उत्तर – एक अनोळखी मित्र – भाग १२ – Ek Anolkhi Mitra

Confusion – एक अनोळखी मित्र – भाग ११ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“साहेब, तो शुद्धीवर आलाय”, एक हवालदार म्हणाला.

“चौकशीला घ्या त्याला “, inspector साहेब म्हणाले.

“साहेब तो मुलगा अजून पूर्ण शुद्धीत नाही आलाय, आणि तो माझ्या ताब्यात आहे, तो पर्यंत फक्त मला थोडा वेळ द्या”, farmhouse वाले आजोबा म्हणाले.

“काका, ही खुनाची case आहे. आम्हाला आमचं काम करू द्या”, inspector म्हणाले.

“मी ही एक डॉक्टर आहे. मला पण माझं काम करू द्या. त्याच्याशी बोलणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला संशय असेल तर तुम्ही सोबत राहा”, आजोबा काकुळतीला येत म्हणाले.

“काय चालू आहे इथे?”, सिद्धू म्हणाला. त्याने आजूबाजूला पाहिलं. तो एका बेडवर झोपला होता. त्याचे कपडे बदलले होते. loose आणि सफेद कपडे होते. तो कुठे आहे ते कळत नवतं, पण तो हॉस्पिटल मध्ये होता हे नक्की.

थोड्या वेळा पूर्वी तिथे काही चेहेरे ओळखीचे होते. त्यात बाबा, नेहा, नेहाचे बाबा, शैलान आणि त्याचे मित्र, काही नातेवाईक आणि मित्र हे लोक होते. पण आजोबांनी त्यांना सर्वांना बाहेर जायला सांगितलं. आता तिथे फक्त काही पोलिस होते, आणि आजोबा त्यांच्याशी बोलत होते.

सिद्धूने हॉस्पिटलच्याबाहेर नजर टाकली. Area ओळखीचा होता.

“आजोबा, मी इथे कसा आलो? बाबा आत्ता होते, ते कुठे आहेत? चिनू कुठे आहे?”, सिद्धू भरभर बोलत होता. सिद्धूच डोकं जड होत होतं. आणि आजारी असल्यासारखं वाटत होतं.

कोणी काहीच बोलेना. खूप वेळ रूममध्ये शांतता होती.

“साहेब, मला तर वाटतं हा नाटक करतोय. चौकशीला घेऊ. दोन फटके पडले कि पोपटासारखा बोलतो कि नाही बघा”, एक हवालदार म्हणाला.

“साहेब, पण case चा उलघडा तर होऊ द्या. त्याची चूक तरी काय ते तर सांगा?”, आजोबा प्रतिप्रश्न करत होते.

“तो पळून का जात होता?”, inspector म्हणाले.

“मी नव्हतो पळून जात. चिन्मय घाबरला होता. तो पळून जात होता. मी तर त्याला समजावत होतो, कि पोलिसात शरण जाऊ. पण त्याने माझं ऐकलं नाही. आत्ता पण तो इथे नाहीये. तो पळून गेला घाबरून नक्कीच”, सिद्धू थोडा मोठ्याने म्हणाला. सर्वांच लक्ष त्याच्याकडे गेलं.

त्याच्या बोलण्याने सगळे गोंधळून जात होते हे तर एकदम स्पष्ट होतं.

“हे बघा साहेब मला त्याच्याशी बोलू द्या. तो मुलगा अजून धक्क्यातून सावरला नाही आहे. . .”, बोलत बोलत आजोबा पोलिसांना घेऊन रूमच्या बाहेर गेले.

आता रूममध्ये कोणीच नव्हतं. सिद्धू एकटा होता आणि विचार करत होता.

‘तरीच मला वाटलं होतं. हा चिन्मय पळणार. मूर्ख आहे तो. कुठे गेला असेल काय माहित. पण आपण इथे कसे आलो? Farmhouse च्या आजोबानीच पोलिसांना फोन लावला असं दिसतंय.’

इतक्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला.

सिद्धूने दरवाजाच्या दिशेने पाहिलं. आजोबा आत आले.

“आजोबा काय चालू आहे नक्की? बाबा कुठे आहेत? चिनू कुठे आहे?”, सिद्धू भरभर म्हणाला.

“हे बघ सिद्धू. मी जे काही बोलतोय ते नीट ध्यान देऊन ऐक. प्रश्न फक्त तुलाच नाही पडलेत. सर्वांना उत्तर हवं आहे”

“पण मी का तुमच्यावर विश्वास ठेऊ? पोलिसांना फोन तुम्हीच तर लावला. आधी चिनूला विश्वासात घेतलं असतं तर ही अशी वेळ आली नसती. आम्हीतर आश्रय ,मागितला होता. तुम्ही विश्वासघात केलात आजोबा.”

“माझ्या राजा. तू माझ्या जागी राहून विचार कर. कोणी जखमी मुलगा सकाळी सकाळी तुझ्या दारात आला असता आणि म्हणाला असता कि अपघात झालाय, तर तू काय केलं असतस? आणि तूच म्हणालास की तुझी आणि तुझ्या मित्रांची ताटातूट झाली आहे म्हणून. हेच कारण होतं कि मी…”

आजोबांची काहीच चूक नाही, हे सिद्धूच्या लक्षात आलं. त्याला विश्वास वाटू लागला.

“ठीक आहे आजोबा. ठेवला विश्वास. आता मला सांगा मी कुठे आहे?”

“कल्याणमध्येच आहेस.”

“पण इतक्या दुरून मी इथे पोचलो कधी?”

“सकाळी तुला आराम करायला सांगून मी पोलिसांना फोन लावला, आणि सगळं सांगितलं. तर पोलिस म्हणाले कि तू खून करून पळत आहेस. पण तुझा स्वभाव, बोलण्याची पद्धत पाहून मला ते नाही खरं वाटलं. मी पुन्हा येउन पाहिलं, तर तू रूममध्ये बेशुद्ध होतास. मग तुला ambulance ने इथे आणलं.. पोलिस होते. मीही तुझ्यासोबत आलो.”

“तुम्ही माझ्यासाठी इथे आलात?”, सिद्धूचा आजोबांवर विश्वास वाढत होता.

“सिद्धू काल रात्री काय काय झालं मला सांग.”

सिद्धुला अजूनही भीती वाटत होती. चिनू अडकू नये असं त्याला राहून राहून वाटत होतं.

“आजोबा मी सांगतो, पण..”

“सिधू ऐक माझं. सगळं सांग. जे जे आठवतं ते सगळं सगळं सांग”, आजोबांच्या डोळ्यात विश्वास होता.

सिद्धुकडे दुसरा पर्याय नव्हता.

“काल संध्याकाळी मी आणि नेहा पिच्चर पाहून घरी जात होतो. तेव्हा mallच्या पार्किंग मध्ये मला आणि नेहाला आकाश नावाचा एक गुंड अडवा आला.

“का?”

“कारण, त्याला माझा राग होता. कारण काही महिन्यापूर्वी आमची खूप मोठी भांडणं झाली होती.”

“काय भांडणं झाली होती?”

“आकाश नेहमी आदि नावाच्या मुलासोबत असायचा. आदीचे वडील मोठे राजकारणी आहेत. आकाश आणि ते सगळे मिळून माझी ragging करायचे. खूप छळायचे. तोंड नाक फुटेपर्यंत मला मारायचे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला शिवी द्यायचे. नेहाचीही harassment होत होती. मला भयानक राग यायचा. म्हणून मी..”, सिद्धू थांबला.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“म्हणून मी काय ? तू काय केलस? सिधू? पुढे बोल..”

“मी आदीची गाडी जाळून टाकली.”

“कशी काय जाळलीस?”

“चिनू होता ना सोबत. तो असेल तर मला काहीच tension नसतं.. त्याने सगळं स्वतः ओढवून घेतलं. कॉलेज ground वर गाडीचा भुगा केला आणि पेट्रोल टाकून आग लावून टाकली”, सिद्धू म्हणाला. तो सहजपणे बोलत होता. ना पश्चाताप, न भीती.

“अरे बापरे. सिद्धू. भीती नाही वाटली? आणि त्याच्या नंतर काय झालं?”

“त्याच्या नंतर ती भांडणं खूप जास्त वाढली.. दुसऱ्या एका मोठ्या राजकारणी माणसाने आदिराजच्या वडिलांना खालीपणा आणण्यासाठी माझी बाजू घेतली. आम्ही हॉटेलमध्ये होतो.”

“आम्ही म्हणजे कोण?”

“मी आणि चिन्मय”

“तो पूर्ण वेळ सोबत होता काय?”

“हो”

“आणि पुढे काय झालं?”

“हॉटेलमध्ये जाऊन चीनुने चौधरी साहेबांना फोन लावला. त्यांना सगळं सांगितलं. तिथे त्यांची मुलं आली. नंतर जयराज पाटलाची माणसं पण आली. भानगडी झाल्या. पण आम्हाला कोणी हात नाही लावला.”

“का?”

“कारण चौधरी सहबांच्या मुलांनी आपल्याला support केला. म्हणून.”

“आणि मग?”

“पुढे तिथे meeting झाली. तिथे उघड झालं, कि आदिराज बापाच्या मोठेपणाचा फायदा घेतोय. त्याचा बाप चांगला होता. त्याने तिथेच तो विषय संपवला. आदिला पण खूप सुनावलं. दोन तीन कानफडात पण वाजवल्या. आदिने पुन्हा कधीच त्रास नाही दिला. ”

“पण इतका मोठा प्रकार झाला. कुठे चर्चा नाही झाली?”

“जयराज पाटलांनी होऊ नाही दिली. नायतर पोरामुळे त्यांची बदनामी झाली असती. ”

“आणि आकाशचं काय?”

“त्याचा राग शांत नव्हता झाला. पण माझ्यावर आदीच्या वडिलांची नजर होती. म्हणून तो मला कधीच काहीच बोलत नव्हता.”

“किती महिने झाले ह्याला. माझी first semester झाली होती तेव्हा. जवळ जवळ सहा सात महिने.”

“आणि त्यानं आत्ता राग काढला?”

“मी एकटा सापडत नव्हतो त्याला. मला माहित होतं कि त्याच्या मनात काय आहे ते.”

“आणि तो तू काल त्याला एकटा सापडलास”, आजोबा काही गोष्टी लिहून घेत होते.

“हम्म”, सिद्धूने मान खाली घातली. “आजोबा, तुम्ही लिहून काय लिहिताय?”

“तुझं बोलणं लिहू देत. आपल्याला लागेल ते. सिद्धू पुढे बोल. काल काय झालं ते सांग.”

“काल मी आणि नेहा पिच्चर संपल्यावर घरी येत होतो. मॉलमध्ये मागच्या side ने बाहेर पडत होतो. पार्किंगमध्ये मला आकाश आडवा आला. आमच्यात मारामारी झाली. माझ्यासोबत चिनूपण आला. ”

“तो आला कुठून?”

“मला नाही माहित ओ आजोबा. तो कुठे जातो कुठून येतो काहीच माहित नाही.”

“बर. पुढे काय झालं ते आधी सांग”, आजोबा ऐकत होते आणि लिहीत होते.

“पुढे चिनू आला. त्याने मला मैत्रीची शप्पथ घातली आणि तिथून घरी पाठवलं.”

“तू त्याला सोडून निघून आलास?”

“माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने माझं काहीच चालू दिलं नाही.”

“नेहापण सोबत होती? तिचं काय झालं?”

“चिनू आला तेव्हा नेहा अचानक गायब झाली. कुठे गेली काहीच माहित नाही.”

“पुढे काय झालं?”

“पुढे मारामारी खूप वाढली. मी आणि चीनुने तिघांना खूप मारलं. पण नंतर आकाशने चिनूला डोक्यात लोखंडी रिपेने घाव घातला. आणि वार खूप भयानक लागला.”

“तू मध्ये नाही पडलास?”

“पडलो न. पण ते सगळं इतक्या भरभर होत होतं कि काही कळायच्या आतंच सगळं होऊन गेलं”, सिद्धूचे भाव बदलले होते.

“पुढे?”, आजोबांच्या चेहेऱ्यावर चिंता दिसत होती.

“पुढे मला. चक्कर आली. डोक्यात शिणक येऊ लागली. आणि पुढे नाही आठवत, आजोबा. कदाचित मी बेशुद्ध झालो. जाग आली तेव्हा मी घरी होतो. बाबा घरी नव्हते. चिनू आला. त्याच्या डोक्याला मार लागला होता. मला म्हणाला, कि त्याच्या हातून आकाशचा खून झालाय.”

“सिद्धू बाळ. असं अचानक कसं रे डोकं दुखतं? कोण विश्वास ठेवेल?”

“नाही नाही आजोबा. अचानक नाही. मला आधीपासून हा डोकेदुखीचा त्रास आहे. फक्त मधल्या period मध्ये जरा बरं वाटत होतं.”

“तू डॉक्टरांना नाही दाखवलंस?”

“सगळं करून झालं माझं. काही फायदा नाही. आधी दुखायचं. नंतर ते दुखण बंद झालं होतं. त्या दिवशी बऱ्याच महिन्यांनी असं डोकं दुखलं माझं. इतकं जास्त दुखत होतं कि पार जीव जायची पाळी आली. ”

“आधी म्हणजे कधी?”

“जेव्हा आदि आणि त्या मुलांची भांडणं झाली होती. मी सतत stress मध्ये असायचो, तेव्हा.. ताण वाढला कि माझं डोकं दुखायचं.”

“आणि तू बेशुद्ध पडलास?”

“हो.. जाग आली तर घरात होतो. रात्रीचे दोन अडीच वाजले होते. दार वाजलं. दारात चिनू, तो पण जखमी. मी त्याला खूप समजावलं. मी म्हणालो कि पोलिसात जाऊ. जे झालं ते सांगू. पुढे बघू काय करायचं ते”, सिद्धू सांगत होता.

“जे झालं ते म्हणजे?”

“त्याच्या हातून आकाशचा खून झाला होता असा म्हणाला.”, सिद्धू दबक्या आवाजात म्हणाला, “म्हणून तर तो पळापळ करत होता.”

“काय म्हणाला तो?”, आजोबा चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव आणून म्हणाले.

“दूर पळून जाऊ म्हणाला. काही महिन्यांनी परत येऊ, तोपर्यंत सगळं निवळेल म्हणाला.”

“मग काय केलं तुम्ही?”

“काही नाही. त्याला खूप समजावलं कि पोलिसात जाऊ. पण त्याने नाही ऐकलं. शेवटी मी त्याच्यासोबत बाहेर पडलो.”

“आणि कुठे गेलास तू?”

“खाडीजवळ गेलो. पोलिस checking खूप tight होती. जेमतेम खाडी cross केली, आणि जुन्या पुलाच्या पलीकडे जाउन शैलानला कॉल केला.”

“कुठे जायचा विचार होता?”

“गुजरात”

“गुजरातमध्ये कुठे?”

“नाही माहित. शैलानच्या गाडीतून जवळ जवळ २०० किलोमीटर दूर गेलो. पण वाटेत checking होत होती. म्हणून गाडी सोडून आम्ही शेतातून पळालो. आणि तो पर्यंत सकाळ झाली. तुमच्या घरी आलो. तुमच्याशी. .” सिद्धू थांबला.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“खोटं बोललो. हेच न?”, आजोबा थोडेसे गालात हसले.

“हो”, सिद्धूने मान खाली घातली. “तुमच्या घरात पण चिनू स्थिर नव्हता. त्याने पाळायची तयारी केली होती. पण दोघांना थकवा अनावर झाला होता. म्हणून आम्ही ठरवलं, कि आळीपाळीने झोपूया. मी आधी झोपलो, तर सकाळी इथे कसा आलो माझं मलाच माहित नाही.”

“सकाळ? वाजलेत बघ किती. संध्याकाळ होत आली आहे.”

सिद्धूने घड्याळ पाहिलं. संध्याकाळचे पाच होत होते.

“काका. आता माझ्याकडे लपवण्यासारख काहीच नाही. मी तुमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवला आणि सगळं सांगून मोकळा झालोय. आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या.”

“तुझ्या प्रश्नांची उत्तरं?”, आजोबांच्या चेहेऱ्यावर प्रश्न होतं. कपाळावर आठी होती.

“हो.. चिनू कुठे आहे?”, सिद्धू घाबरला.

“सिद्धू थांब. तू अजून चिनूबद्दल काहीच का सांगितलं नाहीस?”

“आत्ता विषय दुसरा होता म्हणून मी काही बोललो नाही. पण तो आहे कुठे? पोलिसांनी ताब्यात तर नाही न घेतला? त्याला please काही करु नका. त्याची काहीच चूक नाहीये. तो तर माझ्यासाठी ह्या भानगडीत पडला.”

“कोण आहे तो? त्याने खून का केला? भांडण तर तुझं होतं?”

“तो अनोळखी मित्र आहे. मैत्रीसाठी केलं”, सिद्धूला गहिवरून आलं.

“कोण आहे तो? तुला कसा भेटला?”

“आजोबा, हे सगळं का विचारताय?”

“चिनू गायब आहे. त्याच्याबद्दल कोणाला काहीच माहित नाही. म्हणून त्याला शोधण्यासाठी हे विचारावं लागतंय.”

आजोबा अस बोलल्यावर सिद्धूचा विश्वास अजून वाढला.

“आजोबा. पहिल्यांदा तो मला माझ्या घरासमोरच्या हॉलमध्ये पहिल्यांदा भेटला. पाऊस पडत होता. मध्यरात्री त्याची गाडी बंद पडली होती. म्हणून तो हॉलमध्ये थांबला होता. आणि मोठ्याने गाणी बोलत होता.”

“आणि तू पाहायला गेलास कि कोण आहे ते.”

“हो. बोलता बोलता ओळख झाली. त्याने विचारलं मला कि मला काय लागलंय म्हणून.”

“काय लागलं होतं तुला?”

“त्याच दिवशी आदिने मारलं होतं.”, सिद्धूचा आवाज बोलता बोलता बसला.

“अच्छा ठीक आहे. पुढे काय झालं?”

“मी त्याला आदि आणि त्याच्या टोळक्याबद्दल सगळं सांगितलं. त्याला वाईट वाटलं आणि त्याने माझी मदत केली.”

“त्याने आणि तू मिळून गाडी जाळली.”

“फक्त तेच नाही, तो माझ्यासोबत नेहाच्या घरी आला होता.”

“नेहा कोण?”

“नेहा . नेहा म्हणजे. “, सिद्धुला बोलवेना.

“असुदे असुदे. समजल. पण तिच्या घरी चिन्मय कशासाठी आला?”, आजोबा थोडेसे हसले.

“तिला माझ्यासाठी मागणी घालायला. पण मीच बोललो सगळं. जे आहे ते. रोख ठोक”

“काय धाडस! तिच्या वडिलांनी हाकललं नाही का?”

“नाही. मी म्हणालो कि मी करून दाखवेन, तर मुलगी द्या. आपण काय बांगड्या नाही भरल्यात. हिम्मत आहे माझ्यात”, सिधू थोडासा चिडून म्हणाला.

“हाहाह”, आजोबा कौतुकाने हसले. “पण मग पुढे काय झालं?”

“आजोबा. हे सगळं नका ओ विचारू. आधी सांगा कि चिनू कुठे आहे?”

“त्यालाच शोधतोय माझ्या राजा. तू आधी सगळं सांग.”

“काय सांगू? सगळं तर सांगितलं”

“नेहाच्या घरा जाऊन आल्यानंतर काय झालं?”

“आमच्यात एकदा भांडण झालं”, सिद्धुला ते सांगायचं नव्हतं.

“कशावरून?”

“नेहावरून”

“वाटलंच मला”

“काका. त्या भांडणाशी आत्ता काय संबंध नाहीये. आधी मला सांगा आत्ता चिनू कुठे आहे?”

“तूच सांग. तो इतरवेळी कुठे असायचा? त्याला शोधूया आपण”

“तो infosys मध्ये senior software engineer होता. घर ऑफिस घर. बस अजून कुठे जायचा नाही माहित. तसाही काल तो मला पाच सहा महिन्यांनी भेटला.”

“काय?”

“नेहावरून भांडण झालं तर नंतर मला भेटणं बंद केलं त्याने. मला वाटलं कि दुखावला असेल. पण भेटलो तर म्हणाला कि त्याला लाज वाटत होती. असा आहे माझा चिनू”, सिद्धू पटकन हसला..

“अजून काय माहिती आहे तुला त्याच्याबद्दल? तो कसा आहे सांग मला.”

चिन्मय बद्दल विचारल्या विचारल्या सिद्धू एकदम excite झाला.

“चिन्मय? तो म्हणजे एक हिरा आहे हिरा. इतका dynamic आहे तो. colorful nature. म्हणजे कसं सांगू तुम्हाला !”, सिद्धुला खूप बोलायचं होतं, पण सुरुवात कुठून करू तेच कळत नव्हतं. “तो असा होता, कि कोणीपण त्याला पहिल्यांदा पाहिल, तर टपोरी म्हणेल. कि काय फालतू मुलगा आहे. बेजबाबदार, मूर्ख, अय्याश. कोणाशी काही पडलं नाही. दुनियादारी काही कळत नाही. स्वताला काय समजतो काय माहित. मी पण पहिल्यांदा भेटलो तेव्हा हाच विचार केला. मी तर ठरवलं होतं कि ह्याच्यापासून दूर राहायचं. नंतर विचार केला. बघू तर कसा आहे मुलगा. पुढचं पुढे बघू. पण जसा मला त्याचा स्वभाव कळला, तसा चीण्याशिवाय life नाही असं वाटायला लागलं आजोबा. खरं सांगतो. माझ्या बाबांनी मला मैत्री शिकवली. त्या चिनूत मित्राचा एकूणएक गुण होता.”

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“मित्राचे गुण? काय पाहिलं त्यात?”

“आजोबा. तो स्वतः नेहमी निश्चिंत होता. पण माझी चिंता त्याने स्वताची करून घेतली. माझं छोट्यात छोटं दुःख त्याने खूप मोठं मानलं. आणि स्वतः पूर्ण सुखी असून पण माझ्यासाठी स्वतःचं सगळं सुख पणाला लावलं. आदिराजच्याच matter मध्ये आम्ही गाडी जाळली खरी, पण अडकलो असतो तर? case झाली असती, किवा अजून काही झालं असतं तर त्याचं career बरबाद होतं. पण त्याने त्याची परवा नाही केली. वरून वरून इतका harsh होता, पण आतून ice-cream सारखा soft. त्याने नेहमी फक्त माझाच विचार केला. आणि जेव्हा मला त्याच्यासाठी काही करायची वेळ आलीत तर तो निघून गेला, कि मला त्रास होऊ नये..”

सिद्धुला बोलत बोलत गहिवरून आलं. आजोबा एकदम शांत बसले. त्यांना कळेचना आता पुढे काय बोलू.

सिद्धू पुढे बोलू लागला. आजोबा लक्ष देऊन ऐकत होते आणि लिहून घेत होते. “दिसायला इतका handsome, कि त्याच्याकडे बघतंच बसावं. माझ्याच उंचीचा. अंगाने एकदम weak नाही आणि खूप जाड पण नाही. घारे घारे डोळे. dressing चा जबरदस्त sense होता त्याला. दिसायचा, कि model असेल. आणि career च्या बाबतीत, तो एक miracle होता. बाविसाव्या वर्षी graduate झाला. आणि त्याच वर्षी त्याने campus मधून infosys मध्ये जागा मिळवली. आणि तीन महिन्यात त्याने स्वतःला सिध्द केलं. एका वर्षात promote झाला.”

“काय सांगतोय!”

“हो तर. त्याने गपचूप त्याच्या घरात एक AI चा प्रोग्राम implement केला होता. ते कोणाला बोलायचं नवतं.”

“AI ?”, आजोबा चपापले.

“Artificial intelligence. एक मुलीला program केला होता. तिच्यात खर्या मुलीसारख्या भावना होत्या. संपूर्णपणे नाही. पण सत्तर टक्के. तिला तो मधुरा बोलायचा”

“मला नाही खरं वाटत.”

“मलाही आधी नव्हतं वाटलं आजोबा. पण मी जेव्हा स्वतः पाहिलं तेव्हा माझा विश्वास बसला.”, सिद्धूची excitement शिगेला होती.

“आणि तुझ्या आणि त्याच्या मैत्रीच्या बाबतीत?”

“त्याने तीन दिवसात माझं आयुष्यच बदलून टाकलं. सगळी संकटं स्वतःवर ओढवून घेतली. कोणी कोणासाठी करणार नाही इतक केलं ओ माझ्यासाठी. त्यात फक्त एक दोष होता. नाहीतर मी एक सेकंदसाठी पण दूर नसतं जाऊ दिलं. तसाही तो स्वताहून गेला होता. पण परत येउन चूक मान्य केल्यावर मी पुन्हा त्या गोष्टीचा उल्लेखही नाही केला. आज सकाळी का गेला काय माहीत.”

“हो. मला येतंय लक्षात.”, आजोबा गालात हसले.

“हो न! काल भेटला तर म्हणाला कि त्याला लाज वाटत होती म्हणून तो इतके महिने समोर येत नव्हता. . नेहाला वाईट बोलला म्हणून. त्याला पश्चाताप होत होता. तरी मला अंदाज होताच. त्याचीही काही चूक नाही. मला नाही राग आला त्याचा. त्याने उगाच खूप ताणल. पण आजोबा, आता मला सांगा तो आहे कुठे?”

“आम्हाला नाही माहित. सगळे त्यालाच शोधत आहेत. तो राहतो कुठे?”

“तो राजयोगप्रस्थमध्ये राहतो.”

“कुठे आहे ते ठिकाण?”

“जवळच आहे. माझ्या घरापासून पंधरा वीस मिनिटे चालत.”

“जाऊयात?”

“ठीक आहे.”

पोलिसांनी दुरून त्यांचं संभाषण ऐकलं होतं. पण ते समोर नाही आले.

“हे बघा डॉक्टर, मला नाही वाटत ह्याचा काही फायदा आहे”, एक पोलिस हवालदार म्हणाले.

“नाही. आपल्याला मुलाला एक संधी द्यायला हवी. बघू तर तो काय म्हणतोय आणि कोणाबद्दल बोलतोय”, दुसरे पोलिस inspector म्हणाले. डॉक्टर बाहेर आले. त्यांना उद्देशून inspector साहेबांनी विचारलं, “काय म्हणतोय तो मुलगा?”

“साहेब तुम्ही चला सोबत”, आजोबा चिंतेत होते.

त्यांनी गाडी काढली. सिद्धू, आजोबा, पोलिस इन्स्पेक्टर, दोन हवालदार, आणि आजोबांसोबत दोन तरुण मुलं असे सगळे गाडीत बसले. सिद्धू वाट सांगत होता, तसे तसे ते गाडी तिथे नेत होते.

आधीतर कोण जाने का, सिद्धुला वाट आठवतच नव्हती. पण नंतर त्याच्या सगळं लक्षात आलं.

थोड्या वेळाने ते एका ठिकाणी आले.

राजयोगप्रस्थ.

“हा इथेच.”, सिद्धू म्हणाला. “इथेच राहतो माझा अनोळखी मीत्र. कुठे गेला असेल. साला समोर आला तर जाम मारेन त्याला.”

“नक्की? तो इथेच राहतो?”, पोलिसांनी विचारलं.

“हो तर. गेले सहा महिने जवळ जवळ रोज येतोय मी इथे. इथे नवव्या मजल्यावर त्याचा flat आहे.”

“चल जाऊया”, आजोबा म्हणाले.

ते सगळे त्या society च्या आत गेले.

काहीतरी गडबड होती.

आज काहीतरी वेगळं होतं.

“आता कुठे जायचं?”, आजोबा म्हणाले.

“आजोबा, इथेच. पण लक्षात येत नाही आहे. बर. elevator कुठाय?”

सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. कोणाला काहीच कळत नव्हतं.

कोणी काहीच बोलत नाही हे पाहून सिद्धू विचलित झाला. “काय झालं?”

“कसला elevator? इथं काहीही नाही आहे. काय बडबडतोय हा मुलगा?”, दुसरे हवालदार थोडेसे चिडून बोलले.

“काय? elevator नाही? कसं शक्य आहे?”

“तू चिन्मयला वाचवण्यासाठी खोटं बोलतोय?”, आजोबा म्हणाले.

“नाही नाही नाही. नाही आजोबा. तो इथेच राहतो. मी इथे हजारवेळा येउन गेलोय. बर ठीक आहे. पायऱ्यानी जाऊया.”

“चल. आता इथ पर्यंत आलोय, तर हेही करूया”, आजोबासोबत आलेला एक मुलगा म्हणाला.

“सिद्धू, हे बघ. पोलिस आपल्याला मदत करत आहेत, हा फक्त त्यांचा चांगुलपणा आहे. ते कोणाचं ऐकत नाहीत. case खुनाची आहे. त्यांनी action घेतली तर…”, दुसरा मुलगा म्हणाला.

“माहिती आहे मला. पण..”, सिद्धू त्या मुलाचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला.

“बर आधी वर तर जाऊ. तिथे सगळं कळेल.”, आजोबा म्हणाले.

सगळे भरभर पायऱ्या चढत होते.

सिद्धू पुढे, आणि मागे आजोबा आणि त्यांचे दोन students. त्यांच्या मागे दोघे तिघे पोलिस.

सिद्धू खूप excited होता. तितकाच तो गोंधळून जात होता. काय चालू आहे काहीच कळत नाही. विचार करत करत तो भरभर पायर्या चढत होता.

पहिला मजला.

दुसरा मजला.

तिसरा मजला.

चौथा मजला.

सगळे थांबले.

“काय झालं सिद्धू?”, आजोबांनी विचारलं.

खूप वेळ थांबून सिद्धू म्हणाला.

“आजोबा, बिल्डींगला पुढे मजला नाही आहे.”

सगळ्यांच्या अंगावर शहारे आले.

“नाही नाही. आजोबा हे. . म्हणजे. तो इथेच. . पण तो राहत होता. top floor होता.”

“हाच ह्या building चा top floor आहे. सिद्धू. शांत हो. मन स्थिर ठेव. आणि मला सांग, त्याचं घर कुठे होतं?”

“हा top floor कसा असेल आजोबा? तो नवव्या मजल्यावर राहत होता.”

“काय लावलय? खोटं बोलतोय हा मुलगा. नववा मजला? पाच मजले काय गायब झाले काय? चार मजल्याची बिल्डींग आहे”, इन्स्पेक्टर म्हणाले, पण आजोबांनी खुणावल्याच्या नंतर ते एकदम शांत झाले.

सिद्धूचा आवाज कंपू लागला. हात थरथर करू लागले. काही सुधरेना असं झालं. असं कसं होऊ शकतं? विचार करून करून त्याचं डोकं पार भंडावून गेलं. त्याने खाली बसून घेतलं.

आजोबा म्हणाले, “सिद्धू. माझ्याकडे बघ”, त्यांनी हनुवठी धरून सिद्धूचा चेहेरा उचलला, “हे बघ, सिद्धू. आपल्याला चिन्मय धनगरला शोधायचं आहे कि नाही? तू सांग, त्याचं घर कुठलं आहे?”

खूप वेळाने स्वतःला सावरत, भीती दाबत तो खूप विचार करून बोलला, “तो top floor ला third रूम मध्ये राहायचा.”

“तिसरा रूम उघडा रे. बघा त्यात काय आहे?”, इन्स्पेक्टर दोघा हवालदारांना म्हणाले.

“साहेब. रूममध्ये काहीच दिसत नाय. काहीच नाही तिथं.”, हवालदार म्हणाले.

“काय?”, असं ओरडून सिद्धू धावत धावत त्या रूममध्ये पळाला.

तिथे त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा स्वताच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.

त्या रुममध्ये गेल्या गेल्या सत्ताड उघड्या खिडक्यातून बरीच कबुतरे फडफडत बाहेर उडाली. सगळीकडे धूळ आणि कबुतरांची घाण होती. एकंच रूम होता. तिथे एक दोन benches होते. त्याखाली काही scrapped notes होत्या. त्यापैकी एकदोन उचलून आजोबांनी वाचल्या.

“मीच लिहिल्यात त्या”, सिद्धू थरथरत्या आवाजाने म्हणाला. “चिनू इथ नसायचा तेव्हा मी इथे येउन अभ्यास करायचो.”

आजोबा काहीच नाही बोलले.

“नाही नाही आजोबा.. कसं शक्य आहे? मी इथे रोज यायचो.” एका कोपर्यात बोट दाखवून सिद्धू म्हणाला, “इथे मधुराची screen होती, आणि..” दुसरीकडे जाउन बोट दाखवून सिद्धू म्हणाला, “इथे kitchen आणि coffee vending machine होती. आजोबा खरंच सांगतोय. सगळं गेलं कुठे? इथे कपाट होतं. आणि इथे सोफा होता. इथे wall वर सगळीकडे wallpapers होते. आणि वर एक काचेचा झुंबर होता.”

सगळे एकदम विस्मित होऊन सिद्धुकडे पाहत होते. आजोबा फक्त शांत होते.

“साहेब, मलातर वाटतं कि पोरगा भानातून गेलाय”, एक हवालदार इन्स्पेक्टर साहेबांच्या कानात म्हणाले.

“नाही थांबा. डॉक्टर काय म्हणतायत ते बघू”, inspector म्हणाले.

सिद्धू विचार करून करून थकला. काहीच कळायला मार्ग नाही. डोकं जड झालं. सिद्धूने खाली बसून घेतलं. तो कपाळाला हात लावून विचार करत होता.

“सिद्धू शांत हो. मन स्थिर ठेव. विचार कर. बघ बरं तू आत्ता कुठे आहेस? विचार कर..”, आजोबा सिद्धूच्या डोळ्यात पाहून. शांतपणे बोलत होते. त्यांच्या चेहेऱ्यावर आता गंभीर भाव होते.

“मी आत्ता कुठे आहे? मी आत्ता..”, सिद्धू विचार करत होता.

तो उठून खिडकी जवळ गेला. बाहेर पाहिलं.

सूर्य मावळत होता.

त्याला काहीतरी आठवलं. त्याने परिसर पहिला. सगळं ओळखीचं होतं.

तो आठवत होता कि तो कुठे आहे.

हळू हळू लक्षात येत होतं.

त्याने मागे वळून त्या रूम वर एक नजर फिरवली.

दोन benches. समोर एक blackboard.

आठवलं.

तो एका classroom मध्ये होता.

fourth floor वर?

classroom?

हा . . .

आलं लक्षात.

त्याने स्वतःला कॉलेजच्या fourth floor च्या क्लासरूममध्ये पाहिलं.

पुन्हा थोडं थोडं डोकं दुखू लागलं.

“मी.. मी.. इथे कॉलेजमध्ये कसा आलो? आजोबा, माझं डोकं दुखायला. . “, सिद्धू असं बोलताच ताबडतोब आजोबांच्या सोबत असलेल्या दोन मुलांनी त्याला धरलं, आणि बसवलं.

सिद्धुला ग्लानी येत आहे, हे पाहून घाईघाईने दोघा मुलांनी त्याला पुन्हा उचलून गाडीतून हॉस्पिटल मध्ये आणलं.

“सिद्धू डोळे उघड. माझ्याकडे बघ”, आजोबा अजूनही चिंतेत होते.

सिद्धू हॉस्पिटल मध्ये होता. त्याची ग्लानी खूप कमी झाली.

“आजोबा काय चालू आहे? मला वेड लागलंय का?”, सिद्धू बेडवर पडल्या पडल्या एकदम कमी आवाजाने बोलला.

“नाही. पण तुला आता काही गोष्टी समजून घेऊन सत्य स्वीकारावं लागेल सिद्धू, नाहीतर खरंच वेड लागेल”, आजोबा गंभीर होते.

“कसलं सत्य? काय अमान्य केलंय मी आजोबा?”, सिद्धूची ग्लानी जाऊ लागली.

“तू पूर्ण शुद्धीत आहेस का सिद्धू?”

“शुद्ध? हो तर. असं का विचारताय आजोबा?”

“सिद्धू, तुझं पूर्ण नाव सांग.”

“माझं नाव? काय?”

“बोल सिद्धू.”

“मी सुबोध”, सिद्धू अजूनही गोंधळून जात होता.

“सुबोध?”

“सुबोध लासुरे. पण माझं नाव का विचारलंत?”

“सिद्धू थांब. आणि मी काय बोलतोय ते नीट ऐक. कदाचित तुला खूप मोठा धक्का बसेल, हीच मला भीती आहे”, आजोबा एकदम गंभीर होत होते. हे ऐकल्यावर सिद्धू आधीच घाबरला.

“काय? काय झालं? माझे बाबा तर ठीक आहेत न?”, सिद्धू बेडवर उठून बसला.

“हो”

“नेहा?”

“ती पण ठीक आहे. ते सगळे बाहेर आहेत”, आजोबा शांतपणे म्हणाले.

“आणि चिन्मय?”, सिद्धूने विचारलं.

आजोबा काहीच बोलत नाहीत.

सिद्धू घाबरला.

“आजोबा. काय झालंय? चिन्मय कुठे आहे? तो ठीक तर आहे न?”, सिद्धूने पुन्हा विचारलं.

“सिद्धू. कोण चिन्मय?”, आजोबांनी विचारलं.

“माझा मित्र. मी सांगितलं तुम्हाला सगळं.”

“सिद्धू तू चिन्मय बद्दल सांगितलंस. त्याला खूप शोधलं. तसा कोणी मुलगा नाही सापडला. infosys मध्ये पण चौकशी केली. हे reports बघ”, आजोबांनी एक कागद चिनूच्या हातात दिला.

सिद्धू पुटपुटत वाचू लागला.

“Dear Dr. Bhalerao. As per your request, we have searched for the individual, named ‘Chinmay Dhangar’ in our all databases. We have not found out any person with this name and context who is working as a software engineer in any of our branch.”

“आजोबा काय प्रकार आहे हा? चिनू खोटं बोलला माझ्याशी कि तो software engineer आहे? आणि आता please आता अजून गोष्ट फिरवू नका. नक्की काय चालू आहे मला सांगा”, सिद्धू काकुळतीला येउन बोलत होता.

“मी तुला तेच सांगतोय. पण तुला समजत नाहीये. मला भीती वाटते तुला फार मोठा धक्का बसू नये.”

“तो इतका खोटा कसा वागू शकतो? आजोबा. ह्यापेक्षा वाईटात वाईट काय होईल? काय चालू आहे नक्की? मला सांगा आजोबा. कितीही मोठा धक्का असला, तरी मी सहन करेन. उगाच The Matrix मधल्या Morpheus सारखे कोड्याला कोडं वाढवू नका.”

सिद्धूच determination पाहून आजोबा थोडे निश्चिंत झाले.

“हा. मला हेच ऐकायचं होतं. आता सिद्धू. आता हे मनात पक्क लक्षात घे. चिन्मय धनगरच्या बाबतीत.”

सिद्धू डोळे मोठे करून पाहत होता आणि ध्यान देऊन ऐकत होता.

“चिन्मय धनगर नावाचा कोणी मुलगा अस्तित्वात नाहीये.”

सिद्धूच्या कपाळावर आठी आली. त्याला कळायला काहीच मार्ग नाही.

“काय? काहीही. काहीही वाट्टेल ते बोलू नका. उगाच हा. काहीही उगाच बोलू नका.”, असं बोलून सिद्धू थोडासा हसला. ‘आजोबा साठाळले’, तो विचार करत होता.

आजोबा काहीच बोलत नव्हते. फक्त सिद्धुकडे एकटक लावून पाहत होते. त्यांचे भाव एकदम गंभीर होते.

अपोआप सिद्धूचं हसू मावळलं.

“तुम्ही काय बोलताय? हे बघा आजोबा. माझी परीक्षा नका घेऊ. काही वेळापूर्वी आपण त्याला शोधत होतो. तुमच्या घरी आम्ही दोघे आलो होतो. इथे तुम्ही आणि मी दोघेच आहोत. खोट नका बोलू”

“सिद्धू. माझ्या घरी तू एकटा आला होतास”, आजोबा शांतपणे म्हणाले.

तसा सिद्धूचा चेहेरा बदलला.

“खोटं आहे ते. आम्ही रोज एकत्र फिरत होतो. सर्वांनी पाहिलं त्याला. उगाच मला confuse करताय तुम्ही.”

“कोणी? सर्वांनी म्हणजे कोणी पाहिलं त्याला?”, आजोबा खुर्चीवर पुढे सरकून बसले.

“सर्वांनी. आदि आकाश त्या पोरांनी. नेहाच्या घरी माझ्यासोबत आला होता. अक्ख्या कॉलेजने बघितलं तर. उगाच आपला काहीही बोलायचं म्हणून…”

“तू बेशुद्ध होतास तेव्हा मी सर्वांना विचारलं. चिन्मय धनगर नाव ऐकल्यावर सगळे बोलतात कि कोण आहे तो आम्हाला नाही माहित.”

“तुम्ही खोटं बोलताय”, सिद्धू चिडला.

इतक्यात सिद्धूचा फोन वाजला.

त्याने number पाहिला.

CDPN 321474…

“हह हेलो”

“हेल्लो, सिद्धू. मी मधुरा बोलतेय. ऐक. माझ्याकडे फार वेळ नाही आहे. तू कोणावर विश्वास नको ठेऊस. तुला आणि चिन्मयला सगळे फसवत आहेत.”

“का?”

“ही सगळी त्या आकाशची planning आहे असं मला कळतंय. तो मेला नाही आहे. आणि डॉक्टर भालेराव त्यांना सामील आहेत.”

“पण मी घरी आलेलो तिथे काहीच नव्हतं..”, बोलेपर्यंत फोन cut झाला.

सिद्धूने मान वर करून भालेरावांकडे पाहिलं.

‘विश्वास ठेऊन चूक केली. आजोबा आकाशला सामील आहेत? सर्वांनी मिळून मला आणि चिन्मयला फसवलं आहे?’, सिद्धू विचार करत होता. त्याचे हातपाय थरथर करायला लागले.

‘इथून सुटायचं असेल तर, काय करावं? ह्या भालेरावांना गोडगोड बोलून विश्वासात घेऊ. आणि जसा मोका मिळेल, इथून पळ काढू. चिन्मयने आकाशच काटा काढला. हा म्हातारा भालेरावमध्ये आला तर आपण ह्याचा काटा काढू.’

चिनू विचार करत होता. डॉक्टर आजोबा त्याच्याकडे पाहत म्हणाले.

“काय विचार करतोयस?”, त्यांच्या बोलण्यात विश्वास होता.

“फोन आला,म ममम्मला आत्ता.”, त्याचा आवाज थरथरत होता.

“फोन? कोणाचा फोन आला?”

“नाही कोणाचा नाही.”

“सिद्धू फोन दे. मला दाखव कोणाचा फोन आला तुला आत्ता?”, काका विचार करत होते.

“नाही नाही”, म्हणता म्हणता सिद्धूने थोडा प्रतिकार केला. पण काकांनी फोन घेतला. नंबर पाहिला. त्यांच्या चेहेऱ्यावर पुन्हा चिंता दिसली.

“सिद्धू. तुला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. इथे फक्त मी आहे म्हणून हे पोलिस हात घालत नाही आहेत. ही case खुनाची आहे. मी तुला वारंवार सांगतोय. तुझी एक चूक आणि तुझ्यासकट तुझे बाबापण अडकतील. तुला का कळत नाही? काहीच लपवू नकोस. संग फोन कोणाचा होता.”

‘काय करू? विश्वास ठेऊ कि नको? मधुराचा फोन तर आलेला.’, सिद्धूने विचार केला.

“मी परत एकदा सांगतो. तू आत्ताही पोलिसांच्या ताब्यात आहेस. माझ्यावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त तुझ्याकडे पर्याय नाही.”, आजोबांचे डोळे खूप बोलत होते.

“मधुराचा फोन होता. म्हणाली कि मला आणि चिनूला सगळे मिळून फसवत आहात”, सिद्धूने धाडस केलं.

“कोण मधुरा?”

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“चिनूचा computer”

“फोन दाखव मला”, आजोबांनी सिद्धूच्या हातातून फोन घेतला.

“कुठाय number? Received call दाखव”, आजोबांनी फोन सिद्धूच्या हातात दिला.

सिद्धूने call logs पाहिले. मधुराचा नंबर कुठेच नाही.

“काय झालं? सांग मला. काय चालू आहे? घर दाखवतो म्हणालास, कॉलेजची रूम दाखवली. फोन आला म्हणालास, आणि दाखव म्हटलं तर काहीच नाही. सांग मला सिद्धू. काय चालू आहे?”, आजोबा खुर्चीमध्ये मागे टेकून बसले.

सिद्धूच्या डोळ्यात पाणी आलं, “आजोबा, आत्ता तर फोन आला. मी खरं बोलतोय. तुम्ही मला वेडं सिद्ध करताय का? मधुराचा फोन होता.”

“कोण मधुरा?”

“पुन्हा पुन्हा तेच? चिन्मयचा computer.”

“कोण चिन्मय?”

“चिन्मय धनगर. माझा अनोळखी मित्र”, सिद्धू भरभर आणि ओरडून बोलला. तो वैतागला होता.

“अनोळखी मित्र. अनोळखी मित्र. अनोळखी मित्र. खूप झालं. बस सिद्धू. बस. चिन्मय वैगरे कोणीही नाहीये. आधी मला वाटत होतं कि तुला shock बसेल म्हणून मी स्पष्ट बोलत नव्हतो. पण आत्ता दुसरा पर्याय नाही आहे. चिन्मय नावाचा मुलगा नाहीच आहे कोणी.”

“साफ खोटं. इतक्या लोकांनी पहिला त्याला.”

“कोणी पाहिला?”

“आदि त्या लोकांनी पाहिला.”

“त्यात शैलान होता?”

“हो तर”

“अरे त्या शैलानला आत बोलवा.”, आजोबा मोठ्याने म्हणाले. तसा शैलान आला.

“शैलान भाई बात uncle को”, सिद्धू म्हणाला.

शैलान काहीच बोलायला मागेना.

“अरे यार. माझं तोंड काय पाहतोय? सांग आजोबांना.”

“काय सांगू?”, शैलान म्हणाला.

“चिन्मयके बारेमे. तू भी तो था न वहा पे”, सिद्धू वैतागला होता.

“कहा पे?”

“वो कॉलेज वाला matter. वो गाडी जलाया था वही”

शैलान काहीच बोलेना. सगळे एकमेकांचं तोंड पाहतायत.

“अरे बोल”, सिद्धू ओरडला.

“क्या बोलू भाई? ते सगळं तूच केलं. चिन्मय कोण आहे?”

“सोड. तू तेव्हा late आलेलास. तोपर्यंत गाडीला आग लावून झाली होती. आणि गर्दीमध्ये तुझ्या लक्षात नसेल आलं. तू नसशील बघितला.”, सिद्धू हळू आवाजात म्हणाला.

“मग कोणी पाहिला त्याला? “, आजोबा म्हणाले.

“तो नेहाच्या घरी आलेला.”

“अरे, नेहाच्या बाबांना बोलवा.”, आजोबा मोठ्याने म्हणाले.

“हा. बरं झालं काका तुम्ही आलात. काका ह्या आजोबांना सांगा. चिनू आणि मी एकत्र आलो होतो कि नव्हतो तुमच्याकडे?”

“असं का वागतोय सिद्धू? तू एकता आलतास. तुझ्यासोबत कोणी नव्हतं”, नेहाचे बाबा म्हणाले. तेही गोंधळले होते.

सिद्धू त्याचं तोंडच बघत बसला. त्याला काहीच कळेना, कि सगळे खोटं का बोलत आहेत?

‘बाबांनी नाही पाहिलं त्याला. नेहातर चिनू आला तेव्हा पार्किंग मध्ये नव्हती. घरी गेलो तर त्याच्या घरी काहीच सुधरत नाही आहे. नक्की काय चालू आहे?’, सिद्धू विचार करू लागला. काहीच समजेना.

“आजोबा, काय चालू आहे? सगळे का खोटं बोलत आहेत?”

“कोणीही खोटं बोलत नाही आहे. फक्त तूच स्वताशी खोटं बोलतोय.”, आजोबा एकदम शांतपणे म्हणाले.

“म्हणजे?”

“सांगतो मी तुला. ये बाहेर ये.”, आजोबा सिद्धुला बाहेर घेऊन आले.

त्याला घेऊन ते एका दुसऱ्या रूममध्ये आले.

“सिद्धू हे घाल”, म्हणून आजोबांनी सिद्धुला काही कपडे दिले.

black shirt, dark blue jeans. खाली shoes.

“का आजोबा? हे काय चालू आहे?”, चिनू change करत करत म्हणाला.

“चिनू कुठंय विचारात होतास न? दाखवतो तुला.”

त्या रूममध्ये कोपर्यात तिथे पडद्यामध्ये कपाट झाकून ठेवला होता.

“ये इथे ये.”, सिद्धूने change केल्यावर आजोबा त्याला त्यासमोर आणत म्हणाले.

त्यांनी पडदा बाजूला केला.

आरशात चिनू होता.

handsome daring dazzling dude.

त्याला पाहून सिद्धू स्तब्ध झाला.

स्तब्ध.

असा स्तब्ध जशी मूर्ती असते.

काहीच कळायला मार्ग नाही.

त्याच लक्ष कपाळाकडे गेलं.

त्याच्या कपाळावर एक भली मोठी जखम होती.

त्याने नखशिखांत स्वतःला न्याहाळल. आरशात स्वतःला पाहत होता, कि स्वतःत अजून कोणा दुसऱ्याला? काहीच कळत नव्हतं.

एकच उपाय होता.

भालेराव आजोबा.

“काका. हे… ह्हहे… क्क…काय आहे? मी? मी.. म्म..मी?. . “, सिद्धुला बोलावत नव्हतं.

“शांत हो. धक्का पचव. मी स्पष्टीकरण देतोय. घे”, आजोबांनी त्याला बेडवर बसवलं आणि खिशातून एक मोठं चोकलेट काढलं. “हे खा. आणि शांत हो. मी समजावतो तुला.”

”म्हणजे मी खरंच वेडा आहे?”, सिद्धूने चोकलेट खालल. ते महत्वाचं आहे. काका अनुभवी आहेत. त्याच्यात काही chemicals असतात, त्यामुळे मन प्रसन्न होतं.

“नाही. तू वेडा नाहीस. तू एक exceptionally बुद्धिमान मुलगा आहेस. तुझ्यात भयानक कल्पनाशक्ती आहे. फक्त फरक इतकाच कि तू कल्पनेला खूप जास्त अंगावर घेतलस.”

“आजोबा. मला वाचवा. मी वेडा आहे.”

“नाही रे बाळ. तू वेडा नाहीस. फक्त झालेला प्रकार समजून घे. तू आधीपासून एकटा होतास. तुझा एकांत खूप जास्त होता. आणि empty mind is always very dangerous. तू तुझ्या एकटेपणात चिन्मयला घडवलंस. त्याला तू आकार दिलास. तू स्वतःला सांगत होतास कि तो तुझा मित्र आहे.”

“आणि जे काही घडलं ते?”, सिद्धू धापा टाकत होता. घाबरत होता.

“आणि त्या सगळ्या घटना घडल्या? तू स्वतः केलंस सगळं. हे बघ.”, काकांनी खिशातून फोन काढला. “हा video तुझा आहे. तू गाडी जाळलीस, तेव्हा काही मुलांनी तुझी video काढली. हे बघ.”

काकांनी सिद्धुला video दाखवला. त्यात तो एकटा गाडीचे तुकडे करत होता.

“ओये Mr. India के कॅलेंडर. इधर आ. अरे ओ भाई. तूच. जा second floorला माननीय नामदार श्रीमंत खासदार जयराज पाटील ह्यांचा एकमेव सुपुत्र आदिराज पाटील आहे. त्याला बोलावून आण”, हे सिद्धू त्या video मध्ये म्हणाला.

तोच video पुढे play केला.

“सोड न चिनू, अरे यार. उसकी बडी बडी बोली, आठ बाय दस कि खोली”

“आयला. सही रे सिद. शिकलास तू.”

“बस क्या भाई”

सगळं काही फक्त सिद्धूच बोलत होता. जसा स्वताच स्वतःला response देतोय. हसत होता. एका हाताने दुसर्या हाताला टाळी देत होता. सगळं एकदम विलक्षण होतं.

सिद्धूचा विश्वास बसत नव्हता.

“आजोबा. मी एक एक क्षण जगलोय चिनूसोबत. माझा यार होता तो. मी एक एक सुख आणि दुःख भोगलंय त्याच्यासोबत. जीवाच गुज सांगितलं त्याला. मी त्याला माझं मीपण दिलं. आणि तुम्ही आता मला सांगताय कि तो मीच आहे? कि माझा भ्रम आहे? का सांगितलं मला? मी सुखी होतो माझ्या भ्रमात.”, सिद्धू फुंडून फुंडून रडू लागला.

“बाळ. जर कोणी भ्रमात जगत असेल, आणि सुखी असेल, तर त्याच्यासाठी सत्य महत्वाचं नाही,. हे खरं आहे. पण जर का तो मर्यादा ओलांडत असेल तर वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी लागते.”

थोडं थांबून आजोबा पुढे म्हणाले.

“मला तर ह्याचं आश्चर्य वाटतं कि तुला संशय कसा नाही आला? तुमची भेट फक्त तीन दिवसाची. पहिला तो तुला भेटला. दुसर्या दिवशी कॉलेजमध्ये भांडण, तिसऱ्या दिवशी नेहाच्या घरी जाणं झालं. आणि त्याच दिवशी लगेच भांडण झालं आणि तो गेलासुद्धा? बरं. गेला तर आला तो थेट तेव्हा जेव्हा त्याची गरज होती. मधल्या काळात तू त्याचं घर समजून कॉलेजमध्ये चौथ्या मजल्यावर जाउन अभ्यास करायचास. तू त्याला स्वताच्या मनात तसाच आकार दिलास, जसं तुला स्वतःला व्हायचं होतं. खरंतर त्यात तू स्वतःला आकार देत होतास. हळू हळू तूच चिनू होऊ लागलास. मुळात तू नम्र आहेस. पण चिनू उद्धट होता, तो तू होऊ लागलास. तुझे कपडे आणि राहणीमान बदललं. तुझी भाषा बदलली. तुझं दिसण बदललं.”

“मधल्या पाच महिन्याच्या काळात तो कुठे होता? आजोबा?”

“तूच सांग. आदीचा भांडण मिटला. नेहाचा problem सुटला. मग चिनुची गरज संपली, म्हणून तो येणं बंद झालं.”

“शिवाय नेहा आल्यापासून एकटेपणा गेला.”

“बरोब्बर बोललास. त्या मुलीसाठी तू काहीही करू शकतोस तू. तुझा जीव आहे ती. आणि तुला वाटलं आकाश तिला काही करेल. म्हणून चिनूला आणलास तू आणि…”

“आणि आकाशचा खून केला”, सिद्धूने काकाचं बोलणं पुढे पूर्ण केलं.

खूप वेळ दोघे शांत बसून राहिले.

कोणी काहीच बोलेना.

“पण काका, चिन्मय धनगर हे नाव कुठून आलं?”

“मी तुझ्या बाबांना त्या बाबतीत विचारलं. तुझी आई तुला प्रेमाने चिन्मय बोलायची. पण ती गेल्यावर बाबांनी तुझं नाव बदलून सुबोध ठेवलं. आणि धनगर आडनाव, कदाचित तू जातीने धनगर आहेस म्हणून. . ”

“पण आई गेली तेव्हा मी तेव्हा खूप तान्हा होतो. लक्षात कसं राहील?”

“आपलं मन हे खूप मोठं कोडं आहे. पण तुझं नाव तूच तयार केलंस.”

“आजोबा. शेवटचा प्रश्न काल रात्री काय झालं नक्की?”

“नेहाने इतकंच सांगितलं कि संध्याकाळी आकाश अडवा आला. लगेच नेहा मदत मागायला पोलिसांना शोधायला गेली. ती परत आली, तेव्हा तिथे तू नव्हतास. आकाशचं प्रेत पडलं होतं. तुझ्याकडून इतकंच कळलं आहे कि, तू त्याला मारून लपत छपत खाडीच्या पलीकडे गेलास, आणि नाशीकच्या इथून पुढून कुठून तरी दूर पळायची तयारी केली. तू शैलानला फोन लावलास. तू त्याच्यासोबत फक्त ३० किलोमीटर दूर गेला होतास सिद्धू. आणि जेव्हा पुढे पोलीस होते, तोच ऐनवेळी तिथून तू निसटलास, आणि आलास ते थेट माझ्या दारी. तोही जखमी. ह्यापेक्षा जास्त त्या रात्री काहीही झालं नाही.”

काका बोलता बोलता थांबले.

“आजोबा. तुमची ओळख सांगा.”

“मी Dr. S. भालेराव. मी मानसशास्त्रज्ञ आहे. तुला पाहूनच माझ्या लक्षात आलं कि काहीतरी गडबड आहे. तुझ्या पाकिटातून मी तुझा फोटो पहिला. तुझ्या bag मध्ये तुझा फोटो आणि काही गोष्टी होत्या. मी पोलिसांच्या आधी तुझ्या बाबांना फोन लावला. त्यांनी मला काकुळतीला येउन विनंती केली कि माझ्या पोराला वाचवा. मला खूप वाईट वाटलं. म्हटलं बघू तर काय case आहे. तुला मी माझ्या ताब्यात घेतला. तू आठ तास बेशुद्ध होतास सिद्धू. मी सगळी चौकशी केली. details पहिले. तू सांगायच्या आधी मला तुझ्याबद्दल बरंच माहित होतं.”

“सर, पण तुम्हाला चिनूबद्दल कसं कळलं?”

“हो मला संर वैगरे नको बोलूस. आजोबा म्हण. छान वाटतं. नव्हतं कळल. म्हणून तर मी तुझी सगळी चौकशी केली. हे कोड तर आत्ता उलघडल. तू चिनूच जे वर्णन केलंस, ते तुझं स्वतःचं होतं.. हे माझ्या लक्षात आलं तेव्हाच मला वाटलं कि हि DID ची अतिशय दुर्मिळ case आहे. माझ्या चाळीस वर्षांच्या career मध्ये अशी कासे पहिली नाही रे. ”

“DID?”

“Disassociative Identity Disorder. म्हणजे काय ते नको विचारूस.”

“मी वेडा आहे?”

“नाही रे माझ्या राजा. तू वेडा नाहीस. फक्त तू थोडासा आजारी होतास. आदि आणि त्या लोकांनी तुझ्या मनाला जखमा केल्या होत्या. आता फार त्याचा विचार नको करूस. काही झालं नाही आहे.”

“आणि तुम्ही भेटला नसता तर?”

“कदाचित तुला शिक्षा तर तशीही नसती झाली. पण तू आयुष्य भर स्वतःला विचारत राहिला असतास, कि चिन्मय कुठे आहे, अनोळखी मित्र कुठे आहे. ”

त्याचवेळी आजोबांनी नेहाला आणि बाबांना आत बोलावलं.

बाबांकडे सिद्धू मान वर करून पाहू शकत नवता. त्याच्या मनात खून केल्याची अपराधी भावना होती. तो फक्त मान खाली घालून बसून राहिला.

आजोबांनी बाबांकडे पाहून मान डोलावली. तसे बाबा म्हणाले, “हे बघ, सिद्धू. तू काही गुन्हा केला नाही आहेस. विषारी इंगळी चपलेत आली तर कोणीही तिला ठेचत. हा जगाचा न्याय आहे. तू काळजी नको करूस. तू एकता नाही आहेस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.”

नेहा समोर येउन उभी राहिली. आजोबा आणि बाबा रुमच्या बाहेर गेले.

ती रात्रभर झोपली नव्हती. रडून रडून बेजार झाली होती. तिला पाहून सिद्धुला खूप धीर वाटला.

सिद्धू घाबरला होता. त्याला बोलावत नव्हतं. पण त्याचे डोळे बोलत होते. नेहाला त्याला काय बोलायचं होतं ते समजलं.

तिने येउन त्याला घट्ट मिठी मारली.

दोघेही काहीच बोलले नाही.

आता बाबा आणि नेहाला भेटून सिद्धुला खूपच आधार मिळाला.

नेहा आणि सिद्धू रुमच्या बाहेर आले.

सिद्धूने स्वतःला पोलिसांच्या अधीन केलं.

case कोर्टात गेली.

आकाशच्या विरोधात अनेक पुरावे सापडले. तो गुंड होता. त्याने खूप भानगडी केल्या होत्या. सिद्धूचा भूतकाळ आणि academic record त्याच्यामागे पाठीराख्यासारखा येउन उभा राहिला.

सर्वात मोठा पुरावा होता, पार्किंगच्या इथे असलेला security कॅमेऱ्याची recording. स्पष्ट दिसत होतं, कि आधी आकाशने सिद्धूवर डोक्यात रॉडने जीवघेणा वार केला. त्यानंतर आकाशने बंदूक काढली. तेव्हा सिद्धूने तोच रॉड आकाशला फेकून मारला. तेव्हा ती बंदूक त्याच्या हातातून खाली पडली. तो पुन्हा ती उचलायला धावला, आणि तेवढ्या वेळात सिद्धूने ती उचलली. आकाशचे इतर दोन मित्र सिद्धुला दाबत होते. आणि तेव्हा दुसरा कोणताच उपाय नसल्याने सिद्धूने त्या बंदुकीतून दोन rounds fire केले.

एक छातीत, दुसरा डोक्यात. आकाश जागीच कोसळला.

हा खूप मोठा पुरावा होता. सिद्धू case मधून बाहेर पडला.

बरेच दिवस गेले.

आता खरी गम्मत सांगतो.

एकदा सिद्धू झोपला होता.

कसल्यातरी आवाजाने त्याला जाग आली.

उठून पाहिलं समोरच्या हॉलमध्ये एक काळी सावली फिरत होती.

त्याला काहीतरी आठवलं.

तो धावत धावत hall मध्ये गेला.

समोर चिनू उभा. .

त्याने जाऊन त्याला कडकडून कडकडून कडकडून मिठी मारली.

दोघे काहीही न बोलता खूप रडले.

कोणीच काहीच बोलत नाही.

शेवटी सिद्धू म्हणाला, “कुठे होतास यार. किती miss केलं मी तुला.”

“Busy होतो रे. एकदोन कामं होती.”, चिनू म्हणाला.

“आता जाऊ नकोस”, सिद्धू म्हणाला.

चिनू काहीच नाही बोलला.

सिद्धूच म्हणाला, “यार चिनू. डॉक्टर म्हणाले कि तू माझा भास आहेस.”

चिनू हसला, “तुला काय वाटतं?”

“हे स्वप्न असेल तर please रे. मला उठवू नका रे कोणी”

“मी भास नाही. आणि डॉक्टरांना माहित नाही कि मी काय आहे.”

“असुदे. तू आहेस हे महत्वाच, काय बोलतो? पण आता जाऊ नकोस.”

“हे बघ भाई, मी कलटी मारतोय. वापीस येणार नाही.”

“नको न जाउस यार. तुझ्याशिवाय कोण आहे माझं? मी परत एकटा पडेन रे.”

“तू एकटा नाही पडणार”

“कोण आहेस तू?”

“मला गोष्टी फिरवायला आवडत नाही. मी कोण आहे ते तुला काही वर्षात कळेल. आता मी निघतो. बाकी हिसाब रोकडा प्रेम चोपडा. काय बोलतो?”

“चिनू यार.”

“बोल न भाऊ”

“I love you रे”

“love you too जान.”

“काळजी घे”

चिनू निघून गेला कधी आलाच नाही.

दीड महिन्यात सिद्धूचा result आला. त्याने university मध्ये त्याच्या branch मध्ये चौथा rank आणि कॉलेजमध्ये first rank score केला. Infosys मध्ये campus मधून selection झालं. Job routine चालू झाला. एका वर्षात promotion झालं.

नेहाच्या बाबांना दिलेला शब्द त्याने खरा केला. नेहाचं graduation पूर्ण झालं. दोघांचं लग्न झालंय. नेहाने लग्नानंतर post graduation complete केलं. दोघे खूप सुखी आहेत. आणि एक गोड बातमी मिळणार आहे.

हे सगळं तीन वर्षापूर्वी झालं होतं. आत्ता सिद्धूच्या चाळीच्या इथे जुनी घरे पडून एक tower तयार झालाय. Builder ने society चा नाव राजायोगप्रस्थ असं ठेवलंय..
पण तो धर्मशाळेचा हॉल अजून तसाच आहे.

सिद्धूने त्या बिल्डिंगच्या नवव्या मजल्यावर third flat बुक केला.

तो flat exactly तसाच आहे, जसा चिनूचा होता. सिद्धूने AIचा एक प्रोग्राम पण design केला, पण तो तितका ठीक नाही जितका चिनुची मधुरा होती.

फक्त योगायोग.
.
.

😉

Love you guys!

(समाप्त)

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

 

 

You may also like...

58 Responses

 1. shubhangi says:

  Wow ! What a story. I love it .sir kiti kautuk karaych kadat nahi ahe pn je kahi ahe te khup Chan ahe .svatala ekta vatl k kharach as hot ka mahit nahi.mi sudha khup ekt feel karte pn jevha horror stories vachte tevha kon jane khup Chan vatat.mi sidhu madhe svatala pahil .mi pn ekta astana svatashich bolte. pn jaudya sir apratim story lihilit tumhi

 2. rohan says:

  awesome story…………

 3. Sunny says:

  WoooooooooW Writer भावा काय स्टोरीचा End केलाय. आजपर्यंत खुप काही वाचलं पण यात काहीतरी Bhannat आहे. End एवढा फुलवलाय ना यार DIL खुष हो गया मेरा . Keep It Up Writer Bro . LovE Euuu So much N Ur Stories. Hats Of U भावा .अप्रतिम लेखन. अजुनही मस्त Stories लिह . आम्ही वाट बघतोय . Bye Good Night. Sweet Dreams. Take Care.

 4. s.parab says:

  mala aadhipasun mahit hot chinu ha siddhucha bhas ahe.asha story aadhipan vachlya ahet. pn ya story cha end ekdum different ahe. chinu ani siddhu ch shevtch conversation ekdum manala sparsh karnar vatt me punha punha vachla end. ek no. story ahe ani end tr ekdum mast very very very nice story

 5. Punam Salgarkar says:

  Superb… Mind-blowing… awesome story…. Ending tar farach jabardast vatli.Really HATS OF to your writing and imagination sir.Ashach stories lihit ja ani thanx for writing such beautiful and wonderful story for us….and waiting for your next stories……

 6. Gun Esh Zim says:

  Wow Sir, Such A Great Story I Read After Mrigjala And Ishq
  Nice Story
  Next Thriller, Horror, Suspense Story Chi Vaat Pahtoy

 7. Bhagyavardhini Deshmukh says:

  Story kharch khup mst ahe…bt jra jast ch vadhvleli ahe…bt its amezing…ani mla vatl hoti ki yacha end bad ch honar…bt end khup chan hota…mhanje happy ending…soooo i m also happy….

 8. Raj says:

  Majhyabarobar suddha asach hotay real madhye

  • SHERA says:

   Yar suparstory heart la tuch kala ya story madhe sidhut mazi life disati well done guru storywriting sathi tusudha maza guru zala.

 9. Sanket says:

  Khara lihaila shbda kalat nahit i read many story but this 1 is awsom i fell hya story vr movie pahije but like madhura

 10. Abhijeet says:

  Kharch khup chan?????

 11. sohail says:

  khup khup mst

 12. Priyanka says:

  Kay mast story ahe mi kadhich kontya story var comment or response nahi det .pn tumachi story ek number ahe.mi bolav titak kami ahe ya storybaddal.

 13. sanket patil says:

  Khup bhari aahe yaar
  Awesome friendship.

  Thank you so much for this story.

 14. akshata says:

  khup chan katha lihili ahe tumhi

 15. sachin says:

  very nice narration liked your stori I guess the end but it was fun to read till end

 16. एखादी कथा लिहिताना ती स्वत: आपल्या डोक्यात जगावी लागते . . .
  जशी या स्टोरी मध्ये सिद्धू वर्तमानातंच स्वत:च भविष्य जगला !
  अप्रतिम स्टोरी . . .

 17. pratik khodwe says:

  थोडा समजायला वेळ लागला पण आता वेड लागलाय आसा वाटायलाय

 18. harshali says:

  such a great story yaar.. unbelivable..

 19. raju sawale says:

  kharokhar khupach chaan khup maja aliy wachayala asach likhan chalu theva sir!

 20. Ajay Bhatkar says:

  What a story sir, I love it…??????????

 21. amruta shirodkar says:

  Ak ch no yarr……Kay story lihili aahe..Bhannat akdam…..?

 22. Pratiksha says:

  Ossummm story……?
  Really like it….?

 23. Nilesh wankar says:

  बाकी हिसाब रोकडा प्रेम चोपडा. काय बोलतो?
  One of the best story…. Hatts off sir

 24. Chivi says:

  Likhan..apratim…shabdach nahit
  Kaddak…dole bharun aale..♥

 25. Kadak Story yaar.. App banva na tumcha..vachyla Chhn vatel

 26. Abhishek Gopal Dongre says:

  Awesome story sir. Bhaykatha vachtana Achanak ashi story vachayla milali kharach aashcharya zhala. Pn aali hi Katha kharach mansanchya taarana bhirkaun geli,katha vachtana kharach dokyat phude Kay Lila asel hyachi excitement vadat Hoti. Ektr pn tyatun nirmaan Kelela vyaktimhatva va tya vyaktimhatva chya aadhare assal jivnaat aanlele kiva zhalela baddal. Fhaar Chan Katha Hoti Ni without any doubt U r n excellent writer

 27. Pratibha Kulkarni says:

  Nice Story….Good imagination….

 28. anand says:

  Kharach Khup Faboulus story hoti. Khup enjoy keli. last paryant suspence hota.khup awadli… suspence mule doke fakt futayche rahilet hote….

 29. Jyoti says:

  mastchhhhhhhhhh

 30. Dnyanesh says:

  Very nice story, parts are also good.
  I’m thankful to you for this story.

 31. Nikita Chavan says:

  Amazing Story. sunder……

 32. Mukta says:

  Wowwwwwwwwwwwwwwwwwwwww

 33. anju bagde says:

  great story sir….mi tr guntun gele hote ya story mdhe….fabulous. ..

 34. SWATI says:

  awesome story

 35. Bhavesh Khairnar says:

  LAAAAJAWAAAABBB!!!!!!!
  EKDUM KADAK STORY RAO
  MOVIE BANAYLA HYA STORY VAR
  FILM MAHDYE SAGLE MARATHI ACTORS
  AANI CHINU MHANJE “ANKUSH CHAUDHARI” CHA CHARACTER EKDUM SAHI ASEL

  MAI TOH JABRA FAN HO GYA

 36. somnath saune says:

  Nice story.i like very much specillally end

 37. Rajashri says:

  Unbelievable speechless interesting story

 38. Sumit says:

  Kharach khup mast story hoti shevat paryant suspence hota khup avdali

 39. Nikita Sawant says:

  Bhari aahe, ek number

 40. Amit B Pardeshi says:

  आयला…..
  पाटील साहेब …..कसलं खतरनाक imaginetion
  करता राव तुम्ही ….

 41. Nilam JADHAV says:

  Khup Chan story hoti suspense TR kutun kutun bharala ahe hyat …mala vatlech hote ki tyacha bhas asel kiva swapn…. Khupch Sundar hoti ase vatat hote ki end vahva ch nahi hya story Cha 1k no. Lihali He yevdhe suchate kase tumhala ????mala chinya khup avdhala tyt me mala bghitle…mastch khup avdhali Rav mala hi story

 42. Aishwarya says:

  लेखक किती अणि कस imagination करू शकतो याच अप्रतिम उदाहरण आहे ही कथा… Thank you ही कथा लिहिल्या बद्दल…

 43. संदीप says:

  Really it’s very nice story ever. ….I have no word to appreciate you …. Really very nice…..
  शेवटी एकचं बोलतो
  हिशोब रोकडा प्रेम चोपडा

 44. छान होती story पण ending काय खास नाय वाटली

 45. yogesh says:

  nice story Sir.

 46. Rajesh says:

  काय बोलू माझ्याकडे शब्दच नाहीत. अप्रतिम कथालेखन या कथेतील चीनुसारखा माझ्या आयुष्यात नंदू आहे. तो केवळ माझा भास नसेल ना . देव न करो. मी नंदूविना जगू शकणार नाही.

 47. Rajesh says:

  काय बोलू? अप्रतिम कथालेखन. माझ्याकडे शब्दच नाहीत. या कथेतील चिनू सारखा माझ्या आयुष्यात नंदू आहे. माझा loving brother. तो माझा केवळ भास तर नसेल ना. देव न करो. मी नंदू शिवाय जगू शकणार नाही.

 48. Mahi says:

  This story is so much interesting . I was read whole night ???

 49. Sourabh says:

  apratim dada, keep it up
  hi pahili asi story aahe jithe mi evdha intrest deun 3 divas as a bedtime story wachlo
  love you

 50. Vikas says:

  Sir tumhala atta bhetavs wataty..khup chaan storie ahe tumhi 1 tya mansa sathi .tumhi vichar karayala bhag padal …………..

 51. बकवास, यात अशा रोमांचित कल्पना आहेत ज्या आपल्या आयुष्यात कधीच ख-या स्वरुपात अनुभवायला मिळत नाहित. राहिली गोष्ट plots ची, यात भयंकर disorder क्रम आहे. जो फक्त सिनेमा प्रकारातच वापरला जाऊ शकतो. ब-याच कल्पनांचा अंदाज आधीचं बांधता येत असल्यामुळे त्या पुढच्या suspense ला काहिच अर्थ उरत नाही.

 52. Shekhar says:

  Khupach chaan ..story aahe …ya story var movie banayla pahije ….sir khupach chaan story lihiliy tumhi…..Suspense Khupach mst aahe story madhe ..

 53. Shree says:

  Khup sundar samor ek kalpna vishwach tayr zaly as wataty ki mi ek khup moth swpn bghitly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *