वटपौर्णिमा मराठी माहिती – Vat Purnima Vrat Information In Marathi

उद्या महाराष्ट्र नव्हे तर तमाम भारतखंडातील स्त्रिया वडाची पूजा करतात.
यामागे भाव असतो तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा.
वडाच्या झाडाला दोरयाचे वेष्टन देवून,दिवसभर उपवास व्रत आचरून सती-सावित्रीचे हे व्रत मोठ्या भक्तिभावाने होत असते..!

Vat Purnima Vrat Information In Marathi

Vat Purnima Vrat Information In Marathi


वर वर पाहता हे व्रत हि आजच्या शिकलेल्या डोक्याना अंधश्रध्दा वाटते.मात्र वास्तवात हे व्रत म्हणजे एक मानसशास्त्रीय विधी आहे ज्याने भारतामधील संस्कृती टिकवून समाजाचा समतोल राखला जात आहे.
मुळात सारे सणवार हि एक प्रतीके आहेत.समजात जे जे योग्य आहेत ते टिकले जावे आणि त्यातून एक सुदृढ समाज दीर्घकाळ टिकावा हे उद्देश ठेवून हे सण-विधी आपल्या बापजाद्यांनी बनवले असावेत..!
मानवी मन खूप चंचल असते.कोणताही एक विचार दीर्घकाळ टिकू शकत नसतो.
मनुष्य जरी शिकून शहाणा झाला तरी तो आहे एक प्राणीच…सुशिक्षित प्राणी.
म्हणून प्राण्यांचे जे मूळ गुण आहेत त्याकडे त्याचा कल जास्त असतो.
निद्रा,भूक आणि मैथुन या प्राण्यांच्या ३ गरजा मनुष्यालाही लागू पडतात.
मनुष्य कितीही शिकलेला असो ..त्याला भूक लागतेच ..भूकेनंतर निद्रा आवश्यकच आणि या दोन भुका भागल्यानंतर त्याला तिसरी भूक म्हणजे वासनेची हि लागतेच लागते.
या तेन्हीपासून कोणी सुटत नाही..!
या तिन्हीच्या थोडे पलीकडे गेलात तर आणखी एक गरज आहे ती म्हणजे ज्ञान.
मनुष्याचा जन्मच ज्ञान मिळवण्यासाठी झाला आहे.
मात्र ज्ञान हि जरी गरज असली तरी प्राणी या नात्याने पहिल्या तीन गरजाच सहज मिळवाव्या वाटतात..!
शास्त्र असे सांगते कि जे पिंडी तेच ब्रम्हांडी.
वीज्ञान सुध्दा तेच सांगते कि जे पृथ्वीत आहे तेच मनुष्यात.
७२% पाणी हे मानवी शरीरात आहे आणि पृथ्वीवर सुध्दा..!
आपण या पृथ्वीचाच एक भाग आहोत आणि हेच अध्यात्म सुध्दा सांगते कि या चराचरात,अणुरेणूत ईश्वर आहे.सर्व प्राणी ईश्वार्चीच रूपे आहेत..!
इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्याला प्रगल्भ बुद्धी आहे.
चांगले वाईट याची तुलना करणारे मन आहे.
आणि नवीन उत्पादन क्षमता असलेली कल्पनाशक्ती देखील आहे.
कल्पनेत आपण नवनवीन गोष्टी पाहतो,मन त्याची तुलना करून त्याला बरे वाईट ठरवते आणि बुद्धी ती गोष्ट सत्यात आणू शकते.
आजवरचा मनुष्याचा इतिहास पाहिला तर याच मूळ गोष्टीवर अवलंबून आहे.
पूर्वी मनुष्याच्या केवळ अन्न,वस्त्र,पुनर्निर्मिती आणि निवारा याच गरजा होत्या,कालांतराने गट पडले वेगवेगळ्या काळात मनुष्याने वेगवेगळे आविष्कार केले आणि आजच्या आधुनिक युगापर्यंत मनुष्य आलेला आहे..!
काळ बदलला मात्र मनुष्याच्या बेसिक ज्या गोष्टी आहे त्यात तिळमात्र बदल घडला नाही..!
भारत हि अशी भूमी आहे जिथे हजारो वर्षापासून केवळ मानवी गरजा नव्हे तर ज्ञानाची उपासना केली जायची.
मानवी मनाचा सखोल अभ्यास हजारो वर्षापूर्वी इथे केला गेला आणि त्यातून समाजाला हिताच्या असलेल्या गोष्टी मनुष्याने पाळाव्यात यासाठी काही मानसस्तरीय प्रयोग केले ज्याला सणांचे स्वरूप दिले गेले.
एखादी व्यक्ती जेव्हा मंदिरात जावून देवाच्या मूर्तीपुढे हात जोडून डोळे मिटते तेव्हा तिचा अंतरमनाशी संवाद सुरु होतो.
हि एक मानसशास्त्रीय गोष्ट आहे ज्यायोगे मनुष्य काही क्षणापुरता का होईना स्वताशी संवाद करतो.
एखादी वाईट व्यक्ती जरी मंदिरात गेली तरी तिलासुद्धा जाणीव होते कि आपण चुकत आहोत..मंदिरे बनवली गेली त्याचे कारण हे आहे..!
रोज ध्यान करा म्हटले तर ९९% लोक करणार नाहीत..मात्र रोज मंदिरात जा म्हटले तर १००% शक्य असते..!
यातूनच समाजात सत्प्र्वृतीचे लोक निर्माण होतील..!
अगदी असेच आहे ते वटसावित्रीच्या सणामध्ये..!
जगात भारत हा एकमेव असा देश असेल जिथे स्त्री आणि पुरुष मरेपर्यंत एकत्र संसार करतात.आई-वडील,भाऊ-बहिण यासारखी नाती इतक्या गंभीरतेने पाळतात.
माझे असंख्य बाहेरील देशातील लोक मित्र आहेत जे सांगतात कि इथे एखादा मुलाचे वडील कोण हे सांगणे अवघड आहे…व्यक्तिस्वातंत्र्य या नावाखाली स्त्री-पुरुषांना एवढी सवलत आहे कि कोणीही कोणासोबतहि कितीतरी वेळा मैथुन करू शकतो..!
मात्र असे आपल्या हिंदुस्थानात नाही.याची कारणे जर तुम्ही आभ्यास म्हणून शोधाल तर याची उत्तरे सापडतील ती आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सण-वारात..!
एखादी स्त्री-पुरुष कितीतरी व्यभिचारी असला तरी मंदिरात तो स्वताच्याच मनाला देवाच्या रूपाने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो..!
वाल्याचा वाल्मिकी होणे हे प्रकार फक्त आपल्याच देशात घडतात..!
कारण कितीही चुका केल्या तरी त्या चुका पुन्हा न करायचा निश्चय आपल्या साणावारातून मिळतो.
मात्र हल्ली या सनावारातून आपण नेमके प्रेरणा न घेता केवळ करायचे म्हणून सण साजरे करतो.
वास्तविक सावित्री ची जर तुम्ही गोष्ट ऐकली तर साधारण माणूस मनात आणले तर काहीही करू शकतो याची प्रेरणा मिळते.
मृत्यू हि अटळ गोष्ट आहे.यम आला कि हाताचा घास टाकून जावे लागते.
मात्र ती सावित्री आपल्या पतीचे प्राण परत मागून घ्यायला त्या यमाच्या पाठीमागे गेली.केवढी जिद्द तिची.अंगावर शहारे येण्यासारखा विषय.
अहो,तिने मृत्युच्या देवाकडे हट्ट केला कि माझ्या पतीचे परत परत दे.
आजवर यमाने घेतलेला प्राण कधीच परत येत नसतो हे माहिती असून सुध्दा ती सावित्री वेड्यासारखे पतीचे प्राण यमाला मागू लागते आणि यमाला ते परत द्यायला भाग पाडते.
काय विलक्षण इच्च्शक्ती असेल तिची ?
आपण या सणातून घ्यावे ते हे घ्यावे कि या जन्मात मरणाच्यासुध्दा पुढे जावून समाजाच्या हिताचे काहीतरी कार्य करावे.या जन्मी ते कारावेच पण जर पुनर्जन्म हि प्रक्रिया असेल तर नक्की पुढचा जन्म सुध्दा त्या ध्येयासाठीच व्हावा..!
काही लोक जर याला अंध्दश्रध्दा मानत असतीलही …पण जोवर शुध्द आध्यात्म समोर येवून सर्व मनुष्य स्वताच्या मनावर ताबा ठेवून वागू शकत नाहीत तोवर हे असले सनच आम्हाला जीवन समृध्दपणे जगायची प्रेरणा देतील..!

धन्यवाद

 

Vat Purnima Vrat Information In Marathi

You may also like...

5 Responses

 1. Nastik says:

  Chutya bananeke,dhande he ye

 2. Mayu vispute says:

  Vat purnima upvas vrat kuvarya muli shktat ka please lvkr sanga

 3. Aarti Gore says:

  Nice
  Is help to me my homework

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *