बाजी पासलकर – Baji Pasalkar

बाजी पासलकर – Baji Pasalkar

बाजी पासलकर हे मोस मावळखोर्याचे वतनदार. निगडे मोसे गावापासून सागरून-डावेजापासून, धामण-ओव्होळपर्यंत ७४ खेडी त्यांचा वतनदारी होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते. तंटे सोडविण्यात ते हुशार होते. इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या. पहिले बाजी बेलसरच्या युद्धात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबर युद्धात मारले गेले.

baji

छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरवात केली. तोरणा, शुभानमंगळ, रोहिदा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

फत्तेखानाने जेजुरीजवळ बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करुन किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोट वर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखान वर हल्ला करण्यासाठी बाजी पालसकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फात्तेखांचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गानिमांची कत्तल केली. फात्तेखांचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. अखेरीस गोदाजीच्या वीराने मुसेखानाच्या छाताडाचा वेद घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.

यदुनाथ सरकारांच्या मते काय सावंताच्या युद्धात बाजी मरण पावले (हे सवाई बाजी असावेत). सभासदाच्या बखरीत या युद्धाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. राज्पुरीहून काय सावंत म्हणोन पांच हजार फौजेनिशी युद्धास आला. युद्ध मोठे होतां बहुत रणखंदल जाले. काय सावंत खास व बाजी पासलकर महायोद्धा, याच्या मिश्या दंडायेवढ्या, यांस पीळ घालून वारी केशांच्या आधारे निंबे दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला, याशी व त्याशी खासाखाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार मारले. मग उभायान्ताकडील दळ आपले जागीयास गेले.

बाजी पासाल्कारांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे पण दुर्दैच असे कि याच धरणाच्या जलाशयात त्यांचा चिरेबंदी वाडा तसेच त्यांच्या वंशजांची शेकडो एकर जमीन बुडाली आहे, याचा मोबदला त्यांना शासनाकडून अजूनही मिळालेला नाही. त्यांचे वंशज आजही त्यांच्या स्मृती जतन करायचे काम करत आहेत.

।।शूरवीर बाजी पासलकर ।।

You may also like...

20 Responses

 1. I used to be able to find good advice from your articles.

 2. Varun Pasalkar says:

  Good work to keeping this info

 3. HARIDAS SONABA PASALKAR says:

  great guide line for the pasalkar family. I am totally agreed the last Para. I am an Ex Service man and personally requesting to the Govt. of Maharashtra pls. look in this matter for survival of the history.

 4. sunil kanlod says:

  Nice information about Ranayodha Baji pasalkar .pl.add some. more information.thank You.

 5. Santosh Pasalkar says:

  Very nice information we proud of our self that Baji Pasalkar was from our family

 6. Abhay jadahav says:

  Are mavlyano Marathi bola vachato Marathi lihato Marathi pan comment patavto English mala pan maf kara karan mi English made lihale ahe pan uchar maratit kela ahe jay Maharashtra

 7. Abhay jadahav says:

  Mavala vachun mala khup chan mahiti bhetali kiti trass sahan kele aplya sati aplya mavlyani mard maratha jay Maharashtra

 8. प्रणित परब says:

  त्यांचे वंशज आज कुठे राहतात काही माहिती मिळेल का???

 9. Sachin says:

  Punyat ahet shree rajaram urf rajabhau ani shrkrishna pasalkar Mumbai

 10. विक्रम दत्तात्रय पासलकर says:

  स्वराज्याच्या पहिल्या बलिदानाचे धनी शूरवीर बाजी पासलकर…! पासलकर परिवाराचे नाव बाजींनी पुढच्या अनेक पिढ्यानसाठी अजरामर करून ठेवले…..😢

 11. Kiran sathe says:

  Matanga kulachi shan baji pasalkar .an raghoji mavale..

 12. MAHESH says:

  Can i get contact details of any one from baji pasalkar family.

 13. Nikhil says:

  Very Baji Pasalkarana Shat shat pranaam .. ashya lokan mulech Maharashtra Dharma Ani Hindu Dharma tikun rahila…

 14. Akash says:

  Srvat pahile 1 smjun ghya Hindu dhrma nsun culture ahe.. I am proud of my india anyway bhrastha sarkar kay denar tyanchya varsanna jamin or mobadla..

 15. vishal v jagadale says:

  VEER BAJI Pasalkar yanchi birth date and dead Date samjel kay

 1. August 28, 2014

  […] बाजी पासलकर […]

 2. August 28, 2014

  […] बाजी पासलकर […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *