Flop love story – एक अनोळखी मित्र – भाग २ – Ek Anolkhi Mitra

अपयशस्वी – एक अनोळखी मित्र – भाग १ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

आदिने कानफाडल्याच्या नंतर सिद्धू लंगडत लंगडत कसाबसा कॅन्टीनपर्यंत गेला. तिथे wash-basin पाशी गेला. सगळे लोक वाळीत टाकलेल्या कुष्टरोगी माणसासारखे त्याच्याकडे पाहत होते. सिद्धूचा डोळा सुजला होता. आणि पायाला मार लागला होता. अक्याने लाथ मारल्यामारल्या तो खाली पडला तेव्हा त्याचं ढोपर फुटलं.

सगळ्यात मोठी जखम तर आत्म्याला झाली होती.

त्याने अंगावरची शक्य तेवढी धूळ झटकली. पण स्वाभिमानाला लागलेला मळ कसा धुवावा?

असा तो घरीही जाऊ शकत नव्हता.

त्याचा आवाज रडवेला झाला होता. कसाबसा त्याने दाटलेला कंठ रोखून आवंढा गिळला होता.

तो तिथून बाहेर पडला.

त्याला दूर जाऊन रडायचं होतं. त्याने रस्ता धरला. तो दूर गेला. इतका दूर कि त्याचा आवाज कोणीच ऐकणार तिथे कोणीच नसेल.

कि तो स्वतःपासून दूर जात होता? कि वास्तवापासून?

तो ४ किलोमीटर दूर चालत गेला. खाडी होती. तिथे एक bridge होता. त्याच्या मनात वारंवार विचार येत होता, कि आत्महत्या करावी. पण त्याच्या नंतर वडिलांचं काय, हाच विचार तो करत होता.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

खूप रडला. संध्याकाळ झाली. सूर्य पण त्या looser ची रडारड ऐकून पकून गेला आणि निघून गेला.

मध्यरात्री तो त्या जागेवरून उठला. लंगडत लंगडत घरी पोचला. बाबा झोपले होते.

त्याच्याकडे चावी होती. अलगद दार उघडून तो अंथरुणावर जाऊन पडला. चादर अंगावर घेऊन त्याने निक्षून सगळे शरीर झाकले. जेणे करून बाबांना त्याला लागलय ते दिसू नये. बाबा गाढ झोपले होते.

तो फक्त अंथरुणात पडल्या पडल्या हळू हळू हुंदके देत होता.

पहाटे बाबा कामाला निघून गेले आणि मग त्याला झोप लागली. थोडाच वेळ झोपून तो उठला. अजूनही कण्हत होता. चेहरा सुजला होता. आता तर काल पेक्षा जास्त त्रास होता. मुका मार बसला होता. त्याने शरीर आमल.

आता घरात तो एकटाच होता. थोडा बर्फ घेऊन तो जखमा शेकवत होता. त्याच्या आत आग लागली होती. मनात सूड राग आणि द्वेष तर होता. शरीरात नव्हती ती म्हणजे फक्त शक्ती.

काही दिवस गेले. सिद्धू थोडा सावरला होता. कॉलेज तर regular चालू होतंच.

ते पावसाळ्याचे दिवस होते. एकदा सिद्धू चे बाबा त्याला विषय काढून म्हणाले, “सिद्धू, बेटा. मला बाहेर जायचं आहे. तू जर दोन दिवस राहशील का?”

“ठीक आहे. पण बाबा, असा अचानक का ओ ?”

“मी चाललोय गावी. मोठ्या काकीची तेब्येत खूप खराब होत आहे. मला जाऊन यायला पाहिजे.”, बाबांनी उत्तर दिलं.

“ठीक आहे. “, सिद्धू कॉलेजची bag भरता भरता म्हणाला.

नेहमीप्रमाणे अक्या आणि आदी गेट वर सिगारेट ओढत बसले होते.

“दिपू. झन्डुर आला. घेउ चल. खूप दिवस ह्याचा balance बाकी आहे. थोडे टोचण देऊ.”, आक्या म्हणाला.

तो पर्यंत, “ओय student of the year. इकडे ये रे”, आदिने सुद्धुला हाक मारली.

सिद्धू घाबरला. आणि त्याने मान खाली घातली.

“अरे सोड त्या झंडऱ्याला. ती f.y.b.com ची अलिया भट्ट आली बघ.”, दीपक म्हणाला.

सगळा group दुरून येणाऱ्या नेहाकडे पाहू लागला. नेहाला माहित होतं कि ते काय लायकीचे आहेत. तिने मान खाली घातली.

“तेरे नखरे ही कमाल, उमर ही सोला साल. . ” आक्या दिप्याचा अक्खा group गाणं बोलत होता आणि नेहाकडे पाहत होता आणि मोठ्याने हसत होता. नेहाने नझर खाली घातली आणि निघून जाऊ लागली. शक्य तितक्या घाईने.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

सिद्धूने ते पाहिलं. आपण जिच्यावर प्रेम करतो तिची इतर मुलं छेड काढत आहेत, हे सिद्धुला सहन नाही झालं.

“तुम्हाला लाज नाही वाटत? कशाला तिला रोज त्रास देता?”, सिद्धूने daring केली.

“आईची गां*. अरे हा बघ. झन्ड्रू तर hero बनतोय”, दीपक म्हणाला आणि मोठ्याने हसायला लागला.

आदी railing वरून खाली उडी मारून पुढे आला, आणि सिद्धूच्या हडकुळ्या खांद्याला धक्के देत पुढे पुढे येत म्हणाला, “काय रे झा*, दम आला तुझ्यात? पोरीसामोर हिरोगिरी करतोस? त्यादिवशीचा सोट्या विसरलास काय?”, असा बोलून खाडकन त्याने सिद्ध्याच्या कानफडात आवाज काढला. आणि सिद्धू खाली पडला.

त्याच्या दोन्ही डोळ्यातून घळघळा अश्रू येऊ लागले. पुन्हा एकदा लोक जमा झाले. पण ह्यावेळी मात्र नेहा दुरून बघत नाही बसली. ती धावत आली आणि तिने सिद्धूला सावरलं.

“ओ हो. इसका मतलब… आग दोनो side मे लगी ही भाऊ.”, शैलान म्हणाला. शैलान झटकन पुढे आला आणि सर्वांनी तोडपानी चालू करायच्या आधी त्याने सर्वांना अडवलं.

“छोड न भाई. अरे यार साला आधीच अर्धा मेलाय. आजून काय मारतो भाई त्याला”, शैलान आदिला थांबवत म्हणाला.

अमित पण दुरूनच म्हणाला, “आदि. गुंडाळ.. पोरीसमोर impression ची IZ नको करूस”.

“तू भेट नंतर “, आदिने दम दिला.

आदि, अक्या, दीपु, शैलान, अमित असा त्यांचा पाच सहा जणांचा group होता. त्यात शैलान मोहोम्मद थोडा हळवा होता. आणि अमित त्यांच्यात शांत होता. बाकीचे तर हवेतच असत.

ती पोर मागे वळली. आणि निघून गेली.

इथे नेहाने सिद्धुला उठवलं. ती काहीच बोलत नव्हती, पण तिचे डोळे शांत बसत नव्हते.

तिने ओढणीने सिद्धूचा हात पुसला. सिद्धूला वाटत होतं कि ते स्वप्न आहे कि खरं. ती काहीच न बोलता निघून गेली.

सिद्धुला आता आकाश दोन बोटे उरलं होतं. तो खूप खुश होता. आणि पहिल्यांदा त्याला स्वतःवर झालेली दादागिरी आवडत होती.

तो घरी आला. आणि त्याने निश्चय केला कि, दुसर्याच दिवशी तो नेहाला त्याच्या भावना बोलून दाखवणार. ती रात्र त्याने जागूनच काढली. त्याच्या मनात खूप उत्साह होता.

तो नडला सुद्धा.

त्याने एक फुल घेतलं. विचार केला जे होईल ते होईल. आता बोलूनच टाकू. तो कॉलेजमध्ये library पाशी गेला आणि नेहाला शोधू लागला. ती कुठेच दिसेना.

इतक्यात “अरे झंडूर. तू काय करतोय?”, मागून शैलानचा आवाज आला.

“मी. मी. मी काही नाही ते. ते मी . मी . “,

“अरे ए चू*, मांजरीसारखं मी मी काय करतोय?”, शैलान म्हणाला.

“अरे भाई, मांजर म्याव म्याव करते”, शैलानचा एक पंटर म्हणाला.

“माझी मांजर मी मी करते. तुला काय problem आहे?”, शैलान cool attitude ने म्हणाला.

“नाही”, पंटर ने उत्तर दिलं.

“मग चल. एड**. निघ” , शैलान पुन्हा सिद्धुकडे वळला, “बोल रे. कुठे चाललाय?”

“मी कुठे नाही. मंदिरात चाललोय.”, सिद्धूने तडकाफडकी उत्तर दिलं.

“मंदिरात लाल गुलाब घेऊन? तेही असा कॉलेज मधून? कोणता मंदिर?”

“ते ,ते आहे एक ते हे आपलं”

“माझ्या चेहेर्यावर लिहिलंय काय मी चू* आहे ? खरं बोल? त्या fybcom ला शोधतोय न?”

“हो”, सिद्धूने खाली पाहत उत्तर दिलं आणि तो आतून घाबरला.

“अरे यार. झंडू ऐक. काय नाव तुझा?”, शैलानने चेहेरा पडून विचारलं.

“सिद्धू”

शैलान मोहोम्मद हळवा मुलगा होता. आदि आणि अमित आणि इतर लोक सिद्ध्याला जसा सिद्धुला त्रास द्यायचे, ते त्याला खरंतर मनापासून आवडत नसत. तो आदिला नेहमी अडवत असायचा. पण कधी कधी त्याचा नाईलाज होत असे. पण त्यांच्यात राहणारा फक्त तोच होता, जो जरा बरा होता.

“हे बघ सिद्धू. अपनेको पता है तेरा love है उसपे. पण मी जे सांगतोय ते ऐक नीट. ती land-rover car आहे, आणि तुझ्या cycle ची हवा puncture. ती तुला हो बोलेल हे डोक्यातून काढ. साला पोपट होईल तुझा. त्या दिवशी तू थोडी हिरोगिरी केली म्हणून काय लगेच असा समजू नकोस कि ती तुझ्यावर फिदा झालीये.”

सिद्धूचा चेहेरा पडला. शैलानलासुद्धा अस दुखवायचं नव्हतं. पण त्याच्याकडे दुसरा option नव्हता.

शैलान त्याच्या चमच्यांना बोलला, “पंटर लोक कमी व्हा. ”

“अरे भाई काय झालं?”, दुसर्या पंटरने विचारलं.

“मी तीन पर्यंत मोजेन, एक. . ”

“अरे नाही नाही चाललो. “, पहिला पंटर बोलला आणि दोघे निघून गेले.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

शैलान बोलू लागला, “हे बघ सिद्धया. मी काय बोलतोय ते ऐक. तो आदी माहित असेल तुला. खासदाराचा पोरगा. त्याला fybcom पाहिजे. तू मध्ये नको येउस. त्याने कालच तुझा game केला होता. आदिला मी अडवलं म्हणून वाचलास तू. आत्ता जर तुला त्यांनी पाहिलं असतं तर तुझे हातपाय तुटले असते.”

“मी नाही घाबरत त्या गेंड्याला”, सिद्धू म्हणाला.

आकाशात ढग गडगडत होते.

“अरे बाबा तू का आत्महत्या करतोय सिद्धू?”, शैलान समजवू लागला.

“तिचं मत असेल तर मी बाजूला होईन”

“अरे ओये रोमिओ. मत बित काय नाय. आदि पटवेल तिला काहीही करून. आदि पाटील नाव आहे त्याच. मधल्यामध्ये तुझी भरकट होईल माझ्या राजा. का त्रास करून घेतोय तू?”

रिम झिम पाउस सुरु झाला.

“पण तू का माझ्यावर दया दाखवतोय?”, सिद्धू म्हणाला.

“ए भाई. जे आहे ते बोललो. तुला गाढव चढवून घ्यायची हौस असेल तर अल्लाह मलिक. मी सांगायचं काम केल. आगे तेरी मर्झी. अल्लाह मालिक. जर तुला ती पोरगी चुकून हो बोलली असती, तो वो भी जाती थी कामसे. आदिने उसको कुछ किया तो?”.

आणि लगेच धोधो पाउस चालू झाला.

मी मध्ये आलो तर नेहाला आदी काहीही करू शकतो, हे ऐकून सिद्ध्याचे हातपाय गळाले. त्याच्या छातीत चमका येऊ लागल्या. घाबरून गुलाब खाली टाकलं.

शैलान निघून तर गेला. “ओये छत्री कुठे आहे?”, शैलान ने एका पंटरला हाक मारली.

“छत्री?” “अरे ती नाही रे. मोठी वाली. ” ते आपापसात बोलत हसत निघून गेले.

त्याला सिद्धूच दुःख कळत होतं. पण त्याने जे सिद्धुला संगीतल ते सांगण महत्वाचं होतं, नाहीतर कदाचित पुढे काही अनर्थ घडला असता, असं शैलानला वाटलं. म्हणून तो स्पष्ट बोलला. आणि त्याच्या शब्दरूपी dynamite ने सिद्धूच्या पार्ले biscuit सारख्या ठिसूळ हृदयाचा भूग्गा केला.

शैलानने एकदा फक्त मागे वळून पाहिलं.

आणि पाउस वाढतच गेला.

त्या पावसात त्याचे सिद्धूचे अश्रू असे मिसळून गेले कि ते कोणालाच दिसले नाहीत. त्या पावसात सगळी गर्दी आडोशाला निघून गेली, आणि त्या दुःखाच्या पावसात सिद्धू एकटाच राहिला.

नेहमीप्रमाणे एकटा.

हे दुःख..

हे नैराश्य. . . कि दुःख. . कि हा एकटेपणाच होता कदाचित , जो पुढे घडणार्या भयाण घटनांना कारणीभूत झाला होता.

सिद्ध्याला माहीतही नसेल कि पुढे काय होणार आहे.

कदाचित. .

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

सिद्धूची नेहा – एक अनोळखी मित्र – भाग ३ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

3 Responses

  1. April 14, 2017

    […] Flop love story – एक अनोळखी मित्र – भाग २ – Ek Anolkhi Mitra […]

  2. April 15, 2017

    […] Flop love story – एक अनोळखी मित्र – भाग २ – Ek Anolkhi Mitra […]

  3. June 21, 2017

    […] ज्यांनी भाग १ वाचला नसेल त्यांच्यासाठी http://www.patilsblog.in/stories/horror-suspense/ek-anolkhi-mitra-part-1/ भाग २ साठी http://www.patilsblog.in/stories/horror-suspense/ek-anolkhi-mitra-part-2/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *