अनाहूत – Anahut Marathi Horror Story

Anahut Marathi Horror Story

लेखिका: कविता नाईक
हळूहळू काव्या शुध्दीत येत होती.आकाशला बघून तिला रडू कोसळल.ती रडत रडतच सांगत होती.
ती आरशासमोर बसली होती तेव्हा दरवाजा वर कोण तरी आहे अस तिला वाटल तिला वाटल आकाश असेल.ती उठून दरवाज्याच्या दिशेने गेली तर तिला जे दिसलं,ते भयावह होतं. दरवाज्याकडे एक मुलगा उभा होता.लाल भडक असे त्याचे डोळे , त्याचा चेहरा अर्धा जळालेला होते, अगदी मेण कस वितळतं तस त्याच्या चेहर्याची एक बाजू दिसत होती.
“काव्या…अग भास झाला असेल ग सोना तुला..बोललो होतो ना एकटी नको जाऊ पण ऐकणार कोण ना..? तुम्ही बायका ना….”काव्याच्या गालावर हलकीशी चापट मारून आकाश बोलला. “आकाश पण तू कुठे होतास?”
“मी निशूसोबतच होतो खाली..लाईटचा Problem सोल्व्ह होतो का बघत होतो.” तेवढ्यात निशू बोलली
“आपण एकसाथ झोपूया ना तिघ please पप्पा”
काव्याने आणि आकाश ने होकार दर्शवला. औषधांमुळे काव्याला त्या रात्री झोप लागली.
पण असे भास होणं आता नित्याचं होऊ लागलं. एकदा तर कहरच झाला.
निशू त्या मुलासोबत खेळत होती.
आता मात्र काव्याचे धाबे दणाणले.
पण थोडी हिम्मत करून ती पुढे गेली आणि त्या दोघांचा संवाद ऐकायचा प्रयत्न करू लागली. “दादा तू का माझ्या मम्मीला घाबरवतोस रे?जा कट्टी”
निशा त्या मुलाला सांगत होती.
तेवढ्यात त्या जमिनीवर सॅड symbol रेखाटलं गेलं.
“चल दादा मी तुला माफ करते पण पुन्हा अस नको करूस हा”
तर जमिनीवर आता smile symbol आलं.
“दादा मी ना आता सर्वांना सांगणार की माझा दादू जादूगर आहे,टाटा दादा मी जाते हा”
तसा तो मुलगा अदृश्य झाला भित्री असली तरी काव्या समंजस होती.
ती निशूजवळ आली आणि तिला प्रेमाने विचारलं की कोण होता ग तो?
निशू बोलली ” मम्मा तो ना माझा दादा आहे.आम्ही ना खूप खेळतो..त्याला magic पण येतं मम्मा”
“हो का , पण बाळा तुला त्याची भिती नाही का वाटतं?”
तर निशू बोलली ,”मम्मा म्हणून दादा एकटा असतो आणि तू मला एकदा बोलली होती ना आपण कसे दिसतो ते Important नाही”
काव्याने मायेने निशूच्या डोक्यावर हात फिरवला. आता मात्र काव्याच्या मनात काही वेगळंच चालू होतं.
असेच दिवस पुढे सरकत होते.

Anahut Marathi Horror Story

निशूला शाळेत सोडून काव्या थेट “वात्सल्य” मध्ये आली.
मॅडमचा दरवाजा उघडाच होता.तिने Knock केलं तस आतून आवाज आला “आत या.” “अरे शिंदे मॅम तुम्ही , आज अचानक इथे कशा?काही अडचण?”
खुर्चीवर बसलेल्या ‘ देसाई’ मॅडम नाकावर आलेला चश्मा वर करत बोलल्या. “हो,actually मला निशा बद्दल जाणून घ्यायचं होतं”
“काही problem झाला आहे का?निशा 9 वर्षाची असताना तुम्ही दत्तक घेतलं होतं इथून , याला 2 वर्ष झाली आता” काव्याने देसाई मॅडमना निशाच्या past बद्दल विचारलं.पण अशी कोणाची माहिती देऊ शकत नाही अस सांगून देसाई मॅम विषय टाळत होत्या.
काव्याने खूप Request केल्यानंतर त्यांनी सांगायला सुरूवात केली.
निशाला आईवडील नव्हते पण तिचा भाऊ खूप प्रेम करायचा तिच्यावर.
तिने शिकून मोठं व्हावं यासाठी तो 18 वर्षाचा मुलगा खूप मेहनत करायचा.त्याच्या सेठने एका चाळीतच वरची एक खोली त्याला राहायला दिलेली.
पण एके दिवशी अचानक त्या चाळीच्या वरच्या खोल्यांमध्ये आग लागली.
निशाला वाचवण्यासाठी तिच्या भावाने तिला तिथून खाली फेकल,निशा वाचली पण तिच्या डोक्याला लागल परिणामी ती सर्व काही विसरली.तिचा भाऊ त्या आगीत वाचू नाही शकला. निशाला इथे तिचे शेजारी घेऊन आले.
काव्याचे डोळे पाणावले.
ती घरी आली,तिच्या मनात एक भीती होती की जर तो निशूला घेऊन गेला तर…
तेवढ्यात आरशावर काही लिहिलेलं तिने वाचलं.
“माझ्या बहिणीला सांभाळा.तिला खूप शिकवा.मी एक भाऊ म्हणून तिच्यासोबत नेहमी असेन.”
तेवढ्यात निशा शाळेतून आली, ती अक्षरे गायब झाली.
“मम्मा मी बाहेर जाऊ का?”
“हो जा पण आधी fresh हो,दादाला त्रास नको देऊस हा “काव्याच हे बोलणं ऐकून निशा हसायला लागली..आणि काव्याच्या पण चेहर्यावर हसू आलं..

Anahut Marathi Horror Story

You may also like...

27 Responses

 1. riddhi says:

  Khup chan story aahe..

 2. Kamini vaity says:

  Mastach saspence aahe next part lavkar upload kara best of luck

 3. Shamli says:

  Nice story i like it……

 4. yuvraj says:

  shevat thoda vegla hava hota.. mhanje horror hava hota…

 5. kirantaktode says:

  masta chan

 6. Gita Patil says:

  Nice…..plz next part…..

 7. pooja says:

  khup chaan aahe story…..

 8. The nice thing is small, but it is a nice surprise too much

 9. pradeep pawar says:

  Nice story

 10. Sandeep says:

  Nice but pls pudhacha bhaag lavkar publish kara

 11. Nice but kharach ekhad nat as asu shakt ka,ki je manus melyavar suddha jawal ast.

 12. Prashant says:

  Mastach …khup chhan lihiliye,shevatparyant utkantha wadhavte…

 13. Chetan says:

  Khup chan ahe

 14. shraddha Vedpathak says:

  khup msssst aahe story…story vachat astana sampurn chitra dolyansmor ubha rahat…please lvkr pudhcha bhag publish kara…very nice story…keep it up….??

 15. shree says:

  really i enjoined that story…………………………………………………………!

 16. Divya Mohite says:

  nice story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *