शेतकऱ्यांची आत्महत्या आणि कर्जमाफी?

चुकीच्या गोष्टी बरोबर मांडण्याचा प्रयत्न

अलीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे जोरदार राजकारण सुरु आहे, का नसावे? या आधीच्या राज्यकर्त्यांनी याच कुबड्यांवर लोकांची कृपा जिंकली. मुळात कर्जमाफी पेक्षा कित्येक पिढ्या शेतीच करत असताना; एका सामान्य शेतकऱ्याला २ ते ३ वर्षे बिनकर्ज शेती करता येऊ नये? आणि शेतीप्रधान देशात शेतकरी प्रत्येक वर्षी कर्ज काढावं लागण्या इतका दरिद्री का असावा? Farmers Suicide been a crucial issue, and is being take to wrong direction.

Farmer Suicides

Farmer Suicides

दारिद्र्याचं मूळ शोधायला खूप खोल जावं लागेल, पण थोडक्यात काय तर यंत्रणा योग्य नाही. कधी काळी शेतकऱ्याला भांडवल स्थानिक बाजारातून घेता येत असेल व तिथेच विकून नफाही होत असेल, पण आता भांडवल घरेदी करताना त्यांना सर्वीकडे एकच दर द्यावा लागतो, गाव असो वा तालुका, तरीही शेत मालाचा विक्री भाव ठरलेला नसतो. मुळात शेती उत्पादन विक्री हि इतर यंत्रणांसारखी एक तर केंद्रित नाही आणि शासन वा खाजगी नियंत्रणात नाही.

आत्महत्येच्या भावनिक भांडवलाचे शिकार होताना, हि गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, कर्ज हे जरी वरकरणी कारण असेल तर मूळ खूप खोल आहे, आणि त्याच निवारण कर्जमाफी नाहीये. तसेच इतरही अनेक उद्योग आहेत जिथे आत्महत्या होत आहेत व मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. जगात जवळपास ८,००,००० लोक दरवर्षी आत्महत्या करतात, त्यापैकी १७% आत्महत्या भारतात होतात, २०१४ मध्ये भारतात १,३२,००० आत्महत्या झाल्या होत्या. शेतीप्रधान देशात सर्वात पीडित घटक हा शेतकरी आहे, असा समाज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु आकडेवारी बघता दिसून येत, २७.६% आत्महत्या या घरघुती कारणांमुळे झालेल्या असून ३.३% आत्महत्या कर्जामुळे झालेल्या आहेत, त्यातही शेतकरी व इतर घटक मिळून. खाजगी / सरकारी क्षेत्रातील कर्मचारी यांनी कोणाकडे कर्जाचं गाऱ्हाणं गायचं? जोपर्यंत ते वोट-बँक ठरत नाही तोपर्यंत कोण त्यांचा वाली बनायला उतरेल?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा निश्चितच दुर्लक्ष करण्याचा विषय नाही, तितका गौण हि तो नाही, परंतु कर्जमाफी हा त्यावरील उपाय खचितच नाही. असे नेते होऊन गेले ज्यांनी कर्जमाफी दिल्या, आणि असा आव आणला जसा आपली संपत्ती विकून कर्जमाफी दिली असेल, दुसऱ्याच्या लग्नात जिलेबीचा आग्रह करायला आपल्या बापाचं काय जातंय? यांना खरंच काळजी होती तर कर्जमाफी नंतर शेतकऱ्याला योग्य हमीभाव, दुष्काळासाठी उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.

यावरती समाधान म्हणून केंद्रित किमान बाजारभाव, शेतमाल साठा / दळणवळण करण्याच्या सोयी, विमा, शासन नियंत्रित शेतमाल खरेदी व शेती उत्पादन विक्री इत्यादी उपाय हे नक्कीच दूरगामी ठरतील असे वाटते.

मी काही समीक्षक नाही, थोडं लिहावं वाटलं. काही चुका झाल्या असतील तर कळवाव्यात.

Farmers suicide and analysis.

You may also like...

2 Responses

  1. Yesss ur right….karjmafine sarvsamanya shetkaryachya samshyya sutanar nahit….karjamafi ha eka tatpurta upachar zala…nadi-jod prakalp,Shetisathi 24 tas vij,Shetmalala hami bhav yasarkhya basic sudharana karane garajeche ahe….

  2. Nikhil More says:

    तालुका स्तरावरील शेती उत्पन्न बाजार समिति चे नेमके काय काम असते ?
    विचारन्याचे कारण सभापती पदासाठी नेत्यांचे उंबरे झिजवन्यासह पाय देखिल चाटावे लागतात म्हणे…!
    अन एकदाचा सभापती झाला की साताऱ्याच्या ह्या वेसीपासून ते त्या वेसीपर्यंत फ्लेक्सच फ्लेक्स….!
    शाब्बास रे पट्ट्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *