अँनि बेसंटबद्दल माहिती – Annie Besant Information in Marathi

जन्म : १ ऑक्टोबर १८४७
मृत्यू : २० सप्टेंबर १९३३
कामगिरी : भारतीय ब्राम्ह्विद्याशिक्षा विभागाच्या अध्यक्ष, स्वकीय कायदा संघटनेची स्थापना १९१६ व भारतासाठी स्वतःचा कायदा असावा या विचारांच्या पुरस्कर्त्या. भारतीय काँग्रेस पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्ष (१९१७-१९३३).

Annie besant information in marathi

Annie besant information in marathi

अँनि बेसंट या एक प्रमुख ब्रम्हवैदिक होत्या, तसेच समाजसुधारक, राजकीय नेत्या, लेखिका, वक्त्या सुद्धा होत्या. त्या मुळच्या आयर्लंड येथील होत्या परंतु त्यांनी भारताला आपले दुसरे घर बनवले होते. त्यांनी भारत स्वातंत्र्य युद्धात भारता साठी लढा दिला व भारतीय काँग्रेस पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या.

अँनि बेसंट यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४८ रोजी एका मध्यमवर्गीय घरात इंग्लंड मधील लंडन येथे झाला. त्या मुळच्या आयर्लंड येथून होत्या. त्या फक्त ५ वर्षांच्या असताना त्यांचे वडील मृत्युमुखी पडले. त्यांनी Harrow येथे मुलांसाठी बोर्डिंग स्कूल चालवून आपल्या परिवाराला सहाय्य केले. तरुण वयातच त्यांनी युरोप मध्ये फार भ्रमण केले व त्यामुळे त्यांचा विचारांच्या कक्षा रुंदावल्या.

अँनि चा विवाह १८६७ मध्ये फ्रांक बेसंट नावाच्या एका धर्मगुरू सोबत झाला. परंतु हा विवाह फार काळ टिकला नाही. १९७३ मध्ये त्यांनी त्याच्याशी कायदेशीर रित्या घटस्फोट केला. त्या वेळी त्यांना २ आपत्ये होती. त्यांच्यापासून वेगळे झाल्यावर फक्त स्वतःच्या इतक्या श्रद्धेवरच नाही तर परंपरागत विचारांवर त्यांचे प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यांनी आपल्या लेखणीने चर्च व त्यांचा लोकांच्या आयुष्याला नियंत्रण करण्याचा प्रकारावर हल्ले करण्यास सुरवात केली. त्यांनी खासकरून इंग्लंड च्या चर्च च्या पुतळ्यावर व लोक-पुरस्कृत विश्वासावर हमले केले.

त्यांनी सर्वधर्म समभाव, गर्भ नोरोधीपणा, समाजवाद, स्त्री हक्क व कामगारांचे हक्क यांसाठी लढाई सुरु केली. त्यांना ब्राम्हविद्या हा देवाला जाणायचा सर्वोत्तम मार्ग आहे या विचारांवर विश्वास होता. त्यांची ब्रम्हविद्या संघटना हि अनुवांशिकते वरून भेदभाव, लिंगावरून भेदभाव या विरुद्ध होती तर जागतिक एकतेची प्रसारक होती. मोठ्या प्रमाणावर मानवतेची सेवा हे या संघटनेच ध्येय होतं. ब्राम्ह्विद्या संघटनेच्या सदस्य म्हणून त्या १८९३ मध्ये भारतात आल्या.

त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यातून त्यांना ब्रिटिशां राज्यकर्त्यांकडून व शिक्षण व्यवस्थेकडून त्रासलेल्या मध्यमवर्गी भारतीयांबद्दल अधिक माहिती मिळाली. त्यांच्या शिक्षण सुधारणेच्या दीर्घ प्रयत्नांतून १८९८ मध्ये त्यांनी बनारस येथे सेन्ट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना केली.

त्यांनी १९१६ मध्ये भारतीय स्वातंत्र्य युद्धा मध्ये सहभाग घेतला, त्यांनी होम रूल लीग ची स्थापना केली ज्यांनी हिंदूंच्या स्वतःच्या कायद्यांचा पुरस्कार केला. त्या १९१७ साली भारतातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा झाल्या. हि पदवी सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी “New India” या वर्तमानपत्राची सुरवात केली, व ब्रिटीश राज्याविरोधी टीका केल्या, त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली कारावासाची शिक्षा झाली. गांधीच्या आगमनानंतर बेसंट आणि गांधी मध्ये वादावाद वाढली व बेसंट ने पक्षातून राजीनामा दिला.

अँनि बेसंट यांचा मृत्यू २० सप्टेंबर १९३३ रोजी अदयार (मद्रास) येथे झाला. त्यांच्या इच्चेनुसार त्यांच्या अस्थि बनारस येथे गंगा नदीत विसर्जित केल्या गेल्या.

स्त्रोत : विकिपीडिया

 

Annie Besant Information in Marathi

You may also like...

4 Responses

 1. Birth date mistek……

 2. shubham says:

  horror stories kdhi vachayla miltil aankhi

 3. Dayanand A. Mane says:

  Dear,
  Thank for provide us information this is use full for upgrade my knowledge.
  Please correct following point in your Annie Besant Information in Marathi

  1) Annie Besant DOB in para no 2 (जन्म १ ऑक्टोबर १९४८)
  2) Date of Divorce (१९७३ मध्ये त्यांनी त्याच्याशी कायदेशीर रित्या घटस्फोट केला)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *