अनाहूत – Anahut Marathi Horror Story

अनाहूत  – Anahut Marathi Horror Story

 

Anahut Marathi Horror Story by Kavita Naik & My Horror Experience

‘अग निशू,अजून किती वेळ बाहेर खेळणार आहेस.चल आत ये पटकन..वाजले बघ किती.’ काव्या अक्षरशः वैतागली होती निशाच्या वागण्याला.
‘थांब ना ग मम्मी’ बाहेरून निशा ओरडून बोलली .
‘बस हा आता निशू.पप्पांना काॅल करू का?चल ये लवकर आत.’काव्या खरच आकाश ला काॅल करायच्या तयारीत होती तेवढ्यात निशाची स्वारी आली’काय ग किती वाजले.तुझे पप्पा बघ sunday असून job वर गेले आणि तू अभ्यासाच नाव नाही.करू का पप्पांना call’
काव्या जरा रागातच बोलली.
‘जा कट्टी मम्मी..मी पण नाव सांगणार डॅडूला आणि दादूला ‘बिचारी निशू रडकुंडीला येऊन बोलत होती.
“कोणता दादा ग?”
“मी नाय सांगणार जा,कट्टी”निशा पाय आपटत तिच्या रूम मध्ये गेली.
काव्या विचारात पडली कोणत्या दादा बद्दल बोलत होती निशू.
तेवढ्यात फोन वाजला.
“हैलो”
पलीकडून काहीच उत्तर नाही
काव्या पुन्हा बोलली “हैलो”
“हाहाहा…तुझ्या नवर्याला तर मी मारल.आता तुझ्या मुलिची बारी”पलीकडून घोगरा आवाज आला.
काव्या घाबरली.रडकुंडीला येऊन बोलली “कोण..कोण आहात तुम्ही ? काय केलात माझ्या आकाश सोबत?”
तिचा धीर खचला ती रडायला लागली.तस पलीकडून आवाज आला
“ओय काव्या रडण बंद कर वेडू.
मी आहे तुझा आकाश वेडाबाई मस्करी करत होतो ग.”
“मूर्खा तू ना ये घरी मग बघते तुला हा कोणता नंबर”
“ऑफीसचा आहे ग..अच्छा रोज तर बघतेस ना मला”
“जा ना रे…चल बाय..तू ऑफीसमध्ये काम कर.मी निशू साठी pizza बनवते.”
“ऐक ना, निशूला एक गोड गोड पप्पी दे हा”
“हममम,बाय लव यू”
“लव यू टू”
Anahut Marathi Horror Story
***
प्रसंग दुसरा
निशूच्या रूमचा दरवाजा उघडाच होता.एक पुसटशी आकृती आत येत होती.मम्मी ओरडल्यामुळे निशू रडत रडतच बेड वर झोपलेली.कोणाची तरी चाहूल लागली तिला.कोणतरी होत तिच्या रूम मध्ये.
“कोण आहे?”निशू घाबरत घाबरत बोलली.
तिच्या रूमचा दरवाजा आपोआप बंद झाला.
थोड्या वेळाने काव्या निशूच्या रूम मध्ये आली तर दरवाजा उघडाच होता.
निशा शांत बसली होती.
आरशासमोर बसून ती कसला तरी विचार करत होती.
“काय झाल ग निशू?”
काव्याच्या आवाजाने निशाची तंद्री उडाली.
निशू मम्मीला(काव्याला) जाऊन बिलगली आणि बोलली “मम्मी साॅरी ”
“हे बघ बाळा मी तुझ्या चांगल्यासाठीच ओरडते ना.चल बस आता रडू नको.हे बघ मी काय बनवल तुझ्यासाठी”
“Wow pizza, मम्मी यू आर द बेस्ट”
“काय ग निशू हे काय?तू sandel घालूनच आत आली.”
काव्या विचारात पडली हाॅल मध्ये तर ठसे नाहीत मग इथे कसे.तेवढ्यात तिने जे बघितल , तिच्या अंगावर काटा आलाएक अंधुकशी सावली पडद्याच्या मागे दिसली.
काव्या चार पावल मागे झाली.
निशूचा हात पकडून बोलली,चल खाली Hall मध्ये जाऊन बसूया.
“मी नाही येणार..तू जा ना मम्मी अजून एक पिज्जा आण ना त्याला पण पाहीजे ना.”खिडकीकडे बोट दाखवून निशू बोलली.
आता मात्र काव्या घामाने ओलीचिंब झाली.
निशाचा हात जवळजवळ खेचतच ती खाली आली.अन देव्हार्याच्या समोर येऊन बसली.
असाच वेळ जात होता सूर्य मावळतीच्या दिशेने झुकत होता.काव्या खूप घाबरलेली होती.
भीतीने तिने घराचा दरवाजा पण उघडाच ठेवला होता.
तिचं लक्ष दरवाज्याकडे गेलं.
दरवाजावर कोणाची तरी चाहूल लागली.तिने निशूला जवळ घेतलं.
तेवढ्यात आकाश आला.
काव्याने पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली.
मागून निशा पण धावत आली.
“काय ग?काय झाल”
रडत रडतच तिने सर्व सांगितल
.
“अग तुला भास झाला असेल ग..अस काही नाहीय 2 वर्ष झाली आपण इथे राहत आहोत.
चल रडन बंद कर बघ निशू पण हसतेय.
आणि Horror tv show बघण पण बंद कर तू.”ती तिची मिठी अजून घट्ट करते.
“चल खूप झाल हा आता . मी Fresh होऊन येतो.तोपर्यंत मस्त जेवण तयार कर, नाहीतर एक काम करूया आपण आज बाहेरच जाऊया Dinner करायला.चालेल ना?”काव्याच्या माथ्यावर ओठ टेकवून आकाश बोलला.
“हमम.ठिक आहे.”

तिघ पण तयार होऊन बाहेर जातात.
घरी आल्यावर
“देवा या light ला काय झाल आता,आकाश मोबाईल ची flashlight चालू कर ना”काव्या बोलली.
मी वर जाऊन change करते.
“अग थांब light तर येऊ दे.नाहीतर पुन्हा घाबरणार तू”
हसत हसतच आकाश बोलला.
“चल मी डरपोक नाहीय.”काव्या थोड्या लटक्या रागातच रूमच्या दिशेने निघाली.
“अग हळू पडशील नाही तर”आकाश खालूनच ओरडला.
काव्याने रूमचा दरवाजा उघडला.एक तास तरी रूमच्या खिडक्या बंद असल्यामुळे दमटपणा आला होता.
ती बेडवर जाऊन शांत बसली.5 मिनीट तो शांत बसली.
मग अचानक उठून ती आरश्यासमोर बसली.
कानातले झुमके काढू लागली.
तिचं लक्ष दरवाजाकडे गेले.
“आकाश pls मस्ती नको चल आत ये आणि निशू कुठे गेली?”
अचानक एक जोरात किंकाळी ऐकायला आली.
आकाश निशूला उचलून वर आला.
काव्या बेशुध्द पडलेली दिसली.
जर आकाश आणि निशू खालीच होते तर मग काव्याने कोणाला बघितलं?

 

Anahut Marathi Horror Story

You may also like...

27 Responses

 1. riddhi says:

  Khup chan story aahe..

 2. Kamini vaity says:

  Mastach saspence aahe next part lavkar upload kara best of luck

 3. Shamli says:

  Nice story i like it……

 4. yuvraj says:

  shevat thoda vegla hava hota.. mhanje horror hava hota…

 5. kirantaktode says:

  masta chan

 6. Gita Patil says:

  Nice…..plz next part…..

 7. pooja says:

  khup chaan aahe story…..

 8. The nice thing is small, but it is a nice surprise too much

 9. pradeep pawar says:

  Nice story

 10. Sandeep says:

  Nice but pls pudhacha bhaag lavkar publish kara

 11. Nice but kharach ekhad nat as asu shakt ka,ki je manus melyavar suddha jawal ast.

 12. Prashant says:

  Mastach …khup chhan lihiliye,shevatparyant utkantha wadhavte…

 13. Chetan says:

  Khup chan ahe

 14. shraddha Vedpathak says:

  khup msssst aahe story…story vachat astana sampurn chitra dolyansmor ubha rahat…please lvkr pudhcha bhag publish kara…very nice story…keep it up….??

 15. shree says:

  really i enjoined that story…………………………………………………………!

 16. Divya Mohite says:

  nice story

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *