एक अनोळखी मित्र – एक अनोळखी मित्र – भाग ४ – Ek Anolkhi Mitra

सिद्धूची नेहा – एक अनोळखी मित्र – भाग ३ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

छतावर पावसाचे पाणी पडल्याचा धबाधब आवाज येत होता.

सिद्धू खूप वेळ झोपला. कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. तेव्हा मध्य रात्र होती. त्याचं डोकं अजूनही दुखतच होतं.

सिद्धू उठला.

पुन्हा कोणाची तरी चाहूल लागली. कोणातरी ओरडत होतं.

बाबा बाजूला झोपले होते.

बाहेर मुसळधार पाउस पडत होता.

घरासमोरच्या मंदिराच्या अंगणात काहीतरी चालू होतं. अंगणात त्याला कसलीतरी हालचाल दिसली. कि काळसर सावली होती.

त्याला अंधुक अंधुक काहीतरी दिसत होतं.

कोणतरी माणूस बसला होता. आणि त्या भागात चालत होता.

सिद्धुला आश्चर्य वाटलं. तिथे मंदिराचे गुरुजी सोडले तर कोणीच नसायचं. पण तो माणूस गुरुजी नव्हता.

सिद्धूने हे आधीही पाहिलं होतं.

सिद्धूचं डोकं पुन्हा दुखू लागलं. तो माणूस कोण होता सिद्धुला कळलच नाही, पण आता सिद्धुला कसला संशय आला.

सिद्धूचा चष्मा फुटला होता. तिथे कोण आहे, ते पाहण्यासाठी त्याने छत्री घेतली आणि तो बाहेर पडला.

“कोण आहे रे तिथे?” सिद्धू एक एक पाऊल पुढे टाकत होता. मंदिर जास्त दूर नव्हतं. तो दारात गेला. अंगणावर पत्र्याची shade मारली होती. सिद्धूने छत्री बंद केली. आणि आत जाऊन त्याने आजू बाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. तो पुन्हा पुन्हा फिरून तिथे काय होतं ते शोधू लागला.

बराच काळोख होता. रस्त्यावर lights होते. पण पाउसामुळे साधी रात्रपण भयानक वाटत होती. धो धो पाउस कोसळण्याचा आवाज येत होता.

सिद्धू आवाज कसला येत होता ते पाहण्यासाठी अंगणाच्या बाजूच्या hall मध्ये गेला. कडी उघडली. आणि आत गेला. hall मोठा होता. कडी उघडायचा आवाज आतून दोन वेळा reflect झाला. सिद्धू आत गेला. आत जाऊन त्याने सगळीकडे फिरून पाहिलं आहे का ते. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आतमध्ये थोडा कमी येत होता. तो hall उंच तिथे असल्याने आवाज खूप घुमत होता. सिद्धूने hallची कडी न लावता आत जाऊन सगळीकडे फिरून check कोणी आहे का ते. पण काही खिडक्या उघड्या होत्या. त्यातून दुरून येणारा बाहेरच्या road-lamps चा प्रकाश आत ये होता. तो सोडून काहीच प्रकाश तर तिथे नव्हता. पण तरीही सगळं दिसत होतं.

सिद्धू तिथे फिरला. खिडक्यामधून बाहेरही सिद्धुला कोणीच नाही दिसलं.

सिद्धू मागे वळला, इतक्यात अचानक. . .

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

एक माणूस त्याच्यासमोर दरवाजाजवळ उभा होता. . .

सिद्धू एकदम दचकुन उडून मागे पडला.

“whoa !. . . easy bro. easy. it’s only me. take it easy. मी आहे”.

सिद्धुच्याच वयाचा किवा एखाद वर्ष मोठा एक मुलगा त्याच्या मागे उभा होता. घारे डोळे. कुरळे केस. बराच handsome. वजन आणि height ही बरीच होती. त्याने काळ shirt आणि dark blue jeans घातली होती. तो सिद्ध्याकडे बघत त्याला शांत करत म्हणाला. तो दरवाज्यासमोर उभा होता.

दोघांचा आवाज हॉलमध्ये घुमत होता.

“तू इथे काय करतोय?”, सिद्धू म्हणाला.

“मी इथे side ला मका भाजत होतो. “, तो अनोळखी मुलगा म्हणाला.

त्याच्या हातात मका वैगरे काहीही नव्हतं. “म.मम्म . मका? कुठे आहे मका?”, सिद्धू गोंधळून बोलत होता. थोडा घाबरला होता. आणि त्याचा आवाज कांपत होता. त्याची छाती थोडी थोडी धडधड करत होती.

“खाल्ला”, नजरेने हसत तो सिद्धुला म्हणाला, “अरे यार इथे आत्ता रात्री २ वाजता मक्याचं कणीस कुठून मिळणार? खरातर हे चुकीचं आहे. मका important आहे. मिळायला पाहिजे. रात्र असली म्हणून काय झाली”. असा बोलून तो हसू लागला. आणि मागे वळून सरळ चालत गेला.

तो असा बिनधास्त होता, जसा जगाचा मालक आहे. मोठ्याने picture ची गाणी बोलत होता. आणि मागे वळून रस्त्याच्या बाजूला दोन पाऊले धावत जाऊन आणि मग पुन्हा मागे येत होता.

“मका मिळायला पप.पाहिजे? म म्म म्हणजे?”, सिद्धू विचार करत होता कि हा काय बडबड करतोय. अजूनही त्याला भीती वाटत होती.

तो सिद्धुकडे वळला. “म्हणजे? म्हणजे वाघाचे पणजे. पण तू मला बघून घाबरलास का? कधी handsome मुलाला पाहिल नाहीस काय?”

“नाही तसं नाही, पण मला वाटलं कि. कि . कि ” सिद्धू पुढे कसं बोलू हा विचार करत होता.

“कि भूत आहे”, त्या मुलानेच वाक्य पूर्ण केलं.

“हो”

“अरे यार. भूत कधी असं गाणी बोलत काय? मी मुलगा आहे. मु ल गा. बॉय. बी ओ आय. बॉय.”, तो मोठ्याने म्हणाला.

“बोय चा बी ओ वाय असतो”, सिद्धू अजून पण घाबरत होता.

हॉलच्या बाहेर विजा पडत होत्या.

“अरे यार. तू भावनाको समझ. तुला शंका असेल तर मी मुलगा असल्याचा प्रूफ दाखवू शकतो”, आणि तो पोरगा मोठ्याने हसला.

दोघांचा आवाज हॉलमध्ये घुमत होता.

सिद्धू अजूनही त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहत होता.

“तिच्च्या आयला. मी इतके jokes मारतोय. एकदा तरी हास. हसणं फ्री असत. खर्च लागत असता तर आपण चोरी केली असती”, असा बोलून तो अनोळखी मुलगा स्वतःच मोठ्याने हसत होता.

“शेवटी न राहवून सिद्धू म्हणाला. तू कोण आहेस? तू काय बोलतोय मला काहीच कळत नाहीं आहे”.

अजूनही खूप पाउस कोसळत होता.

“अरे बाबा. मका वैगरे काही नाही. मी तर असाच time-pass करतोय. मी sideला धार मारायला गेलेलो. मंदिर आहे म्हणून. नाहीतर इथेच मोकळा झालो असतो. आधीच आकाशातून इतकं पाणी पडतंय. माझ्या थोड्याश्या पाण्याने पूर तर नसता आला? कोणाला काय कळला असतं?”, तो मुलगा पुन्हा मोठ्याने हसला.

आता हा एक थोडा टपोरी, पण normal मुलगा आहे हे कळल्यावर सिद्धूची भीती गेली आणि सिद्धूपण नकळत खूप वेळाने किवा खरतर दिवसांनी थोडासा हसला. .

“हा. हे ठीक आहे. हसल्यावर बरा दिसतोस. by the way. तू इथे आत्ता काय करतोयस?”, तो म्हणाला.

“हे मी तुला विचारायला पाहिजे”, सिद्धू म्हणाला.

“मग विचार”, त्याने दोन्ही हात वर करत झटकन उत्तर दिले.

सिद्धू हसला, “बर. आता सांग. तू कोण आहेस?”

“मी भूत आहे”.

सिद्धू त्याच्या तोंडाकडेच पाहत बसला.

“अरे बघतोय काय? मी भूत नाही. मी चिन्मय आहे.”

तरीही सिद्धू तसाच बघत होता.

“hellow. काय बघतोय? मी माणूस आहे. साला फाट्या आहे रे तू”, तो मुलगा म्हणाला.

“घाबरत नाही आहे. मी विचार करतोय कि तू वेडा आहेस कि काय”. सिद्धू म्हणाला.

“येडा तो मै हुं. बचपनसे. तू इथे काय करतोयस?”

“तू इथे आरडा ओरड करतोय आणि मला विचारतोस? मी समोर राहतो. तुझा आवाज ऐकून इथे आलो. तू तुझी ओळख सांग”.

“मी. तुझा मित्र समज.”

“माझा कोणी मित्र नाही”, सिद्धूने गरज नसताना अनोळखी मुलाचा अपमान केला.”आणि तसंहि मी तुला ओळखत नाही”, सिद्धू चुकून अजूनही हुंदके देत होता.

“काय rude आहेस यार! ओळखत नसलास म्हणून काय झाल? अनोळखी मित्र म्हण मला.”

सिद्धू आधीच खूप वैतागला होता.. “तू बऱ्या बोलाने गोंगाट नको घालूस. गाणी वैगरे काय? ही काय वेळ झाली? हेच सांगायला मी इथे आलो.”

चिन्मयचं लक्ष सिद्धूच्या बोलण्याकडे नव्हतं. तो कमी प्रकाशात सिद्धूचा चेहेरा न्याहाळत होता. “अरे तुझा चेहेरा. आणि पाय.. अरे बापरे. तुला तर लागलंय रे. चेहेरा, डोळा सुजलाय. काय झाल? तुला मारलं कोणी?”, सिद्धूचं बोलणं मध्येच तोडत अनोळखी मुलगा म्हणाला.

“त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे काय?”

“मला सांग मी तुझी मदत करतो”

“ओळख न पाळख, लोकमान्य टिळक. तू काय मदत करणार. thanks a lot. आता मी जातो माझं डोकं दुखतंय. आणि तू माझी काळजी नको करूस. मला सवय आहे मार खायची”. सिद्धू केविलवाणा होऊन म्हणाला. त्याला आवंढा आला.

अनोळखी मुलाला वाईट वाटलं. “तू यार असं काय बोलतोय? काय झालं मला सांग”.

“का? तुलापण दया आली माझी?”

“तू का काळजी करतोय? तू सांगून पहा. उपाय नक्कीच करू आपण. कोण आहे तो?”

“काही नाही उपयोग. त्याचा बाप खासदार आहे”, सिद्धू मान खाली घालत विचार करत म्हणाला.

“तिच्च्या आयला.. बाप MLA असला म्हणून काय त्याच्या बापाचं राज्य झालं का?”

“हो.. कॉलेज चा trusty आहे त्याचा बाप. आपण नाही करू शकत. त्याच्या बापाचंच राज्य आहे.”

तिथे बाजूला तीन चार खुर्च्या होत्या. “आधी तू मला संग तर काय झालं?”, आणि बोलता बोलता दोघे तिथेच असलेल्या दोन खुर्च्या घेऊन बसले. “main कोण आहे?”

“Main तो खासदाराचा पोरगा”, सिद्धूने उत्तर दिलं.

“आणि अजून?”, चिन्मय हनुवठीवर तळहात ठेवून बसला आणि ध्यान देऊन ऐकू लागला.

“अजून दोघ आहेत.”

सिद्धूने अनोळखी मित्राला सांगायची सुरुवात केली.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

सगळं सांगून झाल्यावर, “मला माझ्या नेहासाठी जास्त त्रास होतोय. मी तर आयुष्य एकट्यानेच काढलंय. माझं काही नाही पण..”, सिद्धू रडायला लागला.

अनोळखी मित्र चेहऱ्यावर दाखवत नव्हता पण त्याला सिद्धुसाठी खूप वाईट वाटत होतं. समोरून तो दाखवत नव्हता. “अरे यार, तू रडू नकोस. ते department पोरींकडे असतं. you be a man !”

“तुला नाही कळणार.” सिद्धू आवंढा गिळत म्हणाला.

“खरंच नाही कळणार. मी असा कधी कोणाचा मार नाही खालला. आणि मला जर कोणी तसं वागवलं जसं आदि तुला वागवतोय, तर माझ्या हातून murder पण होऊ शकतो. पोरं नाहीत का तुझ्याकडे? तो काय एकटा खासदार आहे का? तू दुसर्या आमदाराच्या हात धर“, अनोळखी मित्र हसू दाबत म्हणाला.

“नाही. माझ्या जीवनाचं ध्येय ते नाही. ”, सिद्धू खुर्चीवरून उठत म्हणाला.

“ओये मराठी पिच्चरके अल्लू अर्जुन. ध्येय वैगरे काय? आदिराजचा मार खायचा? बसून घे”.

“तू माझा अपमान करतोयस”

“अरे यार. अक्ख्या कॉलेजपुढे तमाशे झाले. आता अजून काय बाकी आहे?”, अनोळखी मित्र म्हणाला.

सिद्धूने मान खाली घातली.

“हे बघ सिद्धुया. माझं ऐक. आपण विचार करू आणि काही तरी करूया”.

“हा बस झालं. विचार करू म्हणे . तू ऐकून घेतलंस. मला बरं वाटलं. आता तू तुझ्या घरी जा. मी जातो माझ्या घरी. बाजूला मंदिराचे गुरुजी राहतात. ते आता उठतील. पाउस थांबलाय. पहाट होत आली आहे.”

सिद्धू उठून चालायलाच लागणार तेव्हा अनोळखी मित्र म्हणाला, “अरे यार. तुझा प्रोब्लेम काय आहे नक्की? साला स्वतः तर मार खल्लास. पोरीने पण तुझ्यामुळे तिच्या आईचा मार खालला. मी इथे चुत्या आहे जो तुझ्याशी मैत्री करतोय. आणि तू मला काय समजून तुझी स्टोरी आणि हे सगळं सांगतोय. मी तुझा मित्र आहे कि नाही?”

Fears lurking in the dark

“नाही”, सिद्धू त्याला पाठ दाखवून hall मधून सरळ चालत बाहेर पडत होता. नाही म्हणताना त्याने मागे वळून पण नाही पाहिलं.

“पण मला वाटलं कि आपण मित्र आहोत”, अनोळखी मुलगा म्हणाला.त्याचा चेहेरा पडला होता.

“तुला रात्र घालवायला time-pass पाहिजे होता. मला मन हलकं करायचं होतं. दोघांचं काम झालं. आणि राहता राहिला प्रश्न मैत्रीचा. तर ते सोड सगळं. एकटा रहा. सुखी राहशील.”, सिद्धू सरळ चालत होता.

“तू एकटाच आहेस. पण सुखी नाहीस. पुन्हा विचार कर.तुला वाटलं तर परत ये. मी इथेच असेन.”

सिद्धू hall बाहेर पडला. पहाट झाली होती. थंडी होती road-lights बंद झाले होते. थोडा थोडा प्रकाश पडत होता. बाबा उठले असतील का हा विचार करत सिद्धू रस्ता ओलांडू लागला.

आणि मध्येच थांबून एक दोन सेकंद विचार करून मागे वळून हॉलच्या दिशेने पळत गेला.

“बोल काय करायचं ? काय प्लान आहे?”, सिद्धू म्हणाला.

तो तिथेच खुर्ची मध्ये बसला होता. आणि कपाळाला हात लावून विचार करत होता. सिद्धुला पाहून म्हणाला, “यार खासदाराच्या पोराचा बंदोबस्त करायचा उपाय पाहत होतो. तुझ्यात guts असतील तरंच शक्य आहे.”

“काय करावं लागेल?”, सिद्धू म्हणाला.

“मी तुला नंतर सगळं समजावतो.”

“नंतर कधी?”

“आज रात्री भेटूया इथे. आज मी विचार करतो.”, अनोळखी मित्राने उत्तर दिलं.

“इथ आषाढी एकादशी निमित्त आता वर्दळ वाढेल. शिवाय दिंड्या आणि पालख्या येतात”, सिद्धू थोडासा मोठ्याने बोलला. त्याचा आवाज हॉलमध्ये मोठ्याने घुमला.

इतक्यात हॉल चा मागचा दरवाजा वाजला.

अनोळखी मित्र दरवाजातून पळून बाहेर जात म्हणाला, “आज कोणी नसेल तर भेटूया. नाहीतर मला प्रोब्लेम होईल. मला आता बाहेर कामे आहेत. शिवाय घरी जाऊन आवरायचं आहे. office ला जायचं आहे. पाउस थांबला मी आत्ता घरी जातो.”

“तुझं नाव तर सांगून जा. आणि नक्की भेटशील का?”

“मी चिन्मय. हो हो. रात्री ये.”

मागचा दरवाजा उघडला. “कोण आहे? सिद्धू? तू आहेस काय?”

मंदिराचे गुरुजी होते.

“हो गुरुजी. मीच आहे. ”

“काय करतोय बेटा? आणि कोणाशी बोलत होतास?”

सिद्धूने गुरुजींना नमस्कार केला आणि वाकता वाकता म्हणाला, “स्वतःशीच बोलत होतो गुरुजी.”

“ठीक आहे”, गुरुजी पुढच्या दरवाज्याने पूजेसाठी निघून गेले.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

उपाय – एक अनोळखी मित्र – भाग ५ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

7 Responses

 1. Punam Salgarkar says:

  ha part khupach mast vatla….

 2. Shraddha kachi says:

  atta paryantchi story khup chan hoti??????

 3. madhuri says:

  Nice strory

 4. madhuri says:

  Nice story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *