जेव्हा १ लाख वाचक वाचतात ।

नमस्कार वाचक मित्रहो, हि पोस्ट मी कोणत्याही विषयावर माहिती देण्यासाठी नाही टाकत आहे. हि पोस्ट आहे या ब्लॉग बद्दल. या ब्लॉग च्या वाचकांबद्दल आणि थोडीफार अम्हांबद्दल. हा ब्लॉग काही फार मोठा नाही ना याचा वाचक वर्ग. छोट्याशा टुमदार घरासारखच हे आमच्या विचारांचा ऑनलाईन घर आणि तुम्ही आमचा परिवार.

१४ ऑगस्ट २०१४, या ब्लॉग चा पहिला दिवस आणि आता नकळत याला १ वर्ष पूर्ण झालं. कोण वाचेल कोण नाही याचा विचार न करता मिळेल तितके वाचनास उपयुक्त असे मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या ब्लॉग वरील सारेच काही आम्ही स्वतः लिहिलेले नाही, बर्याच वेळा काही लेखकांच्या लेखण्या तुम्हांपर्यंत पोहोचवल्या. त्याबद्दल जशी स्तुतीसुमने ऐकली तशीच लाखोळी सुद्धा काही वेळेस ऐकावी लागली. पण सर्व निभावून गेलं.

आपल्या ब्लॉग च नाव PatilsBlog, ते का? कोण्या पाटील आडनावाच्या माणसाचा हा ब्लॉग आहे म्हणून नाही. जुन्या काही, बर्याच गावांत आताही जेव्हा गावासमोर कोणता मोठा प्रश्न पडत असे, तेव्हा त्या प्रश्नावर विचारविनिमय गावच्या पारावर बसून संपूर्ण गाव करत असे. आणि यात गावच्या पाटलाचा सहभाग असे. तसा हा पारावरचा ब्लॉग. आणि आपण सारे गावकरी या विचारमंचाचे.

आपल्या या ब्लॉग ला १,९२,००० वाचक पूर्ण झाले. हे माझ्यासाठी तरी एक आश्चर्यच आहे. एका वर्षाच्या आत इतके वाचक माझ्या अपेक्षेच्या बाहेरच होतं. आणि ते मला एकट्याला शक्यही नव्हतं. त्यासाठी तुमच्यासारख्याच १,९२,००० लोकांची गरज होती. आपल्या या ब्लोग ला लाभलेल्या आपल्या आशीर्वादासाठी आम्ही कायमचे ऋणी राहू. आपण वाचकांपैकी कुणाला ब्लॉग वर लेखन करायची इच्छा असेल तर प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा.

धन्यवाद

You may also like...

3 Responses

  1. आपन सर्वानी मीळुन त्यांच्या वीचारांचा प्रसार करायला पाहीजे.

  2. YOGESH says:

    Great blog good information to be continued

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *