर ठेवली, “आणि सिद्धू घाई कर. नाहीतर नेहा जीव देईल”, ती रडवेली होऊन बोलत होती.

“तिला सांग माझी वाट पाहायला. मी तिला घ्यायला येईन”.

ती घाई घाईने निघून गेली. सिद्धूने चिट्ठी उघडली.

“सिद्धू.

तू ठीक आहेस न? मला तुझी खूप काळजी वाटत आहे. तुझ्यासाठी सारखी देवाकडे याचना करतेय.

मला इथे घरात कोंडून ठेवलंय. . मला इथून सोडव.

सिद्धू. मला खूप भीती वाटते. रात्र रात्रभर झोप नाही येत. मला गावी पाठवण्याची तयारी चालू आहे. माझं घराबाहेर पडणं बंद केलं आहे आणि आता पुढे काय होईल ते मला माहित नाही. रडून रडून मी बेजार झाले आहे. इथे एक एक क्षण माझ्यासाठी एकेका जन्मासारखा जात आहे. तुझी काळजी आणि आठवण ह्याचमुळे मी जीव रोखून ठेवला आहे.

राजसा, तुझा गोड चेहरा पाहण्यासाठी माझे डोळे तरसले आहेत. माझं मन समजून घे. माझा प्राण कंठाशी आहे. किती दिवस मी ढकलू शकेन माहित नाही. पण परक्या पुरुषाचा स्पर्श माझ्या देहालाच होईल. प्राण तर गेलेले असतील.

खूप धीरानं घे. वेळ कठीण आहे. माझी काजळी नको करूस. मी तुझी वाट पाहत आहे. आणि आपण ह्यातून मार्ग काढू माझा विश्वास आहे.

वाट पाहतेय…

फक्त तुझीच
नेहा”

सिद्धू मूर्ती सारखा स्तब्ध झाला. त्याचं डोकं सुन्न झालं, आणि डोक्यात सणसण होऊ लागली. त्याला काय करावं समजेच न.

त्याचा जीव नेहासाठी कसा तळमळत होता, जसा माण्यावाचून नाग, किवा पंख छाटलेलं पाखरू.

त्याने ती चिट्ठी घट्ट हृदयाशी धरली.

तो तडकाफडकी लगेच नेहाच्या घरी गेला. तिच्या घराला कुलूप होतं. त्याला भीती वाटू लगली कि नेहु आहे तरी कुठे? तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नये.

तो कसा तरी घरी पोचला.

संध्याकाळ झाली होती चार किवा पाच वाजले होते.

त्याला खूप त्रास होत होता. पुन्हा त्याचं डोकं दुखू लागलं. खूप जास्त, इतकं जास्त कि आधी कधीच इतकं दुखलं नव्हतं. तो जमिनीवर गडबडा लोळू लागला. मोठ मोठ्याने ओरडू लागला. पण तेव्हा घरात तो एकटाच होता. तो कसाबसा उठला . आणि मोरीमध्ये जाऊ लागला. त्याने नळ चालू केला आणि त्याखाली आपलं डोकं धरलं.

त्याला अचानक झोप येऊ लागली.

इतकी ग्लानी आली, जशी काय दोन बाटल्या दारू प्यायला आहे. चक्कर येत होती. नजर अंधुक पडली होती. सगळं काही गोल गोल फिरत होतं. तो तिथून मोरीमधून उठला, धडपडत पलंगावर जाऊन कोसळला. आणि धापा टाकत झोपी गेला.

इतकी गाढ झोप लागली कि जसा काय जीव जातोय.

रातकिडे किरकिरत होते.

खिडकीमधून road lights चा प्रकाश आत येत होता. नक्की वेळ माहित नाही. पण मध्य रात्र उलटून गेली होती.

सिद्धुला अलगद जाग आली. चक्कर आणि डोकं थांबलं होतं.

अर्धवट झोपेत त्याला काहीतरी आठवलं. आणि तो झटकन उठून उभा राहिला. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. कोणीच नव्हतं. चप्पल घातली, आणि बाहेर पडला. रस्ता cross करून सरळ हॉलमध्ये गेला.

“अनोळखी मित्रा, कुठे आहेस?”, सिद्धू रडवेल्या आवाजात तिथे फिरत होता, आणि त्या मुलाला हाक मारू लागला. हॉलमध्ये प्रकाश कमी होता.

इतक्यात “कोण आहे कोण आहे. “, दचकून जागा होत तो मुलगा एकदम खडबडून खडबडून म्हणाला.

एका खुर्चीमध्ये चेहेर्यावर रुमाल अंथरून डोकं मागे टेकवून दुसर्या खुर्चीवर पाय पसरवून तो मुलगा तो तिथेच झोपला होता.

“कोण असणार ? मी आहे.”, सिद्धू त्याच्या जवळ येत म्हणाला.

“तीच्च्या आयला, सिद्धया तू आहेस. किती वाट पाहिली मी. दहा वाजल्यापासून इथेंच बसून आहे. शेवटी कंटाळून इथेच झोपलो. मला वाटलं कि तू मेलास कि काय.”

“अजून तरी नाही मेलो”, सिद्धूने चिन्याच्या हातात सिद्धीकाने दिलेली चिट्ठी दिली. “हे वाच..”

डोळे चोळत चिनुने चिट्ठी घेतली आणि, “काय आहे? love letter आहे का?” अस विचारत चिन्या पुटपुटत ती चिट्ठी वाचू लागला.

“हा हा हा हा ह. हि काय नौटंकी आहे यार? राजसा काय, आणि काय परपुरुषाचा स्पर्श वैगरे काय? कोणत्या जमान्यात जगता रे तुम्ही?”, चिन्या नेहमी सारखा टप्पोरी attitude ने सिद्धुकडे बघत हसू लागला. “यार. unique couple आहे तुमचं. आजपर्यंत इतके cases पाहिलेत, पण तुमच्या जोडी सारखी अजीबोगरीब जोडी कधीच नाही. पण हो, काहीपण बोल, पोरीचा solid जीव दिसतोय तुझ्यात. हिचं जर काही केलं नाही तर हि नाही वाचणार.”, चिन्या हसू दाबत बोलत होता. पण शेवटचं वाक्य बोलताना तो हसत नव्हता.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“आता पुढे काय करायचंय?”, सिद्धूने विचारलं.

“तू सांग. ”

“नेहुडीला घेऊन पळून जातो.”, सिधू म्हणाला.

“बाबांचं काय?”, चीण्याचा चेहेरा serious होता.

“थोडं वातावरण निवळलं कि त्यांना सोबत घेऊ”

“नाही. आदि शांत नाही बसणार.”

“तुझं काय मत आहे?”, सिद्धू बोलत होता.

“आदिला घाबरवायचा”, अनोळखी मित्राच्या डोक्यात काहीतरी शिजत होतं.

“तो नाही घाबरणार. त्याला शिंक आली तरी त्याच्या आजूबाजूचे २५ लोक रुमाल घेऊन धावून येतात.”

“किती पोरं आहेत त्याच्याकडे? “, अनोळखी मित्र विचारात होता.

“चारशेच्या आसपास. सात आठ तर सोबत घेऊन फिरतो.”

थोडा विचार करून चिनूने सिद्धुला एक उपाय सांगितला. त्यांच्यात काही discussion झालं. ध्यान देऊन चिनूच्या गोष्टी ऐकत होता. चिनू खुर्चीवर पुढे सरकून दोन्ही गुडघ्यावर कोपर ठेऊन सांगत होतां. आणि सिद्धू मागे सरकून हाताची घडी घालून ऐकत होता.

चिनूच बोलण पूर्ण झालं, “बोल काय बोलतोस?”

सिद्धू कपाळावर हात ठेऊन विचार करत होता. आणि चिनू सिद्धूचा चेहेरा न्याहाळत होता. खूप वेळ ते शांत बसले होते.

“म्हणजे तो मला जाळून टाकायला”, सिद्धू घाबरून म्हणाला.

“अबे ए, लौ*, तुला मी आधीच सांगतो. घाबरायचं नाही. आदिराजची भीती मनात आहे, तोपर्यंत तुझी मदत कोणीही नाही करू शकत.”

“मला नाही वाटत ह्याचा काही फायदा होईल. उलट मला अजून तुडवतील. तोही मारेल, आणि पोलिससुद्धा.”

“इथेच चुकलास मित्रा”, चिनू खुर्चीमध्ये मागे सरकून थोडासा हसून म्हणाला, “तू माझा शब्द ऐक. मी सांगतो ते कर. ”

सिद्धू घाबरत होता. ते पाहून चिनू म्हणाला. “मी स्वतः कॉलेजला येतोय. जे मी बोललो ते उद्या करायचं म्हणजे करायचं”, सिद्धू चिडून बोलत होता.

दोन्ही हातांनी चेहरा झाकूनकोपर गुडघ्यांवर ठेऊन खुर्चीवर पुढे सरकून थकून, “चिनू… मला मारून टाकतील ते.”, सिद्धू समजवत होता.

“नाही माझ्या राजा. ज्याच्या बो*त जोर असतो, दुनिया त्याच्यापुढे झुकते. माझा शब्द खरा होईल. उद्या मी स्वतः तुझ्या कॉलेजला येतोय. तू फक्त कमजोर नको पडूस”.

सिद्धू अजूनही घाबरत होता.

चिनूच्या डोळ्यात मित्राची काळजी दिसत होती. सिद्धूचा हातावर हात ठेऊन तो धीर देत म्हणाला. “हे बघ सिद्धू. हि वेळ हातपाय गाळण्याची नाही आहे. स्वतःसाठी नाही. नेहासाठी तरी नड यार. तू faggot आहेस काय? आणि मी एक एक पाउलाला तुझ्यासोबत आहे. तू कोणाला घाबरतोय? मी नाही साथ सोडत तुझी. माझं वचन आहे”

सिद्धूच्या डोळ्यात पाणी आल. तो अजूनही घाबरत होता.

“घरी जा. उद्या कॉलेजला भेटूया. मी आहे तुझ्यासोबत. आणि जे plan केलाय ते तसंच करायचं. पुढे जे होईल ते होईल.”

सिद्धुला काहीच कळत नव्हतं. तो “ठीक आहे”, अस म्हणून खुर्चीमधून उठला आणि हळू हळू मान खाली घालून विचार करत हॉलमधून बाहेर पडू लागला.

हॉलच्या दरवाज्यापाशी उभा राहून त्याने मागे वळून पाहिलं, चिनू उठून उभा राहून त्याच्याकडे बघून नजरेने हसत होता,आणि हाताने , “घाबरू नकोस, मी आहे” असं त्याने सिद्ध्याला खुणावलं.

सिद्धू घरात येउन पलंगावर पडला. आणि विचार करत होता. बाजूला बाबा झोपले होते.

रात्रभर सिद्धुला झोप नाही आली.

विचार करता करताच पहाट झाली. आणि सकाळ झाली. सिद्धू बाबांकडे पाठ करून एका कुशीवर पडून डोळे सत्ताड उघडे ठेऊन विचार करत होता.

“मी पाणी भरून ठेवलं आहे. रात्रीची दोन भांडी आहेत. जर घासून घे. कपडे फार नाहीत. तेही पिळून घे. मला उशीर झालाय मी कामावर निघतो”, आणि बाबा घाईघाईने निघून गेले.

सिद्धूने पडल्यापडल्या ऐकल, पण काही उत्तर नाही दिल.

आज काय होणार आहे, तो विचार करत होता. त्यालाही माहित नव्हतं.

त्याने अंथरूण सोडलं. मोरीमध्ये गेला. दोन बादल्या स्वतःवर उपड्याकरून त्याने kitchen मधलं काम भरभर आवरलं. कॉलेजची bag घेतली. सिद्धूचे बाबा मेस्त्रीकाम करत. त्याच्याकडे सगळं समान तर होतंच. सिद्धूने बाबांची झोळी घेतली, आणि त्यातली एक मोठी हथोडी बाहेर काढली. bag ठेऊन तो निघाला. त्याने हातात एक air-tight असा मोठासा can घेतला.

सकाळचे दहा वाजून गेले होते.

चिनू आणि सिद्धूने जी planning केली होती, ती सिद्धूच्या लक्षात होती. पण अजूनही तो घाबरत होता. पण त्याने नेहासाठी धाडस करायचा निर्णय घेतला होता.

तिथून तो बाहेर पडला. पेट्रोलपंपावर गेला. ४ लिटर पेट्रोल घेतलं.

तो हळू हळू पावलांनी घाबरत घाबरत कॉलेज गेट जवळ गेला.

Black tee-shirt आणि light-blue jeans घालून, tight narrow shoes, आणि डोळ्यावर aviators. हातात leather glove आणि केस short-spiked. गेटपाशी चिनू उभा. “सिद्धू सिद्धू. अरे यार. सिद्धू. इथे बघ.”, चिनूची हाक आली. “you are late buddy. target आधीच आलाय. लक्षात आहे न?”

“हम्म”, सिद्धूने मान डोलावली.

“आणि हो loose नाही पडायचं. आणि जर भीती वाटली, तर नेहाचा चेहेरा आठवायचा. आज होऊन जाऊदे”, चिनू एकदम determined होता. “आज त्या आदीची गां* फाडू”

“ठीक आहे”, सिद्धू म्हणाला.

आणि दोघे एकत्र निघाले. ह्या दोघांकडे कोणाचं लक्ष नव्हतं. तिथून चालत चालत ते सरळ parking पाशी गेले. तिथे सिद्धू काहीतरी शोधू लागला.

सापडली.

एक brand new Karizma ZMR.

तिला handle lock केलं नव्हतं. त्याने त्या गाडीवर बसून गाडी सरळ केली. दुसर्या पायाने stand ढकलून धक्का देत देत ती गाडी त्याने ground जवळ आणली. मागे वळून पाहिलं. चिनू हाताची घडी घालून सरळ मागे उभा होता.

Ground वर आणून त्याने गाडी ला जोरात धक्का दिला. आणि पुढे त्याचे हात थरथरू लागले.

“तू साला गां*फाट्या. सरक”, म्हणून मागे असलेल्या चीनुने सिद्धुला सरळ धक्का दिला आणि त्याची bag खेचून त्यातून हथोडी काढली, “तुझ्याने काही नाही होणार”. बोलत बोलत त्याने दोन हाताने ती हथोडी वर उचलली आणि आधी खाली पडलेल्या bike ची headlight, मग पेट्रोलची टाकी मग आरसे, मग engine असं करत करत गाडीचा चेंधडामेंधडा करायची सुरुवात केली.

गर्दी जमा होऊ लागली.

बघताबघता चीनुने त्या सुंदर bikeचा कबाडा करून टाकला.

त्याने मग bike च्या पेट्रोलच्या टाकीवर घाव केले. टाकी फुटली.

हे सगळं करताना चीनुचे केस विस्कडले. ते सारखे करत त्याने goggles ठीक करत गर्दीतल्या एकाला हाक मारून बोलावलं, “ओये Mr. India के कॅलेंडर. इधर आ.” चीनुने ज्याला हाक मारली, तो घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. “अरे ओ भाई. तूच. जा second floorला माननीय नामदार श्रीमंत खासदार जयराज पाटील ह्यांचा एकमेव सुपुत्र आदिराज पाटील आहे. त्याला बोलावून आण”.

तो पळत पळत गेला. अजून गर्दी जमली.

तोपर्यंत चिनू तिथे दुसर्या बाजूला एका bike वर बसून सिगरेट light करत होता. सिद्धुतर भेदरून फक्त खांबासारखा उभा होता.

चिनू म्हणाला, “सिद्ध यार. काही फायदा नाही. हे सगळं झालं कि तंदुरी खायची का? शाही दरबारला जाऊया. मस्त धाबा”.

चिनूचा attitude इतका cool होता, आणि तो इतका सहजपणे वागत होता कि, कि . कि. कि आता सिद्धुला त्याचा आधार वाटू लागला.

‘माझ्यासाठी कधी कोणी काहीच केलं नाही. आणि हा काळ भेटलेला मुलगा माझं संकट स्वताच्या अंगावर ओढवून घेतोय’, सिद्धू मनात कृतज्ञ होत होता.

तिसऱ्या मिनिटाला आदि आणि त्याचा ग्रुप जीव खाऊन धावत आला.

“आले बघा, माननीय आदिराज पाटील”, त्यांना पाहून चिनू हसत उठत बोलला. “सिद्धू कामाला लाग”.

आत्ता पर्यंत सिद्धुचीपण हिम्मत वाढली होती. त्याने हातातला पेट्रोलचा कॅन उघडला. Karizmaच्या चेन्धामेंध्यावर त्याने सगळा कॅन उपडा केला आणि माचीसची काडी खेचली.

“थांब सिद्धू थांब”, आदि ओरडत होता. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आणि आदि धावत येउन सिद्धुला थांबवायच्या आत सिद्धूने माचीस काडी ओढून पेट्रोल वर टाकलीसुद्धा.

“सिद्धू थांब please. थांब”, आदि जीव खाउन ओरडत होता.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

चिनू दूर राहून हसत होता. आणि “सिद्धू मागे सर”, असा बोलत होता.

पुढच्या क्षणी bike धु धु करून पेटली. आग खूप मोठी झाली आणि ती इतकी वाढली कि त्याची झळ दूर पर्यंत येत होती. सगळे मागे सरकले.

आदिला त्याच्या मित्रांनी मागे खेचलं, आणि सिद्धुला चीनुने मागे ओढलं. आग वाढत वाढत गाडीच्या engineपाशी गेली, आणि टाकी फुगायला लागली.

आणि १०-१२ सुतळी बॉम्ब दाणकन फुटल्यासारखा मोठ्ठा आवाज झाला. गाडीचं पुढचं ढम्पर थोडा वर उडालं, आणि आग थोडी बसली. फक्त tires जळत होते. plastic coating आणि wires चा कोळसा झाला. एकूणएक जन धडधडत होता.

चीनुने आधीच गाडीची टाकी फोडली होती. म्हणून गाडी फार जोरात फुटली नाही. पण सिद्धू सोडून सगळे घाबरले.

‘झंडूर झंडूर झंडूर. आल्या दिवसापासून झंडूर. आणि आज सिद्धू थांब. हाहाहाहा’, सिद्धू मनात हसत होता. चिनू बाजूला उभा होता.

सगळे blank झाले होते. कोणाला काही कळतच नव्हतं. आणि जे सर्वांना दिसत होतं ते फक्त पेटलेली गाडी आणि डोळे लाल करून आदिकडे रागाने संतापाने पाहणारा सिद्धू. आजवर जो भीतीने थरथरत होता, तो सिद्धू आज संतापाने थरथरत होता.

आणि आदि. .

त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती. हे सगळं इतकं अनपेक्षित होतं, कि तो तूर्तास भेदरला होता.

तो अचंभित होऊन आणि घाबरून सिद्धूकडे बघत होता.

“काय, माननीय नामदार आदिराज पाटील. नमस्कार.” चिनूने कडक आवाजात आदिला हाक मारली. आदि आता थरथरत होता. “पुन्हा सिद्ध्याच्या आजूला किवा बाजूला दिसलास, तर bike च्या ऐवजी तुला जाळेन. कळलं का रे? संरक्षित प्रजातीके भालू. मराठी समजलं न तुला? का समजावू प्रेमाने ? ”

“सोड न चिनू, अरे यार. उसकी बडी बडी बोली, आठ बाय दस कि खोली”, सिद्धूपण dialog मारत होता.

आदि एकदम शांत. शंखासारखा उभा होता. आणि नंतर त्याच्या पायातले तरण गेले आणि तो घामाघूम होऊन गुडघ्यावर बसून धु धु जळणाऱ्या bike कडे बघत राहिला.

“आयला. सही रे सिद. शिकलास तू.”, चिनूने सिद्धुला कड्डक टाळी दिली.

“बस क्या भाई”, सिद्धूने चिनूच्या गळ्यात हात टाकला.

चिनू आणि सिद्धू दोघे स्तब्ध झालेल्या गर्दीमधून वाट काढत “चल रे, चक दे इंडियाके शाहरुख. बाजूला हो”, दोनतीन पोरांच्या खांद्याला धक्के देत दोघे बाजूला झाले आणि वाट काढत निघून गेले.

एक दोन मुलं mobile वर video काढत होते.

“चिन्या हा बघ”, सिद्धूने हाक मारली.

“smile please, say cheese”, दोघे कॅमेऱ्याच्या समोर आले. आणि मोठ्याने हसत ते दोघे कॉलेजमधून बाहेर पडू लागले. जो नाही त्याला खुन्नस देत होते. आणि त्यांनी पाहिल्यावर समोरचा माणूस नजर खाली घालायचा. आजवर सिद्धूकडे पाहून जे उपहासाने हसायचे, ते आता त्याच्याकडे भीतीने पाहत होते.

त्याने कांडंच तसा केला होता.

अम्या आणि अक्याने आदिला उचलले. “आदि, बाबांशी बोलूया”, दिप्या म्हणाला. सगळे घाबरले होते.

“चिनू, शाही दरबार माहित आहे न?”, सिद्धू आणि चिनू तंदुरी खायला निघून गेले.

दुपार झाली होती, आणि दोघांना भूक लागली होती.

चीनुने सिद्धूला त्याच्या बुलेट वर मागे बसवलं, आणि व्ह्रूमव्ह्रूम करत गाडी वरून ते जाऊ धाब्यावर जेवायला जाऊ लागले..

निडर. बिनधास्त .

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

शाही दरबार – एक अनोळखी मित्र – भाग ६ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

5 Responses

  1. Prajakta Janardhan Parab says:

    khupach chhan.
    pudhe vachayla khup avdel…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *