सिद्धूची नेहा – एक अनोळखी मित्र – भाग ३ – Ek Anolkhi Mitra

Flop love story – एक अनोळखी मित्र – भाग २ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

तो पाउस थांबलाच नाही.

संध्याकाळी सिद्धू घरी आला. सिद्धूच डोकं खूप दुखत होतं. गेले काही दिवस दर थोड्याथोड्या वेळाने त्याचं डोकं धरायचं. डॉक्टरांनी औषध दिलं, पण काही असर नाही झाला. झोपायची वेळ तर तशी नव्हती. पण पडल्यापडल्या त्याला कधी झोप लागली त्याचं त्यालाच नाही कळल.

तो खूप वेळ झोपला. कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली. तेव्हा मध्यरात्र होती.

सिद्धू उठला.

पुन्हा कोणाची तरी चाहूल लागली.

बाबा बाजूला झोपले होते.

सिद्धूच्या घरासमोर एक विठोबाचं मंदिर होतं. त्या मंदिरासमोर एक अंगण होतं. त्या अंगणाला लागून एक भला मोठा hall होता. तो धर्मशाळेसारखा सर्वांना खुला होता. त्यात वारीला जाणार्या दिंड्या मुक्कामाला यायच्या. सिद्धूच्या घरात तर जास्त जागा नव्हती. तो त्या अंगणात किवा त्या hall मध्येच अभ्यास करत असे.

बाहेर मुसळधार पाउस पडत होता. अंगणात त्याला कसलीतरी हालचाल दिसली. कि काळसर सावली होती. कोणतरी मोठ्याने ओरडत असल्याचा आवाज होता.

त्याला अंधुक अंधुक काहीतरी दिसत होतं. त्याने चष्मा लावून पाहिलं.

कोणतरी माणूस बसला होता. आणि त्या भागात चालत होता.

सिद्धुला आश्चर्य वाटलं. तिथे मंदिराचे गुरुजी सोडले तर कोणीच नसायचं. पण तो माणूस गुरुजी नव्हता.

सिद्धूचं डोकं पुन्हा दुखू लागलं, आणि तो झोपून गेला. पण तो माणूस कोण होता सिद्धुला कळलच नाही, आणि नंतर तो विसरून गेला.

दुसर्या दिवशी सकाळ झाली.

पाउस थोडा उघडला होता. बरेच दिवसांनी उन पडलं होतं. विठोबाच्या मंदिरात गर्दी होणार होती. कारण आषाढी एकादशी येणार होती. वातावरण उत्साही होतं. पावसामुळे अंगण ओलंच होतं. अधूनमधून पाऊस यायचा आणि लगेच उन पडत असे. सिद्धूला थोडं बरं वाटलं. तो कॉलेजला जायची तयारी करू लागला.

वातावरणात खूप आनंद होता. typical पावसाळ्याचं वातावरण होतं. पण आज उन पडल्याने ते तर अजून सुंदर वाटत होतं. पक्षी आणि झाडे टवटवीत दिसत होती. रस्ते अजूनही ओले होते.

पण तरीही खूप दिवसांनी पाऊस थांबला होता. सिद्धूच्या आतलाही, आणि बाहेरचाही.

सिद्धू कॉलेजला गेला.

आज नेहा सिद्धूच्या आधीच क्लासरूम मध्ये आली होती.

नेहा. . ती एक अतिशय गोड मुलगी होती.

ती चाफेकळी सारखी नाजूक होती. सरळ नाक, टप्पोरे काळेभोर डोळे. गुलाबासारखे ओठ आणि दुधासारखा रंग. आणि हो अभ्यास करून करून लागलेला भलामोठा चष्मा. तो चष्मा गालापर्यंत मोठा होता. तो कधीकधी ती घालायची. नेहमी काजळ लावायची. नाजूक भुवया. थोडासा गोलसर चेहेरा. कमरेइतकी झुलुपे, त्यांची ती कधी तरी वेणी घालायची. ती वेणी. सरळ कंबरबांधा. पण उंची फार जास्त नाही आणि फार कमीदेखील नाही. dressing म्हणाल तर, कधीतरी जीन्स, पण जास्त करून साधे पंजाबी dresses. कधीतरी हिल्स, पण एरवी matching footwear. तिला dressing चा sense जबरदस्त होता. कानात आवर्जून डूल, आणि हातही कधी मोकळे नसायचे.

ती अतिशय हुशार होती. दहावीत शाळेत दुसरी आली होती.

तिच्यात असं काहीच नव्हतं जे कमी आहे. तिच्याकडे कोणीही पाहून कोणीही मुलगा मोहित झाला असता. म्हणून तिच्या मागे पोरांची रीघ असायची. त्यात आदिसुद्धा होता. Normally, सुंदर मुलींना खूप त्रास होतो. मुलं त्रास देतात. आणि कधी कधी त्यांचाच अहंकार त्रास देतो. पण नेहामध्ये अहंकार नव्हता. ती खूप सहन करायची. स्वभावतःच शांत आणि नम्र होती. तिचा आवाज २० डेसिबलच्या वर नाही जायचा. आणि तिचा स्वर खूप मंजुळ होता.

तीही कधी जास्त कोणात मिसळत नसे.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

Lecture सुरु होण्यासाठी काही वेळ बाकी होता. वर्गात फार लोक नव्हते. नेहा तिच्या एका मैत्रिणीसोबत बसली होती. सिद्धुला पाहून तिचा चेहेरा खुलला. त्याच्या ते का लक्षात येत नसे कोणाला माहित?

कदाचित न्यूनगंड…

तिथे जास्त कोणी नाही आहे हे पाहून नेहाने विषय काढला. नेहा सिद्धूजवळ येउन म्हणाली, “सिद्धू, एक काम होतं तुझ्याकडे”.

“हा बोल न”. सिद्धूची छाती १०००० rpm ने फिरणाऱ्या मोटार सारखी.धडधडधडधडधड

“Integration शिकव. आणि matrix सुद्धा. काही problems नाही सुटत आहेत”.

“ठीक आहे. शिकवेन. पण कधी?”, सिद्धूचा आवाज कापत होता.

“तू म्हणशील तेव्हा. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळच वेळ आहे”, नेहाने गोड स्मित केलं.

ती समोरून approach करत होती, आणि ह्या माठ्याला काहीच कळत नव्हतं.

“चालेल. आज? पण कुठे?”

“जिथे आपल्याला कोणी disturb नाही करणार.”

“एक काम करूया हे lecture संपलं कि library?”

“नको, तिथे खूप लोक असतात”, नेहाने मनातल्या मनात हसून म्हटलं.

“असू दे न. आपल्याला काय? उलट library मध्ये शांतता असते”, सिद्धू म्हणाला.

“अरे हो. पण आपल्यामुळे त्यांना disturb नाही का होणार”. नेहाने मनात विचार केला, ‘हा अजून खूप निष्पाप आहे. ह्याला कसं कळत नाही कि मला जी गणितं सोडवायची आहेत ती ह्या पुस्तकात नव्हेत’..

“अरे हो. खरं आहे.. तुला सांगताना मला बोलावं लागेल. इतर लोक वाचत असतील, त्यांना त्रास होईल.”, सिद्धया झंडूर म्हणाला.

“आपण एक काम करू. lecture संपल्यावर fourth-floor ला जाऊया. तिथे कोणीच नसतं. एखादा classroom मध्ये अभ्यास करूया”.

“ठीक आहे”, सिद्धू म्हणाला.

lecture खूप वेळ चाललं. रिंग झाली. सर ‘उरलेला भाग नंतर सांगूया’, असं बोलून निघून गेले.

नेहाने सिद्धुकडे पाहिलं. “चल जाऊयात?”

“हो ठीक आहे. tiffin?”

“तिथेच.. चालेल न ?”

“बर”, सिद्धू पुस्तके bag मध्ये भरत म्हणाला.

दोघे बोलत बोलत चौथ्या मजल्यावर पोचले. third floor biotech चे department होते. आणि fourth floor वर एकही classroom मध्ये दुपारी २ नंतर कोणीही नसत. तिथे computer science चे क्लासेस होते. तिथला एक रूम तर कोणी वापरतही नसे. नेहाला हे माहित होतं.

नेहु आणि सिद्धू त्याच रूम मध्ये गेले. सिद्धू तिच्याकडे वर नझर करून पहातही नव्हता. नेहामात्र त्याच्या घार्या मादक डोळ्यातून स्वतःचे काळेभोर टपोरे डोळे हळूच देत नव्हती. ती सिद्धूचा रेखीव देखणा चेहेरा अशी न्याहाळत होती कि संपूर्ण आयुष्य तिला तेच करायचं होतं.

कि जशी एखादी भ्रमरी असावी जी फुलावर बसली. नेहाच मन तसं सिद्धूवर बसलं. कि जशी चकवी असावी जी मेघाकडे पहावी. तशी ती सिद्धुकडे पाहत होती.

सिद्धू तर सिद्धूच होता. त्याला नेहाचं मन लक्षात येतच नव्हतं. आणि खरतर त्याचा हाच साधेपणा नेहाला आवडत असे.

सिद्धूने एकदोन pages आणि maths ची बुक काढली. नेहाने सांगितलं, “माझ्या बुक मध्ये सोल्व कर. मी ते घरी जाऊन रेफर करेन”.

“सम्स काढ. सोल्व करू”, सिद्धूपण विचलित होता.

“४५ आणि ४६ पेज काढ”, नेहा द्विधा मनस्थितीत होती. बोलू कि नको बोलू. बोलू कि नको बोलू. बोलू कि नको?

“see Neha. what we need to do is, firstly understand derivation. derivation and integration are exactly opposite to each other. see s square is equal to 2x. and.. and..”

नेहापण scholar होती. तिला ते सगळं येत होतं. आता तिच्यापुढे प्रश्न होता कि सिद्धूला मनातील गोष्ट कशी सांगू.

सिद्धूने नेहाचं बुक उघडलं, “नेहा. तू तर सगळे सम्स already सोल्व केले आहेस”.

“सिद्धू. मला येतं रे integration”.

“derivation ?”

“हम्म..”

“मग घरी जाऊयात?”, सिद्धू म्हणाला.

नेहाने कपाळावर हात मारला. घरी जायचं नाव काढल्यावर मात्र नेहुडीचा आपा गेला. “किती साधा आहेस रे. . अरे मी तुला इथे ह्यासाठी नाही घेऊन आली. का रे तुला कळत नाही”.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“अरे नाही… कळलं मला. तुला नक्कीच physics येत नाही. बरोबर न? मला सगळे तेव्हाच याद करतात. नाहीतर मला जास्त कोण विचारत नाही”.

“मी विचारते तुला. . मी गणित शिकायला नाही इथे आणलं तुला.कसं रे तुला कळत नाही?”, पुढे नेहाला काहीच बोलवत नव्हतं..

दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले. तिथे जो संवाद झाला, त्याचं वर्णन कसं करू?

कि तिथे शब्द नाहीत, पण संवाद आहे. ते दोघे एकमेकांकडे असे पाहत होते, कि जसा खूप दिवसांनी जिवलग मित्र भेटतो. कि जणू समग्र जीवन त्याच व्यक्तीची वाट पाहत होते. कि क्षणाची.

अस्थिर वणवा बनून जंगलेच्या जंगले जळणारा अग्नी एक छोटीशी शांत स्थीर ज्योत बनून जगाला प्रकाश देतो, तसा त्यांची निर्मळ आणि चंचल मने एकमेकांत स्थीर झाली.

नेहाने लाजून खाली पाहिलं. नेहाचा भाव सिद्धुपेक्षाही जास्त गहन होता. पण व्यक्त करण्याची पद्धत मर्यादा लज्जेच्या रेश्मात किडा बनली. तिचे फक्त डोळे बोलत होते. आणि पाणी थांबत नव्हतं.

आता सिद्धूने माघार नाही घेतली.

“नेहा, तुला अंदाज पण नाही आहे तुझ्या आठवणीत आणि स्वप्नात मी एक एक दिवस कसा काढलाय. मला नाही माहित का, पण आता तूझ्याशिवाय माझं काहीच भविष्य मला दिसत नाही. माझंही ह्या जगात कोणीच नाही. मी तुझ्यात स्वताला बघतो. आणि इतक्या गर्दीत मला फक्त तूच माझी वाटतेस. तूच माझं प्रारब्ध आहेस. पण तू इतकी सुंदर, मी असा गरीब, म्हणून मी कधी हे बोलून नाही दाखवलं”, सिद्धूने मान खाली घातली.

गरिबीची बात ऐकल्यावर नेहाच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं, पण ते सिद्धुला दाखवू न देता नेहा म्हणाली, “अरे वेडोबा. तू गरीब नाहीस. तू फक्त… फक्त..” नेहाला काळेच न कि आता पुढे काय बोलावे, “थोडा लुकडा झंडूर आहेस आणि boring आहेस”, नेहा सिद्धुला हसवण्यासाठी बोलली.

“हा सगळे तेच म्हणतात. पण आता gym ला जाऊन body बनवेन मी. कारण आता fybcom च्या अलिया भट्टला पटवलं आहे मी”, सिद्धू म्हणाला. नेहुडी रडता रडता स्वतःच खुदकन हसली.

आता स्वतःला थांबवण शक्य नव्हतं आणि तिने पळत येउन सिद्धुला कचकचीत मिठी मारली.

नेहा आणि सिद्धू असे भेटले, जशी नदी समुद्राला भेटते. नेहाला नेहा कोण आहे आणि सिद्धुला सिद्धू कोण आहे तेही आठवेना. दोघांचे डोळे मिटलेले आणि सर्व व्यवहार थांबले.

थांबले नाहीत ते फक्त दोघांचे अश्रू.

कि गेल्या कित्येक जन्मांचा दाह होता, ज्याने दोघांची छाती अजून जळत होती, त्यावर कोणी गंगाजळ शिंपडल. दोघांना दरदरून घाम येत होता, आणि दोघांची शरीरे अंगावर आलेल्या रोमांचांमुळे फणसासारखी काटेरी दिसत होती.

ती गोरी बाहुली, आणि हा सावळा नाजूक सुकुमार.

सध्या शृंगारिक संसारिक प्रेमाची उपमा अशा संबंधांना नाही देत येत.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

खरंतर हल्ली मुलांना प्रेम म्हणजे काय हे शिकवण्याची गरज आहे. फक्त शारीरिक आकर्षणं, हे नैसर्गिक आणि महत्वाचं असलं तरी, पुरुषाचा पुरुषार्थ हा मर्यादेत आहे, आणि स्त्रीचं सौंदर्य हे समर्पणात आहे. पुढे कोणतीही कौटुंबिक अडचण येणार नाही, हे आधीच समजून घेऊन खूप समजून उमजून एकेक पाउल पुढे टाकत जाऊन, व्यवहार आणि धर्म सांभाळून जे पुढे जात नाहीत, त्याचं काही खरं नाही. हा विचार न करता फक्त शारीरिक आकर्षणाला बळी पडून संबंध जुळतील, तिथे तिथे Break-ups होत राहतील. मुलीला हे शिकवण्याची गरज आहे, कि तिच्या पतीशिवाय दुसरी ओळख नाही, आणि पुरुषाला पत्नीसोडून इतर माता, आणि भगिनीसमान आहेत, हि मर्यादा आहे. आणि तिचं उल्लंघन झालं कि माणूस माणूसपण हरवून बसतो.

सिद्धू आणि नेहु. त्यांच्या तर रेशमाच्या गाठी फार पूर्वीच बांधल्या गेल्या होत्या. त्या दोघांचे संबंध आणि मन तितकेच नाजूक होते, जितकी त्यांची कोवळी वये.

इतक्यात दरवाजा धडकन आवाज होऊन उघडला आणि त्यांची समाधी भंगली. दोघे बाजूला झाले.

लाल डोळे करून नागासारखा फुत्कार टाकत आदि समोर उभा.

“तुझ्या आईला.” आदिने सिद्धीला जोराने लाथ मारली. सिद्धू कोलमडला. नेहा “सिद्धू” जोराने किंचाळली. आणि आदिला धक्का देत सिद्धुला वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीराची ढाल केली. नेहावर आदि हात उचलू शकत नव्हता. तिला सिद्धुसाठी झटताना पाहून आदि चकित झाला.

“नेहा? तू आणि ह्या झा*सोबत? अरे ह्याला अजून चड्डी घालायची अक्कल नाही. you deserve a man, sweetheart. not a loser like this. यार तुम्हा पोरींना कधी अक्कल येईल रे. जाऊदे. तू फक्त बोल हा जबरदस्ती करत होता. ह्याला गायब करेन मी”.

“जो जबरदस्ती करतोय त्याला तू गायब करशील? नक्की?”, नेहाने विचारलं.

“तुझ्यासाठी काहीही करेन मी. तू बोल फक्त. अरे मी आदि आहे. आदिराज पाटील. तू बोल मी काय करू तुझ्यासाठी? ह्याचे हातपाय तोडू?”

“इथे जबरदस्ती फक्त तूच करतोय. स्वतःला का नाही गायब करत. किवा स्वतःचे हातपाय तोडून घे”.

जिथे प्रेम असतं, तिथे भीती नसते. नेहा आणि सिद्धू आदिकडे निःशंक होऊन असे पाहत होते, जसे त्याच्याकडे पाहण्याची हिम्मत कधी कोणी केली नव्हती.

“Oh my goodness! हा shot तर बघा. impossible यार. नेहा तू? आणि हा झंडू? oh f*ck. अम्या बरोबर बोलतो. पोरींना झा* अक्कल नसते. हे बघ नेहा. ह्याच्याकडे काहीही नाही. मी तुला सगळं काही देऊ शकतो. तू बोल फक्त. तुझा बोलणं पूर्ण होण्याच्या आत ती वस्तू देतो तुला. ह्याच्याकडे आहे तरी काय?”

“सिद्धूकडे नेहा आहे”, नेहा असं बोलली आणि सिद्धूच्या डाव्या हाताला तिने घट्ट मिठी मारली.

झालं. आदीचा तोल गेला. सिद्धुला त्याने दुसर्या हाताला धरून ओढलं. दुसऱ्या हाताला नेहा होती. तिला झटका बसला आणि ती जमिनीवर कोसळली. तिला पडलेली पाहून आदि एकदम दचकला. पण आता सिद्धूचा तोल गेला. एका bench चा लाकूड घेऊन तो आदीच्या दिशेने धावला. पण सिद्धू पडला थोडा अशक्त.

आदिला काहीही नाही झालं. उलट आदिने सिद्धुलाच खूप मारलं. नेहा खूप झटत होती. पण आदिपुढे त्याचं आणि तिचं काहीही चालत नव्हत.

“आदि. मी तुझे पाय धरते. सिद्धुला काहीही करू नकोस”, नेहा काकुळतीला आली.

“नेहा. तू बाजूला हो. ह्याने फसवलं आहे तुला. मी ह्याला सोडणार नाही.”, आदि म्हणाला.

मारत मारत त्याची वरात काढली. कॉलेज मध्ये सगळे तमाशे बघणारे जमा झाले. धक्के लाथा अन बुक्क्यांनी पुढे पुढे पडणारा सिद्धू. मागे लाथा घालणारा आदि. आणि दोघांच्या मागे रडत अडवायचा प्रयत्न करणारी बिचारी नेहा.

चौथ्या मजल्यावरून खाली.

मग अजून खाली.

मग दुसरा मजला.

सगळ्यात खाली येउन तिथून मजल्यावरून library च्या पुढून ground वरून gate पर्यंत तिघे आले.

खेळ करण्यासाठी जसा डोंबारी खेळ मांडताना आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोकांना जमा करतो, आदिने तसाच अक्खा कॉलेज गोळा केला. खूप तमाशे केले. शिव्या दिल्या. धमक्या दिल्या. नेहा रडून रडून थकली.

पोलिस आले. ते मध्ये पडले. पण constable ने PSI साहेबाच्या कानात सांगितलं, कि हा जयराज पाटलांचा मुलगा आहे. पोलिस थोडे बिचकले, तरीही मध्ये पडले. आणि आदिला उचलून घेऊन जाऊ लागले.

आदि थांबला. “परत नेहाच्या आजूबाजूला दिसलास तर मारून टाकेन तुला”, तरीही जाता जाता ओरडत होता.

आदि गर्दीतून वाट काढत निघून गेला.

तिथे नेहा आणि सिद्धूभोवती साठलेली गर्दी फक्त दुरून शांतपणे पाहत राहिली. नेहा पडलेल्या सिद्धुच्या छातीवर डोकं ठेऊन ढसाढसा रडत होती.

“नेहुडी, यार. तुला म्हणालो न. पुढच्या month मध्ये gym चालू करतो. ह्या गेंड्याला तर. . आहह. ”

नेहाचं दुःख कमी करण्यासाठी आणि थोडंस वातावरणाच गांभीर्य कमी करायला सिद्धू बोलायचा प्रयत्न करत होता. पण joke मारता मारता चुकून तो सभागती कण्हला.

नेहा सिद्धूचा अवेळी केलेला joke ऐकून “सिद्धू चल इथून दूर जाऊ. तुझ्या केसाला धक्का लागला तरी माझा जीव … ”

नेहाला मागून तिच्या आईने ओढलं.

“कार्टे, हुशार हुशार म्हणून इथवर शिकवली ते हे दिवस दाखवायला?” नेहाच्या आईने तिला सणसणीत कानफटात लावली. “भर बाजारात परक्या मुलाला हें असा? छिना* ” नेहाचं घर कॉलेज जवळच होतं. गर्दी मधील कोणीतरी तिला जाऊन चुगली केली.

“आई. तो परका नाही. “, नेहा खूप रडत होति.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“मला उत्तर देते? तुझा कॉलेज बंद. बाहेर येन बंद करते थांब . कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली कार्टीने”, आई केस ओढत शिव्या देत मारत नेहाला खेचत घेऊन जात होती.

“आईग . आ. . सोड मला”, नेहा रडत धडपडत पुन्हा पुन्हा रडत सिद्धुकडे पाहत होती. तिचा उजवा आणि सिद्धूचा डावा हात सुटला.

आणि सिद्धू. .

पुन्हा एकदा. .

तो कॉलेजच्या गेटजवळ धुळीने माखलेला तोंड फुटलेला तसाच पडून होता. कोणी त्याला उठायला हातही देत नव्हता. सगळे त्याची कीव करत होते. पण कदाचित आदित्य एका मोठ्या बापाची औलाद असल्याने त्याला घाबरून, कि ‘आपल्याला काय करायचं’ ह्या भावनेने ते माहित नाही; पण गर्दी फक्त बघत होती. एक दोन हळव्या मनाचे लोक सोडले, तर बाकी सर्वे तर बघेच होते.

सिद्धू नंतर कण्हत कण्हत स्वतःच उठला. चष्मा फुटला. तो फेकून दिला. त्याने त्याचं कॉलेजचं दप्तर उचललं.ते थोडं दूर पडलं होतं. झटकलं. त्यातून पाण्याची बाटली काढून थोडं पाणी तोंडावर मारलं. आधी लाल आणि मग साधं पाणी त्याच्या चेहऱ्यावरून घरंगळत जमिनीवर पडलं. बघणार्यांना कळून चुकलं, कि तमाशा संपला आहे, आणि तिथली गर्दी हळू हळू बिथरू लागली.

आणि सिद्धू पुन्हा एकटा.

उठला. एकांतात गेला. खूप रडला.

ते फुल उमलण्याच्या आधीच कुस्करल. ते स्वप्न जे खरं झालं होतं, तोच पहाटेचा अलार्म झाला.

सिद्धू घरी गेला. बाबा अजून कामावरून आले नव्हते.

त्याचा आपा गेला होता. त्याने भयानक संताप केला. त्याला आदिपेक्षा स्वतःचा जास्त राग येत होता. स्वतःच्या दुबळेपणाला तो पूर्णपणे कंटाळून गेला होता. त्याने घरात खूप आदळआपट केली. मानसिक संतुलन गेल्यासारखा तो मोठ्याने रडत होता. भिंतीवर डोकं आपटून घेतलं. त्यामुळे त्याचं कपाळ फुटलं.

समोरची कपाटाचा आरसा.

त्यात तो स्वतःला बघत होता. कि एका झंडूरला? पण तो एका अशा पिंजऱ्यात अडकला होता, जिथे तो आला कुठून तेही माहित नाही, आणि बाहेर कसं पडायचं तेही त्याला कळत नव्हतं.

त्याने स्वतःला कसं पाहिलं? जसं आरशात त्याचा शत्रू उभा आहे. आणि तो स्वतःच स्वताची कीव करतोय. स्वतःच्याच जखमांना पाहून स्वतःच स्वतःला उपहासाने हसतोय. त्याने स्वतःच्या रडून लाल झालेल्या आणि मार लागल्याने सुजलेल्या डोळ्यांना पाहिलं. त्याने फाटलेल्या शर्टाला आणि मळलेल्या कपड्यांना पाहिलं. कि ते निर्जीव असूनही त्याची साथ सोडताना त्याला दिसले. साथ देणारी तर नेहुडी होती. त्याने स्वताच्या जखमांत तिच्या वेदनांना अनुभवलं.

आता त्याला सहन झालं नाही. त्याने त्याच्या हातात जे काही होतं ते धाडकन आरशावर फेकून मारलं.

ठाण करून मोठ्याने आवाज झाला आणि त्या आरशातील शत्रूचे तुकडे तुकडे झाले.

पण ह्या loser कडून काय होणार? रामायणातल्या महिरावणाप्रमाणे, जसे रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवीन महिरावण यायचा, तसा आता इथे जमिनीवर बिथरलेल्या काचेच्या प्रत्येक तुकड्यातून अनेक शत्रू सुद्धुला पाहू लागले. आणि हिणवू लागले.

पुन्हा हरला. अराशापासून आणि स्वतःपासून.

नेहाचा विचार करून तर तो बिनपाण्याच्या मासोळीसारखा तळमळत होता.

रडला. पडला. स्वतःला दुखावून घेतलं. खूप रडला.

शेवटी थकला.

त्याचं डोकं खूप दुखू लागलं. खूप जास्त. . .

त्याला अचानक खूप झोप येऊ लागली.

झोपी गेला.

मित्रहो. .

मी हि कथा लिहिताना खूप विचार केला. पण सिद्धूला होणारा त्रास आहे, त्याला जबाबदार कोण?

तत्वज्ञान म्हणतं, कि स्वताच्या बाबतीत जे काही चांगलं किवा वाईट होतं त्याला सज्जन कधीही दुसरा जबाबदार असे म्हणत नाही.

पण कधीकधी नीती आणि तत्वज्ञान अर्थ लावण्याच्या दृष्टीने खूप कठीण जातं.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

एक अनोळखी मित्र – एक अनोळखी मित्र – भाग ४ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

7 Responses

 1. Vivek Salunkhw says:

  Story ekadam bhari ahe lavalar pudhacha part taka ?

 2. Punam Salgarkar says:

  Nice story……pudhe vachayla aavdel..

 3. Krishna Shinde says:

  FABULOUS

 4. rohit says:

  1no. Story ahe mala avdli phudcha part lavkr taka

 5. Tushar Dalvi says:

  बकवास. नेहमीच्या साऊथ सिनेमात असलेल्या routine romantic कथे प्रमाणेच याही कथेत पात्र रंगविली गेली आहेत. यात प्रेम भावनेच्या पैलूंना फक्त एखादया शत्रूच्या आणि मित्रत्वाच्या ठराविक नियमांचा आधार दिला आहे. प्रेमाच्या आणखी उदात्त भावनांची मोकळीक दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *