Murder – एक अनोळखी मित्र – भाग १० – Ek Anolkhi Mitra

Problem – एक अनोळखी मित्र – भाग ९ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

“बरोबर रे.. बरोबर. सिद. कालपर्यंत त्या आदीचा मार खात होतास. आता माझी गरज संपली न रे? आता का नाही तू हात सोडणार? एकदा विचार तरी करायचा होतास. माझ्याशिवाय तू काहीच नाही आहेस. जा रे गरज नाही तुझी”, चिनू झोपेत नशेत बडबडत होता .

सिधुला भयानक राग येत होता. तरीही त्याने खूप दमाने घेतलं. “मधुरा, सकाळी ताबडतोब मला फोन कर. ह्याची नशाच उतरवतो.”

“ठीक आहे”

चिनू गाढ झोपेत होता. सिद्धूने घड्याळ पाहिलं. पहाटेचे चार होत होते. तो घाईघाईने घरी आला. घरी बाबा जागे झाले होते. बाबा खूप चिंतेत होते.

“काय रे, सिद्धू? कुठे गेला होतास? अस अचानक? एक हाक मारून मी जातोय हे तरी सांगायचं होतंस”, बाबा घाई घाईत म्हणाले.

“एक मित्र आला होता, बाबा. त्याची तब्येत बिघडली होती. त्याला घरी सोडवून आलो”

“कोण मित्र?”

“एक अनोळखी मित्र”

“कोण आहे तो? कुठे राहतो?”, बाबा अजूनही चिंतेत होते.

“काळजी नका करू बाबा. सगळं काही ठीक आहे. बाबा मी पाणी तापायला ठेवतोय”

“हे बघ सिद्धू. मी काय बोलतोय ते ऐक. तू समजदार आहेस. मला संशय नाही. पण तुझं वय नाजूक आहे. कोण मित्र आहे तो मला दाखव. इतक्या रात्री..”

“बाबा. विश्वास ठेवा माझ्यावर. काहीही झालं नाही आहे. मी हाताळेन नीट. कसं समजवू?”, सिद्धू बाबाचं बोलणं मध्येच तोडत मोठ्याने म्हणाला.

“ठीक आहे”, पण बाबांची काळजी कमी झाली नव्हती.

सिद्धूने gas वर पाणी तापायला ठेवलं. आणि तो अंथरुणात येउन पडला. त्याला राहून राहून चिनूचा विचार पडत होता. त्याला स्वतःला वाईट वाटत होतं. तो विचार करत होता, ‘आपण त्यावर उगाच हात उचलला. पण तो काहीही बोलत होता. किती दुर्लक्ष करायचं? जाऊदे सकाळी बघू. त्याची उतरली कि मग त्याला समजवू. नाहीतरी चिनू आपली जान आहे. रागावेल पण येईलंच न आपल्याकडे. पण इतका का तो दारू पितो? बघू. ह्याला माणसात आणू.’

“सिद्धू, मी निघतोय.”, बाबांनी हक मारली.

“ठीक आहे बाबा”, सकाळचे सात वाजत आले होते.

रोजची कामे आवरून सिद्दने कॉलेज ची bag भरली. रस्त्यावर जास्त वर्दळ नवती. तो कॉलेजला पोचला. जास्त कोणी आलं नव्हतं. तो थेट वर्गात गेला. फक्त दोन तीन मुलं आली होती. तो एका बेंचवर जाऊन बसला.

दोन्ही हातात कपाळ ठेऊन डोळे बंद करून तो विचार करत होता. इतक्यात त्याचा फोन वाजला.

“हेल्लो”

“हा सिद्धू मी बोलतेय”

“हा बोल मधु. चिनू कसा आहे?”

“काल काय झालं होतं? तुमच्यात भांडण झालं का?”

“नाही. भांडण अस काहीच नाही.”

“चिनू काहीच बोलत नाही आहे. असं वाटतंय कि खूप hurt झालाय. नेहमीपेक्षा आज जास्त arrogantly बोलतोय.”

“नशेत आहे का?”, सिद्धूच्या कपाळावर आठी आली.

“नाही. सकाळी normal झाला होता. काय माहित नाही का, पण चेहरा सुकलाय त्याचा”, मधूचा आवाज पात्तळ झाला होता.

“त्याला फोन लाव”

“हा तुझा फोन चीनुकडे redirect करतेय”

दोन सेकंदांनी रिंग होऊ लागली. पण कोणीच फोन receive केला नाही.

सिद्धू थोडा tension मध्ये आला. ‘चिनू फोन उचल, फोन उचल, यार. sorry रे. माझी जान’, सिधू मनात बोलत होता. फोन कट झाला. ‘आपल्याकडून काही तरी चुकलं आहे वाटतं. चिनू जास्त sentimental आहे. खूप जास्त मनाला लावून घेतलं आहे त्याने. थोडा वेळ जाऊ द्यायला हवा. सगळं ठीक होईल’.

लेक्चर सुरु झालं. सिद्धूने सगळे lectures मन लावून attend केले. शेवटची बेल झाली.

lecture संपलं. वर्गातली सगळी मुलं हळूहळू कमी झाली. सिद्धूने पुन्हा चिनूला फोन लावला. पुन्हा तेच. नाही attend केला. सिद्धूच्या मनात काहूर होत होतं. सिद्धू वर्गात एकटाच होता.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

इतक्यात कोणीतरी मागून येउन अतिशय गोड मिठी मारली.

“किती किती कौतुक करू तुझं. सिद्धू. बाबा किती खुश आहेत तुझ्यावर! तुझ्यामागे दिवसभर घरात तुझंच कौतुक चालू होतं”.

सिद्धूने अलगद मागे पाहिलं. तिला खूप अलगद बाजूला करून तो समोर बेंचवर जाऊन बसला.

“का रे काय झालं?”, नेहाचा चेहेरा पडला.

सिद्धू काहीच बोलत नव्हता. फक्त डोळे मिटून कपाळाला हात लावून शांत विचार करत होता. नेहा त्याच्या डाव्या बाजूला येउन बसली. त्याच्या एका खांद्यावर हात ठेऊन शांत आवाजात म्हणाली, “काय झालं?”

सिद विचार करत होता कि ‘सगळे वाद नेहामुळे झाले. मी मुलीसाठी मित्राशी विश्वासघात केल्यासारखं होईल. पण चिनूपण तर चुकीचं बोलत होता. आणि नेहाची तर काहीच काहीच चूक नाही. म्हणून तिलाही दूर नाही करता येत’.

“नेहु. एक प्रोब्लेम झालाय”

“सिद्धू. तुला आणि प्रोब्लेम? शक्यच नाही. अशक्य गोष्ट शक्य करणारा माझा सिद्धू. तो प्रोब्लेममध्ये?”, नेहा सिद्धूचा आत्मविश्वास जागा करीत होती. “अरे गोडोबा, माझ्याकडे बघ तर एकदा”, नेहाचा आवाज हळू आणि नम्र.

“नेहु. माझ्यामुळे मित्र दुखावला गेला आहे”

“कोण मित्र?”

“चिनू”

“झालय काय नक्की?”, नेहा शांतपणे म्हणाली.

सिद्धू काहीच बोलत नव्हता. ‘काय बोलू? आणि हिला काय सांगू?’

“सोड जाऊदे. होईल सगळं ठीक”, सिद्धू बळंच हसला. नेहाला कळून चुकलं कि काही तरी प्रोब्लेम आहे. आणि सिद सांगत नाही आहे म्हणजे कदाचित problemचा तिच्याशी संबंध आहे. पण तिचा सिद्धूच्या निर्णयावर विश्वास होता.

नेहा आणि सिद्धुमध्ये गैरसमज होऊ शकत नाहीत.

नेहा काहीच म्हणाली नाही. सिद्धू बेंचवर मागे सरकून बसला. नेहा सिद्धूच्या डाव्या बाजूला कवटाळून धरून डोळे मिटले. दोघेही हातात हात धरून बराच वेळ तिथे बसले होते.

ती रात्र आणि त्या नंतरचा तो दिवस फार वाईट होता. त्यानंतर सगळंच बदललं.

काळजी, अभ्यास आणि काळजी.. काही दिवस असेच गेले.

त्या दिवसानंतर चिनू सिद्धुला भेटतच नव्हता. त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. सिद्धू खूप वेळा त्याच्या घरी जायचा. जवळ जवळ रोजच. तो बरेचदा तिथे मधूशी बोलायचा. तिथे लिखाण आणि इतर अभ्यास करायचा. चिनू नेहमीच घरी नसायचा. कॉल्स attend नाही करायचा. तरीही तो मधुराशी बोलून चिनुची सगळी माहिती विचारायचा. तो काय करतोय कुठे जातोय सिद्धुला सगळं माहित असायचं. पण खरं सांगायचं झालं, तर सिद्धुला पण चिनूचा थोडा राग आला होता. तसा तर तो खूप वेळा चिनूला मधुमार्फत sorry बोलला होता. पण तो चीनुने पुन्हा संपर्क करायची वाट पाहत होता. पण चीनुने खूपच मनाला लावून घेतलं होतं. तो काही करून सिद्धूला contact करत होता. बरेचदा मधु बोलायची, कि ‘तू येणार आहेस असं कळताच चिनू बाहेर गेला’. आणि तो कुठे जात होता ह्याचा काहीच पत्ता नसायचा.

बघता बघता एक महिना गेला.

Exams जवळ येणार होते. सिधू पूर्णपणे व्यस्त होता. जास्तीत जास्त वेळ library मध्ये जात होता. चिनूसाठी रोज मधुराला कॉल करणे चालू होते. अधूनमधून तो चिनूच्या घरी जात होता. पण एकदाही एकदाही चिनू त्याला भेटला नाही. चिनू फक्त जाऊन तिथे चिनूच्या घरी अभ्यास करायचा. नेहाही त्याला अज्जिबात disturb करत नव्हती.

बाकी सगळं नॉर्मल होतं. पण, फक्त चिनुची खूप काळजी वाटत होती. आणि तो समोर येतच नव्हता.

सिद्धूचा दिवस कसा जात होता. पाहटे उठून kitchen च सगळ पाहून मग कॉलेज. मग lectures, मग library किवा कधीकधी थोडावेळ नेहासोबत आणि रात्री घरात सगळी कामे. थोडावेळ अभ्यास आणि पुन्हा दुसर्या दिवशीची तयारी.

Exam ची तारीख जवळ येत होती. तणाव वाढत होता. सिद्धुला मनात खूप वाईट वाटत होतं. तो चिनूसाठी खूप त्रास करून घेत होता. त्यामुळे नेहशीही तो नकळत जास्त बोलत नव्हता. पण एकाबाजूने त्याला असं ही वाटत होतं कि, चिनू अति करत आहे. छोट्याश्या गोष्टीसाठी इतका राग धरून ठेवण्यासारखं काहीच नव्हत. तरीही तो रोज रोज चिनूचा फोन try करत होता. पण काही उपयोग होत नव्हता. रोज तेच तेच.

आदि आणि इतर मुले सिद्धुपासून दूर राहत होती. आणि सिद्धुतर आधीपासूनंच दूर होता. त्याच्याकडे वेळ नव्हता. आधी ज्या घटना घडल्या, त्याचा कुठेही उल्लेख नव्हता.

दोन महिने पुढे सरकले.

चीनुने स्वतःला अभ्यासात बुडवून घेतलं. एकंच ध्येय होतं. नेहाही त्याला खूप आधार देत होती. फक्त चिनू दूर जात होता. परीक्षेची एकएक तारीख जवळ येत होती. चिनूला एका क्षणासाठीही सिद्धू विसरला नव्हता. आणि त्याला परत मिळवण्यासाठी तो शक्य ते सगळं करत होता.

दीड महिने गेले.

परीक्षा सुरु झाली. एकानंतर एक दिवस पुढे जात होता. सिद्धू एक ideal अशा answer sheets submit करत होता. एकएक उत्तर नीट, सुटसुटीत, मुद्देसूद, सखोल, informative, knowledgeable आणि एकदम अचूक. शोधून शोधून पण चूक नाही सापडणार. theory exam संपली, आणि नंतर practicals होते. तेही संपले.

‘कुठे आहेस यार चिनू. एकदा बोल तरी’..

आजच exam संपली होती. सिद्धू थोडा निश्चिंत होताच. संध्याकाळ होणार होती. सिद्धू निवांत होता.

नेहाचे papers कधीच संपले होते. सिद्धूचा शेवटचा paper झाल्या झाल्या त्याच दिवशी दोघे संध्याकाळी बाहेर movie ला जाणार होते.

मित्रहो, ही कथा पूर्ण होत आहे. इथून पुढे दोन घटना घडल्या. खूप ध्यान देऊन वाचा. आणि गोंधळून जाऊ नका.

त्या संध्याकाळी सिद्धूने छान ड्रेसिंग केली होती. Deo लावून काळं शर्ट, blue jeans. narrow tip shoes घातले. आणि कड्डक aviators चढवले. केस spiked केले.

Simple आणि sober look, पण एक नंबर dashing.

“बाबा, मी येतो”, सिद्धूने बाबांना नेहाबद्दल सांगितलं होतं. बाबांना काळजी होती. पण त्यांना नेहाबद्दल नाही म्हणायचं काहीच कारण नव्हतं. नेहा त्यांनाही आवडली होती. आत्तादेखील बाबांना माहित होतं कि सिद्धू नेहासोबत बाहेर जात आहे.

“लवकर ये. जास्त उशीर करू नकोस. आणि फोन चालू ठेव. पैसे आहेत न?”, बाबा सिद्धुकडे कौतुकाने पाहत होते. तो खूप सुंदर दिसत होता.

आई नसल्याने सिद्धुचे बाबाच त्याची आईच्या जागी होते.

“हो. आहेत पैसे. लवकर येतो”, सिद्धू घाईघाईत बाहेर पडला.

संध्याकाळचे तीन झाले होते. ते मॉलमध्ये जाणार होते. सिद्धू थेट पार्क मध्ये गेला. त्याने कॉल केला. नेहाने फोन उचलला

“नेहु, कुठे आहेस?”

“सिद्धू. एक प्रोब्लेम झालाय. आजचा प्रोग्राम cancel. मला काम आहे”, नेहा एकदम पटकन म्हणाली.

“पण आपलं कधीच नक्की झालं होतं. आणि अचानक काय प्रोब्लेम? थांब तिथे. मी येतोय.”

“सिद्धू please रे. मला माफ कर. पण आपण नंतर कधी movie ला जाऊया न”

“पण मी tickets घेतलेत. At least सांग तरी कि काय प्रोब्लेम झालाय?”

“प्रोब्लेम म्हणजे..”, नेहा अडखळत होती.

“ह्याला काय अर्थ आहे? परत कधी बोलणार नाही तुझ्याशी.”, सिद्धूने रागावून फोन cut केला.

‘काय प्रोब्लेम झाला असेल? नेहा अशी कधीच वागली नाही.आणि नेहु कधी खोटं पण बोलत नाही’, विचार करत करत त्याने फोन खिशात ठेवून मागे वळून पाहिलं.

नेहु समोर उभी.

मुलीचं फार वर्णन करू नये. पण तरीही..

नेहाने काळ्या रंगाची सलवार आणि चुणीदार, आणि त्यावर mismatching ओढणी. ओढणी खूप जाड होती. शाल असते तशी. छोट्या छोट्या सुंदर पाऊलात matching heels. चीनुदाराच्या घड्या घोट्यावरून खाली येत होत्या. पंजाबी dress. ओढणीने संपूर्ण शरीर झाकलं होतं. आणि तिचा अंगाभोवती असलेला वेटोळा कमरेच्या खाली येत होता. ती बरेचदा डोक्यावरून ओढणीचा पदर घ्यायची. पण तो सारखा सारखा खाली पडायचा. खांद्यावर एक छोटीशी bag होती. त्यात typical मुलींच्या वस्तू असायच्या. केस एकाबाजूने पुढे थोडे मोकळे आणि मागे कमरेइतकी जाडसर वेणी असे केले होते. कानात छोटे छोटे सोन्याचे डूल होते.

तशी त्या बाहुलीला फार makeup ची गरज नसायची. पण तरीही स्त्रीस्वभावानुसार नाजूक ओठांना थोडीशी लाली, आणि काळ्याभोर डोळ्यात भरपूर काजळ. हातात हिरव्या बांगड्या. कपाळावर छोटासा गंध.

तिच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्नता होती. तिने कान धरले. “मी तर गम्मत केली. मी तुझ्या आधी इथे होते”, नेहा हसली.

तिला पाहून सिद्धूचा चेहेरा एकदम खुलला. “तरी. मला वाटलंच होतं”. सिद्धू हसला.

नेहाने घाईघाईने जवळ येउन सिद्धूचा डावा हात धरला. “चल जाऊयात.”

दोघे हळू हळू चालत theater च्या दिशेने जाऊ लागले. संध्याकाळचे साधारण साडेतीन होत होते. चार वाजताची movie होती. वेळ होता. दोघे theater पाशी गेले. सिद्धकडे tickets होते. Theater खाली दोघे गप्पा मारत होते.

सिद्धूसोबत असताना नेहा कधीच शांत बसत नसे. बडबड बडबड थांबतच नव्हती. सिद्धला तिचं सारं बोलणं माहित होतं. पण तरीही तो शांतपणे सगळं ऐकून घेत होता. ‘काल काय झालं. उद्या काय होणार’, इथ पासून “घरी electricity चं bill १२०० रुपये आलं”’, इथपर्यंत सगळं सांगून जेव्हा काहीच सांगायचं शिल्लक राहिलं नाही, तेव्हा नेहा शांत बसली.

दोघे theater मध्ये गेले. show house-ful होता.

सिद्धोबा आणि नेहाबाई दोघे त्यांच्या जागी नीट adjust झाले. इथून तिथूनच्या काही गोष्टी एकमेकांना सांगत होते.

Picture सुरु झाला.

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

सिद्धू तर सिद्धू होता. तो पूर्ण involve होऊन movie पाहत होता. आणि नेहा तर नेहा होती. ती फक्त सिद्धुला पाहायला आली होती. ती पापणीही न लवता सिद्धूचा चेहेरा न्याहाळत होती. तिला इतका आनंद होत होता, कि त्याचं शब्दात वर्णन नाही होऊ शकत. पिच्चर चालू असताना नेहाकडे सिधूचं लक्ष नव्हतं. नेहाला हे माहित होतं. तिचे डोळे पाणावले होते. अंगावर आनंदाने रोमांच येत होते. हृदयात आनंदाचं कारंज लागलं होतं. ती सारखी सारखी सिद्धुवरून जीव ओवाळून टाकत होती, आणि मनात पांडुरंगाला प्रार्थना करत होती, ‘माझ्या राजसाला जगातली सगळी सुखे मिळोत. माझ्या गोडोबाला कधी कोणाची नझर न लागो.’

सगळे दीड तास नेहा सिद्धुला न्याहाळत होती. Lights on झाले. interval झाला.

सिद्धूने नेहाकडे पाहिलं. ती अजूनही एकटक त्याच्याकडे पाहतच होती.

“नेहा तू काही खाणार का? थांब मी अलोच. ..”, सिद्धू जाऊ लागला.

“हा हा.”, नेहाची सिद्धुमध्ये लागलेली समाधी भंगली. एकदम खबडून भानावर आली. “थांब न. नको जाऊस”, नेहाचा चेहेरा पडला.

“अरे बाबा, आलोच कि दोन मिनिटात”, सिधू गालात हसला.

“मला भीती वाटते. तू नको जाउस”, नेहुने सिद्धूचा हात घट्ट धरला.

“नेहु. मी एक मिनटात येतोय. मी कुठेही जाणार नाही तुला सोडून”, सिद्धू शांतपणे म्हणाला, “अशी कशी रे येडी!”, तिचा हात अलगद सोडवून सिद्धू हसला.

“नाही जायचं”, नेहा जवळजवळ रडायला लागली होती. तिचा आवाज अवंढ्यात अडकला. तिला बोलावत नव्हतं.

“अरे बाबा. मी अर्ध्या मिनिटात येतो. मग तर झालं? मी कुठेही जाणार नाही. काय झालं तुम्हाला नेहाबाई?”, सिद्धू खूप शांतपणे म्हणाला.

“मला दडपण येतं”

“कसलं दडपण?”

“नाही माहित”

“बर ठीक आहे. चल दोघे जाऊयात. मग तर झालं?”, सिद्धू कपाळावर हात मारत गालात हसत म्हणाला. नेहा पुन्हा एकदा प्रसन्न होऊन हसली. आणि normal झाली.

सिद्धुला हे तिचं वागणं माहित होतं.

ती सिद्धूसाठी वेडी होती. आणि तो ही तिच्यात स्वतःला पहायचा. फक्त फरक हाच की ती मुलगी होती. तिला भावना आवरता येत नसे. आणि सिद्धू तिचाच असल्याने सिद्धुपुढे त्याची गरजही नसे. आणि हा सिद्ध पक्का त्याबाबतीत खंबीर होता.

स्वताच्या मनावर ताबा नसेल तर तो पुरुष काय कामाचा?

दोघे बाहेर आले. फार गर्दी होती.

“काय घेऊयात?”, नेहा म्हणाली.

“Popcorn घे. थोडा junk food खाऊ”

नेहाने भरपूर काय काय घेतलं. दोन मोठे burgers, french-fries, coke चे दोन मोठे cups. आणि दोघे बाहेर आले.

इतक्यात, “काय भाई. कशी काय movie?”

सिद्धूने मागे वळून पाहिलं. आकाश आणि त्याचे मित्र होते. ठस्सन देत होते. सिद्धूच्या डोक्यात तिडीक गेली.

“का रे? तू का विचारतोय? Bollywood magazine चा critic आहेस काय?”, सिद्धू हसून बोलला. पण त्याचे डोळे हसत नव्हते.

“हा आणि critic? English येतं का त्याला? सोड. चल जाऊ दे आपला movie miss होतोय”, नेहा मोठ्याने हसून म्हणाली आणि तिने खूप तुच्छतेने आणि उपहासाने आकाशकडे पाहिलं.

आकाशच्या आत जळवणूकीने आग लागली होती.

“आक्या, पोरीसमोर हिरो बनतोय. घ्यायचं का ह्याला? आधीचा पण हिसाब बाकी आहे”, अक्याचा एक मित्र म्हणाला.

“आत्ता नको”, आदिने मान डोलावून म्हटलं, “ह्या झन्ड्रूला आज बघूच”. आकाशचा संताप होत होता.

नेहा आणि सिद्धू पुन्हा जागेवर येउन बसले. त्यांची seat खूप मागे होती. पुढच्या चौथ्या row मध्ये आकाश आणि त्याचे मित्र होते.

Movie पुन्हा continue होत होती. नेहा थोडी disturb झाली होती.

“सिद्धू, ऐक न”, नेहा हळू आवाजात पुटपुटली.

“काय झालं?”

“तो आकाश बघ सारखा वळून वळून पाहतोय”

“अच्छा? चल त्याची जळवू”, सिद्धू नेहाला डोळा मारून म्हणाला, आणि गालात हसला. तो नेहाच्या उजव्या बाजूला थोड दूर सरकून बसला होता. त्याने एक हात नेहुच्या डाव्या खांद्यावर ठेवला. नेहा लाजून गोरी गोरी होत होती. सिद्धू आपल्याकडे आकाश पाहतोय असं पाहून त्याने एक दोन french fries उचलल्या आणि नेहाला एक खाऊ घातली. नेहापण तसंच करू लागली. दोघे गालात हसत होते.

आकाशची धाय जळत होती. पण अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं. सांगताही येईना, सहनही होईना.

सिद्धूने नेहुच्या हातावर हात ठेवला. तीही थोडी उजवी कडे वळून सिद्धुला खेटून बसली. सिद्धूने आकाशला डोळा मारला. आकाशने एकदा रागाने पाहिलं. आणि मग तो पुढे वळला आणि त्याने नंतर मागे वळून पाहिलंच नाही.

तासा दीड तासात पिच्चर संपला. संध्याकाळ झाली होती. सात-साडेसातचा सुमार होता. Softy खात खात theater मधून दोघे बाहेर आले.

Mallच्या मागच्या आणि खालच्या भागात parking साठी तळमजली आणि दुमजली अशी खूप मोठी जागा होती. त्याच्या बाजूला दर थोड्या थोड्या अंतराने खूप अशी दुकाने होती. दुसऱ्या कोपऱ्यात एक elevator होता. Mall मधून बाहेर पडायला parking च्या इथून मागून एक shortcut होता. सिद्धू आणि नेहा बोलत बोलत तिथून बाहेर पडत होते.

“अंधार पडायला लागला आहे. चल तुला घरी सोडवतो”, सिद्धू म्हणाला.

“नाही थोडा वेळ थांब. मला नाही जायच”, नेहा हळू आवाजात म्हणाली.

“उद्या परत भेटू. पण आज उशीर नको करायला”, सिद्धू थोडासा गालात हसत म्हणाला.

बोलत बोलत नेहा दोन पाऊले पुढे गेली. आणि झटकन मागे वळून तिने सिद्धुला मागे ढकललं.

“सिद्धू, हा मुंगश्या इथेच येतोय”, नेहा दबक्या आवाजात म्हणाली.

“नेहा, तू कमी हो. मला वाटतं matter होईल. आधीच theater मध्ये मचमच झाली आहे”, सिद्धू म्हणाला.

“तुला सोडून नाही जाणार. आधी एकदा माहिती आहे न त्यांनी तुला..”

“हो हो माहिती आहे. पण ”

“पण बीण काहीही नाही. ते तिघे आहेत. एकटा पडशील. चल दुसऱ्या वाटेने घरी जाऊ”

“किती दिवस असं पळत राहायचं?”, सिद्धू चिडला होता. नेहा आल्यापासून भीती तर सिद्धूची साथ सोडून गेली होती.

“ते तिघे आहेत. आणि ते हुमरीतुमरी करणार. सिद्धू तुला माझी शप्पथ आहे, इथून निघून जाऊ. आधीच तो असुयेच्या भरात आहे”, नेहा काकुळतीला येत होती.

“अरे चल हटा. उगाच मला कमजोर करू नकोस. शप्पथ? काय शप्पथ?”

“अरे पण जर विवेकानं घे. आतताई होत आहेस तू”

“काही नाही. त्याची खूप नाटकी झाली आहेत. माझ्या डोक्यात आहेच तो आधीपासून, त्याच्या आईला..”

“सिद्धू. आवर स्वतःला. ते गुंड आहेत. माझा सिद्धू गुंड नाही”

“गुंड? गुंड नाहीच आणि गांडूही नाहीये मी”, सिद्धूचे तेवर बदलले होते.

नेहा एकदम अचंबीत झाली. “सिद्धू? हा तोच साधाभोळा गोडोबा आहे कि मला भ्रम होतोय? माझा तुझ्या हिमतीवर संशय नाही. तू नेभळंट असतास तर ही नेहा आज इथे तुझ्यासोबत नसती. वेडोबा. सिद्धू, परिस्थिती पहा.”

“नेहा तू जा घरी. मी रात्री कॉल करतो तुला”

“मला धडधड होतेय”

आकाशच्या पोरांचं लक्ष गेलं. ते सिद्धुकडे पाहून हातवारे आपापसात करून बोलत होते.

“तुमचा मुलींचा स्वभावच भित्रा. वाघीण बन वाघीण. बोल मला नेहु कि जा सिद्धू आणि त्यांच्या तंगड्या तोड. परत त्यांची हिम्मत व्हायला नाही पाहिजे आपल्या वाटेला यायची”

“सिद्धू ते तिघे आहेत. मी घाबरत नाही आहे पण अहंकारात नको येउस. स्वतःच्या मर्यादा ओळख. कारण परिणाम भयानक होऊ…”

“अरे बाबा काहीही नाही होत. हिसाब रोकडा प्रेम चोपडा. काय बोलते? तू जा घरी. आज ह्यांचा काम फीट पिच्चर हीट करतो. “, नेहाचं बोलणं मध्येच तोडत सिद्धू ओरडला.

“ए, झंडऱ्या”, एक पंटर ओरडला. “इकडे ये रे, ए झा*”, त्यांना सिद्धूवर हात साफ करायचा होता.

“कसल्या हिशोबाची गोष्ट करतोयस? सिद्धू भानावर ये.”

ती मुलं खूप दूर होती. ती हळू हळू चालत जवळ येत होती.

नेहा रडायला लागली.

“अरे यार. तू please आता melodrama चालू नको करूस”, सिद्ध ऐकतच नव्हता.

ती पोरं एकदम जवळ आली.

“काय रे ए. त्या पोरीच्या पदरात लपतोय काय? गां* फाटली का आता?”, दुरून आक्या ओरडत होता.

“ह्याच्या आईला. नेहा, सुम खा. मी रात्री कॉल करतो”, सोद्धू संतापत होता.

इतक्यात मागून एक हाक आली. “सिद्धू,. पोरीला घेऊन कलटी मार. ह्यांना मी handle करतो”

तो चिन्या होता.

त्याला पाहून सिद्धूचा चेहेराच खुलला.

“चिन्या. यार. तू? इथे? कुठे होतास?”

“ओये FBI investigation. तुला सगळा इत्यंभूत समाचार नंतर दिला तर नाही का चालणार?”, चिनू नेहमीच्या attitude मध्ये म्हणाला.

“तुला पाहून काय बरं वाटलं यार”, सिद्धू एकदम खुश होता.

“सिद्धया. पोरीला घेऊन लंपास हो. मी ह्याना सांभाळतो”, चिनू serious होऊन म्हणाला.

“येडा आहेस काय? मी तुला सोडून नाही जाणार”, सिधू हसत पण seriously म्हणाला.

“अरे बाबा. जा आता तू उगाच फालतुमध्ये मध्ये नको पडूस. मी करतो manage. नेहाला घे आणि सटक”

“शक्य नाही”, सिद्धू full determined होता.

आणि इतक्यात ती मुले एकदम जवळ आली. “का रे झंडू. Theater मध्ये हेरो बनत होतास? लौ*. तुला त्याच दिवशी उचललं असतं, पण काकासाहेब मध्ये पडले”

“अरे जा रे. भोस**. तू काय माझं झा* उघाडशील”, चिनू त्वेषात आला. त्यांचे बोलबच्चन चालू झाले.

एकाने येउन चिनुची collar पकडली. सिद्धचा आपा गेला. त्याने जाउन त्याच्या कानफडात ओढली.

“तीच्च्या आयला.. “, चीनुने हात सोडला. चीनुमध्ये मस्त ताकद होती. त्याने आकाशला खूप घुमवला. चिनू आणि सिद्धू तिघावर हावी होत होते.

आकाशच्या ते लक्षात आलं. तिथे side ला एका गाडीखाली एक लोखंडी rod पडलेला. आकाशने तो उचलला आणि तो सिद्धूच्या दिशेने धावला. सिद्धूच लक्ष नव्हतं. त्याने झटकन तो rod सिद्धूच्या डोक्यात मारला, तोच चिनूमध्ये पडला. चिनूने तो वार स्वतःवर घेतला.

“चिन्या”, सिद्धू जोराने ओरडला. चिनूचं कपाळ फाटलं होतं. तसरीही तो ऐकणारा नव्हता.

चिनू तसाच उठला, आणि आकाशच्या दिशेने जाऊ लागला. आकाशला समजलं, कि चिनू आणि सिद्धू ऐकणार नाहीत. तेव्हा त्याने खिशात हात घातला. सिद्धूने काही करायच्या आधीच आकाशने त्याच्या जवळून pistol काढली आणि चिनूच्या पोटात pistol च्या दोन rounds शूट केल्या.

आकाशच्या बरोबर असलेली दोन्ही मुले घाबरली. “आक्या, अ.अअ.रे हा ममम्मंर्डर केलास तू. आता तिघे अडकू”, ती पोरं बडबडत होती. आणि ती घाबरून पळून जात होती.

सिद्धुच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. सिद्धूच्या छातीत पाणी झालं. सिद्धूच्या दोन्ही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. “चिनू. चिनू. “, तो मोठ्याने ओरडत आणि किंचाळत होता.

चिनू तडफडत जमिनीवर लोळत होता, “सिद्धू यार. मला माफ कर रे. मी त्यादिवशी नेहाला असं.. मी त्यादिवशी नेहाला असं बोलायला नको होतं”, चिनूला बोलवत नव्हतं.

“चिन्मय. डोळे उघड. काय केलस तू हे? दरवेळी फक्त माझ्यासाठी इतकी संकटं ओढवून घेतलीस. माझ्या मित्रापेक्षा जास्त आहेस तू. भाऊ पण नाही करणार इतकं माझ्यासाठी तू केलस. मी तुला काहीच नाही देउ शकलो. तुला काही झालं तर मी परत एकटा पडेन यार. तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही. चिनू. डोळे उघड.”

सिद्धूचा परत संताप झाला. तो किंचाळला, ”आकाश. तुला सोडणार नाही मी. माद***… नाही तुझ्या गां*त गरम वाळू भरली तर सिद्धू दोन बापाचा. आक्या.. हिझ*सारखा पळालास का? हिम्मत असेल तर समोर ये. काय रे ए. तुला कापून टाकेन आकाश. माझ्या चीण्याला मारलास?”, सिद्धू वेड्यासारखा किंचाळत होता. ओरडत होता.

“चिन्या यार. मरू नको.. मला नाही राग आला तुझा. आता काही बोलणार आहेस का? अरे यार. तूला काही झालं तर मी पुन्हा एकटा पडेल रे. चिनू. please बोल माझ्याशी. अरे कोणीतरी ambulance बोलवा. कोणी आहे का इथे?”, सिद्धू किंचाळत होता. ओरडत होता. मोठ्याने ओरडत होता.

हात थरथरत होते. घसा सुकला होता. बोलवत नव्हतं. आवाज कांपत होता. छाती धडधडत होती. सिद्धूचा आवाज निर्मनुष्य parking area मध्ये घुमत होता. पण ऐकणारं कोणीच नव्हतं.

त्याची अवस्था त्या टोळ पक्षासारखी झाली, ज्याचा सगळा परिवार वणव्यात जाळून गेला आहे, आणि शेवटच्या निखार्यांच्या तडतडीत तो केविलवाणी फडफड करतोय.

चिनूचं शरीर थंड पडत चाललं होतं, आणि धडधड मंदावत चालली होती.

इतक्यात सिद्धूच्या डोक्यात खूप तीव्र सणक निघाली.

जणू कानामधून मेंदुमध्ये कोणीतरी लाललाल तापलेली सळई घातली आहे. डोकं इतकं दुखू लागलं कि, कि. आतमधून ते आता जणू एखाद्या भोपळ्यासारखं फुटणार आहे. डोळ्यासमोर अंधेरी येऊ लागली. असं डोकं त्याचं खूप दिवसांनी दुखलं होतं.

“आह, आह” सिद्धू जमिनीवर लोळू लागला. “चिनू, चीनु”, तो निपचित पडला. त्याची चेतना कमी होत होती. शरीरावरचा ताबा जात होता. नजर कमजोर पडत होती.

रक्ताच्या थारोळ्यात चिनू आणि सिद्धू चिनूच्या अंगावर बेशुद्ध पडला.

सिद्धुला जाग आली.

शांत एकांत रात्र होती.

त्याचं डोकं दुखत नव्हतं.

त्याने उठून आजूबाजूला पाहिलं.

तो त्याच्या घरात होता.

बाबा घरात नव्हते.

घड्याळ पाहिलं. रात्रीचे अडीच वाजले होते.

इतक्यात त्याचा दरवाजा कोणीतरी ठोठावला..

“सिद्धू सिद्धू. दार उघड. सिद्धू.”

Ek Anolkhi Mitra Marathi Katha

त्याने घाईघाईने जाउन दार उघडलं.

दारात चिनू होता.

त्याचं डोकं फुटलं होतं.

“चिनू. तू? आत्ता? आत ये. काय झालं तुला? तू कुठे होतास इतके दिवस? फोन attend नाही केलेस. आणि हे रक्त? बापरे, तुला लागल आहे. घरात येलवकर. मी डॉक्टरांना फोन करतोय”.

“सिद्ध. थांब. अरे यार. प्रोब्लेम झालाय रे.”

“काय झालं? मी आहे बोल. काय झालं?”

चिनू घाबरला होता, “अरे यार, सिद्धू. माझ्याहातून आकाशचा murder झालाय.”

Confusion – एक अनोळखी मित्र – भाग ११ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

4 Responses

 1. shubhangi says:

  Sir hya nantrcha part please lavkr pathava plzz plz

 2. shubhangi says:

  Sir he Kay navin mod anala story madhe ani ankhi kiti suspense

 1. April 26, 2017

  […] Murder – एक अनोळखी मित्र – भाग १० – Ek Anolkhi Mitra […]

 2. April 27, 2017

  […] Murder – एक अनोळखी मित्र – भाग १० – Ek Anolkhi Mitra […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *