योगी आदित्यनाथ, युपी चे २१वे मुख्यमंत्री – Yogi Adityanath Information In Marathi

२०१७ च्या उत्तर प्रदेश निवडणुकांनंतर उत्तर प्रदेश चे नवीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल माहिती

भाजप चे अग्रेसर नेते म्हणून ओळखले जाणारे योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. ते उत्तर प्रदेश चे २१ वे मुख्यमंत्री आहेत. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी खासदार बनून सर्वात मोठ्या संसद भावनापर्यंत पोहोचणाऱ्या आदित्यनाथ चे खरे नाव आहे अजय सिंह नेगी.

योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

आदित्यनाथ चा जन्म उत्तराखंड मधील गढवाल गावात ५ जून १९७४ रोजी एका राजपूत घराण्यात झाला. गढवाल युनिव्हर्सिटी मध्ये गणित विषयात बीएससी केल्यावर ते गोरखनाथ मंदिराचे आचार्य अवैद्यनाथ यांच्या संपर्कात आले. आचार्यांकडून दीक्षा घेतल्यावर त्यांनी आपले सांसारिक जीवन सोडले व योगी बनले.

अवैद्यनाथांनी राजकारणातून सन्यास घेतल्यावर आदित्यनाथ हे गोरखपूर चे खासदार म्हणून निवडून आले. १९९८ पासून ते या प्रदेशाचे नेतृत्व करत आलेले आहेत. ते नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते गोरखपूर येथून सतत ५ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांची छबी हिंदू हृदय सम्राट अशीच आहे. लोकसभेत सुद्धा हिंदू समाजाचा अडचणींविषयी मुद्दे उपस्थित करतात.

यांच्यावर बऱ्याच वेळा कायदा हातात घेतल्याचे आरोप झाले आहेत. गोरखपूर दंगलीतही यांचे नाव घेतले गेले होते. ते आज गोरखनात मठाचे आचार्य आहेत. योगी आदित्यनाथ हे युवा हिंदू वाहिनीचे संस्थापकही आहेत, जी हिंदू तरुणांची सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रवादी संघटना आहे.

विवाद

८ सप्टेंबर २००८ रोजी योगी आदित्यनाथांवर अजमगढ येथे प्राणघातक हल्ला झाला, या हल्ल्यात ते थोडक्यात वाचले. हा हमला इतका मोठा होता कि हमलेकरांनी १०० हुन अधिक वाहनांना घेरले होते. गोरखपूर येथील मुस्लिम सण मोहरम यात झालेल्या गोळीबारात एका हिंदू तरुणाची हत्या झाल्यावर गोरखपूर दंगलीदरम्यान योगी आदित्यनाथांना अटक झाली होती, जिल्ह्याधिकाऱ्यांनी तो युवक जखमी असल्याचे सांगूनही आदित्यनाथांनी त्या युवकाला भेटण्याची इच्छा दर्शवली होती. त्या वेळेस त्यांनी गोरखपूर येथील संचारबंदी हटवण्याची मागणी केली व जिल्ह्यादिकार्याच्या नाकारला न जुमानता त्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले. यामुळे त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. याचे पडसाद असे उमटले कि मुंबई-गोरखपूर गोदान एक्सप्रेस चे काही डब्बे पेटवण्यात आले. याचा आरोप हिंदू युवा वाहिनी वर लागला.

हि दंगल उत्तर प्रदेश च्या ६ जिल्यांमध्ये व ३ मंडळांमध्ये पसरली. त्यांच्या अटकेच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी हरी ओम व पोलीस प्रमुख राजा श्रीवास्तव यांची बदली करण्यात अली. ऐकिवात आहे कि आदित्यनाथांच्या दबावाखाली मुलायमसिन्ह यादव व उत्तर प्रदेश सरकार ला हि कारवाही करावी लागली.

You may also like...

1 Response

  1. Omkar Ramdas Gite says:

    No.1 in Great Scientists

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *