अपयशस्वी – एक अनोळखी मित्र – भाग १ – Ek Anolkhi Mitra

Ek Anolkhi Mitra Marathi Thriller Story

“भे**… मार त्याला..”
“ह्याच्या आईची **”

“आह. . ”

“आद्या सोडू नकोस. तुडव”. . .

नाक फुटलं. तोंड फुटलं. त्याचं समाधान झालं

आदित्य आणि त्याचे मित्र हसत हसत आणि निघून.

खरं तर हे नेहमीचं होतं.

तो कॉलेजच्या गेटजवळ धुळीने माखलेला तोंड फुटलेला तसाच पडून होता. कोणी त्याला उठायला हातही देत नव्हता. सगळे त्याची कीव करत होते. पण कदाचित आदित्य एका मोठ्या बापाची औलाद असल्याने त्याला घाबरून, कि ‘आपल्याला काय करायचं’ ह्या भावनेने ते माहित नाही; पण गर्दी फक्त बघत होती. एक दोन हळव्या मनाचे लोक सोडले, तर बाकी सर्वे तर बघेच होते.

सिद्धू नंतर कण्हत कण्हत स्वतःच उठला. त्याने त्याचं कॉलेजचं दप्तर उचललं. ते थोडं दूर पडलं होतं. झटकलं. त्यातून पाण्याची बाटली काढून थोडं पाणी तोंडावर मारलं. आधी लाल आणि मग साधं पाणी त्याच्या चेहऱ्यावरून घरंगळत जमिनीवर पडलं. बघणार्यांना कळून चुकलं, कि तमाशा संपला आहे, आणि तिथली गर्दी हळू हळू बिथरू लागली.

फक्त नेहाच दुरून पाहत होती आणि टीपे गाळत होती. पण तीही पुढे नाही आली. येऊ शकली नाही.

सिद्धू म्हणजे पु.लं.च्या सखाराम गटणेचा pirated version.

शरीराने साधारण किरकोळ. चेहेरा सुंदर पण, त्याच्यात special असं काहीच नव्हतं. न ड्रेसिंगचा सेन्स, न कोणती style. पैसे कुठे होते style मारायला? इन मीन तीन शर्ट आणि दोन pants. कॉलेज चा पहिला दिवस होता, तेव्हा त्याच्या वडिलांनी मोठ्या प्रेमाने त्याला एक ड्रेस दिला होता. एक सफेत, आणि दोन पिवळे शर्ट. एक काळी आणि एक राखाडी पेंट. सिद्धू आळीपाळीने तेच ५ कपडे अदलून बदलून घालायचा. केस म्हणजे, अंघोळ केल्या केल्या चपचपीत तेल लावून सगळे पुढे घ्यायचा आणि ७५% उजवीकडे आणि २५% डावीकडे वळवायचा. बस. . अजून काहीच नाही. दीड वर्ष एकंच चप्पल वापरत होता.

Ek Anolkhi Mitra Marathi Thriller Story

त्याच्याकडे काहीच नव्हतं. घरात परिस्थिती अतिशय गरीब होती. आई लहानपणीच गेली होती. त्याने पुस्तकांनाच स्वतःचं जीवन बनवलं होतं. त्याचे मार्क हीच त्याची एकमेव मिळकत होती. खूप मेहेनत करून त्याने महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. आणि त्याचं समग्र शिक्षण गुणवत्ता आणि शिष्यवृत्तीमुळेच झालं होतं.

त्याचं आयुष्य इतिहासाचं ते रटाळ black and white बुक होतं, ज्यात न कोणता रंग होता, आणि जे कोणालाही वाचायचं नव्हतं.

तो स्वभावताच अतिशय बुद्धिमान मुलगा होता. त्याचा कधीच कोणी मित्र नव्हता. तो नेहमी एकटा राहत असे.

पुस्तके सोडून त्याला एकंच गोष्ट आवडायची. एका मुलीवर तो खूप प्रेम करायचा. आणि तिच्यासाठी रात्र-रात्रभर जागायचा. पण त्याचात स्वताच्या भावना बोलून दाखवायची हिम्मतही नव्हती.. ती नाही बोलेल ह्या भीतीने नव्हे, तर ती बोलणे सोडून देईल ह्या भीतीने.

खरंतर तिलाही तो खूप आवडायचा. तिला तो साधा वाटायचा. आणि तीही same त्याच्यासारखीच होती. सखाराम गटणे- female version.

सिद्धू एक ragging material होता. जो नाही तो त्याला टपली वाजवायचा. आणि सिद्धू चूक नसेल तरीही sorry बोलायचा. वडिलांना त्रास होईल, म्हणून तो कधीच त्याला होणारा त्रास त्यांना सांगत नसे. ते तरी काय करणार? ते फार गरीब होते. त्याची harassment करणारी खूप श्रीमंत आणि मोठ्या बापाची पोरं होती. त्यांच्या विरोधात तर पोलिस पण की करू शकत नव्हते.

आज आत्ता त्याने मार खालला कारण, त्याची चूक इतकीच होती, त्याने कॉलेज मध्ये आल्या आल्या गेट वर बसलेल्या आदी आणि इतर मुलांना सलाम नाही केला. आणि त्यांनी आवाज दिल्यावर सिद्धूने त्यांना ignore केलं.

आदिने समोर येउन कॉलर पकडली.

“काय रे, झंडुर. माजला का रे? आवाज देतो तर बघत नाही. आम्ही दिसलो नाय का तुला? सलाम नाही केलास?”

“मी का सलाम करू तुला? तुझा बाप MLA आहे म्हणून? तो मला पोसायला नाही येत.”, सिद्धूने स्वतःच्या तोडक्या मोडक्या स्वाभिमानाखातर कडक उत्तर दिल.

हेच कारण होतं, आदिने पाचव्यांदा सिद्ध्याला तुडवलं.

तर मित्रहो. . असा होता सिद्धू. .

स्वताची shirt-in कधी बाहेर न येऊ देणारा, आणि पोटाच्या वर pant घालणारा तीही plastic-belt सकट..

ही त्याच loser ची गोष्ट आहे.

Ek Anolkhi Mitra Marathi Thriller Story

Flop love story – एक अनोळखी मित्र – भाग २ – Ek Anolkhi Mitra

You may also like...

4 Responses

  1. April 14, 2017

    […] अपयशस्वी – एक अनोळखी मित्र – भाग १ – Ek Anol… […]

  2. June 21, 2017
  3. June 21, 2017
  4. June 21, 2017

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *