बाबासाहेब पुरंदरे माहिती – Babasaheb Purandare Information In Marathi

Babasaheb Purandare Information In Marathi

Babasaheb Purandare

Babasaheb Purandare

बळवंत मोरेश्वर पुरंदरे
जन्म : जुलै २९, १९२२ (नाग पंचमी)

बळवंत मोरेश्वर पुरंदरे (Balwant Moreshwar Purandare), आपण यांना जास्तकरून बाबासाहेब पुरंदरे याच नावाने ओळखतो. यांचा जन्म महाराष्ट्रातलाच. याचं बहुतांश कार्य हे शिव छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित आहे, यामुळेच त्यांना शिवशाहीर असेही संबोधले जाते. बाबासाहेब जनमानसांना ओळखीचे झाले ते त्यांच्या “जाणता राजा” या शिवरायांच्या आयुष्यावर आधारित नाटका मुळे. जे फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश व गोवा येथेही प्रसिद्ध आहे. बाबासाहेबांनी शिवरायांसोबतच पुण्याच्या पेशव्यांचाहि गहन अभ्यास केला आहे. बाबासाहेबांनी १९७० च्या काळात माधव देशपांडे व माधव मेहेरे व बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेत मार्गदर्शन केले. ऑगस्ट १९, २०१५ रोजी बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

कार्य :

अगदी लहान वयातच बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर कथा लिहायला सुरवात केली होती, नंतर या सर्व कथा एकत्रित करून त्या “ठिणग्या” या पुस्तकाच्या रुपात प्रसिद्ध करण्यात आल्या. राजा शिव-छत्रपती, केसरी व नारायणराव पेशवे यांच्या आयुष्यावर लेहिलेले पुस्तक हे त्यांच्या आयुष्यातील प्रसिद्ध लिखाणे आहेत. परंतु १९८५ साली प्रसिद्ध झालेला “जाणता राजा” हा सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय असे नाटक होत, जे शिव-छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित होत. तेव्हापासून हे नाटक महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये तसेच आग्रा, दिल्ली, भोपाळ तसेच अमेरिकेतही ८६४ वेळा प्रयोग केला गेला आहे. मूळ प्रत मराठी व नंतर हिंदी मध्येही याचे भाषांतर करण्यात आले. हे नाटक २०० पेक्षा जास्त कलाकारांकारून रंगवले गेले आहे, तसेच यात हत्ती, उंट व घोड्यांचा सुद्धा समावेश होता. दरवषी दिवाळीच्या सुरवातीला याचे प्रयोग केले जातात.
नाटक क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना मध्य-प्रदेश सरकार कडून २००७-०८ साली “कालिदास सन्मान” हा पुरस्कार दिला गेला होता.

खाजगी आयुष्य :

बाबासाहेबांच्या पत्नी, निर्मल पुरंदरे, या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या पुण्यामध्ये “वनस्थली” संस्था चालवतात. त्यांचे ग्रामीण स्त्रियांसाठी व मुलांसाठीचे कार्य प्रख्यात आहे. मुलगी माधुरी पुरंदरे लेखक, चित्रकार व गायिका आहे. त्यांनी पाब्लो पिकासो वर पुस्तक लिहिले आहे.
बाबासाहेबांना २ मुले आहे, अमृत पुरंदरे व प्रसाद पुरंदरे. प्रसाद पुरंदरे यांचे नाटक व चित्रपट सृष्टीमध्ये प्रख्यात योगदान आहे.

 

You may also like...

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *