कान्होजी जेधे – Kanhoji Jedhe Information in Marathi

कान्होजी जेधे ( Kanhoji Jedhe Information )  माहिती

कान्होजी जेधे आणि त्याचा पुत्र बाजी तथा सर्जेराव हे शिवकालातील जेधे घराण्यातील कर्तबगार पुरुष होते. पुण्यापासून दक्षिणेस सुमारे ५० कि.मी. अंतरावर असलेल्या भोरजवळच्या कारी या गावचे देशमुखी त्यांना आदिलशहाने दिली होती. शिवाजीराजेच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या आदिलशहाने फत्तेखान या सर्दारामार्फात सन १६४७ साली शहाजीराजेंना अटक केली होती, तेव्हा कान्होजी व दादाजी लोहकरे शहाजीराजेसोबत होते. पुढे सर्वांची सुटका झाल्यावर शहाजी राजे आदिलशहाच्या हुकुमावरून बंगरूळ या आपल्या नव्या जहागिरीच्या ठिकाणी आले असता त्यांनी कान्होजीला शिवाजी महाराजंकडे पाठवले.

शहाजीराजे त्यांना बोलले, “मावळप्रांती तुम्ही जबरदस्त आहा, राजश्री शिवाजी महाराज पण आहेत. त्यांकडे जमेतीनिसी तुम्हास पाठवितो. तेथे इमाने शेवा करावी, कलकला (बिकट प्रसंगी) तरी जिवावर श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे (मरण पत्करावे) तुम्ही घारोबियातील मायेचे लोक आहा. तुमचा भरोसा मानून रवाना करतो (जेधे करीना).

शहजीराजेंचे हे बोल म्हणजे आज्ञा मानून कान्होजी शिवाजीराजेंकडे आले आणि म्हणाले, “महाराजांनी (शहाजी) शफत घेऊन साहेबांची सेवेशी पाठविले. तो इमान आपला खरा आहे. खासा व पाच जन लेक व आपला जमाव देखील सहेबापुढे खस्त खातील.

याच सुमारास सब १६४९ साली अफझलखानने जावळीवर स्वारी करायचे ठरवले व आदिलशहाच्या वतनदारांना फर्मान पाठवले व आपण्या सोबत येण्याचे सांगितले. खानाच्या फर्मानास घाबरून केदारजी व खंडोजी खोपडे खानास मिळाले. फलटनचे निंबाळकर पूर्वीपासून आदिल्शासोबत होते. पण कान्होजी जेधे आपल्या पाच पुत्रांसह सरकारी येउन राजेंना भेटला व बोलला “यापुढे खस्त होऊ (मरण स्वीकारू) तेव्हा आमचे वतन कोण खावे. आम्ही इमानास अंतर देणार नाही.” यानंतर राजेंचा निरोप घेऊन कान्होजी कार्जी आपल्या गावी आले, व मावळातील समस्त देशमुखांना बोलवून शिरायांना मदत करण्यास सांगितले.

।। कन्होजी जेधे यांचे रोहिडा काल्ल्यावरील वाड्यातील देवघर ।।

।। कन्होजी जेधे यांचे रोहिडा काल्ल्यावरील वाड्यातील देवघर ।।

 

कान्होजी समस्त देशमुखांना म्हनाले. “अफझलखान बेईमान आहे, कार्य जालियावरी नस्ते निमित्य घेऊन नाश करील, हे मार्हष्ट आहे. अवघीयांनी हिम्मत धरून जमाव घेऊन राजश्री. स्वामी सांनिध राहोन एकनिष्ठेने सेवा करावी, यैशा हिमतीच्या गोष्टी सांगितल्या. ” यावर सर्व देशमुखांनी राजेंकडे जाउन आपले इमान व्यक्त केले. अडचणीच्या वेळी मावळातील सर्व देशमुखांना एकत्र करण्याचे काम कान्होजीने करून राजांना मोठी मदत केली.

प्रतापगडाच्या लढाईत कानोजीचा पुत्र बाजी याने जीवा महालासोबत राहून महाराजांचे प्राण वाचवले. तर खानाचा पदाव झाल्यावर कान्होजी आपल्या सैन्यासोबत खानच्या सैन्यावर तुटून पडला व हत्ती, घोडा, नौबती, नगारे, बिशाडी, खानाचा खजाना मिळवला. शिवाजीराजेंनी सन १६५५ साली जावळीच्या मोर्यास शासन केले. त्यावेळी कान्होजी, बांदल, सिलिंबकर व इतर देशमुखांनी त्यांना सहकार्य केले.

शायीस्तेखानाविरुद्ध लढण्यासाठी बाजी व चंद्रजी हे कान्होजीचे दोन पुत्र राजेन्सोबत लालमहालात गेले होते, राजे तोरणा, राजगडाच्या बांधणीत गुंतले विजापुरी सरदार फत्तेखान याने अचानक पुणे परिसरावर हल्ला केला. राजे तातडीने कान्होजीस घेऊन पुरंदरावर आले, मराठ्यांचे गानिमांबरोबर धारोन्धर युद्ध झाले, अनेक मावले मृत्युमुखी पडले, पराभव झाल्यावर मराठ्यांचा ध्वज शुतृच्या हाती लागू नये म्हणून बाजीने काही गनिमास यमसदनी धाडून ध्वज पुरंदरावर आनला. तेव्हा राजे निशाण सांभाळून आणले म्हणून खुश झाले व त्यास सर्जाराई असा किताब दिला. पुढे बाजी सर्जेराव या नावाने ओळखला जाऊ लागला.

पुढे छत्रपती राजाराम च्या कालखंडात सर्जेराव ने आपल्या पित्याप्रमाणे कामगिरी करत औरंगजेबाविरुद्ध मावळातील देशमुखांना एकत्र केले. स्वराज्यासाठी जेधे घराण्याने मोठे योगदान केले आहे.

Kanhoji Mausoleum on Rohida Fort

कान्होजी यांची रोहीडा किल्ल्यावरील समाधी.

 

 

 

 

 

You may also like...

10 Responses

 1. Milind Jedhe says:

  Need photographs

 2. Harish Govindrao Jedhe Deshmukh says:

  स्वराज्यसंरक्षक कान्होजी जेधे देशमुख यांचे समाधीस्थळ आंबवडे ता.भोर जि.पुणे येथे आहे.

 3. vaibhav salekar says:

  kanoji jedhe are brave mavla
  aamche gav aambavade shedage mama

 4. Rupesh Gopinath Jedhe says:

  Swarajyat sarvaani Chatrapti Shivaji Maharaaj
  Yaanna sarv marathi sardar ani marathi mavlyanni kelelya hindvi swarajya mule aaj aapan sarv marathi bandhav ektra rahto aahe
  Jai Bhavani Jai Shivaji

 5. Mayur borse says:

  कान्होजी जेधेंच्या म्रुत्यूबाबत माहिती मिळेल का ?

 6. सरदार कान्होजी जेधे देशमुख
  याचा पुर्ण इतिहास लिण्याकरिता मला मदत करा

 1. August 29, 2014

  […] कान्होजी जेधे […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *