Confusion – एक अनोळखी मित्र – भाग ११ – Ek Anolkhi Mitra

Murder – एक अनोळखी मित्र – भाग १० – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“आईशप्पथ! काय बोलतोय? अरे यार.. तुला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे न्यायला लागेल”, सिद्धू घाबरला होता. त्याचा चेहेरा बदलला.

चिनूच्या डोक्यातून रक्त येत होतं. हाताला थोडा मार लागला होता. कपडे मळले आणि फाटले होते. “नाही रे. hospital काय; मी घरात पण नाही जाऊ शकत. पोलीस शोधत आहेत मला..”, चिनू अडखळत होता. अंगावर पण रक्त होतं.

“पण काय झालंय ते तर सांग”, सिद्धू म्हणाला.

“मला वाटेत अडवला. तिघे होते.. मारामारी.. मारामारी झाली. अक्याला घुमवला मी. तर त्याने gun काढली. दुसरा option नव्हता.. नव्हता माझ्याकडे.”

“बाकी दोघे?”

“पळाले.. गांडू साले.”

“चल पोलिसात शरण जाऊ.”

“काही फायदा नाही. माझा विश्वास नाही पोलिसावर. मी तुला हे सांगायला आलोय, कि कि. . ”

“अरे यार. हे रक्त बघ. चिनू यार. please. डॉक्टरांना”, सिद्धू हादरला होता.

“अरे यार. मी नाही.. मरणार. मी. तुला.. फक्त. हे.. सांगायला.. आलोय. कि”, चिनू बोलताना अडकत होत.

“बोल न. लवकर बोल. “, बोलत बोलत सिद्धू आत पळाला आणि हळद घेऊन आला.

“अरे यार. सिद्धू. ऐक. हा matter चिघळेल. मी कल्टी मारतोय. परत खूप दिवस दिसणार नाही”, चिनू एकदम हळू बोलत होता.

“पण जाशील कुठे?”, सिद्धू हळद दुसऱ्या हाताने थोडी हळद आणि एक कापड घेतलं. त्याने जखमेवर हळू हळू लावत सिद्धू म्हणाला, “थोडं झोंबेल.”

“आह.. साल्या.. आग होतेय”, चिनू कण्हत होता.

“झालं झालं थांब. आता infection नाही होणार.”, सिद्धू हळूहळू जखम पुसत होता. “चिन्या यार. तू जाशील कुठे?”

“मला नाही माहित. पण…”

“पण बिन काही नाही. मी येतोय तुझ्यासोबत”, सिद्धू आत गेला.

“सिद्धू ऐक. सिद्धू ऐक तर यार. मी काय बोलतोय”, चिनू हळू हळू ओरडत होता

“थांब आलो”

“सीधु.. मी काय बोलतोय”, चिनू मोठ्याने म्हणाला. सिधू बाहेर आला. चिनू पुढे बोलू लागला. “तू कुठे येतोय? माझं मलाच अजून नक्की नाय”, चिनू म्हणाला.

“ठीक आहे. बघू न काय करायचं. आधी आत्ताच्या आत्ता इथून सटकू. पोलिस शोधत असतील आपल्याला”, सिद्धू घाई घाईत म्हणाला. तो काही समान pack करत होता.

“आपल्याला नाही.. मला. ते मला शोधत आहेत. तुझा काही संबंध नाही”, चिनू थोडा मोठ्याने म्हणाला, “आतून पाणी आण. आणि बाबा कुठे आहेत?”

“बाबा कुठे आहेत माहित नाही.”, सिद्धू आतून पाणी घेऊन आला. “चिनू. सुरुवात दोघांनी मिळून केली. शेवटपण दोघे एकत्र करू. तुझा तर तसा ह्या लोकांशी काही संबंधपण नव्हता. माझ्यासाठी तू सगळं ओढवून घेतलं. आणि तुला वाटतं कि मी तुला एकटा सोडेन आता?”

“अरे यार. सिद्धू. माझी गोष्ट वेगळी आहे. माझ्या पुढे मागे…”

“’कोणी नाही’ असा म्हणालास तर दुसऱ्यांदा डोकं फोडेन”, सिद्धू चिनूच बोलणं मध्ये तोडत म्हणाला. “मी आहे न यार.”

“थोडं समजून घे दादासाहेब” चिनू हळू हळू बोलत होता. “बाबांचं काय होईल?”

“मी समजावेन त्यांना.. नंतर contact करू”, सिद्धू bag pack करत होता.

“नाही contact होणार”, चिनू म्हणाला. “मी आत्ता गेलो, तर कदाचित परत कधीच नाही येणार. समजून घे. तू सोबत आलास, तर murderच्याच दिवशी तू गायब झालास असं होईल आणि काहीही संबंध नसताना तुझ्यावर संशय येईल.”

“मग काय करायचं?”

“Simple.” चिनू उठत म्हणाला, “मी फरार होतो. थोडे दिवसांनी तुला contact करतो. तू इथे तोपर्यंत नॉर्मल रहा. माझा कुठे तसा काहीच अर्थार्थी संबंध नाही आहे. आकाश तसाही झोलर होता. पोलिस बघून घेतील. Matter शांत झाला कि मी उगवतो. तू शांत राहा. नेहाच आणि बाबांचं बघ. तुझ्यावर doubt नाही पण येणार”

“तू काय समजतो रे स्वतःला?”, सिद्धू चिनूचा चेहेरा पहात होता. “मला शिव्या द्यायला आवडत नाहीत. पण आता शप्पथ डोकं फिरलं माझं!”

चिनूने मान खाली केली.

“साल्या, माझ्यासाठी इतकं केलंस. आणि माझी पाळी आली तर मला हाकलतोय तू?”, सिद्धू म्हणाला.

“अरे माझी जान. हाकलत नाही आहे मी तुला. पण विचार कर. कशाला फालतू senti होतोय? प्रोब्लेम वर solution काढायचं, कि emotional होऊन तो अजून वाढवायचा?”

“चल रे. फालतू साला. उगाच डोकं फिरवतोय. कसलं solution? त्या politicians न contact करू. ते कामाला येतील.”

“घंटा.. कोणी कामाला नाही येणार.”, चिनू बाहेर निघायच्या तयारीत होता.

“नाही तर विचार करू न यार. इतके झोल केले आपण. ही वेळ पण मारून नेऊ. माझा प्रोब्लेम तुझा, आणि तुझा प्रोब्लेम माझा… simple. बोल काय बोलतो?”

“सिद्धू. माझ्या राजा. आत्ता पर्यंत फक्त नशीब होतं म्हणून वाचलो आपण. आत्ता murder झालाय. बंबू लागतील दोघांचे. माझे तर लागलेत already. ही real life आहे.. film नाही. जरा डोकं वापर.”

“तू? लौ*.. तू मला reality शिकवतोय? गेले पाच सहा महिने स्वतः paradox सारखा मध्येच गायब होतोय. कुठे होतास माहित नाही. कुठे जातोस माहित नाही. महिनेच्या महिने तोंड दाखवत नाहीस. फोन उचलत नाहीस. इतका मनस्ताप दिलाय. च्यायला. ती मधुरा कॉल attend करून करून वैतागली. आणि एकदा समोर येतो ते थेट murder करून. ते पण हे सांगायला कि मी आता परत येणार नाही म्हणून!! तुझं डोकं फुटलंय म्हणून काही बोलत नाही मी तुला. नाहीतर तुला मीच कानफाडणार होतो तुला. भोस*च्या..”

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“चिडू नकोस रे डार्लिंग.. थोडा समजून घे.”

“तुला समजून घेता घेता थकलो मी आता. किती समजून घेऊ? situation सांग. murder का केलास?”

“दुसरा option नव्हता. तो किवा मी अशी condition होती.”

“हेच पोलिसांना सांगू. ऐक माझं. पळून गेलो तर कानफाट्या नाव पडेल. चूक नसताना संशय येईल”, सिद्धूने चिनूचं कपाळ स्वच्छ केलं. हाताची जखम नीट बांधून मग एक मोठं jacket सोबत घेतलं.

“माझा विश्वास नाही पोलिसांवर”, चिनू घरातून बाहेर पडला.

“माझा आहे”, सिद्धू पण बाहेर पडला. “हे घे. घाल”, त्याने jacket चिनूला दिलं.

“सिद्धू. तू घरात बैस. मी contact करेन. वाट बघ.”

“आई शप्पथ चिनू. अजून एकदा जरी मला घालवायची बात केली तर.. माझं जाम डोकं फिरलंय”, सिद्धूचा संताप होत होता.

“अरे बाबा. ऐक माझं. काही फायदा नाही ह्याचा.”

‘नको येउस नको येउस’ बोलत बोलत चिनू घराच्या बाहेर पडला आणि त्याच्या मागे सिद्धूही घराच्याबाहेर पडला. दोन पाउले चालणार तोच पोलिसांची एक गाडी आली. आणि दोघे घाईघाईने पळत जाउन दोघे समोरच्या hall मध्ये लपले जिथे ते पहिल्यांदा भेटले होते.

आडोशाला लपले.

“सिद्धू यार. घरी जा. बाबा येतील. माझं मी बघून घेतो”, चिनू कुजबुजला.

“मी ऐकणार नाही आहे. बोल आत्ता कुठे जायचं?”

“तुला काय वाटतं?”

“मी सांगतोय कि पोलिसात जाऊ. शिक्षा झाली, तरी कमी शिक्षा होईल.”

“नाही. नको. पोलीस नको. आता सगळीकडे नाका बंदी असेल. सगळे शोधत असतील. एक काम करू. इथून निर्जन ठिकाणी जाऊ.”

“शक्य नाही. कुठे नं कुठे सुगावा लागणार”

“आधी area तून बाहेर पडू. पुढे बघू काय करायचं.. थोडे पैसे घे.”

“घेतलेत. साडेचार पाच हजार आहेत. सोन आहे थोडं. बघू”, सिद्धू म्हणाला.

“चल”

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

एकमेकांचा हात धरून ते दोघे hall मधून बाहेर पडले. सर्वांची नजर चुकवत ते लपतछपत highway पर्यंत जाऊ लागले. रस्त्यावर जबरदस्त checking चालू होती. दर आठ दहा पाऊलांना पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. ते कधीही नजरेत येऊ शकत होते. त्यांनी घरातून थेट रस्त्यावर न जाता आड वाटेने रस्ता धरला. पण गाड्या खूप होत्या. Area मध्ये full बंदोबस्त होता. मुख्य रस्त्याच्या ऐवजी त्यांनी दुसरीकडून वाट काढायचं ठरवलं. पण highway फक्त ३ किलोमीटर दूर असूनही काहीच रस्ता नव्हता. ते कसेबसे खाडीपर्यंत आले.

चिनूला चालवत नव्हतं. पण ते जुन्या पुलाला ओलांडून कसेतरी पलीकडे आले. तिथे त्यांची शहराची हद्द संपली. पुढे एक छोटसं गाव होतं. गावात सगळं शांत झोपेत होतं. दोन तीन कुत्री आणि काही गुरखे सोडून तिथे अजून कोणीच नव्हतं. गुरखेही झोपेत होते.

इतक्यात सिद्धुला काही आठवलं. त्याने खिशातून फोन काढला आणि नंबर dial करू लागला..

“अरे यार. फोन नको करूस. फोन calls tap होत असतील.”, चीनुने झटकन सिद्धूच्या हातातून फोन ओढला.

“मग काय करायचं?”

“कोणाला फोन लावतोय?”

“शैलान.. त्याला सांगू. तो मदत करेल.”

“मधुराला सांगतो. तिच network थोडं protected आहे.”, चिनू खाली बसत म्हणाला. तो पळून पळून दमला होता. त्याने सिद्धुकडून फोन घेतला.

रात्रीचे दोन पस्तीस झाले होते. `

एक number dial करून चिनू म्हणाला, “CDPN Madhura 321474”

फोन मधून मशीन म्हणाली, “Please enter the password”

“हिसाब रोकडा प्रेम चोपडा”, चिनू monotonic होऊन म्हणाला.

“Access granted”, तिथून replay आला.

“हेल्लो, चिनू कुठे आहेस? मला खूप काळजी वाटत आहे”, मधुरा म्हणाली.

“मी ठीक आहे. सिद्धू पण आहे इथे माझ्यासोबत. तू त्याच्याशी बोल.”, चीनुने सिद्धुकडे फोन दिला.

“हेलो मधु”, सिद्धू म्हणाला. “तुला urgently एक काम करायचं आहे.”

“बोल. मी ऐकतेय. ‘Process switched on real time priority’.”, मधुरा म्हणाली.

“ताबडतोब शैलान मोहोम्मद नावाच्या माझ्या मित्राला शोध, आणि त्याला कॉल कर. माझा message दे. माझं location सांगतो…”

“Location trace झालं आहे. तू फक्त message सांग.”, मधुर घाई घाईने म्हणाली.

“बर. फक्त मला इथून शक्य तितक्या दूर जायचं आहे. मला गाडी किवा काही माध्यम हवं आहे. किवा फक्त..”

“हो समजलं मला. मी सांगतेय त्याला”

मधुराने फोन cut केला.

पुढच्या पाचव्या मिनिटाला SMS आला.

“Person has been contacted. Location delivered. He is expected to reach at the place within half an hour.”

सिद्धू आणि चिनू दोघे त्या गावाच्या वेशीपाशी आडोशाला होते. आत गावात घरे दूर होती. एक मंदिर होतं. तिथला दिवा छान दिसत होता. तिथे कोणीच नव्हतं. तिथून सरळ रस्ता होता, जो अनेक फाटे आणि गल्ल्याना जोडत होता. तिथून पुढे तोच रस्ता सरळ highway ला निघत होता. दोघे असे लपून बसले होते, कि कोणालाच दिसत नव्हते. पण त्यांना रस्त्यावरून येणाऱ्या जाणार्या गाड्या मात्र दिसत होत्या.

दोघांचा श्वासोच्छ्वास, रातकिडे आणि खूप वेळाने रस्त्यावरून येणारी आणि जाणारी एखाद दुसरी गाडी, हे सोडून बाकी कसलाच आवाज नव्हता.

खूप वेळ दोघे काहीच बोलले नाहीत.

चिनू खूप दमला होता.

“कोण आहे हा शैलान?”, चिनू साशंक होता.

“आदीचा मित्र होता. पण आपल्याशी चांगला आहे”, सिद्धू म्हणाला.

“किती विश्वास आहे ह्यावर?”

“शंभर टक्के”, सिद्धूने bag तून काहीतरी काढत म्हटलं. “हे घे. खा.”

दोघे थोडी फळं आणि चिवडा अशा गोष्टी खात होते. घरात जे काही होतं ते सिद्धूने सगळं उचललं आणि sack मध्ये भरलं.

“चिनू”

“हम्म”, चिनू रस्त्याला नजर चिकटवून विचार करत होता.

“चिनू. तू झोप थोडा वेळ. हा शैलान कधी येईल माहित नाही. पाऊणे तीन होत आलेत. मधुराने exact location तर सांगितली असेल न?”, सिद्धू चिनूला म्हणाला.

“मधुरा चुकणार नाही.. पण आपण असं लपून बसलो, तर आपण त्याला कधीच दिसणार नाही”, चिनू म्हणाला.

“त्याला call करण्यावाचून दुसरा पर्याय नाही”, सिद्धू अजून tension मध्ये होता.

“आणि त्याच्या आधी पोलिस आले तर?”, चिनू म्हणाला.

“मी तर म्हणतो चांगलं होईल.”

“मला वाटतं सिद्धू, तू घरी जा. मी करतो काहीतरी manage”, चिनू बसल्याजागी मागे टेकत म्हणाला.

“दुसरा option नव्हता म्हणून तू त्याला मारलं. अशा condition मध्ये शिक्षा नाही होत. सगळ्यांना माहित आहे.”

“आणि झालीच तर?”

“करू न काही तरी. पण पळून वैगरे नाही पटत मला”

“शांत राहा. तो शैलान का कोण तो आला कि इथून कलटी मारू. UP MP मध्ये कुठे तरी जाऊ. काहीतरी झोल मारू. नंतर बघू.”

“अबे चू*. हजार किलोमीटर लांब जातोय आपण. काहीच चूक नसताना. इथेच गुन्हा सिद्ध होईल. चिनू भानात ये. पाण्यात किती खोल घाण केली, तरी ती वर येतोच.”

दुरून रस्त्यावर एक गाडी येउन गेली.

“सिद्धू. मी एक दिवस पण घरात २४ तास कधी राहिलो नाही. Jail म्हणजे.. यार.. त्यापेक्षा म suicide काय वाईट मं?”

“तुला काहीही होणार नाही. माझा शब्द आहे. मी सांगतो मी खून केला.”

“चल रे हटा. आला मोठा गुन्हा अंगावर घेणारा”, चिनू वैतागला होता. त्याला सिद्धूच बोलणं impractical वाटत होतं. “तू साला bookworm आहेस. तुला झा* दुनिया माहित नाही सिद्ध्या. सगळं इतकं सोप नाही आहे. आणि हा गुन्हा खूप मोठा आहे”

“काय बोलू यार तुला. जशी तुझी मर्जी. तसही तू माझं काही चालू नाही देत.”, सिद्धू शांत बसला.

खूप वेळ दोघे शांत बसले.

“एक बोलायचं होतं”, बऱ्याच वेळाने चिनू म्हणाला.

“बोल न भाई”

“अरे यार. तुला जाम miss केलं मी..”, चिनू काय बोलणार सिद्धुला माहित होतं.

“Phone attend का करत नव्हता? ..”

“कसं सांगू तुला. यार. .”

“तोंडाने सांग, आणि फिरवत नको बसूस. सरळ बोलून मोकळा हो. “, सिद्धू रस्त्याकडे पाहत म्हणाला.

चीनुने मान खाली घातली.

इतक्यात सिद्धूचा फोन वाजला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
फोनची रिंग त्या पार्किंग area मध्ये घुमत होती. त्या आवाजाने parking lot मध्ये सिद्धुला जाग आली.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

अजून पण डोकं थांबत नव्हतं. पण डोक्यातून येणाऱ्या कळा छातीतून येणाऱ्या वेदनांपेक्षा कमी दुःख देत होता.

त्याचा जीवाचा जिवलग मित्र मरून पडला होता. सिद्धू दुःखाने तडफडत होता. पण तिथे त्याचं ऐकणार कोणीच नव्हतं. त्याने कसंबसं उठून चिनूच्या थंड प्रेताला बाजूला केलं. तो रडून ओरडून थकून गेला होता.

“चिन्या. हे काय झालं?”, चिनूच्या प्रेताला पुन्हा पुन्हा कवटाळून सिद्धू रडत होता.

“मी सूड घेणार”, सिद्धू सारखा सारखा डोळ्यात आग आणून बोलत होता, आणि त्याच वेळी तो डोक्यातून येणाऱ्या शिणकांमुळे ‘आह आह’ म्हणून कण्हत होता. डोकं गरगर करत होतं. एकीकडे डोक्याचं दुखणं, आणि दुजीकडे चिनू..

तसाच धडपडत उठत तो दोन पाऊले चालत दूर गेला. दोन पाउले चालतच थोडीशी चक्कर कमी झाली, आणि पुढची दोन पाऊले तो कमी अडखळला.

मदत हवी होती. कोणाचीही मदत.

त्याने खिशातून mobile काढला. हात थरथरत होते. नजर अंधुक पडली होती. थरथरत्या हाताने mobile बाहेर काढता काढता तो गळून पडला. पुन्हा तो उचलून वेळ पाहिली.

ते रात्रीचे साडे नउ होते.

चिनू तिथे तसाच निपचित पडला होता.

“हे काय झालं ! अरे कोणी तरी आहे का? कोणी आहे का? please. माझी मदत करा. माझा मित्र.. “, सिद्धू ओरडत ओरडत रडत धडपडत बाहेर येत होता. तो पुन्हा पुन्हा चीनुकडे पाहत होता. तशी त्याची अवस्था अजून भयानक होत होती.

चिनू भेटल्यापासून, ते त्याच्याशी घालवलेला एकएक क्षण सीधु आठवत होता. तसातसा त्याचा त्रास वाढत होता. कोणी कोणासाठी इतकं करेल? सख्खा भाऊ नाही करणार, ते ह्या अनोळखी मित्राने केलं.

ते दुःख आणि दाह घाताघाताने वाढत होता.

“चिन्या. यार. मी पुन्हा एकटा पडलो. आता माझं ह्या जगात कोणीच नाही. तुला जायचं होतं तर आलासच का? मी तरी आग्रह केला नव्हता. तू स्वताहून आला होतास. तुझी मनमानी नाही चालणार. कधीही येतो कधीही जातो. परत ये रे.”

स्वप्नात वाटलं नव्हतं जे घडून गेलं.

तो पार्किंग मधून बाहेर आला.

रस्ता सामसुम होता. निरव निरव शांतता होती. भयानक वातावरण होतं. दुकाने आणि घरे बंद होती.

सिद्धू गोंधळून जात होता.

काय होतंय काहीच कळायला मार्ग नव्हता.

सिद्धू एका घरापाशी गेला. सगळी शक्ती लावून त्याने दरवाजा ठोकला.

“दार उघडा. please दार उघडा”, चिनू रडत रडत ओरडत होता. अजूनही चक्कर येत होती. आतून कोणीही काही उत्तर दिलं नाही. तो पुढे गेला.

न रस्त्याला एखादी गाडी होती, न कोणी माणूस.

तो तसाच धडपडत पळत पळत दुसरीकडे गेला. त्याला कळतंच नव्हतं कि तो आहे कुठे.

भ्रम होत होता.

सिद्धू थोडा पुढे गेला. रस्ते कळंत नव्हते. काय चालू आहे तेही कळंत नव्हतं. नजर मध्ये मध्ये अंधुक पडत होती. डोकं ठसठसत होतं. कण्हत कण्हत पुढे जाउन तो अडखळून पडला.. उठून मागे वळून पाहिलं, तर तो कुठे होता तेच समजत नव्हतं.

इतक्यात त्याचा फोन वाजला..
.
.
.
.
.
.
.
.
.
अचानक फोन च्या आवाजामुळे सिद्धू आणि चिनू दोघे चपापले. खूप शांतता असल्याने तो आवाज खूप मोठा वाटला.

“काय करू? उचलू का?”, सिद्धूने दबक्या आवाजात चिनूला विचारलं.

“आधी बघ कोण आहे”, चिनू म्हणाला.

“Number दिसत नाहीये. CDPN काहीतरी लिहिलंय”, सिद्धू confuse झाला होता.

“अरे मधु आहे ती. उचल उचल”, चिनू म्हणाला.

त्याने फोन उचलला.

“hello”, अलगद कानाला लावून सिद्धू म्हणाला.

“हा हेल्लो. सिधू. कुठे आहेस?”, शैलान म्हणाला. मधूने शैलानचा कॉल trace होऊ नये म्हणून स्वतःच्या secured network मधून सिद्धूच्या फोन मध्ये divert केला होता.

“तू कुठे आहेस?”

“मजबूत checking आहे. तू रस्त्याला उभा राहा. मी त्या गावाच्या इथून पास होतोय.”

“गाडी कोणती आहे?”, सिद्धू म्हणाला.

“आत्ता मी innova मध्ये आहे”

चिनू म्हणाला, “अरे चु*, रात्री फक्त दुरून headlight बघून गाडी ओळखायला तू काय mutant आहेस काय? दुसरा बोल त्याला”

सिद्धू थोडा विचार करून शैलानला म्हणाला, “Headlight blink कर. मला कळेल कि तो तू आहेस.”

“ठीक आहे”, शैलान म्हणाला.

काही गाड्या तिथून pass झाल्या. काही मिनिटात एक गाडी आली, तिची headlight blink होत होती.

“आला”, सिद्धू थोडा निश्चिंत झाला.

गाडी जवळ येउन थांबली.

रात्रीचे तीन जावून वाजून पाच मिनिटे झाली होती.

“ये रे. आत बैस”, शैलानने दार उघडलं. तो drive करत होता. त्याच्यासोबत अजून दोन मुले होती. ते मागे बसले होते.

“तू ठीक तो हे ना?”

“हा ठीक हु. बस थोडा.. “, सिद्धूने चीनुकडे पाहत म्हटलं.

“अच्छा ठीक आहे.. काही खाललास काय?”, शैलान म्हणाला.

“हो”, सिद्धू आणि चिनू शैलानच्या बाजूला बसले. दुसरी दोन मुले मागे होती.

“चिनू. अजूनही सांगतो. ऐक माझं. पोलिसात जाऊया.”, सिद्धू पुन्हा पुन्हा बोलत होता.

“शक्य नाही. आत्ता तडीपार होऊ. काही महिने जाउदे. सगळं ठीक होईल”, चिनू हळूहळू बोलत होता. त्याची शक्ती क्षीण होत होती. तो जखमी होता.

“नाक्या नाक्याला चेकिंग आहे. दादा. इकडून खूप सटकण कठीण आहे.”, शैलानचा एक पंटर म्हणाला.

“अरे हटा. चिनू म्हणाला. चेकिंग वैगरे काही नाही. कुठे तरी लंपास होऊ. फालतू मध्ये jail होईल”

“पोलिस system खूप जास्त strong आहे चिनू. आपण पळून चूक करतोय. उगाच शिक्षा वाढेल”, सिद्धू म्हणाला.

“आत्ता काय करायचं ते बोल.”, शैलान म्हणाला.

“गुजरातचा रस्ता पकड”, चिनू म्हणाला.

“गुजरात?”, शैलान चपापला.

“हा. बोर्डर क्रॉस कर. पुढे बघू कुठ जायचं ते”, चिनू म्हणाला.

“भाई तू पेहेलेसे घायल है. तेरेको…”, शैलानचा दुसरा मित्र म्हणाला.

“काही नाही होत मला. तू मिळेल त..तो रस्ता पकड आणि गाडी पळव. दूर घेऊन चल. गायब होऊ”, चिनू म्हणाला.

सिद्धू घाबरला होता. पहाट होत होती. पाऊणे चार होत होते. रस्त्यावर जास्त कोणी नव्हतं. शैलान drive करत होता. कोणी काहीच बोलत नव्हतं. त्यांनी तासाभरात highway वरून साठ किलोमीटर अंतर पार केलं.

कोणी काहीच बोलत नवतं. खूप थंडी वाजू लागली. चिनूची तब्येत अजून अजून खराब होत होती.

मोकळा रस्ता खूप वेगाने मागे मागे जात होता. एक खिडकी उघडी होती. क्वचित एखादं दुकान, बंगला किवा छोटंसं गाव येउन भरभर मागे जात होतं. निरव निरव शांत एकांत होता. ते पाच लोक चिंतेत होते आणि खरंच घाबरलेले होते.

चिनूने डोकं सिद्धूच्या खांद्यावर ठेवलं होतं. चिनू थकून झोपला होता.

सिद्धुला डोळा लागला.
.
.
.
.
त्याने डोळे उघडले. रस्त्यावर mall च्या बाहेर सिद्धू एकटा होता.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

तिथे कोणीच नव्हतं. तो कुठे होता त्याला काहीच कळायला मार्ग नव्हता. त्याने खिसे तपासले. त्यातून त्याला संध्याकाळच्या पिच्चरची दोन तिकिटे सापडली. आणि त्याला काहीतरी आठवलं.

हळू हळू भान येऊ लागलं. आजूबाजूचे रस्ते लक्षात येऊ लागले.

तो पळत पळत थोडा पुढे गेला. बाजूच्या गल्लीतून पुढे गेला. पुढे एक मोठा रस्ता होता. त्याच्या समोर एक हॉल होता.

त्या हॉलकडे पाहून त्याला काहीतरी आठवत होतं. दुरून एक काळी सावली त्या हॉलभोवती फिरत होती, आणि मोठ्याने कोणीतरी गाणी बोलत आहे असा आवाज येत होता.

हे त्याने त्या पूर्वीही पाहिलं होतं.

तसाच आवाज.

तशीच सावली.

डोकं पुन्हा ठसठसू लागलं.

‘काय बरं… लक्षात येत नाही आहे.’

सिद्धू डोक्याला खूप ताण देऊन विचार करत होता.

आठवलं. . . .

तो धावत धावत त्या हॉलमध्ये गेला. तशी ती सावली गायब झाली.

हॉलमध्ये सिद्धू एकटा होता. तो मधोमध जाऊन उभा राहिला. हॉलच्या खिडकीतून road-light चा प्रकाश आत येत होता. बाकी तिथे सगळा अंधार होता.

कोणी दिसत नव्हतं, पण गाणी बोलल्याचा आवाज येत होता. हॉलमध्ये घुमत होता. तो आवाज खूप वाढत होता.

इतका वाढत होता, कि कानाचे पडदे फाटू लागले.

आता सहन होत नव्हतं.

पुन्हा डोकं गरगरू लागलं. इतका त्रास होऊ लागला, कि कधीच सहनशक्ती नव्हती असं वाटू लागलं.

“आह. आह. आह”

लाकडाच्या ओंडक्यासारखा सिद्धू जमिनीवर कोसळला.

नझर अंधुक पडली.

चेतना जाऊ लागली.

हळू हळू डोळे बंद होऊ लागले.

.

.
.
.
.
.
“सिद्धू उठ. सिद्धू.”, शैलान म्हणाला.

रस्त्यावर प्रकाश पडला होता. शैलानने गाडी बाजूला लावली होती.

“कुठे पोचलो?”, सिद्धू म्हणाला.

“डहाणू cross. जवळजवळ दोनशे किलोमीटर कापले. और एक घंटा, और महाराष्ट्र क्रॉस”, शैलान म्हणाला. “पुढे बघ. checking चालू आहे. पकडलं तर लफडा होईल.”

“चिनू उठ”, सिद्धू चिनूला हलवत म्हणाला.

चिनू हळूच जागा झाला. “time बघ”, तो हळू आवाजात पुटपुटला.

“साडेपाच झालेत”, सिद्धू म्हणाला.

“थांबलो का आपण? ”, चिनू पुटपुटला. .

“पुढे पोलिस आहेत”, शैलानचा एक मित्र म्हणाला, “काय करायचं?”

इतक्यात पोलीसांच लक्ष गेलं, आणि एक हवालदार त्याच्या दिशेने शिट्टी वाजवत खुणावू लागला.

“आ* *व*… आता?”, शैलानचा मित्र म्हणाला.

सिद्धूची छाती धडधड धडधड.

“थांब रे. एक idea करू. headlights on कर. गाडी side ला घे. शैलान. तू धार मारायची acting कर. मी सटकतो. हा point क्रॉस करू आणि पुढे भेटू. इथून पुढे तुम्ही तिघेच जा.”

“त्यांना दिसेल”, सिधू म्हणाला.

“नाही दिसणार. headlights च्या मागे अंधार दिसतो लांबून”, चिनू born intelligent होता. झटकन पळवाट काढली.

शैलानने exactly तसंच केलं. गाडी side ला घेऊन तो बाजूला उभा राहिला. Headlights on होते. मागच्या मागे सिद्धू आणि चिनू बाहेर पडले. सरळ वाटेने न जाता ते रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झाडीमधून पाळायची सुरुवात केली.

दुरून त्यांनी पाहिलं, कि पोलिस शैलानला आणि त्याच्या मित्रांना विचारात होते. शैलानने गाडी पुढे घेतली. पोलिस सगळी checking करताना सिद्धू आणि चीनुने दुरून पाहिलं.

सुदैवाने पोलिसांचं दोघांकडे लक्ष नाही गेलं.

सिद्धू थांबून थांबून मागे पाहत होता.

“पळ. सिद्धू.”, चीनुने त्याचा हात ओढला.

दोघे उंच गवत आणि झाडीतून पळत होते. बरीच पहाट झाली होती. चिनू तूर्तास थकला होता. मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं.

शैलान आणि त्यांची ताटातूट झाली होती. तरीही ते थांबत नव्हते. दोघांचे कपडे फाटले. अंगाला लागलं. ते कोणत्यातरी शेतातून पळत होते. तिथून ते एका कच्च्या वाटेवर आले. पुढे त्यांना थोडीशी घरे दिसली. ते एक छोटसं गाव होतं. तिथे फार वस्ती नव्हती. वर्दळ कमी होती. काही बायका जात होत्या. एखाद दुसरा माणूस किवा गवळी दुध घेऊन जात होता. बाकी गाव अजूनही निपचित होतं.

थोडा थोडा प्रकाश होत होता.

इतक्यात सिद्धूचं लक्ष चिनूकडे गेलं.

तो अर्धवट बेशुद्ध होत होता. धावून थकला. आधीच जखमी होता. अशक्त झाला होता. आता थकवा सहन होत नव्हता.

“पाणी. सिद्धू पाणी. ” चिनू हळू हळू पुटपुटत होता.

“थोडा धीर धर. थोड चाल. अजून थोडं पुढे.”

“सिद्धू. जा तू. पाणी घेऊन ये. मला नाही चालवत”, चिनू म्हणाला.

सिद्धू थांबला. कपाळावरचा घाम पुसत पुसत त्याने आजू बाजूला पाहिलं. रस्त्याच्या डाव्या बाजूला दूरवर अंतरावर एक घर होतं. घर कसलं? चांगला भला मोठा बंगला होता. तो खूप सुंदर होता. तिथे कोणीतरी असण्याची शक्यता होती.

सिद्धूने विचार केला आणि चिनूला घेऊन तो त्या दिशेने जाऊ लागला. चिनू अर्धवट ग्लानीमध्ये होता. बंगल्याच्या बाहेर खूप मोठं अंगण होतं. तिथून पुढे जाउन त्याने दार ठोठावलं.

एक साधारण साठीचे धष्टपुष्ट वयोवृद्ध आजोबा होते.

सफेत शुभ्र लुंगी, आणि शुभ्र बंडी. दोंदिल होतं. चेहेरा प्रसन्न. केस मागे सरकलेले. तेजस्वी कांती. खूप छानसा चष्मा. ते पाहटे उठून कदाचित पूजा करत होते. त्यांच्या हाताला गंध तसाच होता.

“काका. आम्हाला accident झालाय. माझा मित्र गाडीवरून पडला.”

आजोबांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले.

फार explanations ऐकत न बसता, त्यांनी “अरे बापरे. या या. आधी आत या” म्हणत आधी दोघांना आत घेतलं.

आतून औषधे आणि पाणी आणत त्यांनी विचारपूस केली.

“तुम्ही आलात कुठून? आणि accident कुठे झाला ? तुमची नावे सांगा”, आजोबा चिंतेत होते.

“आम्ही कोल्हापूर वरून आलो आहोत. द्वारकेला कार ने चाललो होतो. आमच्यासोबत आमचे अजून तीन मित्र होते”, सिद्धूने पट्टी पढवली.

“अस होय?”, आजोबा विचार करत होते.

त्यांनी चिनूला औषधोपचार केले. दोघांना थोडं दूध आणि काही हलका नाश्ता दिला. चिनूने काही खालाल्यावर त्याला थोडी तरतरी आली.

आजोबांनी त्यांची थोडी चौकशी करून त्यांनी दोघांना सांगितल. “हे बघा बाळांनो. तुम्हाला खूप लागलंय असं दिसतंय. हे माझं farmhouse आहे. इथून दवाखाना आणि शहर थोडं दूर आहे. आत्ता सकाळचे पाऊणे सात होत आहेत. इतक्या सकाळी अशा अवस्थेत बाहेर जाणं ठीक नाही. तुम्ही आराम करा. काही लागलं तर मागून घ्या. थोड्यावेळाने आपण तुमच्या मित्रांना संपर्क करूया. तुम्ही पडा. मी थोडं काम करतोय.”

“ठीक आहे”, सिद्धू म्हणाला.

एका रूम मध्ये दोघांना थांबवून आजोबा बाहेर गेले.

“ए सिद्ध. चल सटंक इथून.”, चिनू म्हणाला.

“तुझी हालत बघ आधी”, सिद्धू म्हणाला.

“काही नाही होत. चल निघू. म्हातारा आहे का बघ”, चिनू म्हणाला.

“आजोबा बाहेर गेले वाटतं”

“बघून ये”, चिनू म्हणाला.

सिद्धू बाहेर जाउन आला.

“इथे नाहीये कोणीच”, सिद्धू म्हणाला.

“काय करायचं?”

“एक झोप काढू. तासाभरात निघून जाऊ”, सिद्धू म्हणाला.

“आणि वेळेत जाग नाही आली तर? हा काका झोल करेल. बोल काय बोलतो?”, चिनू म्हणाला.

“कधितर कोणावर विश्वास ठेव. किती प्रेमाने बोलत होते ते. आळीपाळीने झोपू”, सिद्धू म्हणाला.

”हो हो. राहूदे प्रेम. तो गेला पोलिसांना बोलवायला”

“आळीपाळीने झोपू”

“तू आधी झोप”, चिनू म्हणाला

बराच वेळ बेडवर अडवा पडून पण सिद्धुला झोप येईना.

“चिनू”

“हा बोल न भाऊ’

“तू मध्ये गायब का झालेलास?”, डोळे मिटल्या मिटल्याच सिद्धूने विचारलं.

“सोड आता ते. आता आहोत न एकत्र?”

“नाही सांगच. काय प्रोब्लेम होता? एकदा फोन नाही attend केलास साधा?”

“काय बोलणार यार मी? माझी मलाच लाज वाटत होती.”

“कसली लाज?”, सिद्धूने डोकं चीनुकडे वळवून विचारलं.

“तेच रे.. त्या रात्री पिउन कायपण बोलत होतो मी. दुसर्या दिवशी उतरल्यावर लक्षात आलं.”

“पण मला राग आलाच नाही”

“मी जे काही नेहा वाहिनीबद्दल बोललो ते बरोबर नव्हता रे. पण साला बरोबर आणि चूक सांगणार कोण मला? तुला तरी बाबा आहेत. मला कोण चांगलं वाईट शिकवणार”

“सोड ते आत्ता. पण यार. आपण असे किती दिवस लपतछपत फिरणार? आणि बाबांचं काय होणार? आपण चाल पोलिसात जाऊ. अजून पण वेळ नाही गेली. २४ तास पण नाही झालेत”, सिद्धू विषय बदलत होता.

“म्हणून तुला बोलत होतो कि घरी जा. माझ्यासोबत गुंतवून घेतलंस तू स्वतःला”, चिनूचा आवाज बारीक होत होता.

“पुढे काय?”, सिद्धू म्हणाला.

“बघू”, चिनू अडवा होत म्हणाला. सकाळचे सात झाले होते.

सिद्धुला कधी झोप लागली त्याचं त्यालाच कळलं नाही.

.
.
.
.
.
.
.
सिद्धूने डोळे उघडले.

तो त्या हॉलमध्ये एकटाच पडला होता.

आता काही वेळापूर्वी येणारा आवाज थांबला होता.

तो कसाबसा उठला.

अडखळत बाहेर आला.

रस्त्याच्या पलीकडे त्याचं घर होतं.

तो खूप थकला होता. बाबा घरी नव्हते. तो तसाच बेडवर अडवा पडला.
सिद्धुला जाग आली.

घड्याळ पाहिलं. रात्रीचे अडीच वाजले होते.

इतक्यात त्याचा दरवाजा कोणीतरी ठोठावला..

“सिद्धू सिद्धू. दार उघड. सिद्धू.”

त्याने घाईघाईने जाउन दार उघडलं.

दारात चिनू होता.

त्याचं डोकं फुटलं होतं.

“चिनू. तू? आत्ता? आत ये. काय झालं तुला? तू कुठे होतास इतके दिवस? फोन attend नाही केलेस. आणि हे रक्त? बापरे, तुला लागल आहे. घरात येलवकर. मी डॉक्टरांना फोन करतोय”.

“सिद्ध. थांब. अरे यार. प्रोब्लेम झालाय रे.”

“काय झालं? मी आहे बोल. काय झालं?”

चिनू घाबरला होता, “अरे यार, सिद्धू. माझ्याहातून आकाशचा murder झालाय.”
“आईशप्पथ! काय बोलतोय? अरे यार.. तुला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे न्यायला लागेल”, सिद्धू घाबरला होता. त्याचा चेहेरा बदलला.

चिनूच्या डोक्यातून रक्त येत होतं. हाताला थोडा मार लागला होता. कपडे मळले आणि फाटले होते. “नाही रे. hospital काय; मी घरात पण नाही जाऊ शकत. पोलीस शोधत आहेत मला..”, चिनू अडखळत होता. अंगावर पण रक्त होतं.

“पण काय झालंय ते तर सांग”, सिद्धू म्हणाला.

“मला वाटेत अडवला. तिघे होते.. मारामारी.. मारामारी झाली. अक्याला घुमवला मी. तर त्याने gun काढली. दुसरा option नव्हता.. नव्हता माझ्याकडे.”

“बाकी दोघे?”

“पळाले.. गांडू साले.”

“चल पोलिसात शरण जाऊ.”

“काही फायदा नाही. माझा विश्वास नाही पोलिसावर. मी तुला हे सांगायला आलोय, कि कि. . ”

“अरे यार. हे रक्त बघ. चिनू यार. please. डॉक्टरांना”, सिद्धू हादरला होता.

“अरे यार. मी नाही.. मरणार. मी. तुला.. फक्त. हे.. सांगायला.. आलोय. कि”, चिनू बोलताना अडकत होत.

“बोल न. लवकर बोल.”

“अरे यार. सिद्धू. ऐक. हा matter चिघळेल. मी कल्टी मारतोय. परत खूप दिवस दिसणार नाही”, चिनू एकदम हळू बोलत होता.

“पण तू मॉलमध्ये. . नाही थांब. . तेव्हा मी कुठे होतो.. चिनू? आणि आत्ता बाहेर.. काय चालू आहे नक्की?”
.
.
.
.
.
.
.
सिद्धूने डोळे उघडले.

बाजूला चिनू नव्हता.

समोर पाहिलं. पोलिस आणि बरेच लोक होते. Farmhouse वाले आजोबा त्यांच्याशी काहीतरी महत्वाचं बोलत होते. त्यांच्यात बाबा, नेहा, नेहाचे बाबा, शैलान आणि त्याचे दोघे मित्र हे लोक ओळखीचे होते. पण सगळे चेहेरे ओळखीचे नव्हते. सगळे चिंतेत मात्र होते. नेहा खूप रडत होती. सिद्धूचे बाबाही हादरले होते.

शुद्धीवर आल्या आल्या सिद्धूने एकंच प्रश्न विचारला. .

“चिनू कुठे आहे?”

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

उत्तर – एक अनोळखी मित्र – भाग १२ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

6 Responses

 1. shubhangi says:

  Hya part madhe kiti confusion ahe madhech vatate Chinu Mela madhech suruvaticha kahi bhag yeto madhe sagd ult vatat ahe …..
  Next part lavkar upload kara plzzzzzz

 2. punam says:

  khupach confusion aahe sir ya part madhe …..kahich kalat nahi …..

 3. nilesh says:

  hya bhagachya nava pramanech bharpur confusion – pan bahutek he Siddhu chya dokyatil confusion asav…. i thik so…

  interesting ….

 4. Sunny says:

  अरे बापरे चिन्या सिध्याला सोडुन पळाला वाटतं . तो त्याच्यासोबत अडकु नये म्हणुन . कि मारला ठार चिन्याला ! लेखक साहेब ह्या पार्ट मध्ये खुप confusion आहे .
  एकतर चिनु मेलाय , किंवा याला सोडुन पळाला आणि दूसरं म्हणजे सिधू मिञाच्या Tention मध्ये वेडा झालाय . काहीतरी नक्कीच झालंय .
  कारण त्या Farm-House मध्ये पोलीस वगैरे ठिक आहे . पण नेहा , तिचे बाबा , सिध्याचे बाबा हे कसे काय आले . हा Part खुपच Suspense मध्ये टाकणारा आहे .
  Writer साहेब पुढचा Part टाका लवकर . नाहीतर विचार करुन डोकं फुटायचं आमचं .

 5. Prashanth mane says:

  You r such mature author !!! Beyond brilliant!!! Chinu Ch cherector agdi jabardast hot shevatparyant suspense hota Maja aali aani chinu Ch cherector cha impact evedha jabardast jhala mla ki mi story read kartana tyala emagin karat hoto kharch hates off sir!!!!

 1. April 28, 2017

  […] Confusion – एक अनोळखी मित्र – भाग ११ – Ek Anolkhi Mitra […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *